पृथ्वीवर सुखरूप उतरल्यानंतर नासाची अंतराळवीर Kate Rubins हिला यानातून बाहेर काढताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -17 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 64चे अंतराळवीर Kate Rubins रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Kud -Sverchkov हे तिघे अंतराळस्थानकातील सहा महिन्यांचा मुक्काम संपवून शनिवारी पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत
शुक्रवारी 9.34 p.m.ला त्यांचे सोयूझ MS-17 हे अंतराळयान अंतराळस्थानकातून पृथ्वीच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणि शनिवारी12.33p.m ला पृथ्वीवर परतले ( 10.55a.m. स्थानिक वेळ )कझाकस्थानातील Dzhezkagan येथे त्यांचे अंतराळ यान सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले
सोयूझ यान पृथ्वीवर उतरताच रशियातील नासा संस्थेतील टीम तात्काळ तिथे पोहोचली आणि त्यांनी तीनही अंतराळवीरांना यानातून बाहेर येण्यास मदत केली त्या नंतर त्यांना उचलून आणून खुर्चीवर बसविण्यात आले अंतराळ वीर पृथ्वीवरच्या हवेतील मोकळा श्वास घेऊन थोडे फ्रेश झाल्यावर नासा संस्थेतील टीममधील डॉक्टरांनी त्यांचे प्राथमिक चेकअप केले आणि त्यांना फुलांचा गुच्छ देऊन ते पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले त्यांना पाणी पिण्यास देण्यात आले हे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतल्यामुळे आनंदित झाले होते त्यांच्या आवश्यक मेडिकल चेकअप नंतर Kate Rubins नासाच्या विमानाने Houston येथील तिच्या घरी पोहोचली तर रशियन अंतराळवीर Sergey Rhyzhikov आणि Sergey Kud -Sverchkov Star City Russia येथील त्यांच्या ट्रेनिंग बेस मध्ये परतले
स्थानकातील ह्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात Kate Rubins ह्यांनी अंतराळातील झिरो ग्रॅविटीत मानवी Heart मध्ये काय बदल होतो आणि D.N.A. Sequencing ह्यावर संशोधन केले शिवाय अंतराळातील वातावरणात Microbesमध्ये कसे बदलतात ह्यावरही संशोधन केले
Kate Rubins आणि Sergey Rhyzhikov ह्यांची हि दुसरी अंतराळवारी होती तर Sergey Kud -Sverchkov ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी होती आता 21 एप्रिलला Kate Rubins तिच्या ह्या मोहिमेबद्दल पत्रकारांशी लाईव्ह संवाद साधून माहिती देणार आहे
No comments:
Post a Comment