मंगळभूमीवरील आकाशात भरारी मारतानाचा Ingenuity Helicopter चा ऐतिहासिक फोटो -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 19 एप्रिल
नासाच्या Perseverance मंगळ यानासोबत मंगळावर गेलेल्या Ingenuity हेलिकॉप्टर ने सोमवारी मंगळावरच्या आकाशात यशस्वी भरारी मारली आणि जगाच्या इतिहासात परग्रहावर उडणारे पहिले हेलिकॉप्टर अशी ऐतिहासिक नोंद केली
सौर उर्जेवर कार्यान्वित होणारे हे स्वयंचलित हेलिकॉप्टर 3.34 a.m.EDT ला ( 12.33 a.m. मंगळावरील वेळ ) स्वयंचलित यंत्रणेने चार्ज झाले आणि मंगळभूमीवर तीन मीटर (10 feet) उंचीवर झेपावले तीस सेकंद मंगळावरील आकाशात भ्रमण करून 39.1 सेकंदांत पुन्हा मंगळभूमीवर सुरक्षित उतरले हे हेलिकॉप्टर सुरवातीला स्वयंचलित यंत्रणेने आकाशात झेपावले पृथ्वीवरील नासाच्या California येथील टीमला रोव्हरमधील Altimeter ने पाठवलेला यशस्वी उड्डाणाचा डाटा प्राप्त होताच टीममधील सर्वांनी टाळा वाजवून जल्लोष करीत आनंद व्यक्त केला
हि मोहीम यशस्वी झाल्याचा संदेश प्राप्त होताच ह्या मोहिमेच्या टीम प्रमुख MiMi Aung म्हणाल्या कि ,पृथ्वीवर Wright बंधूंनी जसे आकाशात पहिले विमान उड्डाण केले तसच आम्हाला मंगळ भूमीवरील आकाशात Ingenuity हेलिकॉप्टर उडवायचे होते आता आमचे हे स्वप्न साकार झाले आहे
नासाचे Associate Administrator Thomas Zurbuchen ह्यांनी जिथून Ingenuity helicopter मंगळभूमीवरील आकाशात झेपावले त्या ठिकाणाला Martian Airfield असे नाव दिले आहे ते म्हणाले,117 वर्षांपूर्वी Wright Brothers ह्यांनी पृथ्वीवरील आकाशात विमान ऊड्डान केले आता आम्ही मंगळावरील आकाशात Ingenuity helicopter ऊडवले ह्या दोन्ही घटना वेगवेगळ्या ग्रहावरील आहेत Amazing आहेत जगाच्या ईतिहासातील आश्चर्यकारक यशस्वी घटना आहेत
मंगळावर अत्यंत विरळ वातावरण आहे तेथे अत्यंत सुक्ष्म गुरुत्वाकर्षण आहे अशा वातावरणात Ingenuity helicopterचा पंखा स्वयंचलित यंत्रणेने कार्यान्वित करून अशा हवेत भरारी मारणे सोपे नव्हते मागच्या आठवड्यात Ingenuity helicopter चे ऊड्डान अयशस्वी झाले तरीही आम्ही हार मानली नव्हती कारण ह्या मंगळमोहिमेतील शास्त्रज्ञ गेली सहा वर्षे ह्या मोहिमेच्या यशस्वीते साठी अथक प्रयत्न करत होते आता त्यांच्या कष्टाला यश मिळाले आहे अर्थात Ingenuity किती ऊंचावर आणी कीती दुरवर ऊडेल हे आताच सांगता येत नसले तरी आमची मोहीम भविष्यात यशस्वी होईल ह्याची आम्हाला खात्री वाटतेय कारण Ingenuity helicopter ने मंगळावरील आकाशात यशस्वी भरारी मारुन सद्या तरी Sky on Mars may not be the limit हे सिध्द केलय
Ingenuity helicopter मंगळभुमीवर ऊड्डान करून तेथील भविष्यकालीन मानवी वास्तव्यासाठी योग्य वातावरण शोधणार आहे शिवाय तेथील भुमीवरील दऱ्या,खोरे,नदी,नाल्यांचे निरीक्षण नोंदवून तेथील फोटो व माहिती पृथ्वीवर पाठवणार आहे सद्या शास्त्रज्ञांनी भविष्यकालीन मंगळमोहिमेतील अंतराळविरासाठी मंगळावरील भुमीसारखी जमीन तयार करून त्यात केलेली धान्य,भाजी,फळे लागवड यशस्वी झाली आहे स्थानकात देखील भविष्य कालीन मंगळभुमी वरील दिर्घकालीन वास्तव्यासाठी संशोधन सुरू आहे
Ingenuity helicopter ने मंगळभुमीवरील केलेल्या ऊड्डाणाचे फोटो व लाईव्ह व्हिडिओ नासा संस्थेने सोशल मिडिया वरून शेअर केले आहेत
No comments:
Post a Comment