नासा संस्था - 15 मार्च
नासाच्या अंतराळ मोहीम 64/65 चे अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनी मागच्या आठवड्यात पत्रकारांशी लाईव्ह संवाद साधला शिवाय सोशल मीडियावरून आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली सध्या ते रशियातील Star City येथे आहेत नासा संस्थेतर्फे ह्या लाईव्ह संवादाचे प्रसारण नासा T.V. वरून करण्यात आले सुरवातीला नासाच्या Huston येथील कार्यालयातुन Megan Sumner ह्यांनी Mark Vande ह्यांच्याशी संपर्क साधुन संवादाला सुरवात केली
Megan- नऊ एप्रिलला तुम्ही स्थानकात जाणार आहात,काय फिलींग आहेत?
Mark- He thanks Megan! मी खुपच exited आहे! खरतर आक्टोबर मध्ये माझ ट्रेनिंग पूर्ण झाले होते पण तेव्हा मी जाऊ शकलो नाही पण आता मात्र माझी अचानक शेवटच्या क्षणी निवड झालीय त्या मुळे मी खूप आनंदात आहे आणि जाण्यासाठी एकदम रेडी आहे
Megan - That is great to hear! आता मिडिया वरुन प्रश्न घेऊ यात !
Joey roulette( the verge)- अगदी ऐनवेळी अचानक तुमची निवड झाली हे तुम्हाला केव्हा आणी कस कळल?
Mark- हा गमतीदार किस्सा आहे ! माझ्या शाळेतल्या मित्राचा मध्यरात्री फोन आला खरतर मी खूप झोपेत होतो तेव्हा फोन माझ्या पत्नीने ऊचलला त्यान तीला माझी ह्या मिशनसाठी निवड झाल्याची बातमी twitter वर वाचल्याच सांगितल मी आनंदित झालो पण जोवर मला नासाचा निवड झाल्याचा Official ईमेल आला नाही तोवर मला खात्री नव्हती कारण आम्हा चौघा अंतराळवीरांच स्थानकात जाण्यासाठी सिलेक्शन झाले होते आणी ट्रेनिंगही आणी सोयुझ यानातुन फक्त तिघांना जाता येत पण ऐनवेळी एका रशियन अंतराळवीराऐवजी माझी निवड झाल्याचा ईमेल आला आणी मी खरोखरच खूप आनंदी झालो माझ्या आजवरच्या मेहनतीच प्रयत्नांच चीज झाल होत आणी आता मी जाण्याच्या तयारीत आहे अत्यंत ऊत्सुक आहे
Mercia Dunn(associated press)- तुम्ही किती दिवस स्थानकात रहाणार आहात आम्हाला अस कळालय की,स्थानकात रशियन फिल्मच शुटींग होणार आहे त्यामुळे तीथे दोन टुरीस्ट अंतराळवीर येणार आहेत त्यामुळे तुमच परतीच सीट त्यांना द्यावे लागेल व तुमचा स्थानकातील मुक्काम वाढेल
Mark - हो! खरय! कदाचित अस घडेल सोयुझ यानात आधी सांगितल्या प्रमाणे तिघांनाच बसता येत त्यामुळे रशियन फिल्म निर्माते जर तिथे आले तर मला सहा महिन्यांनी पृथ्वीवर परतता येणार नाही मला जास्ती दिवस स्थानकात रहावे लागेल आणी मला जर तिथे जास्ती दिवस रहायची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल कारण आधीच्या मिशनमध्ये मी तीथे फक्त सहा महिने राहिलो होतो आता ह्या दुसऱ्या मिशनमध्ये मी हि संधी स्विकारेन कारण स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत जास्त दिवस राहिल्याने मानवी आरोग्य तिथल्या वातावरणाला कसा प्रतिसाद देते मानवी शरीरात तेथे तग धरून राहताना काय बदल होतात ह्या वर सध्या शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत त्यासाठीच्या प्रयोगात ह्या आधी अंतराळवीर Scott Kelly आणी Peggy Whitson ह्यांनी वर्षभर स्थानकात राहुन आणी Jessica Meir हिनेही जवळपास वर्ष भर राहून सहभाग नोंदवला होता आता मला ती संधी मिळेल
Caustin- आता स्थानकात तुम्ही अकरा अंतराळवीर एकत्रित रहाणार आहात तेव्हा कसे adjust करणार?
