Saturday, 1 August 2015

मैत्रीदिन

                            दिल दोस्ती दुनियादारीतल्या रुममेटच्या मैत्रीतून एकमेकांना सावरणारया ,एकमेकांची दुख: आपलीशी करत त्याच हसत खेळत निवारण करून आयुष्य आनंदी करणारया सुखद मैत्रीच सुंदर स्वरूप आपण अनुभवतोय आजकालच्या स्वातंत्र्याच्या गैरवापर करून व्यसनाधीन संस्कारहिन तरुणाईचा मैत्रीचा हैदोस पाहता ह्या मालिकेतून उलगडत जाणारी तरुणाईची मैत्री,मैत्रीतून मांडली जाणारी समस्या आणि ती सोडवणारी हि मित्रमंडळी ह्याच अनोख मैत्रबंधन खरोखरच लाजवाब!  विशेषत: शेजारच्या नुकत्याच कॉलेज मध्ये दाखल झालेल्या पण raging च्या भितीन रोज गेटबाहेरून परत येणारया लहान दोस्ताला धैर्य देऊन raging हाणून पाडायला शिकवणारे हे दोस्त मैत्रीला वयाच बंधन नसत हे दाखवून देतात मैत्रीचे विविध पैलु उलगडतानाच आजकालच्या ज्वलंत समस्येकडेही लक्ष वेधत त्यावर उपाय सुचवण्यात लेखक यशस्वी झालाय.
                           उद्या मैत्रीदिन पूर्वी मला वाटायच कशाला हवा मैत्रीदिन ज्या दिवशी मित्र किंवा मैत्रीण भेटतात तोच मैत्रीदिन पण आता मैत्रिणी जेव्हा बरयाच वर्षांनी भेटल्या तेव्हा मैत्रीदिनाच महत्व पटल मैत्रीदिनाच्या निमित्याने आपल्याला मैत्रीचा आठव होतो एक दिवस मजेत जातो
                            मैत्री निखळ ,निर्वाज्य आनंददायी.एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होऊन आश्वस्त करणारी.खरच मैत्रीचा धागा किती चिवट असतो ना ! कोणी तोडु पाहील तरी तुटता तुटत नाही उलट जास्तच पक्का होतो लहानपणी शाळेत अबोध वयात मैत्रीची सुरवात होते त्यात रुसवे,फुगवे ,मारामारी, चिडण,चिडवण असत ती बालिश निरागस मैत्री खरी असते त्यात खोटेपणा नसतो घरातल्या सुखी सुरक्षित वातावरणातून शाळेत प्रवेशल्यावर तिथल्या भीतीदायक वातावरणात मैत्रीची साथ मिळते आणि भीती दूर पळते पुढे कॉलेजात गेल्यावर मैत्रीचे निकष बदलतात मैत्रीत प्रगल्भता येते नवीनच पंख फुटलेल्या तरुणाईला मोकळ्या आकाशात उडण्याची साथ मिळते एकमेकांना सावरण्याच बळ येत
