Saturday, 13 December 2025

स्वर्णगिरी व्यंकटेश स्वामी मंदिरात तेलगु अभिनेता संदीप माधव ह्यांच्या राम बजरंग सिनेमाच शुटिंग

         स्वर्णगिरी मंदिरातील पाण्यातील विष्णूची सुंदर मूर्ती 

 स्वर्णगिरी मंदिर -12 डिसेंबर 

हैद्राबाद पासून जवळ स्वर्णगिरी पर्वतावरील निसर्गरम्य परिसरात नव्यानेच निर्माण झालेले व्यंकटेश स्वामी मंदिर म्हणजे दाक्षिणात्य द्रविडीयन शैलीतील उत्कृष्ठ वास्तुकलेचा अप्रतिम नमुना ह्या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे मंदिराच्या मागच्या भागात खाली छोट्या तळ्यातील पाण्यात विष्णूची काळ्या दगडात कोरलेली अप्रतिम सुंदर मूर्ती आणि वर डोंगरावर विष्णूची बारा फूट उंच मूर्ती असलेले आणि लक्ष्मीची आकर्षक मूर्ती असलेले प्रमुख मंदिर आणि इतरत्र छोटी देवांची मंदिरे बाहेर हनुमानाची भव्य मूर्ती आहे इथे येणाऱ्या भाविक पर्यटकांना इथल्या भक्तीमय वातावरणा बरोबरच तळ्यातील विष्णूची अप्रतिम मूर्ती आकर्षित करते इथे देखील तिरुपती ,तिरुमला देवस्थाना प्रमाणेच दररोज वेगवेगळ्या पूजा अर्चना अभषेक वै केल्या जातात 2018/2024 दरम्यान ह्या मंदिराची निर्मिती तज्ज्ञ वास्तुशास्त्रज्ञ आणि प्रथितयश उद्योगपती ह्याच्या सहकार्याने झाली आहे मंदिर नवीन असल्यामुळे आता हळूहळू त्याचा लौकिक वाढत आहे ह्या मंदिराची कीर्ती सर्वत्र पसरत असतानाच इथल्या निसर्गरम्य पवित्र वातावरणात सिनेमाचे शुटिंग करण्याची इच्छा सिनेदिग्दर्शकांना देखील झाली नऊ डिसेंबरला प्रसिद्ध तेलगू अभिनेता संदीप माधव ह्यांच्या राम बजरंग ह्या सिनेमातील गाण्याचे शूटिंग इथे झाले 

स्वर्णगिरी मंदिरात नेहमीप्रमाणेच भाविकांची गर्दी तिकीटाची रांग,दर्शनाची रांग,लक्ष्मी विष्णू आणि हनुमानाच्या भव्य मूर्तीच्या दर्शनाने तृप्त झालेल्या पर्यटकांची पावले आपसूकच मंदिराच्या मागे तळ्यातील झोपलेल्या विष्णूचे अप्रतिम सौन्दर्य पाहण्यासाठी तेथील सौदर्य कॅमेराबद्ध करण्यासाठी वळलेली सगळ्यांचीच फोटो काढण्यासाठीची धडपड तेथील निखळ निळ्या पाण्यातील फवारे आणी त्यातील मुर्ती सौन्दर्य आणि स्वत:ची छबी कॅमेराबद्ध करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात मग्न दर्शनानंतर तिरुपती सारखेच चिंचेचा भात (पुलिआरु)आणि लाडूचा प्रसाद घेण्यासाठी गर्दी अर्थात रांग आणि बायकांची नारळ फोडण्यासाठीची लगबग इथे बायका सहजतेने नारळ फोडत होत्या 

अशातच मंदिरात सिने दिग्दर्शकाची सिनेमाचे गाणे शूट करण्यासाठीची तयारी सुरू होती सिने कॅमेऱ्यासाठी ट्रॉली त्या साठी रूळ ठेवलेले दिसले तेव्हा पहिल्यांदा तिरुपती प्रमाणे वेगवेगळ्या सेवाचे लाईव्ह चित्रण होत असेल असे वाटले पण हळूहळू तेथे स्पॉटबॉय,सहाय्यक कर्मचारी,हिरोला ऊन लागु नये म्हणून छत्री धरलेला स्पॉट बॉय दिसला  सहज चौकशी केली तेव्हा तिथल्या तेलगू भाषिक सहाय्यकाने तिथे बजरंग बाजी सिनेमातील गाण्याचे शूटिंग होणार असल्याचे ह्या सिनेमातील हिरो प्रथितयश पण हिरोईन नवोदित असल्याचे सांगितले लंच ब्रेक असल्याने त्यांचे जेवण सुरु असल्याने त्यांना यायला वेळ होता अर्थातच भाषा प्रॉब्लेम आला पण  हिंदी आणि इंग्रजीत संवाद साधला 

                                       

