Wednesday, 20 May 2015

विदर्भ उष्णतेच्या तडाख्यात तापमानाचा उच्चांक

विदर्भात सद्या प्रचंड ऊन तापत असुन ह्या आठवडयात तापमानाने उच्चांक गाठला आज सर्वाधिक तापमान वर्धा व चंद्रपूर येथे ४७. ५ पर्यंत गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ह्या आठवड्याची सुरवातच जास्त तापमानाने झाली रविवारपासूनच सूर्य प्रचंड उष्णतेने तळपू लागलाय यवतमाळ येथेही सोमवारी तापमान ४५. ६ इतके नोंदले गेले राजस्थान मधुन वहात येणाऱ्या उष्ण वारयामुळे  उन्हाची तीव्रता वाढली असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येतेय रविवार पासूनच नागपूरच्या तापमानाचा पारा ४६ अंशाच्या वर गेला असल्याची चर्चा होती त्या मुळे रस्त्यावर शुकशुकाट होता सकाळी नऊ  पासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत होत्या
उन्हाच्या तीव्रते मुळे लोक आवश्यक कामानिमित्यच  बाहेर पडतात उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक डोक्याला स्कार्फ,शेला बांधून डोळ्याला गॉगल लावुन बाहेर पडताना दिसतात  दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य झाले आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी थंड पेय सरबत,रसाच्या गाडया उभ्या असून लोक तिथे उन्हापासून बचाव करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत
ह्या वर्षी अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे इतके दिवस ऊन जाणवले नाही पण आता मात्र उन्हाची तीव्रता दररोज वाढतच आहे मंगळवारी  वर्धा येथे सर्वाधिक ४७.५ इतके तापमान नोंदले गेले त्या नंतर नागपूर ,चंद्रपूर अकोला येथे ४६ अंश सेल्सिअस तापमान होते  मागच्या वर्षी नवतपाच्या उन्हाने वैदर्भीय त्रासले होते यंदाही तापमान वाढतच आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे कुलरची हवा ,माठातले पाणीही गरमच असते शिवाय दिवसभरच्या उन्हामुळे नळातून येणारे पाणीही गरम असते  अजून एकदोन दिवस तापमान असेच राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलाय  विदर्भात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा उष्माघाताने बळी गेल्याची नोंद झाली आहे सध्या मे महिन्याचे शेवटचे दिवस असून लवकरच नवतपाचे (अत्तुच्च उष्णतेचे ) ऊन पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय

                                

No comments:

Post a Comment