Mark- स्थानक मोठे आहे तीथे भरपूर जागा आहे अमेरिकन व रशियन segment वेगळे आहेत थोडी फार adjustment करावी लागेल अर्थात थोडे दिवसच कारण Kate Rubin's आणी दोन रशियन अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परततील तिथे प्रत्येक जण आपआपल्या कामात व्यस्त असतो कोणी व्यायाम करतो कोणी संशोधन तर कुणी ईतर कामे त्या मुळे अडचण होणार नाही पण मोकळ्या वेळी आम्ही जेव्हा एकत्र जमु तेव्हा खूप मजा येईल एरव्ही स्थानकात तीनच जण रहायचे एव्हढे जण एकत्र पहायला मिळण,रहायला मिळण आमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आमच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ते चांगलेही आहे
Space News(Jeff Faust)- ह्या वेळेसच्या निवडीबद्दल तुम्हाला twitter वरून कळाल अस तुम्ही सांगितलत ह्या आधीच्या आणी आताच्या अंतराळ मोहिमेत काय फरक आहे?
Mark- आधी मी नवीन होतो अंतराळ प्रवासाबद्दल माहिती नव्हती पण जाण्यासाठी इतकाच ऊत्सुक होतो तेव्हा मी अननुभवी होतो पहिल्या अंतराळ प्रवासाचे क्षण थरारक होते आता मला अंतराळ प्रवासाचा अनुभव आहे स्थानकात सहा महिने रहाण्याचा तेथील वातावरणाचा अनुभव आहे ह्या वेळेस वेळेवर माझी निवड झाल्याने ऊड्डानपुर्व ट्रेनिंगसाठी वेळेवर पोहोचलो पण आधी मी पुर्ण वेळ ट्रेनिंग घेतल,अत्यंत कठीण आणी अथक परीश्रम केले आता सोप वाटल तरी तेव्हा ते खूप कठीण होत पण आताही मी तितकेच परीश्रम घेतलेत आणी मी दुसऱ्यांंदा स्थानकात जाऊन संशोधन करण्यासाठी ऊत्सुक आहे कोरोना मुळे launching एप्रिलमध्ये असल्याने पुरेसा वेळ मिळाला
Bill Hardwood (CBS News)- अंतराळवीर सातत्याने स्थानकात रहाण्यासाठी जातात अजूनही सोयुझ यानातुन रशियन भुमीवरून तुम्ही जाणार आहात त्याबद्दल सांगा
Mark- गेल्या विस वर्षापासून नासाचे अंतराळवीर स्थानकात सातत्याने जात आहेत सद्या तरी रशियन भुमीवरून सोयुझ यानातुन अंतराळवीर स्थानकात जातात आता Space X Dragon मधुन अमेरिकन भुमीवरून अंतराळवीर स्थानकात पोहोचले आहेत ईतर देशाप्रमाणे रशियाही नासाचे पार्टनर आहेत अमेरिकेतून अमेरिकन स्पेसक्राफ्टमधुन जायची संधी मिळाली तर आम्हाला निश्चितच आवडेल भविष्यात असे घडेल
Robert Perelman(Collect Space)- तुमची निवड ऐनवेळी झाल्यामुळे तुमचे कपडे,सामानाची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला का ? स्थानकात नेण्यासाठी तुमच्या आवडीचे पदार्थ वै. ?