काही वेळातच इथे शुटिंग सुरु असल्याची बातमी सर्वत्र पसरली तेलगू भाषिक भाविक आणि इतर उपस्थित पर्यटकांची तेथे गर्दी जमली समोर प्रोड्युसर मॅडम आणि दिग्दर्शक बसले होते संदीप माधवन येताच सर्वांनी टाळ्या वाजवत जल्लोष केला कोरिओग्राफरने हिरो संदीप ह्यांना आणि डान्स ग्रुप मधील सर्व कलाकारांना नृत्याच्या स्टेप दाखवल्या,रिहर्सल झाली त्या नंतर Action,Cut Retake चा सिलसिला सुरु झाला दहाबारा रिटेक नंतर दिग्दर्शकाच्या मनाप्रमाणे स्टेप झाल्यानंतर डान्स मधील काही ओळींचे शूटिंग OK झाले विशेष म्हणजे सिनेमाचे हिरो संदीप ह्यांनी ह्या सर्व स्टेप्स समजून घेत न थकता तेव्हढ्याच जोशात शूटिंग पूर्ण केले .

                                 

त्यांच्याशी बोलण्याची त्यांच्या विषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याने आधीच त्यांच्या सहाय्यकातर्फे परवानगी घेतली होती मधल्या काही वेळात फ्रेश झाल्यानंतर संदीप ह्यांनी त्यांच्या विषयी,ह्या सिनेमाविषयी माहिती दिली वेळ खूप कमी होता तरीही त्यांनी संवाद साधला ते म्हणाले ह्या आधी त्यांनी तीनचार सिनेमात हिरोचे काम केले आहे आता राम बजरंग सिनेमाचे शूटिंग सुरु आहे त्यातील गाण्यातील हा शेवटचा काही भाग इथे चित्रित होत आहे त्यांना ह्या सिनेमाविषयीच्या भावना काय असे विचारले तेव्हा त्यांनी खूप छान! असे सांगत जास्ती माहिती तुम्हाला सिने दुग्दर्शक सांगतील असे म्हटले ते कुठे आहेत असे विचारल्यावर त्यांना बोलवून त्यांची ओळख करून दिली तुमची हिरोईन कुठे आहे असे विचारल्यावर ह्या गाण्यात तिचे काम नाही असे सांगितले दिग्दर्शकांनी तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का?असे विचारत हा सिनेमा मराठीत पण येणार असून  राम बजरंग  हा सिनेमा उन्हाळ्यात रिलीज होईल असे सांगितले ह्यात श्रद्धा आणि व्यक्तिगत स्टोरी देखील आहे असे सांगितले ! 

                               

                        तेलगू अभिनेता संदीप माधव व सिने दिग्दर्शक सिनेमा विषयी संवाद साधताना 

तेलगू अभिनेते संदीप माधव हैदराबादचे रहिवासी आहेत शाळा कॉलेज मध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनय आणि खेळाची आवड आहे सुरवातीच्या काळात त्यांनी लोफर ,ज्योती लक्षमी ह्या सारख्या सिनेमात काम केले त्यांनी नाटकातही हिरोच्या भूमिका केल्या 2012 मध्ये त्यांनी रेल्वे स्टेशन ह्या सिनेमात काम केले  2013 मध्ये दलम आणि जॉर्ज रेड्डी ह्या सिनेमाचे दिग्दर्शक जीवन रेड्डी ह्याच्या सोबत त्यांनी अभीनयासोबतच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले हा सिनेमा उस्मानिया युनिव्हर्सिटी मधील विध्यार्थी युवा नेत्याच्या जीवनावर आधारित होता  राम गोपाल वर्मा दिग्दर्शित Vangaveeti ह्या सिनेमातील त्यांची हिरोची भूमिका लोकप्रिय झाली 

संदीप माधव ह्यांची निगर्वी आणि सहजतेने त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधण्याची वृत्ती त्यांना भविष्यात लोकप्रियता आणि यशाच्या मार्गावर नेईल ह्याची खात्री पटते राम बजरंगचे दिग्दर्शक सुधीर रेड्डी देखील निगर्वी आहेत 

Monday, 1 December 2025

अंतराळवीरांनी स्थानकातून पृथ्वीवासीयांना Thanks Giving Day निमित्त शुभेच्छा दिल्या

 

नासाचे अंतराळवीर Zena Cardman ,Jonny Kim ,Mike Fincke आणि जपानचे अंतराळवीर Kimiya Yui लाईव्ह संवादा दरम्यान स्थानकातून Thanks Giving Day च्या शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था 

 

नासा संस्था -1 डिसेंबर 

अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील चवथ्या गुरुवारी Thanks giving Day उत्साहात साजरा केल्या जातो अमेरिकन नागरिक त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक आणि मित्रांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात सर्वजण एकत्र येऊन पार्टीचे आयोजन करतात आणि वेगवेगळ्या खास पारंपारिक पदार्थांचा समावेश असलेल्या मेजवानीचा आस्वाद घेतात पृथ्वीपासून दूर अंतराळ स्थानकात तरंगत्या अवस्थेत राहणाऱ्या अंतराळवीरांना मात्र कुटुंबियांसोबत हा डे साजरा करता येत नाही पण अंतराळवीर स्थानकातील मित्रांसोबत स्थानकात हा दिवस साजरा करतात पार्टी करून पृथ्वीवरून त्यांच्यासाठी आलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधून पृथ्वीवरील कुटुंबियांशी संवाद साधतात आणि Thanks giving Day च्या शुभेच्छा देतात  