                         मैत्रीला वयाच ,स्थळकाळाच ,जातीधर्माच बंधन नसत ती कोठेही केव्हाही कोणाशीही होऊ शकते शाळा कॉलेजातली मैत्री, लग्नानंतर विशेषत:स्त्रियांच्या बाबतीत घर,संसार,मुल,मुलांच शिक्षण करिअर ह्या मुळे दुरावते वर्षानुवर्षे भेटी होत नाहित पण अवचित जेव्हा मैत्रिणीच गेट टुगेदर होत तेही २०-२५ वर्षानंतर तेव्हाचा आनंद काय वर्णावा ! गप्पांना उत येतो हास्याला उधाण येत सुखदुखा:ची देवाणघेवाण होते भेटण्यान आनंद द्विगुणीत होतो प्रत्येकाला काय सांगू ,किती सांगु अस झालेल असत बोलण्याच्या ओघात वय,वेळ विसरत मधली वर्ष गळून पडतात एकमेकांचे बदललेले पत्ते email ,फोन न. मिळतो आणि पुन्हा एकदा जुनी मैत्री नव्यान सुरु होते आणि आता तर whats app वरून फोनवर तासनतास गप्पा रंगतात चिंता क्लेश ह्याचा क्षणभर विसर पडतो जगण्याची नवी उमेद जागी होते जीवनात हास्य फुलत.मैत्रीच रसायनच वेगळ असत!  खरया मैत्रीत स्वार्थ नसतो ,फसवणूक नसते ती निर्मळ निस्वार्थ असते काहीजण अल्पावधीतच मैत्रीचा सुगंध दरवळून आपल्याला कायमचे सोडून जातात कधीही न येण्यासाठी!
                         काही मित्रमैत्रिणी मात्र फसवे असतात सोबत राहुन ते आपल्या मित्रांना फसवत असतात समोर गोड बोलून मागे त्यांच्या विरोधात बोलतात ,अफवा पसरवतात आणि त्यांना त्याचा पत्ताही नसतो त्यांच्या चांगुलपणाला मूर्खपणाच लेबल लावून ते त्यांच हस करतात आणि त्यांच्या संकटात,दुखा:त भर टाकतात काहींना त्यांची प्रगती, संपन्नता ,उत्कर्ष बघवत नाहि कधीकधी तर अशा मित्रांमुळे दिवाळ वाजण्याची वेळ येते तर काही जण आपला हेतू साध्य करून संकट समयी मित्राला एकट पाडून निघुन जातात आणि "A Friend in need is a friend indeed "हि म्हण उलटी करून Friend is not in need is not a friend indeed अशी नवी म्हण सार्थ करत त्याला आयुष्यातून उठवू पाहतात त्याला जगण नकोस होत काही कमकुवत मनाची माणस क्वचित जीवही देतात अशा वेळेस मैत्रीवरचा विश्वास उडतो आणि नको ती मैत्री करण अस होउन जात पण काही कर्तुत्ववान माणस मात्र हार न मानता अशांना त्यांची जागा दाखवुन देतात त्यांना कितीही एकट पाडलं तरी ते हारत नाहीत
                          आणि अशाच वेळी खरया मित्रांची ,मैत्रिणीची ओळख पटते कधीकधी जुन्या शाळा कॉलेजातल्या मैत्रिणी पुन्हा भेटतात आणि  मैत्रीवरचा उडालेला विश्वास पुन्हा बसतो जगण्याला नवसंजीवनी मिळते जुन्या आठवणीला उजाळा मिळतो आणि पुन्हा एकदा खरया मैत्रीचा प्रत्यय येतो आपल्या जवळचे दुरावतात ,आपल्यावर संकट येतात तेव्हा जे मित्र  कामी येतात तेच खरे मित्र नाहीतर मैत्रीला अर्थ नसतो 