Mark- माझी निवड वेळेवर झाल्याने मला वेळ मिळाला नाही माझ्या मापाचा Space suiteही तयार नव्हता पण मी रशियन सहकाऱ्याचा स्पेससुट वापरला त्यांचे स्पेससुटही चांगले आहेत मला माझ्या साईजचे सुट नासा संस्थेतर्फे पाठवण्यात येणार आहेत आणी पदार्थच म्हणाल तर रशियन पदार्थही चांगले असतात स्थानकात सध्या अमेरिकन अंतराळवीर रहात आहेत त्यामुळे तिथे अमेरिकन पदार्थ आहेतच
सोशल मिडिया वरुन- अंतराळप्रवासात काही अडचण येईल,समस्या ऊदभवेल अशी भीती किंवा चिंता वाटते का?
Mark - आम्हाला ट्रेनिंग दरम्यान अंतराळप्रवासात काही समस्या आली तर परीस्थिती कशी हाताळायची कस नियंत्रण मिळवायच ह्याच प्रशिक्षण दिलेल असत त्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खूप कठीण ट्रेनिंग देऊन तयार केल जात त्यामुळे आम्ही सतत सतर्क असतो यानातुन काही toxic पदार्थ लिक होऊ नये म्हणून यानातील सगळ्याच पार्टची,लिकेज नाही ना ह्याची कसुन तपासणी केली जाते माझ्या पहिल्या अंतराळ प्रवासाच्या वेळेस मला अशी चिंता होती पण सुदैवाने काही समस्या ऊद्भवली नाही आता मी निश्चिंत आहे मला आता पहिल्या अंतराळ प्रवासाचा अनुभव असल्याने काही समस्या आल्यास मी ती कुशलतेने सोडवून त्यावर नियंत्रण मिळऊ शकेन
प्रश्न -स्थानकात मानव किती काळ वास्तव्य करू शकतो? आणी स्थानकात गेल्यावर तुम्ही काय मिस करता?
Mark -सद्या तरी निश्चित काळ सांगता येणार नाही पण ह्या आधी सांगितल्याप्रमाणे अंतराळवीर एकवर्ष तिथे राहु शकतात मानवी शरीर तिथल्या वातावरणात कीतीकाळ तग धरून राहु शकते आणी सक्षम बनून तिथल्या वातावरणाला सामोरे जाऊ शकते ह्यावर संशोधन सुरू आहे कदाचित भविष्यात मानव जास्त काळ स्थानकात राहु शकेल
स्थानकात आम्ही पृथ्वीवरील वातावरण मिस करतो तिथे झीरो ग्रव्हिटीत तरंगत्या अवस्थेत राहाव लागत सरळ ऊभ राहता येत नाही चालता येत नाही हालचाली नियंत्रित होतात मानव किंवा वस्तू 360 degree कोनातून गोलाकार फिरतात त्यामुळे सतर्क रहाव लागत नाही तर कुठेही धडकुन ईजा होण्याची भीती असते कधी आपण समोर जाऊ पहातो तेव्हा फोर्सने ऊलट्या दिशेने ढकलल्या जातो सुरवातीला त्रास होतो पण नंतर सवय होते दोन्ही हात कामात असतील तर भिंतीवर पाय ठेऊन ऊभ रहाता येत कुठल्याही दिशेने वर,खाली अगदी सुपरमॅन सारख हळूहळू सगळ्याची सवय होते मग मात्र मजा वाटते पण सुरवातीला खूपच कठीण जात
Robert Perlman-(Collect Space) -साठ वर्षांपुर्वी पहिले स्फुटनिक अंतराळयान अंतराळात झेपावले आता गेल्या विस वर्षांपासून अंतराळवीर सातत्याने स्थानकात रहात आहेत काय फरक जाणवतो
Mark- साठ वर्षांपूर्वी अमेरिका व रशियात स्पर्धा होती आता आम्ही मिळुन अंतराळ मोहीम यशस्वी करतो नासा संस्थेत अनेक देश सहभागी आहेत आणी सद्याची मंगळ मोहीम,आगामी आर्टिमस मोहीम,Space X Crew Dragon ह्या मोहिमाच यश अभिमानास्पद आहे प्रेरणादायी आहे
Marcia Dunn-(associated press) तुम्ही कोविड लस घेतल्याच ऐकल! काय आणी कशी काळजी घेतली?