ह्या वर्षी देखील सध्या स्थानकात वास्तव्यास असलेले नासाचे अंतराळमोहीम 73 चे अंतराळवीर Zena Cardman, Mike Fincke,Jonny Kim आणि जपानचे अंतराळवीर Kimiya Yui ह्या चौघांनी Thanks Giving Day च्या आधी नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधत पृथ्वीवासीयांना Thanks Giving Day निमित्त शुभेच्छा दिल्या 

Zena -"Hello,स्थानकात तुम्हा सर्वांचे स्वागत,आम्ही आता येणाऱ्या काळातील सणांच्या सुट्ट्यांचा विचार करतोय आणि तुम्हाला शुभेच्छाही देतोय! Jonny Thanks Giving Day बद्दल तुझ मत काय आहे तुझ्यासाठी किती महत्वपूर्ण आहे हा दिवस?

Jonny -"माझ्यासाठी Thanks Giving Day म्हणजे आपल्या आयुष्यातील काही काळ थांबून आपल्याला प्रेरित करणाऱ्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानण्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस Thanks Giving म्हणजे Pause,Slowdown & Reflect! प्रामुख्याने ह्या वर्षाबद्दल बोलायच झाल तर मला इथे स्थानकात तुमच्यासोबत वास्तव्य करायला संशोधन करायला मिळाल माझ्यासाठी हे अभिमानास्पद आहे तुमच्या सहकार्याबद्दल मैत्रीबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो पण त्याचवेळी मी जेव्हा माझ्या कुटुंबियांबद्दल मित्राबद्दल विचार करतो तेव्हा इथे मला त्यांची उणीव भासते मला इथे येण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल,मला वेळोवेळी साथ दिल्याबद्दल मी त्या सर्वांचे एका शब्दात आभार मानतो त्यासाठी एक संबंध पुरेसा आहे Its Just gratitude !" Kimiya तुझ काय मत आहे ? 

Kimiya -"आमच्या जपानमध्ये Thanks Giving Day नसतो पण इथे स्थानकात वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर एकत्र वास्तव्य करतात संशोधन करतात तेव्हा आपण सगळ्यांच्या संस्कृतीचा आदर करतो खरच Thanks Giving Day ची पद्धत खूप चांगली आहे आपल्याला मदत करणाऱ्याबद्दल जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते मी पण तुमच्यासोबत हा दिवस साजरा करणार आहे तुमच्या सोबत डिनरमध्ये सहभागी होऊन तुमच्या स्पेशल पदार्थांचा आस्वाद घेणार आहे तुमचा काही स्पेशल प्लॅन आहे का ?

Mike - "Thanks giving day च्या जेवणातील पदार्थांचा आस्वाद घेण मला खूप आवडत ह्या वर्षी स्थानकातील हा माझा दुसरा Thanks giving day आहे त्या मुळे त्याला विशेष महत्व आहे मागच्या वेळेस Shuttle Crew सोबत हा दिवस साजरा केला आणि ह्या वेळेस तुमच्या सोबत साजरा करणार आहे आता सोयूझ मधून नवीन अंतराळवीर येतीलआणि त्यांच्या सोबत आपल्यासाठी Thanks giving चे खास पदार्थ पण येतील म्हणून मी उत्सुक आहे Thanks giving चे पारंपारिक Turkey चे विविध पदार्थ Cranbery Sauce इथे आहेच मी त्यावर toss करेन रशियन Cranbery sauce वैशिष्टपूर्ण असत ते मी इथे मिस करत होतो आता मी त्याचा आस्वाद घेऊ शकेन अर्थातच मला इथे माझ्या कुटुंबीयांची उणीव जाणवतेय पण इथे मी तुमच्या सोबत space family सोबत हा दिवस साजरा करेन  हे खूप सुंदर क्षण आहेत आणि आता त्यात नवे अंतराळवीर सामील होणार आहेत त्यामुळे माझ्या आनंदात भर पडेल Zena आपल्याकडे असलेले Food Packet दाखवणार आहेस ना !"

 Zena -"हो का नाही दाखवणार ? आपल्यासाठी हे फक्त  अन्न पदार्थ नाहीत तर आपल्या सर्वांच्याच रोजच्या आयुष्यातील आवश्यक भाग आहे आणि नासा संस्थेने आपल्या आरोग्याची काळजी घेत आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी खूप छान पदार्थ येणाऱ्या सणांसाठी पाठवले आहेत त्यात Turkey आणि Mike ने सांगितल्या प्रमाणे काही पारंपारिक नॉनव्हेज पदार्थासोबतच Mashed Potatoes आणि अनेक डेलिशिअस पदार्थांचा समावेश आहे आपण आता येणाऱ्या नवीन अंतराळवीरांसोबत त्याचा आस्वाद घेणार आहोत मी देखील त्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे कारण आता आपली मोहीम संपत आलेली असताना सगळ्यांसोबत हा दिवस साजरा करायला मिळतोय Jonny तुला काय वाटतय !"