Monday, 27 July 2015

लाखोंच्या संखेने भाविक पंढरपुरात दाखल

 गेल्या महिनाभरापासून हाती टाळमृदुंग व मुखी हरिनामाचा गजर करीत ऊनपावसाची तमा न बाळगता मैलोनमैल पायी चालत पंढरीकडे वाटचाल करणारया वारकऱ्यांच्या दिंड्या आषाढीच्या पूर्व संध्येला पंढरपुरात दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जवळपास ७५ दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सपत्न्निक पूजेसाठी पंढरपुरात दाखल झाले.जवळपास सर्वच मराठी channels नी  प्रेक्षकांना लाइव टेलिकास्ट दाखवून घरबसल्या वारी दर्शन घडवल त्या त्या चानल्सचे पत्रकार प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊन वारीतली अद्ययावत बित्तंबातमी लोकांपर्यंत पोहोचवत होते
 ह्या वर्षीच वैशिष्ठ म्हणजे तरुणाईची फेसबुक दिंडी, मोबाइल क्रांतीचा उपयोग करत तरुणाईने फेसबुक वरून वारीतल्या लोकांना वारीतल्या आवश्यक गोष्टीची माहिती पुरवली तर सेल्फिचा मोह वारकऱ्यांनाही पडला काही उत्साही तरुणाईने ह्या वेळेस डिजीटल कॅमेरा अश्वाच्या गळ्यात अडकवून  "अश्वाच्या नजरेतून रिंगण सोहळा "  हा अफलातून प्रयोग राबवत लोकांना त्याचे दर्शन घडवले.
 ह्याही वेळी वारीचा उपयोग लोकप्रबोधनासाठी करण्यात आला आणि परमार्थ व पर्यटना सोबत जागृती मोहीमही राबवली गेली त्यात नेहमीच्या "साक्षरता अभियान ,स्वच्छता अभियान ,पर्यावरण संतुलन" ह्या संदेशासोबत " अवयव दान श्रेष्ठ दान "हा उपक्रम राबवला गेला वेगवेगळ्या दहा भाषेतून विठोबाचे नाव टोप्यांवर banners वर लिहुन भाषेची ओळख करून देण्यात आली शिवाय मोडी भाषेचीही माहिती दिल्या गेली वारीच जागोजागी स्वागत होऊन त्यांच्या राहण्याची जेवण्याची सोय करण्यात आली ह्या वेळेस वारीतल्या जेवणात भाकरी पिठल्या सोबत मिष्ठान्न भोजन व धोंड्याचा महिना असल्याने एका ठिकाणी धोंड्याचा (मोदक ) समावेश होता वारीतल्या कष्ठकरयांनी वारीत आपला व्यवसाय करून आपल्या उद्योगशीलतेचे दर्शन घडवले ( हे उदाहरण आत्महत्त्या करू पाहणाऱ्या शेतकरयांपुढे ठेवायला हरकत नाही कर्ज फेडण्यासाठी ते इतर उद्योग करू शकतात  )
 पूजेसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या अमृता फडणवीस ह्यांनीही वारकरयासोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.आषाढी एकादशी निमित्त्य पंढरपुरात जवळपास ८-१० लाख भाविक दाखल झाले असून मंदिरापासून सातआठ किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या असून हि रांग आणखीही लांबवर जाण्याची शक्यता आहे शीघ्र व व्ही आय पी दर्शन बंद असून पदस्पर्श दर्शनाला २० तास तर मुख दर्शनाला दीड दोन तास लागत होते.
एव्हढ्या मोठ्या संखेने पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांच्या सुरक्षाव्यवस्थेचा ताण प्रशासनावर पडला असून लोकांच्या सुरक्षेसाठी सोलापूरहून आलेल्या पोलिसांची सतर्क यंत्रणा सज्ज आहे जवळपास ५००० पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत भाविकांसाठी कोणी अचानक आजारी पडल्यास अध्ययावत उपकरणासह डॉक्टरांचे पथकही सज्ज आहे त्यांच्याकडे ECG मशीन ,oxygen सिलिंडर्स व इतर आधुनिक उपकरणे आहेत इंडियन रेड क्रॉसचे व इतर स्वयंसेवी संघटनेचे स्वयंसेवक लोकांना मार्गदर्शन व आवश्यक मदत देण्यासाठी सज्ज आहेत
 मंदिर आकर्षक रोषणाइने सजले असून मंदिरावर लावलेल्या टी वी स्क्रीन वरून मंदिराबाहेरील लोकांना विठ्ठलाचे दर्शन घेत येत आहे मंदिर समिती तर्फे भाविकांना मोफत चहा पाणी देण्यात येत असून लोकांना मंदिराजवळील अतिक्रमण हटविल्याने दर्शन घेणे सोयीचे झाले आहे. आधीच अस्वच्छतेच्या प्रश्नांनी हैराण झालेले पंढरपूरकर मात्र  वारीनंतर होणारया घाणीच्या समस्येने चिंतीत आहेत तर वारीतल्या वारकरयांची  स्वयंशिस्त स्वच्छतेच्या बाबतीत पंढरपुरात का दिसत नाही? असा सवाल प्रशासना तर्फे विचारला जातोय

वाचा -  आषाढी एकादशी   (वाचा वर क्लिक करा )


