Perseverance अंतराळ यानात अत्याधुनिक MOXIE ऊपकरण बसविण्यात येत असताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -21 एप्रिल
मंगळावर 18 फेब्रुवारीला पोहोचल्यानंतर लगेचच Perseverance मंगळ यानाने कार्यरत होऊन महत्वाची माहिती व फोटो पाठवण्यास सुरवात केली होती 19 तारखेला ह्या यानासोबत पाठवण्यात आलेल्या Ingenuity helicopter ने देखील मंगळावरील आकाशात यशस्वी ऊड्डान करून तेथील फोटो पाठवले आहेत आता Perseverance यानाने आणखी महत्वपुर्ण कामगिरी पार पाडली आहे यानात बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने यानाने मंगळावरील 60 व्या दिवशी म्हणजे 21 एप्रिलला मंगळ भुमीवरील वातावरणातील हवेतुन कार्बन डाय ऑक्साईड गोळा करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन त्यातून ऑक्सिजन वेगळे करण्याचे महत्वपूर्ण काम पार पाडले आहे
मंगळावरील वातावरण अत्यंत विरळ आहे आणी तेथील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी पण कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण मात्र खूप जास्त म्हणजे 96% ईतके प्रचंड आहे म्हणून शास्त्रज्ञांनी संशोधन करुन MOXIE हे ऊपकरण तयार केले आहे Perseverance ह्या सहाचाकी मंगळयानात toaster च्या आकाराचे MOXIE हे संशोधीत ऊपकरण बसविण्यात आले आहे ह्या ऊपकरणात आधुनिक यंत्रणेद्वारे हवेतील कार्बन डाय ऑक्साईड गोळा करून त्यातून ऑक्सिजन वायु वेगळा करण्याचे तंत्र विकसित केले आहे आता ती यंत्रणा कार्यान्वित झाली आहे
मंगळावरील भविष्यकालीन मानवसहित अंतराळ मोहिमेतील अंतराळविरांसाठी आणी तेथील अंतराळयानाच्या ऊड्डानासाठी आवश्यक ईंधन म्हणून ऑक्सिजन निर्मिती आवश्यक आहे Perseverance यानाच्या ह्या यशस्वी कामगिरी नंतर हे ऊपकरण संशोधीत करणाऱ्या टिमचे Associate Administrator Jim Reuter हे म्हणतात कि,मंगळावरील अत्यंत विरळ वातावरणातुन कार्बन डाय ऑक्साईड वायू गोळा करुन त्यातून आँक्सिजन वायू वेगळा करण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण आहे ह्या प्राथमिक यशाने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे हा सुरवातीचा टप्पा आहे अजून खूप दुरवरचा पल्ला आम्हाला गाठायचा आहे त्यासाठी खूप काम करण बाकी आहे पण ह्या यशाने मंगळावरील भविष्यकालीन मानवी वस्ती वसविण्याची शास्त्रज्ञांची ईच्छा पुर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
MOXIE चे प्रमुख संशोधक Michael Hecht म्हणतात भविष्यात मंगळावर मानवी वस्ती वसवली तर त्यांच्या श्वासोच्छवासासाठी आणी तिथुन पृथ्वीवर परतण्याकरता रॉकेट ऊड्डाणासाठीच्या ईंधनासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे आणी सद्या तरी Perseverance यानाने हा प्रयोग यशस्वी करत भविष्यकालीन मार्गाची किल्ली शोधली आहे
MOXIE विषयी अधिक माहिती देताना ते म्हणातात आम्ही ह्या यंत्राचे संशोधन करण्यास प्रेरीत झालो कारण आधी सांगितले त्याप्रमाणे ऑक्सिजनची आवश्यकता ! समजा भविष्यात मंगळावर चार अंतराळवीर वास्तव्यासाठी गेले तर तिथून ऊड्डाणासाठी अंदाजे 15,000 पौंड (7 मेट्रिक टन) ईतक्या वजनाच्या ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणी त्यातील एक टन ऑक्सिजन अंतराळवीरांच्या श्वासोच्छवासाठी आवश्यक आहे पृथ्वी वरुन 25 मेट्रिक टन ऑक्सिजन मंगळावर घेऊन जाण अत्यंत अवघड आहे पण एक टन वजनाचे MOXIE यंत्र मंगळावर पाठवल तर त्याद्वारे 25टन ऑक्सिजन तयार करण अधिक ऊपयुक्त ठरेल अस आम्हाला वाटल आणी आम्ही ह्या अत्याधुनिक यंत्राची निर्मिती केली
ह्या यंत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवेतील कार्बनडाय आँक्साईड गोळा करुन त्यातील ऑक्सिजनचे दोन molecules वेगळे केले जातील व ऑक्सिजन जमा करुन साठवला जाईल ह्या वेळेस बाहेर पडणारा कार्बन मोनाक्साईड हवेत सोडला जाईल ह्या यंत्रणेत ह्या रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक तेव्हढी हवा गरम करणे किंवा थंड करण्याची क्षमता विकसित केली आहे शिवाय ह्या रासायनिक प्रक्रियेदरम्यान बाहेर पडणाऱ्या वायुंमुळे Perseverance मंगळ यानावर दुष्परिणाम होऊ नये ह्यासाठी ह्या MOXIE यंत्रावर सोन्याचा पातळ मुलामा देण्यात आला आहे त्या मुळे यानातुन Infrared Rays reflect होतील आणी यानाचे संरक्षण होईल
मानवाला दहा मिनिटे श्वासोच्छवास करण्यासाठी साधारण पाच gram ऑक्सिजनची आवश्यकता असते MOXIE तितका ऑक्सिजन जलदगतीने तयार करेल अशी यंत्रणा त्यात विकसित केली आहे आणी शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वी वरील दोन वर्षे म्हणजे मंगळावरील एक वर्षे पर्यंत MOXIEऑक्सिजन निर्मिती करु शकेल असा अंदाज आहे कदाचित नऊपट जास्तच ऑक्सिजन जमा होईल अशी यंत्रणा त्यांनी विकसित केली आहे
No comments:
Post a Comment