सोन्या चांदीचे भाव सद्या उतरले असून शुक्रवार पर्यंत २६००० च्या आसपास असलेले standard सोने व ३५००० च्या आसपास असलेली चांदी शनिवारी आणखी कमी होऊन सोने २५७०० रु तर चांदी ३४५०० पर्यंत उतरली असून अजूनही भाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय
गेल्या आठवडयात ग्रीसची टळलेली दिवाळखोरी ,चीनच्या उद्योगधंद्याचे दूर झालेले आर्थिक संकट आणि इराणने अणुउर्जा करारावर केलेली स्वाक्षरी ह्या मुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले
शिवाय डॉलरच्या मजबुतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी सोने विक्रीस काढले लंडन मध्ये सोन्याचे भाव गेल्या आठवडयापासुन कमी होत आहेत त्या पाठोपाठ अमेरिकेतही डॉलरच्या मजबुतीमुळे गुंतवणुकदार सोने विक्री करत असून सेन्सेक्सने मारलेल्या उसळी मुळे भारतातही शेअरबाजार तेजीत आहे त्या मुळे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळल्याने भारतात सोन्याचे भाव उतरत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या ५ वर्षानंतर भाव इतके कमी झाल्याचे जाणकार सांगत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोन्याचांदीचे भाव आणखी खाली आले तर सोन्याचे भाव २४००० पर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून हि स्थिती फार दिवस टिकणार नसल्याचाही अंदाज वर्तवण्यात येतोय
No comments:
Post a Comment