Saturday, 18 July 2015

सोन्या चांदीचे भाव उतरले

सोन्या चांदीचे भाव सद्या उतरले असून शुक्रवार पर्यंत  २६००० च्या आसपास असलेले standard सोने व ३५००० च्या आसपास  असलेली चांदी शनिवारी आणखी कमी होऊन सोने २५७०० रु तर चांदी ३४५०० पर्यंत उतरली असून अजूनही भाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय 
गेल्या आठवडयात ग्रीसची टळलेली दिवाळखोरी ,चीनच्या उद्योगधंद्याचे दूर झालेले आर्थिक संकट आणि इराणने अणुउर्जा करारावर केलेली स्वाक्षरी ह्या मुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले 
शिवाय डॉलरच्या मजबुतीमुळे  आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी सोने विक्रीस काढले लंडन मध्ये सोन्याचे भाव गेल्या आठवडयापासुन कमी होत आहेत त्या पाठोपाठ अमेरिकेतही डॉलरच्या मजबुतीमुळे गुंतवणुकदार सोने विक्री करत असून  सेन्सेक्सने मारलेल्या उसळी मुळे भारतातही शेअरबाजार तेजीत आहे त्या मुळे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळल्याने भारतात सोन्याचे भाव उतरत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या ५ वर्षानंतर भाव इतके कमी झाल्याचे जाणकार सांगत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोन्याचांदीचे भाव आणखी खाली आले तर सोन्याचे भाव २४००० पर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून हि स्थिती फार दिवस टिकणार नसल्याचाही अंदाज वर्तवण्यात येतोय  

Saturday, 11 July 2015

यवतमाळ पावसाच्या प्रतीक्षेत

जुन महिना संपून जुलै अर्ध्यावर आला तरी यवतमाळ येथे अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही त्या मुळे यवतमाळकर पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत जुन मध्ये पावसाने व्यवस्थित हजेरी लावली त्या मुळे शेतकरी व नागरिक सुखावले पण नंतर मात्र पाऊस लांबल्याने नागरिक पुन्हा उन्हाळा अनुभवत आहेत  गेल्या आठवडयात संद्याकाळी साडेसहा पर्यंत सूर्याची प्रखरता जाणवत होती
ह्या आठवड्यातही सूर्याची प्रखरता जाणवत असली तरी मधून अधून काळे ढग दाटून येतात आणि आता पाऊस बरसणार असे वाटत असताना पुन्हा ऊन पडते आणि पाऊस काही येत नाही
वातावरणातील उष्मा आणि उकाड्या मुळे पुन्हा नागरिकांनी कुलर्स बाहेर काढलेत शिवाय यवतमाळकरांना 
आता पुन्हा पाणीटंचाईची चिंता भेडसाऊ लागलीय आधीच पाणीपुरवठा दोनदिवसांनी होतोय पुरेसा पाऊस पडला नाही व धरण भरले नाहीतर पाणीप्रश्न आणखी गंभीर होईल
जूनमधल्या वेळेवर पावसाच्या आगमनामुळे आनंदित झालेल्या शेतकरयांनी आपल्या शेतात पेरणीही केली होती पण पावसाने मारलेल्या दडीमुळे पिके कोमेजू लागल्याने त्यांनाही आता दुबारपेरणीची चिंता लागली आहे 
यवतमाळ येथे आधी दुष्काळ मग अतीपावसाने आलेला पूर ,गारपीट  ह्या मुळे आधीच लोक त्रस्त झाले होते आणि आता पावसाने मारलेल्या दडीमुळे लोकाना पाणीप्रश्न तर शेतकरयांना दुष्काळाची चिंता लागलीय  म्हणुनच लोक आता पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत         