Jonny -"खरच खूप सुंदर क्षण सगळ्यांचे आभार मानण्याचा एकत्र साजरा करण्याचा हि खूप अमूल्य संधी आहे!"

Mike ,Zena  ,Kimiya ,Jonny -आम्हा सर्वांतर्फे Happy Thanks Giving Day! तुमच्या कुटुंबियांसोबत ,मित्रपरिवारांसोबत खूप enjoy करा आणि पार्टीमध्ये पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घ्या! आणि हा दिवस आनंदात घालवा !

 

Sunday, 30 November 2025

नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey Sverchkov आणि Sergey Mikave स्थानकात पोहोचले

  Soyuz MS-27 backup crew members (from left) NASA astronaut Chris Williams and Roscosmos cosmonauts Sergey Kud-Sverchkov and Sergey Mikaev pose for a portrait at the Gagarin Cosmonaut Training Center in Russia.

 नासाच्या अंतराळ मोहीम 73चे नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey Sverchkov आणि Sergey Mikave निघण्याच्या तयारीत- फोटो नासा संस्था  

नासा संस्था -30 नोव्हेंबर 

नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey Sverchkov आणि Sergey Mikave स्थानकात सुखरूप पोहोचले गुरुवारी कझाकस्थानातील बैकोनूर उड्डाणस्थळावरून दुपारी 4 वाजून 27 मिनिटांनी (2.27a.m. स्थानिक वेळ) Soyuz MS -28 ह्या अंतराळयानातून हे तिन्ही अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणि तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर स्थानकाच्या जवळ पोहोचले 

उड्डाणाआधी ह्या अंतराळवीरांचे उड्डाणपुर्ण चेकअप करण्यात आले उड्डाणस्थळी जाण्याआधी ह्या अंतराळवीरांनी त्यांना निरोप द्यायला आलेले संस्थेतील मान्यवर आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला त्या नंतर हे तीनही अंतराळवीर उड्डाणस्थळी पोहोचले आणि सोयूझ अंतराळ यानातून स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले 

 स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर सोयूझ यानाने स्थानकाभोवती दोन फेऱ्या मारल्या आणि 7 वाजून 38 मिनिटांनी स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचताच अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली स्थानक आणि सोयूझ अंतराळयान ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडल्या नंतर दहा वाजता ह्या तिन्ही अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या राहात असलेल्या मोहीम 73 च्या अंतराळवीरांनी स्थानकात ह्या अंतराळवीरांचे स्वागत केले   

काही वेळाने अंतराळवीर फ्रेश झाल्यानंतर नासा आणि रशियन स्पेस संस्थेच्या मान्यवरांच्या संपर्कात ह्या आंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला 

   The newly-expanded Expedition 73 crew. In the front row (from left) are the newest crew members Chris Williams from NASA and Roscosmos cosmonauts Sergey Kud-Sverchkov and Sergei Mikaev. In the back are, NASA astronaut Mike Fincke, Roscosmos cosmonaut Sergey Ryzhikov, NASA astronauts Jonny Kim and Zena Cardman, Roscosmos cosmonaut Alexey Zubritsky, JAXA (Japan Aerospace Exploration Agency) astronaut Kimiya Yui, and Roscosmos cosmonaut Oleg Platonov.

स्थानकात पोहोचल्या नंतर नासा आणि रशियन संस्थेशी Welcome Ceremony दरम्यान लाईव्ह संपर्क साधताना स्थानकातील दहा अंतराळवीर एकत्रित -फोटो नासा संस्था 

Welcome Ceremony साठी स्थानकातील Zveda Service Module मध्ये स्थानकातील दहाही अंतराळवीर एकत्र जमले तेव्हा Moscow येथील Russian Mission Control आणि नासाच्या Huston Mission Control येथील मान्यवरांनी त्यांच्याशी लाईव्ह संपर्क साधला आणि त्यांना Thanks Giving Day च्या शुभेच्छा दिल्या 

संस्था प्रमुख -"तुम्ही सर्वजण कसे आहात?अंतराळ प्रवास कसा झाला आणि आता स्थानकात पोहोचल्यावर कसे वाटते? तुम्ही आनंदी दिसत आहात तुम्ही स्थानकात सुरक्षित पोहोचल्याचे पाहून आम्हीही आनंदी झालो आहोत तुमचे अभिनंदन आणि स्थानकात स्वागत!" 

अंतराळवीर -"आमचा प्रवास छान झाला आम्ही ठीक आहोत आणि स्थानकात पोचल्यावर छान वाटले !

