शास्त्री नगर येथे गुरवार दि. ७ तारखेला होणारा पाणी पुरवठा सायंकाळ पर्यंत झालाच नाही विशेष म्हणजे यवतमाळ येथे दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येते तेही कमी दाबाने अचानक पाणी न आल्याने बायकांची तारांबळ उडाली ह्या बाबतीत विचारणा करण्यासाठी पाणीपुरवठा कार्यालयात फोन केला असता तो उचलण्यात येत नव्हता वारंवार फोन करूनही जेव्हा फोन उचलल्या गेला नाही तेव्हा सकाळ कार्यालयाशी संपर्क साधला असता व्हाल्व बिघडल्याचे व उशिराने पाणी सोडण्यात येणार असल्याचे कळाले.शेवटी संध्याकाळी कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधला तेव्हा पाणी सोडल्या जाईल असे सांगण्यात आले अखेर उशिराने पाणी आले तेही अत्यंत कमी दाबाने त्या मुळे नागरिकांना दोन दिवस पुरेल एव्हडा पाणीसाठा करता आला नाही विशेष म्हणजे व्हाल्व नादुरुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठा उशिराने होईल अशी बातमीही दैनिकांना देण्यात आली नव्हती किंवा फोनवरून नागरिकांनाही सांगण्यात येत नव्हते पूर्वी पाणीपुरवठा होणार नसला किंवा काही अडचणी आल्यास रिक्षा फिरवून नागरिकांना सुचित करण्यात येत होते पण आता रिक्षाही फिरवल्या जात नाही आणि ऑफिस मधले फोन रिंग वाजत असूनही उचलल्या जात नाहीत
ह्या वर्षी मधून आधुन सतत पाऊस,गारपीट झाल्याने पाणी जून पर्यंत पुरेल इतके शिल्लक असल्याचे सांगण्यात आलेय तरी देखील गेल्या अनेक वर्षापासून एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा दोन दिवसांनीच होतो पावसाळ्यात भरपूर पाऊस,पूरस्थिती येऊनही लोकांना मात्र कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते कारण पूर आल्यानंतर पाणी धरणाची दारे उघडुन रस्त्यावर सोडले जाते त्या मुळे नागरिकांचे नुकसान होते शिवाय पाणी नियोजन योग्य प्रकारे न केल्याने भरपूर पाऊस पडूनही लोकांना नियमित पाणी पुरवठा होत नाही पूर्वीप्रमाणे लोकांना नियमित पाणी पुरवठा करावा व त्यात येणारया अडचणींचे लवकरात लवकर निवारण करावे अशी नागरिकांची मागणी आहे
No comments:
Post a Comment