Tuesday, 9 June 2015

नांदी उत्कृष्ट नाटय प्रयोग

 स्टार वाहिनीने "World  थियेटर टेलीव्हिजन प्रिमियर " ह्या नावाने दर्जेदार मराठी नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच ठरवल आहे त्याची सुरवात "नांदी " ह्या नाटकान  झाली खरतर "नांदी" हे एक नाटक नसून नाटकाच्या आरंभापासून आजवर जी नाटक गाजली त्या दहा नाटकातील नाटय प्रसंगावर आधारीत हे नाटक आहे."अकल्पित कल्पिताना" ह्या टी व्ही वरील लाइव्ह chat शो च्या माध्यमातून आजवर गाजलेल्या नाटकातील नाट्य प्रसंगाची अप्रतिम मेजवानी घरबसल्या नाट्यरसिकांना पाहायला मिळाली स्पृहा जोशीच  खुमासदार औसुक्यपुर्ण सूत्रसंचलन जुन्या काळातील नाट्यशास्त्राचे जनक भरतमुनी आणि त्यांच्या हातात नव्या युगातील laptop ,प्रश्न विचारणारे प्रेक्षक व स्वत:ची समस्या मधूनच येणारया फोनवरून सोडवणारी सूत्रसंचालक आणि रंगभूमीवर गाजलेले नाटय प्रवेश ह्याच विनोदी पण रंजक  व अभ्यासु चित्रण हि थीम छान होती.आजवर अभिनय क्षेत्रात गाजलेले दहा कलाकार आणि त्यांनी केलेल्या गाजलेल्या दहा नाटकातील भूमिका खरोखरच लाजवाब !
 सुरवात अभिञान शाकुंतल पासून होते तेव्हा संस्कृत ऐवजी मराठी भाषा laptop वर select करतानाच आरंभापासून आतापर्यंत झालेली तंत्रज्ञानातील प्रगती रसिकांपर्यंत पोहोचते संगीत सौभद्र मधल्या प्रसाद ओकची भूमिका लक्षवेधक आहे त्याने साकारलेली रुक्मिणी अप्रतिम! त्याने आपल्या सशक्त अभिनयातून चेहरयावर स्त्रीसुलभ राग,द्वेष,लोभ,लज्जा ह्या भावभावनांचे भावविभ्रम सहजतेने प्रतिबिंबित केलेत  त्याने साकारलेल्या स्री भूमिकेत कोठेही बाष्कळपणा नाही प्रसादने आजवर विविधांगी भूमिका साकारल्यात सद्या " होणार सून मी ह्या घरची" मध्ये मिश्किल विनोद करणारया प्रसादच्या चेहऱ्यावरचे हे हावभाव पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू तरळत ह्या नाटकात अजय पुरकर ह्यांची कृष्णाची भूमिका छान होती त्यांनी गायलेले" नभ मेघांनी आक्रमिले ,नच सुंदरी धरी कोपा" सुरेल होते प्रसादनेही" प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी होत उष:काल हा" ह्या गाण्यामध्ये अजय पुरकर यांना सुरेल साथ दिली बरयाच दिवसांनी हि गाजलेली श्रवणीय गाणी नाट्यसंगीत आवडणारया रसिकांना ऐकायला मिळाली हे दोघेही गायक नट सारेगमपच्या युध्द तारयांचे मध्ये भाग घेतलेले प्रसाद तर विजेता गायक त्याचा अभिनय संघर्ष "जोडी तुझी माझी"मधून ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले असतील "नटसम्राट" मध्ये सीमा देशमुखने साकारलेली मिश्किल कावेरी जशी