संस्था प्रमुख -"Sergey Sverchkov तुम्ही दुसऱ्यांदा स्थानकात प्रवेश केल्यावर काही बदल जाणवला का?

Sergey Sverchkov - "निश्चितच स्थानकात छान बदल झालाय पुन्हा प्रवेश केल्यावर पहिल्यापेक्षा जास्त आनंद झाला "

संस्था प्रमुख -"तुम्ही स्थानकात थंडीच्या दिवसात राहायला गेला आहात इथे खूप थंडी आहे आम्ही थंडीपासून बचाव करत आहोत तुम्ही स्वत:ची काळजी घ्या !तुम्ही तुमच ध्येय साध्य करून तिथे पोहोचला आहात हे पाहून आम्हाला आनंद झाला तुम्ही आता तिथे संशोधनात छान वेळ घालवाल आणि पृथ्वी निरीक्षण कराल तुम्ही उत्कृष्ट काम करून सुरक्षित पृथ्वीवर परतण्याची आम्ही वाट पहातोय तुमच्या कुटुंबीयांतर्फे तुम्हाला शुभेच्छा!Thanks Giving day ला तुम्ही इथे नसाल पण आम्ही तुम्हाला Video पाठऊ रशिया तर्फे तुमच पुन्हा अभिनंदन !"

Huston -"तुमचे अभिनंदन! ह्या वर्षी काही आठवड्यापूर्वी स्थानकाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्या ऐतिहासिक वर्षी तुम्ही स्थानकात वास्तव्यास गेला आहात तुम्ही तेथे उत्कृष्ट संशोधन कराल आणि ह्या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्याल अशी आम्हाला खात्री वाटते !"

अंतराळवीर -"Thanks ! आम्हाला हि संधी दिल्याबद्दल आमचे इतके छान स्वागत केल्याबद्दल ! आमचा अंतराळ प्रवास छान झाला आम्ही लकी आहोत स्थानकाच्या पंचविसाव्या वर्षी आम्हाला इथे वास्तव्य करायला मिळतय त्या बद्दल आभार आम्ही निश्चितच उत्कृष्ट काम करू आम्ही Super Happy झालो आहोत तुम्हालाही!" 

       "Happy Thanks Giving Day !  

Monday, 24 November 2025

नासाचे अंतराळवीर Chris Williams दोन रशियन अंतराळवीरांसोबत स्थानकात वास्तव्यास जाणार

  NASA astronaut Chris Williams poses for an official portrait at the agency’s Johnson Space Center in Houston.

                                        

 नासा संस्था -20 नोव्हेंबर 

नासाच्या अंतराळमोहीम 73 चे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey Kud-Sverchkov आणि Sergei Mikaev हे तिघे 27 नोव्हेंबरला आठ महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत 

गुरुवारी कझाकस्थानातील बैकोनूर उड्डाणस्थळावरून दुपारी 4 वाजून 27 मिनिटांनी (2.27a.m. स्थानिक वेळ) Soyuz MS -28 अंतराळयानातून हे तिन्ही अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावतील आणि तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर स्थानकाच्या जवळ पोहोचतील 

त्या नंतर सोयूझ अंतराळयान स्थानकाभोवती दोन फेऱ्या मारेल सोयूझ यान 7 वाजून 38 मिनिटांनी स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचताच अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल त्यानंतर स्थानक आणि सोयूझ अंतराळयान ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडेल 9.50 मिनिटाला हि प्रक्रिया पूर्ण होईल आणि हे तीनही अंतराळवीर दहा वाजता स्थानकात प्रवेश करतील स्थानकात सध्या राहात असलेले मोहीम 73 चे अंतराळवीर ह्या तीनही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत करतील 

हे  अंतराळवीर स्थानकातील अंतराळमोहीम 73-74 मध्ये सहभागी होतील आणि आठ महिने स्थानकात वास्तव्य करून तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील अंतराळवीर Williams हे  अंतराळस्थानकातील अंतराळवीरांच्या दीर्घकालीन वास्तव्यादरम्यान निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त संशोधन,पृथ्वीवरील विकासासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि Modular Workout System ,Cryogenic Fuel efficiency &grow Semiconductor Crystals in Space ह्या विषयी संशोधन करणार आहेत 

अंतराळवीर Chris आणि अंतराळवीर Mikaev हे प्रथमच स्थानकात राहायला जाणार आहेत अंतराळवीर Sergey Kud -Sverchkov मात्र दुसऱ्यांदा स्थानकात राहायला जाणार आहेत हे सर्वजण 2026 च्या उन्हाळ्यात पृथ्वीवर परततील 

ह्या अंतराळवीरांच्या स्थानकाकडील उड्डाण आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा टी वी वरून करण्यात येणार आहे 

Tuesday, 18 November 2025

नासा आणि Blue Origin संस्थेच्या ESCAPADE अंतराळयानांचे मंगळ आणि सौरवाऱ्याच्या संशोधनासाठी उड्डाण यशस्वी

