झी मराठी channel वर नव्यान सुरु झालेली दिल दोस्ती दुनियादारी हि मालिका पदार्पणातच लोकांच्या पसंतीस उतरलीय सद्याच्या सासुसुना ,कटकारस्थान आणि इतर मालमसाल्याच्या मालिकांना कंटाळलेला प्रेक्षक वर्ग दिल दोस्ती कडे वळल्यास नवल नाही दिल दोस्ती दुनियादारी मधले तरुण ,तरुणी कामाच्या शोधात मुंबईत आलेले आणि जागेच्या टंचाईमुळे flat शेअर करणारे अचानक flat मध्ये राहण्यासाठी मिनल रेशमा ह्या विवाहित तरुणीला घेवून येते .ती आधीही तिला भेटलेली असल्याने तिची कहाणी ऐकून तिला घरी आणते पण flat मधले इतर तिला त्यांच्यासोबत राहू देण्याच्या विरोधात असतात कारण रेशमा त्यांना रेल्वेत भेटलेली असल्याने ती खोटे बोलतेय अस त्यांना वाटत मग तिला घालविण्यासाठी सारे खूप प्रयत्न करतात तिच्यावर चोरीचा आळ आणतात पण नंतर रेशमा सुखी संसाराचे स्वप्न घेऊन मुंबईत आलीय पण घराचा उंबरठा ओलांडताच तिचा पती राकेश तिचा स्वप्नभंग करीत तिला त्याच्या लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीबद्दल सांगत,घटस्पोट मागतोय आणि तीच इथे कोणी नाही आणि ती हे घरी सांगू शकत नाही हे कळताच सारे तिला घरी घेऊन येतात,मानसिक आधार देतात आणि तिच्या आईवडिलांना हि गोष्ट कळू नये म्हणून धडपडतात आणि कथानक सुरु होते.
Flat मधील सुजय,आशु, कैवल्य,Anna ,मिनल आणि रेशमा ह्यांच्या एकत्र राहण्यातून येणारया अडचणी उडणारे खटके आणि होणारया संघर्षातून घडणारया गमतीजमती प्रेक्षकांना हसवतात हा flat सुजयच्या काकांचा आहे तो आय टी कंपनीत काम कारतो त्या मुळे सतत laptop घेऊन बसलेला व्यवहारी तरुण इतर चौघांना आपला flat भाडे घेऊन शेअर करतो. कैवल्य श्रीमंत घरातला पण गिटार प्रेमामुळे घर सोडून आलेला आणि संगीत क्षेत्रात नाव कमवण्यासाठी संघर्ष करतोय ,लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरवलेला आशु गुन्हेगारी परिसरात वाढलेला त्या मुळे सतत त्याच सावटाखाली राहणारा शिकण्यासाठी मुंबईत येतो आणि जगण्यासाठी वाढदिवस आरेंजर म्हणून काम करतो ,तर Annaही चांगल्या कुटुंबातली कॅथलिक ख्रिश्चन तरुणी assistant fashion डिझायनर म्हणून काम करतेय तर मिनल सिनेविश्वात मिळेल त्या भूमिका करत संघर्ष करतेय सारयांनाच पैशाची कडकी.
ह्या मालिकेतली मीनलची challenging ,dashing modern ,रोकठोक Tom बॉयीश भूमिका स्वानंदी टिकेकर म्हणजेआरती टिकेकर व उदय टिकेकर ह्यांच्या कन्येन उत्तम वठवलीय तिचा अभिनय सहज सुंदर आहे आणि विशेष म्हणजे तरुणाईला ती खूप आवडतेय. सखी गोखले ह्या शुभांगी व मोहन गोखलेच्या कन्येनही रेशमाची साधी सरळ ,दुसरयांच्या मदतीला धावणारी ,अस्ताव्यस्त घराला व इतरांना वळण लावणारी उत्तम कुक पण हळवी सतत रडणारी भूमिका तितक्याच सहजतेन पेललिय ,इतरांचे विनोद जरा उशिराने लक्षात येणारी प्रांजळ आणि गोड ख्रिश्चन तरुणी Anna पूजा ठोंबरे उत्तम साकारतेय. इंग्लिश शिकण्याची आवड असणारा पण शिकू न शकलेला लोकांच्या मदतीला धावणारा आशु पुष्कराज चीरपूटकर छान साकारतोय ,अमेय वाघ हा सिनेनाट्य कलावंत त्या मुळे त्याची भूमिका एकदम सरस त्यान रोकठोक आत्मकेंद्री बेफिकीर सडेतोड कैवल्यची भूमिका उत्तमपणे पेललीय तर सुव्रत जोशीही व्यवहारी आयटी तरुण सुजयच्या भूमिकेत फिट आहे.
कैवल्यवर लाइन मारणारी प्रगल्भाची एंट्री असो कि आशूच्या गुजराती मैत्रिणीच्या एन्ट्रीचा एपिसोड धमाल उडवून देणारा आशुच त्याच्या मैत्रिणीसाठी (किंजल) इंग्लिश शिकण प्रेक्षकांची अफलातून करमणूक करत एकंदरीत हि थोडीशी आगाऊ कार्टी मनान चांगली ,कधी एकमेकाशी भांडणारी तर कधी समजून घेणारी ,अडचणीच्या वेळेस धाऊन जाणारी कधी रेशमाला रडवणारे तर कधी तीच कौतुक करणारे हे तिचे दोस्त तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करतात तेही विनोदाची पेरणी करत हा एपिसोडही लोकांना भरभरून हसवून गेला हे दोस्त तिला वेळोवेळी सावध करत ह्या जगात राहायच तर पक्क व्हायला हव हे शिकवतात सारेच कलावंत लाजवाब ,मस्त आणि दिलखुलास हसवणारे ,कधी धमाल मस्ती गोंधळ तर कधी कोपरखळी मारत ,शाब्दिक कोटी करत,हळुवार चिमटे काढत लोकांना हसवणार हलक फुलक कथानक असणारी हि मालिका तरुणाईला आपल्या जवळची वाटतेय कारण आता जागेच्या टंचाई मुळे पुण्या,मुंबईत करीअर करण्यासाठी आलेली तरुणाई एकच flat शेअर करतेय
पण रेशमाला घालवण्यासाठी कैवल्यच भिकारयाला आणण त्याचा चाटून पुसून खाल्लेला बाऊल परत मागण( कुणीही भिकारयाला दिलेल्या बाऊलमध्ये खाणार नाही,मुळात भिकारयाला घरात घेणार नाही)
आणि फराळासाठी उपमा पोहे च नाव घेत रेशमाच इडली सांबाराची प्लेट हातात देण ह्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास मालिका उत्तम

No comments:
Post a Comment