सरस तशीच गडकऱ्यांच्या एकच प्याला मधली सुधाकरच्या दारूच्या व्यसनामुळे श्रीमंतीतून गरिबीत आलेली, इतकी कि एकवेळच्या जेवणाची भ्रांत पडावी तरीही तितकीच कणखर स्वावलंबी सिंधू पाहणाऱ्यांच्या मनाला चटका लावून जाते अश्विनी एकबोटे नी साकारलेली शकुंतला,अश्रूंची झाली फुले मधली सुमित्रा barrister मधली राधक्काहि उत्तम होती नाटकाच्या शेवटी तिचा अभिनय पाहून वातावरण स्तब्ध होते  तेजस्विनी पंडितन कीचक वध मधली क्रोधीत असहाय्य द्रोपदी,  सखाराम बाईनडर मधली बेदरकार नायिका छान वठवलीय स्पृहान" एकच प्याला" मधली फटकळ स्पष्टवक्ती गीता आणि चाहूल मधली आत्मनिर्भर स्वतंत्र बाण्याची नायिका छान रंगवलीय शरद पोंक्षे चा "नटसम्राट आप्पा बेलवलकर  ,barrister "मधला नायक  उत्तम अविनाश नारकरन  दुष्यंत ,"अश्रूंची झाली फुले" मधला प्रोफेसर विद्याधर  ,चिन्मय मांडलेकरन युधिष्ठीर ,चाहूल मधला नायक छान साकारलाय
  नांदी मधून नाटय निर्मितीच्या काळापासूनचे बदलते स्त्रीजीवन,स्त्रीची लाचारी ,आगतिकता जाऊन तिच्यात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आलेली क्षमता आत्मनिर्भरता ,नाटय निर्मितीचा काळ त्यानंतर उठलेले वादंग विशेषत: कीचक वधानंतर झालेले दंगे ban करण्यात आलेलं नाटक नाटय कलावंत गणपत पाटील ह्यांना झालेली मारहाण हा  इतिहास नांदी नाटकातून उलगडत जातो  महाकवी कालिदास ,आण्णासाहेब किर्लोस्कर ,खाडिलकर ,वि.वा.शिरवाडकर, राम गणेश गडकरी, विजय तेंडूलकर वसंत कानेटकर ह्या नाटककारांची नाटके आल्यानंतर त्यांना मिळालेला उत्तम प्रतिसाद  हजारोंच्या संख्येन झालेली गर्दी ,कमाईही तितकीच पण नाटय कलावंताला मिळणार तुटपुंज मानधन ह्या  सारयांची माहिती नाटका दरम्यान रसिकांना दिली जाते ह्या दिग्गज नाटककारांच्या समर्थ लेखणीतून निर्माण झालेल्या अजरामर नाटयकृती रसिकांना अजूनही तितक्याच आवडतात
थोडक्यात उत्तम नाटककारांची उत्कृष्ट नाटक ,ती सादर करणारे सशक्त कलावंत आणि अर्थातच लेखक दिग्दर्शक सारच अप्रतिम! दाद देण्या सारख! पण शंभर प्रयोगानंतर हे नाटक आता बंद करण्यात आलय स्टार प्रवाह वाहिनीने मात्र नांदी दाखवून रसिकांना जुन्या नाटकांचा रंजक प्रवास घडवून सुखद धक्का दिला नाटकाचा लेखक हृषीकेश जोशीन त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीतून नाटय निर्मितीच्या काळापासून आजवर झालेल्या सामाजिक सांस्कृतिक भावनिक बदलाच अभ्यासपूर्ण संशोधन करत नांदीची निर्मिती केलीय आणि आता त्याच पुस्तकही प्रकाशित झालय नांदी मुळे लोक पुन्हा जुनी नाटके आवडीन पाहतील ह्यात शंका नाही .    

