Saturday 1 August 2015

मैत्रीदिन

                            दिल दोस्ती दुनियादारीतल्या रुममेटच्या मैत्रीतून एकमेकांना सावरणारया ,एकमेकांची दुख: आपलीशी करत त्याच हसत खेळत निवारण करून आयुष्य आनंदी करणारया सुखद मैत्रीच सुंदर स्वरूप आपण अनुभवतोय आजकालच्या स्वातंत्र्याच्या गैरवापर करून व्यसनाधीन संस्कारहिन तरुणाईचा मैत्रीचा हैदोस पाहता ह्या मालिकेतून उलगडत जाणारी तरुणाईची मैत्री,मैत्रीतून मांडली जाणारी समस्या आणि ती सोडवणारी हि मित्रमंडळी ह्याच अनोख मैत्रबंधन खरोखरच लाजवाब!  विशेषत: शेजारच्या नुकत्याच कॉलेज मध्ये दाखल झालेल्या पण raging च्या भितीन रोज गेटबाहेरून परत येणारया लहान दोस्ताला धैर्य देऊन raging हाणून पाडायला शिकवणारे हे दोस्त मैत्रीला वयाच बंधन नसत हे दाखवून देतात मैत्रीचे विविध पैलु उलगडतानाच आजकालच्या ज्वलंत समस्येकडेही लक्ष वेधत त्यावर उपाय सुचवण्यात लेखक यशस्वी झालाय.
                           उद्या मैत्रीदिन पूर्वी मला वाटायच कशाला हवा मैत्रीदिन ज्या दिवशी मित्र किंवा मैत्रीण भेटतात तोच मैत्रीदिन पण आता मैत्रिणी जेव्हा बरयाच वर्षांनी भेटल्या तेव्हा मैत्रीदिनाच महत्व पटल मैत्रीदिनाच्या निमित्याने आपल्याला मैत्रीचा आठव होतो एक दिवस मजेत जातो
                            मैत्री निखळ ,निर्वाज्य आनंददायी.एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होऊन आश्वस्त करणारी.खरच मैत्रीचा धागा किती चिवट असतो ना ! कोणी तोडु पाहील तरी तुटता तुटत नाही उलट जास्तच पक्का होतो लहानपणी शाळेत अबोध वयात मैत्रीची सुरवात होते त्यात रुसवे,फुगवे ,मारामारी, चिडण,चिडवण असत ती बालिश निरागस मैत्री खरी असते त्यात खोटेपणा नसतो घरातल्या सुखी सुरक्षित वातावरणातून शाळेत प्रवेशल्यावर तिथल्या भीतीदायक वातावरणात मैत्रीची साथ मिळते आणि भीती दूर पळते पुढे कॉलेजात गेल्यावर मैत्रीचे निकष बदलतात मैत्रीत प्रगल्भता येते नवीनच पंख फुटलेल्या तरुणाईला मोकळ्या आकाशात उडण्याची साथ मिळते एकमेकांना सावरण्याच बळ येत
                         मैत्रीला वयाच ,स्थळकाळाच ,जातीधर्माच बंधन नसत ती कोठेही केव्हाही कोणाशीही होऊ शकते शाळा कॉलेजातली मैत्री, लग्नानंतर विशेषत:स्त्रियांच्या बाबतीत घर,संसार,मुल,मुलांच शिक्षण करिअर ह्या मुळे दुरावते वर्षानुवर्षे भेटी होत नाहित पण अवचित जेव्हा मैत्रिणीच गेट टुगेदर होत तेही २०-२५ वर्षानंतर तेव्हाचा आनंद काय वर्णावा ! गप्पांना उत येतो हास्याला उधाण येत सुखदुखा:ची देवाणघेवाण होते भेटण्यान आनंद द्विगुणीत होतो प्रत्येकाला काय सांगू ,किती सांगु अस झालेल असत बोलण्याच्या ओघात वय,वेळ विसरत मधली वर्ष गळून पडतात एकमेकांचे बदललेले पत्ते email ,फोन न. मिळतो आणि पुन्हा एकदा जुनी मैत्री नव्यान सुरु होते आणि आता तर whats app वरून फोनवर तासनतास गप्पा रंगतात चिंता क्लेश ह्याचा क्षणभर विसर पडतो जगण्याची नवी उमेद जागी होते जीवनात हास्य फुलत.मैत्रीच रसायनच वेगळ असत!  खरया मैत्रीत स्वार्थ नसतो ,फसवणूक नसते ती निर्मळ निस्वार्थ असते काहीजण अल्पावधीतच मैत्रीचा सुगंध दरवळून आपल्याला कायमचे सोडून जातात कधीही न येण्यासाठी!
                         काही मित्रमैत्रिणी मात्र फसवे असतात सोबत राहुन ते आपल्या मित्रांना फसवत असतात समोर गोड बोलून मागे त्यांच्या विरोधात बोलतात ,अफवा पसरवतात आणि त्यांना त्याचा पत्ताही नसतो त्यांच्या चांगुलपणाला मूर्खपणाच लेबल लावून ते त्यांच हस करतात आणि त्यांच्या संकटात,दुखा:त भर टाकतात काहींना त्यांची प्रगती, संपन्नता ,उत्कर्ष बघवत नाहि कधीकधी तर अशा मित्रांमुळे दिवाळ वाजण्याची वेळ येते तर काही जण आपला हेतू साध्य करून संकट समयी मित्राला एकट पाडून निघुन जातात आणि "A Friend in need is a friend indeed "हि म्हण उलटी करून Friend is not in need is not a friend indeed अशी नवी म्हण सार्थ करत त्याला आयुष्यातून उठवू पाहतात त्याला जगण नकोस होत काही कमकुवत मनाची माणस क्वचित जीवही देतात अशा वेळेस मैत्रीवरचा विश्वास उडतो आणि नको ती मैत्री करण अस होउन जात पण काही कर्तुत्ववान माणस मात्र हार न मानता अशांना त्यांची जागा दाखवुन देतात त्यांना कितीही एकट पाडलं तरी ते हारत नाहीत
                          आणि अशाच वेळी खरया मित्रांची ,मैत्रिणीची ओळख पटते कधीकधी जुन्या शाळा कॉलेजातल्या मैत्रिणी पुन्हा भेटतात आणि  मैत्रीवरचा उडालेला विश्वास पुन्हा बसतो जगण्याला नवसंजीवनी मिळते जुन्या आठवणीला उजाळा मिळतो आणि पुन्हा एकदा खरया मैत्रीचा प्रत्यय येतो आपल्या जवळचे दुरावतात ,आपल्यावर संकट येतात तेव्हा जे मित्र  कामी येतात तेच खरे मित्र नाहीतर मैत्रीला अर्थ नसतो 

No comments:

Post a Comment