नासाच्या Cape Canaveral Space Force Center येथील 36 Complex उड्डाण स्थळावरून ESCAPADE अंतराळयान अंतराळात झेपावले -फोटो -नासा संस्था / Blue Origin 

नासा संस्था / Blue Origin -13 नोव्हेंबर 

नासा आणि Blue Origin संस्थेच्या वतीने ESCAPADE ह्या जुळ्या अंतराळयानांचे मंगळ आणि सौरवाऱ्याच्या  संशोधनासाठी उड्डाण करण्यात आले नासाच्या Florida येथील Cape Canaveral Space Force Center येथून 36 complex ह्या उड्डाण स्थळावरून  गुरुवारी दुपारी 3.55 (EST) वाजता हि दोन्ही अंतराळयाने Blue Origin च्या New Glenn रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात झेपावली ESCAPADE (Escape &Plasma Acceleration &Dynamic Explorer) हि दोन अंतराळयाने मंगळावरील Magnetic वातावरणावर सौरवाऱ्याचा कसा प्रभाव पडतो आणि भविष्यकालीन मानवासहित मंगळ मोहिमेसाठी उपयुक्त संशोधित माहिती मिळवणार आहेत 

सूर्याच्या अंतर्गत भागातील स्फोटक घटकांमुळे नुकत्याच झालेल्या उद्रेकामुळे अत्यंत शक्तशाली तीव्र उष्ण ज्वाळा आणि आगीचे लोट बाहेर पडले पृथ्वीवरील काही भागात त्याचा परिणाम झाला पृथ्वीवरील आकाशात Auroras पडल्यामुळे उड्डाणासाठी हवामान अनुकूल नव्हते त्या मुळे ह्या अंतराळयानांच्या उड्डाणास उशिर झाला आता ह्या सौर उद्रेकाचा व वादळाचा मंगळावर काय परिणाम झाला ह्या विषयी संशोधित माहिती मिळेल 

  Two spacecraft approach Mars

ESCAPADE च्या यशस्वी उड्डाणानंतर नासाचे Administrator Sean Duffy ह्यांनी Blue Origin Rocket Lab चे U.C Berkeley, नासाच्या ESCAPADE मोहिमेची टीम आणि सर्व पार्टनर्सचे अभिनंदन केले ," ह्या Heliophysics mission द्वारे मंगळावरील पुरातनकाळचे अस्तित्वात असलेले पोषक वातावरण शुष्क वाळवंटात कसे रूपांतरित झाले ह्याचा शोध घेण्यात येईल आणि संशोधित माहिती गोळा करण्यात येईल शिवाय सौरवाऱ्यामुळे तेथील वातावरणावर काय परिणाम होतो ह्या विषयी संशोधित माहिती मिळवण्यात येणार आहे New Glennच्या प्रक्षेपणाद्वारे गोळा केलेली हि संशोधित माहिती भविष्यकालीन आर्टीमस मोहिमेत MK-1च्या प्रक्षेपणासाठी उपयुक्त ठरेल शिवाय भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठीही आवश्यक आहे !"  

Rocket Lab द्वारा निर्मित हि दोन अंतराळयाने सूर्याच्या करोडो मैल प्रती तास वेगाने येणाऱ्या अखंडित प्रकाशझोत आणि त्यातील सौरकणांचे सखोल निरीक्षण करून संशोधित माहिती गोळा करणार आहे ह्या सौर प्रवाहित प्रकाश किरणे ,सौरवारे व सौरवादळामुळे मंगळावरील वातावरण प्रभावित होऊन ते कसे बदलत गेले प्राचीन काळी अस्तित्वात असलेले पाणी कसे नष्ठ झाले तेथील पोषक वातावरण थंड कसे झाले हि माहिती संशोधित करतील  

नासाच्या Washington येथील संस्थेच्या Associate Administrator Nicky Fox म्हणतात ," ESCAPADE मोहीमेद्वारे मंगळावरील प्राचीन कालीन वातावरण आणि सध्याच्या वर्तमानकालीन वातावरणाविषयी संशोधित माहिती गोळा केल्या जाईल हि माहिती प्रामुख्याने भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळयानातील अद्ययावत यंत्रणा ,रोबोटिक उपकरणांच्या संरक्षणासाठी आवश्यक आहेच पण ह्या मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठीही महत्वाची आहे कारण तेथे पृथ्वीसारखे पोषक वातावरण नाही !" 

