Thursday 8 April 2021

अंतराळवीर Mark Vande Hei रशियन अंतराळवीर Oleg Novitskiyआणी Pyotr Dubrov ऊद्या अंतराळस्थानकात रहाण्यासाठी जाणार

Cosmonauts Pyotr Dubrov of Roscosmos, left, and Oleg Novitskiy, center, of Roscosmos, and NASA astronaut Mark Vande Heiनासाच्या मोहीम 65चे अंतराळवीर Pyotr Dubrov ,Oleg Novitskiy आणि Mark Vande Hei रशियातील Star City Gagarin Cosmonaut ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग दरम्यान -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 6 एप्रिल

नासाच्या अंतराळ मोहीम 65चे अंतराळ वीर Mark Vande Hei,रशियन अंतराळवीर व सोयुझ कमांडर Oleg Novitskiyआणी Flight engineer Pyotr Dubrov हे तिन अंतराळवीर ऊद्या नऊ एप्रिलला स्थानकात रहाण्यासाठी जाणार आहेत 

कझाकस्थानातील बैकोनुर Cosmodrome येथून दुपारी 3.42 मिनिटांनी (12.42p.m.स्थानिक वेळ) त्यांचे MS-18 हे सोयुझ यान अवकाशात झेपावेल आणि तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळ यान स्थानकाजवळ पोहोचेल त्या नंतर यान दोन फेऱ्या मारेल अंतराळयान स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचताच यानाचा स्थानकाशी संपर्क होईल आणि दोन तासांनी सोयूझ यान आणि स्थानक यांच्यातील docking प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर संध्याकाळी 7.o7 मिनिटाला सोयूझ यान स्थानकाला जोडले जाईल 

अंतराळ स्थानकात सद्या रहात असलेले सात अंतराळवीर ह्या तिघांचे स्थानकात स्वागत करतीलअंतराळवीर Mark Vande ह्यांची हि दुसरी अंतराळवारी असून Oleg Novitskiy हे तिसऱ्यांदा अंतराळस्थानकात राहायला जाणार आहेत तर Pyotr Dubrov हे पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार आहेत 

हे तिन्ही अंतराळवीर नासाच्या अंतराळ मोहीम 65 मध्ये सामील होऊन तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी  होतील अंतराळस्थानकात प्रवेश केल्यानंतर नासाचे दहा अंतराळवीर एकमेकांचे अभिनंदन करून नासा संस्थेशी संपर्क साधतील ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ उड्डाणाचे आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा t.v. वरून करण्यात येणार आहे 

                                                तीनही अंतराळवीर उड्डाणस्थळी दाखल                 

 The Soyuz MS-18 rocket, that will launch the Expedition 65 crew to the space station on April 9, is rolled out to the launch pad in Kazakhstan. Credit: NASA/Bill Ingalls

 पाच एप्रिलला बैकोनूर Cosmodrome वर सोयूझ MS -18 आणण्यात आले सोबत अंतराळवीर -फोटो नासा संस्था 

हे तिनही अंतराळवीर त्यांचे अंतिम ट्रेनिंग पूर्ण करून उड्डाणासाठी सज्ज झाले आहेत पाच एप्रिलला हे तिघे रशियातील ट्रेनिंग सेंटर मधून कझाकस्थानातील बैकोनूर Cosmodrome येथे दाखल झाले तेथे त्यांची उड्डाणपूर्व चाचणी घेण्यात आली ह्या तिघांची सोयूझ फिट चेक,Space Suite फिटिंग चेक व इतर आवश्यक चाचणी घेण्यात आली ह्या तिघांनी त्या नंतर काही वेळ आपल्या आवडीचे कॅरम,बुद्धिबळ वै गेम खेळण्याचा आनंद घेतला त्यांनी Cosmonaut Hotel Flag raising ceremony मध्ये भाग घेऊन आपलाआपल्या देशाचा झेंडा फडकावला शिवाय वृक्षारोपणही केले ह्या अंतराळवीरांनी तेथील नासाच्या म्युझियमला भेट दिली आणि तेथील अंतराळवीरांच्या सह्या असलेल्या बोर्डवर सह्या केल्या

No comments:

Post a Comment