Tuesday 27 April 2021

Space X Resilience चे अंतराळवीर एक मेला पृथ्वीवर परतणार

 Pictured from left are Crew-1 members Michael Hopkins, Victor Glover, Shannon Walker and Soichi Noguchi.

 Resilience Space X- 1चे अंतराळवीर Mike Hopkins ,Victor Glover ,Shannon Walker आणि Soichi Noguchi -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -  27 एप्रिल

नासाच्या Space X -1चे अंतराळवीर Michael Hopkins,Victor Glover,Shannon Walker आणि Soichi Noguchi आता 28 एप्रिल ऐवजी 1मेला पृथ्वीवर परतणार आहेत Resilienceच्या Splash down साठी सद्याचे हवामान अनुकूल नसल्यामुळे Space X आणि नासा संस्था ह्या दोघांनी विचारांती हा निर्णय घेतला आहे 

Space X -1 crew Dragon Resilience ह्या चारही अंतराळवीरांना घेऊन शुक्रवारी संद्याकाळी 5.55 वाजता अंतराळस्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी अंतराळप्रवासास निघेल त्या आधी Resilience मधील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होऊन यान स्थानकापासून वेगळे होईल आणि एक मेला शनिवारी दुपारी 1.36 मिनिटाला पृथ्वीवर पोहोचेल Resilience अमेरिकेतील मेक्सिको येथील Gulf Off Florida येथील समुद्रात अवकाशातून पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरेल 

पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकात कमांड चेंज सेरेमनी व अंतराळविरांचा Farewell event पार पडेल ह्या वेळेस स्थानकाची कमांडर Shannon Walker स्थानकाची सूत्रे व चावी जपानचे अंतराळवीर Akihiko Hoshide ह्यांच्या हाती सोपवेल 

Resilience चे Splash down Atlantic Ocean मधील सात Landing zones पैकी एका ठिकाणी किंवा Florida येथील Gulf Coast मध्ये होईल त्या आधी ह्या Splash down साठी किनाऱ्याजवळील दहा मैल अंतरावरील भाग सुरक्षित करण्यात आला असून तेथील होड्या त्यांचे मालक ह्यांना दूर जाण्यास सांगण्यात आले आहे शिवाय नागरिकांनाही तेथे येण्यास निर्बंध घालण्यात आले असून हा परिसर रिकामा करण्यात आला आहे अंतिम क्षणी हवामानाचा अंदाज घेऊन Resilience च्या Splash down चे ठिकाण निश्चित केल्या जाईल लोकांच्या व Resilience च्या सुरक्षिततेसाठी हि काळजी घेण्यात आली आहे

 Resilience मधून अंतराळवीरांनी स्थानकात केलेल्या सायंटिफिक प्रयोगातील संशोधित नमुने आणि गोळा केलेला डेटा पृथ्वीवर आणण्यात येईल ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्याचे आणि Resilience च्या Splash down चे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment