गेल्या जवळपास महिनाभरापासून सुरु असलेला सफाई कामगारांचा संप अखेर मिटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला गेल्या महिना भरात संपामुळे घंटागाडी कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी येत नव्हते त्या मुळे कचरा नियमित घंटागाडीत टाकण्याची सवय झालेल्या नागरिकांना कचरा कोठे टाकावा हा प्रश्न पडला होता नागरिकांनी सतत तक्रारी केल्यानंतर नगर परिषदेतर्फे मधून अधुन ट्रक फिरवून कचरा गोळा केल्या जात होता पण तरीही दररोजच्या कचरयाचा प्रश्न होताच काहिंनी रस्त्यावर कचरा टाकल्याने स्वच्छ व सुंदर यवतमाळात कचरयाचे ढीग साचु लागले होते साचलेल्या ढीगामुळे आधीच डासांच्या त्रासाने त्रस्त असलेले यवतमाळ मधले नागरिक कचरा उचलल्या न गेल्याने वाढलेल्या डासामुळे ,दुर्गंधीमुळे व त्यात मनसोक्त फिरणारया डुकरांच्या त्रासाने वैतागले होते पण अखेर घंटा गाडीवाल्या कर्मचारयांचा संप मिटला व घंटा गाडी सकाळी कचरा गोळा करण्यासाठी घरापुढे आली आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला
No comments:
Post a Comment