Wednesday, 20 May 2015

विदर्भ उष्णतेच्या तडाख्यात तापमानाचा उच्चांक

विदर्भात सद्या प्रचंड ऊन तापत असुन ह्या आठवडयात तापमानाने उच्चांक गाठला आज सर्वाधिक तापमान वर्धा व चंद्रपूर येथे ४७. ५ पर्यंत गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ह्या आठवड्याची सुरवातच जास्त तापमानाने झाली रविवारपासूनच सूर्य प्रचंड उष्णतेने तळपू लागलाय यवतमाळ येथेही सोमवारी तापमान ४५. ६ इतके नोंदले गेले राजस्थान मधुन वहात येणाऱ्या उष्ण वारयामुळे  उन्हाची तीव्रता वाढली असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येतेय रविवार पासूनच नागपूरच्या तापमानाचा पारा ४६ अंशाच्या वर गेला असल्याची चर्चा होती त्या मुळे रस्त्यावर शुकशुकाट होता सकाळी नऊ  पासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत होत्या
उन्हाच्या तीव्रते मुळे लोक आवश्यक कामानिमित्यच  बाहेर पडतात उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक डोक्याला स्कार्फ,शेला बांधून डोळ्याला गॉगल लावुन बाहेर पडताना दिसतात  दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य झाले आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी थंड पेय सरबत,रसाच्या गाडया उभ्या असून लोक तिथे उन्हापासून बचाव करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत
ह्या वर्षी अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे इतके दिवस ऊन जाणवले नाही पण आता मात्र उन्हाची तीव्रता दररोज वाढतच आहे मंगळवारी  वर्धा येथे सर्वाधिक ४७.५ इतके तापमान नोंदले गेले त्या नंतर नागपूर ,चंद्रपूर अकोला येथे ४६ अंश सेल्सिअस तापमान होते  मागच्या वर्षी नवतपाच्या उन्हाने वैदर्भीय त्रासले होते यंदाही तापमान वाढतच आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे कुलरची हवा ,माठातले पाणीही गरमच असते शिवाय दिवसभरच्या उन्हामुळे नळातून येणारे पाणीही गरम असते  अजून एकदोन दिवस तापमान असेच राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलाय  विदर्भात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा उष्माघाताने बळी गेल्याची नोंद झाली आहे सध्या मे महिन्याचे शेवटचे दिवस असून लवकरच नवतपाचे (अत्तुच्च उष्णतेचे ) ऊन पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय

                                

Friday, 8 May 2015

शास्त्री नगर येथे उशिराने पाणी पुरवठा

                                  शास्त्री नगर येथे गुरवार दि. ७ तारखेला होणारा पाणी पुरवठा सायंकाळ पर्यंत झालाच नाही विशेष म्हणजे यवतमाळ येथे दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येते तेही कमी दाबाने अचानक पाणी न आल्याने बायकांची तारांबळ उडाली ह्या बाबतीत विचारणा करण्यासाठी पाणीपुरवठा कार्यालयात फोन केला असता तो उचलण्यात येत नव्हता वारंवार फोन करूनही जेव्हा फोन उचलल्या गेला नाही तेव्हा सकाळ कार्यालयाशी संपर्क साधला असता व्हाल्व बिघडल्याचे व उशिराने पाणी सोडण्यात येणार असल्याचे कळाले.शेवटी संध्याकाळी कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधला तेव्हा पाणी सोडल्या जाईल असे सांगण्यात आले अखेर उशिराने पाणी आले तेही अत्यंत कमी दाबाने त्या मुळे नागरिकांना दोन दिवस पुरेल एव्हडा पाणीसाठा करता आला नाही विशेष म्हणजे व्हाल्व नादुरुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठा उशिराने होईल अशी बातमीही दैनिकांना देण्यात आली नव्हती किंवा फोनवरून नागरिकांनाही सांगण्यात येत नव्हते पूर्वी पाणीपुरवठा होणार नसला किंवा काही अडचणी आल्यास रिक्षा फिरवून नागरिकांना सुचित करण्यात येत होते पण आता रिक्षाही फिरवल्या जात नाही आणि ऑफिस मधले फोन रिंग वाजत असूनही उचलल्या जात नाहीत
ह्या वर्षी मधून आधुन सतत पाऊस,गारपीट झाल्याने पाणी जून पर्यंत पुरेल इतके शिल्लक असल्याचे सांगण्यात आलेय तरी देखील गेल्या अनेक वर्षापासून एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा दोन दिवसांनीच होतो पावसाळ्यात भरपूर पाऊस,पूरस्थिती येऊनही लोकांना मात्र कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते कारण पूर आल्यानंतर पाणी धरणाची दारे उघडुन रस्त्यावर सोडले जाते त्या मुळे नागरिकांचे नुकसान होते शिवाय पाणी नियोजन योग्य प्रकारे न केल्याने भरपूर पाऊस पडूनही लोकांना नियमित पाणी पुरवठा होत नाही पूर्वीप्रमाणे लोकांना नियमित पाणी पुरवठा करावा व त्यात येणारया अडचणींचे लवकरात लवकर निवारण करावे अशी नागरिकांची मागणी आहे