Saturday 11 July 2015

यवतमाळ पावसाच्या प्रतीक्षेत

जुन महिना संपून जुलै अर्ध्यावर आला तरी यवतमाळ येथे अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही त्या मुळे यवतमाळकर पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत जुन मध्ये पावसाने व्यवस्थित हजेरी लावली त्या मुळे शेतकरी व नागरिक सुखावले पण नंतर मात्र पाऊस लांबल्याने नागरिक पुन्हा उन्हाळा अनुभवत आहेत  गेल्या आठवडयात संद्याकाळी साडेसहा पर्यंत सूर्याची प्रखरता जाणवत होती
ह्या आठवड्यातही सूर्याची प्रखरता जाणवत असली तरी मधून अधून काळे ढग दाटून येतात आणि आता पाऊस बरसणार असे वाटत असताना पुन्हा ऊन पडते आणि पाऊस काही येत नाही
वातावरणातील उष्मा आणि उकाड्या मुळे पुन्हा नागरिकांनी कुलर्स बाहेर काढलेत शिवाय यवतमाळकरांना 
आता पुन्हा पाणीटंचाईची चिंता भेडसाऊ लागलीय आधीच पाणीपुरवठा दोनदिवसांनी होतोय पुरेसा पाऊस पडला नाही व धरण भरले नाहीतर पाणीप्रश्न आणखी गंभीर होईल
जूनमधल्या वेळेवर पावसाच्या आगमनामुळे आनंदित झालेल्या शेतकरयांनी आपल्या शेतात पेरणीही केली होती पण पावसाने मारलेल्या दडीमुळे पिके कोमेजू लागल्याने त्यांनाही आता दुबारपेरणीची चिंता लागली आहे 
यवतमाळ येथे आधी दुष्काळ मग अतीपावसाने आलेला पूर ,गारपीट  ह्या मुळे आधीच लोक त्रस्त झाले होते आणि आता पावसाने मारलेल्या दडीमुळे लोकाना पाणीप्रश्न तर शेतकरयांना दुष्काळाची चिंता लागलीय  म्हणुनच लोक आता पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत         

No comments:

Post a Comment