स्थानकात पोहोचल्यानंतर लाईव्ह संवाद साधताना दहाही अंतराळवीर एकत्रित -फोटो नासा संस्था
नासा संस्था -9 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 65चे अंतराळवीर Mark Vande Hei रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy आणि Pyotr Dubrov नऊ एप्रिलला 9.20a.m.ला स्थानकात सुखरूप पोहोचले
त्यांचे सोयूझ MS-18 अंतराळयान कझाकस्थानातील बैकोनूर येथून 3.42a.m.ला स्थानकाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणि तीन तासांनी स्थानकाजवळ पोहोचले यानाने दोन फेऱ्या मारल्यानंतर यान स्थानकाजवळ पोहोचले यानाची hatching आणि docking प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले
काही वेळांनी स्थानकातील दहाही अंतराळवीर एकत्रित आले आणि ह्या तीन अंतराळवीरांचा वेलकम सेरेमनी पार पडला त्या नंतर अंतराळवीरांचा रशियातील नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधला गेला तेव्हा संस्थेतील प्रमुखांनी त्यांचे स्थानकात सुरक्षित पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले ह्या वेळी अंतराळवीरांनी त्यांच्या नातेवाइकांशीही लाईव्ह संवाद साधून सुरक्षित पोहोचल्याचे सांगितले
सुरवातीला अंतराळवीर Oleg Novitskiy ह्यांच्या नातेवाईकांनी संवाद साधला
रिटा -Hello ! father its Me ! तुम्ही कसे आहात ?
Oleg - मी ठीक आहे!आम्ही खूप लवकर पोहोचलो !
रिटा -हो! आम्ही सगळ्यांनी पाहील ! Dad, तुम्ही कधी परत येणार ? अस विचारल
Oleg -Oh ! तुम्ही पाहिलत ? Good !
रिटा - Dad ! आम्ही दिलेल खेळण Wolf Kitten दाखवा
Oleg -ह्यांनी Wolf दाखवताच आणि ते स्थानकात तरंगू लागताच त्यांची मुलगी आनंदित झाली तेव्हा त्यांनी आईला फोन द्यायला सांगितला तेव्हा त्यांच्या पत्नीने स्थानकात सुरक्षित आणि लवकर पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त करून स्थानकातील वास्तव्य सुरक्षित आणि यशस्वी होवो अशा शुभेच्छा दिल्या
त्यानंतर Pyotr Dubrov ह्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि तुम्ही आनंदी आणि फ्रेश दिसत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे सांगत तुम्ही कसे फील करत आहात असे विचारल
Dubrov -मी खूप आनंदी आणि exited आहे
अभिनंदन !तुम्हाला हि संधी दिल्याबद्दल नासा संस्थेचेही आभार त्यांच्यामुळेच आज तुम्ही स्थानकात आहात तुमची हि पहिलीच अंतराळवारी आहे तुमच्या मित्रांचे सतत फोन येत होते त्यांनी तुमच लाँचिंग पाहील सर्वांनी तुमच अभिनंदन केलय
Dubrov - सर्वांचे आभार ! आणि नासाचेही !हो निश्चितच !त्यांच्यामुळे आज मी इथे पोहोचलोय
-आता तुम्ही परत आल्यावर आपण फिशिंगला जाऊ ! आता मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन उत्कृष्ठ काम करून स्थानकात तुमचा ठसा उमटवा तुम्ही त्यासाठी खूप वर्षे मेहनत घेतली आहे तुम्हाला यश मिळो आणि स्थानकातील वास्तव्य सुरक्षित आणि यशस्वी होवो अशी सदिच्छा !
Dubrov -थँक्स!
-त्या नंतर पुन्हा Oleg ह्यांच्या मुलीने त्यांना पुन्हा तिने दिलेल खेळण दाखवायला सांगितल तेव्हा त्यांनी आणि Mark Vande ह्यांनी तिला ते दाखवल !
अखेर सर्वांचे आभार मानून हा लाईव्ह संवाद संपला
No comments:
Post a Comment