ESCAPADE अंतराळयान मंगळावर जाणार असले तरीही सध्या पृथ्वी आणि मंगळ सूर्याच्या विरुद्ध दिशेला आहेत त्यामुळे डायरेक्ट मंगळाच्या दिशेने जाणे यानाला कठीण आहे त्या मुळे मंगळावर जाण्याआधी पृथ्वीपासून दहा लाख मैल अंतरावरील Lagrange Point 2 येथे जाईल आणि काही काळ तेथे भ्रमण करेल जेव्हा पुढच्या वर्षी  नोव्हेंबर 2026 मध्ये पृथ्वी आणि मंगळ जवळ येथील तेव्हा हे अंतराळयान पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत शिरून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणीय वातावरणाचा उपयोग करून मंगळाच्या कक्षेत शिरेल दहा महिन्यांनी सप्टेंबर 2027मध्ये मंगळावर पोहोचेल आणि 2028 मध्ये कार्यरत होऊन संशोधनास सुरवात करेल 

Blue Origin चे CEO Dave Limp ह्यांनी देखील यशस्वी उड्डाणा नंतर आनंद व्यक्त केला आणि ह्या टीममधील सर्वांचा मला अभिमान वाटत असल्याचे सांगून सर्वांचे अभिनंदन केले   

Friday, 14 November 2025

सूर्याच्या अंतर्गत भागातून शक्तिशाली ज्वाळांचे उत्सर्जन

close up view of the sun firing off a colossal X5.1 solar flare on Nov. 11.

सूर्याच्या अंतर्गत स्फोटक भागातुन शक्तीशाली आगीचे लोट आणि ज्वाळांचे उत्सर्जन होत असताना 

Space News -11 नोव्हेंबर 

सूर्याच्या अंतर्गत भागात सतत आग घुमसत असते आणि त्यातून अत्यंत वेगाने शक्तिशाली आणि उष्ण ज्वाळां उत्सर्जित होत असतात 11नोव्हेंबरला सकाळी सूर्याच्या अंतर्गत भागातून X5.1 प्रकारच्या अत्यंत शक्तिशाली आगीच्या ज्वाळा आणि आगीचे लोट अत्यंत वेगाने पृथ्वीच्या दिशेने बाहेर पडले 2024 नंतर सूर्याच्या अंतर्गत भागातून उत्सर्जित झालेल्या ह्या ज्वाळा ह्या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात शक्तीशाली तीव्र आणि उष्ण होत्या 

गेल्या काही दिवसापासून सूर्याचा अंतर्गत भाग सक्रिय झाला असून त्या भागातून सतत अत्यंत उष्ण आगीच्या ज्वाळा बाहेर फेकल्या जात आहेत ह्या महिन्यात नऊ व दहा तारखेला पण सूर्याच्या अंतर्गत भागातून मोट्या प्रमाणात तीव्र व उष्ण ज्वाळा व आगीचे लोट बाहेर पडले सूर्याच्या अंतर्गत करोनल भागातील विस्फोटानंतर हे उत्सर्जन होते नासाच्या शास्त्रज्ञांनी प्रसारित केलेल्या माहिती नुसार ह्या ज्वाळा अत्यंत शक्तिशाली आणी तीव्र ऊष्णतेच्या असतात ह्या ज्वाळा ताशी  4.4 दशलक्ष मैल वेगाने पृथ्वीच्या दिशेने उत्सर्जित झाल्या 

ह्या स्फोटक ज्वाळांच्या उत्सर्जनानंतर आफ्रिका व युरोपमधील काही भागात अंधार झाला आणि पृथ्वीच्या सूर्य प्रकाशीत भागातील High Frequency Radio Communication प्रभावित झाले नऊ नोव्हेंबरला बारा तासांच्या कालावधीत दोनवेळा सूर्याच्या अंतर्गत भागातून X 1.7 क्लास च्या शक्तिशाली ज्वाळा बाहेर फेकल्या गेल्या 

सर्व जगाला प्रकाशमान करणारा सुर्य प्रत्यक्षात आगीचा पेटता गोळा आहे सुर्याच्या अंतर्गत भागातील मॅग्नेटिक फिल्ड मध्ये अंतराळातील प्रचंड वेगाने वाहणारे वारे धुळ आणी हानीकारक Cosmic कीरणे सतत आत ओढल्या जातात अंतर्गत भागातील ज्वलनशील पदार्थ आणी वायूमुळे सतत आग घुमसत असते आणी त्यापासून तयार होणारे आगीचे लोट,ज्वाळा,विध्युत भारीत किरणे वायुकण प्रचंड वेगाने सुर्याच्या करोना ह्या भागात फेकल्या जातात त्यामुळे तेथील भागात तीव्र उष्णता आणि प्रकाश असतो ह्या भागातील चुंबकीय क्षेत्रात ज्वलनशील पदार्थ,वायू,विद्युतभारीत किरणे,विद्युतभारीत कण गोलाकार फिरत असतात तेथे सतत ऊष्ण सौर वारे वहात असतात,सौरवादळे होतात जेव्हा ह्या वादळाची तिव्रता वाढते तेव्हा शक्तीशाली स्फोट होतात आणि त्यामुळे निर्माण झालेले आगीचे लोट ह्या चुंबकीय क्षेत्रातुन बाहेर अंतराळात फेकल्या जातात 