Mark- मी रशियात येण्याआधी कोविडची पहिली लस घेतली आता ह्या आठवड्यात दुसरी घेईन माझ्या रशियन सहकाऱ्यांनी घेतली की नाही हे मला माहिती नाही कारण आम्ही quarantine होतो आम्ही सर्वांनी मास्क वापरून कोरोना lock down च्या कडक निर्बंधाचे पालन केले सुरक्षित अंतर ठेवल पण आता सोयुझ यानात मात्र कमी जागेत सुरक्षित अंतर ठेवता येणार नसले तरी आमच्या अंगावर स्पेससुट असल्याने भीती नाही
Joey roulette-( the Verge)- तुम्ही Space X Crew Dragon ऊड्डानाच प्रशिक्षण घेतल का?
Mark- मी सोयुझ यान ऊड्डानाच प्रशिक्षण घेतलय flight engineer असल्याने पण Space X Crew Dragonच नाही पण Crew Dragon आतुन पाहिल खरच खूप Fantastic आहे ऊड्डानाच ट्रेनिंग घेतल नसल तरी आम्हाला त्यातील यंत्रणेची माहिती देण्यात आलीय विषेशतः Dragon मधील स्वयंचलित Docking System बद्दलची
Stepanie- पृथ्वीवरुन अंतराळात गेल्यावर आणी तीथुन पृथ्वीवर परतल्यावर पुर्ववत व्हायला कीती वेळ लागतो? तुमचा अनुभव कसा होता ?
Mark-- आधी सांगितले त्याप्रमाणे स्थानकातील वातावरणात adjust व्हायला दोन आठवडे लागले कारण तीथे सारच तरंगत आपण सवयीने एखादी वस्तू खाली ठेवायला जातो पण थोड्या वेळाने ती वस्तू तिथे नसते ईतरत्र तरंगत जाते मग खूप शोधाव लागत मग तो ग्लास असो की,ईतर काही तसच इथल्या भींतीवर टिस्कोटेपसारख्या वस्तू चिटकवल्या तरी त्या निघून जातात पाणी,अन्न तरंगत त्यामुळे ते पकडून खाण्याची कसरत करावी लागते पण नंतर सवय होते पृथ्वीवर परतल्यावर हालचाली करताना त्रास होतो,हाडे ठिसूळ होतात डोळ्याच्या दृष्टी वर परिणाम होतो,चालण विसरत nausea होतो पण डाक्टरांच्या सल्ल्याने,औषधाने आणी घरच्यांच्या सहकार्याने दोन महिन्यात सगळ पुर्ववत होत पण ढिसुळ झालेली हाडे पुर्ववत व्हायला मला सहा महिने लागले होते
प्रश्न -तुमच्या स्थानकातील संशोधनाच स्वरूप कस असत तूम्ही कशावर प्रयोग करणार आहात
Mark- आम्ही तिथे सुरू असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होतो नासाच्या शास्त्रज्ञांनी ठरवल्यानुसार आम्ही तेथे experiment करतो झीरो ग्रव्हिटीतील मानवी शरीरात होणारे बदल नोंदवतो, samples गोळा करतो आणी त्याची माहिती पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठवतो वेगवेगळ्या रोगांवर अत्याधुनिक ऊपचार शोधण्यासाठी तीथे संशोधन सुरू आहे मी तीथे अल्झायमर ह्या रोगावर संशोधन करणार आहे विसरभोळेपणासाठी मेंदुतील कोणत्या पेशी कारणीभूत आहेत झीरो ग्रव्हिटीतील वातावरणात त्या कशा बिहेव्ह करतात त्यांच्यात काय बदल होतो ह्यावर मी संशोधन करणार आहे शीवाय ईतर संशोधनातही सहभागी होणार आहे
No comments:
Post a Comment