Thursday, 13 November 2025

मंगळभूमीवर आढळल्या हिमयुगाच्या खुणा पुरातन काळच्या पाण्याच्या अस्तित्वाला दुजोरा

   Topographic map of Mars’s Coloe Fossae region

मंगळभूमीवरील Coloe Fossae ह्या भागात आढळलेल्या पुरातन कालीन हिमयुगातील प्रवाहित पाण्याच्या अस्तित्वाच्या खुणा -फोटो -युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) 

E.SA News- 12 नोव्हेंबर -

(Science &Exploration/ Space Science/Mars Express ) 

पुरातनकाळी मंगळ ग्रहावरही पृथ्वीसारखे पोषक वातावरण होते तेथे पाण्याचे अस्तित्व होते एव्हढेच नाही तर तेथे पृथ्वीसारखे हिमयुगही होऊन गेले असे संकेत मिळाले आहेत युरोपियन स्पेस एजन्सीच्या Mars Express वरील High Resolution Stereo Camera ने घेतलेल्या नव्या फोटोतून मिळालेल्या संशोधित माहितीतून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे 

मंगळावरील उत्तरेकडील भागातील Coloe Fossae ह्या भागात हिमयुगाच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्या आहेत ह्या पाठारी भागातील खोल दऱ्या,खोरे आणी गोलाकार लहान मोठे पाणवठ्याचे आटलेले खड्डे पाहून मंगळावरील पुरातन काळच्या हिमयुगाचे संकेत मिळतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे 

प्राचीन काळी 2.5 बिलियन वर्षांपूर्वी जवळपास 20,000 वर्षांपूर्वी फक्त पृथ्वीवरच हिमयुग नव्हते तर सौरमालेतील इतर ग्रहांवरही होते त्या वेळेस पृथ्वीचे तापमान अत्यंत थंड 7-10 C.पेक्षाही कमी होते आणि ह्याचे कारण आतासारखे ग्लोबल वार्मिंग नव्हते तर त्या काळी झालेल्या भूगर्भातील,भूपृष्ठावरील आणि वातावरणातील अनैसर्गिक घडामोडीमुळे अती उष्ण अती थंडी ,पाऊस पूर ह्या सारख्या आस्मानी संकटामुळे तेथील वातावरण बदलत गेले आणि हळूहळू नष्ठ होत गेले 

ह्या काळात सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आणि अती थंडीमुळे तेथे प्रवाहित असलेले पाणी गोठले आणि त्याचे बर्फात रूपांतर झाले काही ठिकाणी ह्या खड्ड्यात बर्फ साचून तेथे  Glaciers निर्माण झाले सरोवर गोठल्यामुळे बर्फ़ाच्छादित झाले त्यावर बर्फ़ाचे शिट्स तयार झाले कालांतराने तेथील हवामान उष्ण झाले तेव्हा हे बर्फ वितळले आणि हिमनगाच्या स्वरूपात प्रवाहित झाले 

  Bird’s-eye view of Coloe Fossae

अशा हिमयुगाच्या खुणा आपल्या पृथ्वीवरही आढळतात युरोपियन स्पेस एजन्सीच्या Mars Express वरील High Resolution Stereo Camera ने घेतलेल्या नव्या फोटोत ह्या भागातील भूपृष्ठावर प्रवाहित पाण्याच्या समांतर रेषा आढळल्या हा भाग Coloe Fossae ह्या नावाने ओळखला जातो ह्या रेषा जमिनीला पडलेल्या भेगांमुळे निर्माण होतात अंतराळातून येणारे खडक भूमीवर आढळल्यामुळे तेथे खड्डे पडले असावेत हे खड्डे लहान मोठे काही ठिकाणी एकत्रित काही ठिकाणी असमान इकडे तिकडे पडलेले आहेत काही पुरातन खडबडीत तर काही नवीन घर्षणाने गुळगुळीत झालेले दिसतात 

ह्या भागातील खोल दऱ्यामधील प्रवाहित पाण्याच्या रेषा हिमयुगातील पाण्याच्या अस्तित्वाचे संकेत देतात मंगळावरील हिमयुगाच्या काळात तेथून बर्फ़ाचे ढिगारे वाहात गेल्यामुळे तयार झाले असावेत ह्या खुणा पृथ्वीवरील हिमनद्यांसारख्या दिसतात आणि बाजूला दगडांचा दाट थर दिसतो 

सध्या मंगळावरील वातावरण शुष्क असले तरीही पुरातन काळी मंगळावरील ध्रुवीय वातावरण बदलांमुळे बर्फ गोठवणारी थंडी आणि कालांतराने बर्फ वितळवणारी उष्णता निर्माण झाल्यामुळे ह्या भागात ह्या खुणा निर्माण झाल्या  

थंडीच्या काळात मंगळाच्या ध्रुवापासून मध्य अक्षांशापर्यंत बर्फ पसरतो नंतर उष्ण वातावरणात तो मागे हटतो पण काही खुणा मागे राहतात तसेच हिमयुगात तेथे दरी,खड्डे पडून तो भाग बर्फाच्छादित झाला असावा असा शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे