Saturday 24 April 2021

नासाचे Space X Crew Dragon अंतराळवीरांसह स्थानकात सुखरूप पोहोचले

 The four new SpaceX Crew-2 astronauts joined the Expedition 65 crew today bringing the station population to 11. Credit: NASA TV

 स्थानकात पोहोचल्यानंतर अकरा अंतराळवीर एकत्रित पृथ्वीवरील नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -24 एप्रिल 

नासाचे Space X Crew Dragon  आज तेवीस तासांच्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळवीरांसह अंतराळस्थानकात पोहोचले नासाचे अंतराळवीर व मिशन कमांडर Shane Kimbrough,पायलट Megan McArthur जपानचे अंतराळवीर Akihiko Hoshide आणि युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet हे चार अंतराळवीर काल 23 एप्रिलला पहाटे 5.49a.m.ला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी निघाले त्यांचे Space X Crew Dragon Endeavor अमेरिकेतील नासाच्या Kennedy Space Center Florida येथील 39 A Launch Complex येथून स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले 

अंतराळात झेपावताच दहा मिनिटांनी यानाचे रॉकेट प्रज्वलित झाले आणि यान ताशी 17,000 मैल इतक्या प्रचंड वेगाने अंतराळ प्रवास करू लागले तेवीस तासांनी Endeavor अंतराळ यान स्थानकाच्या समोरील भागातील Harmony Module जवळ पोहोचले 7.05a.m.ला स्थानक आणि Crew Dragon ची स्वंयचलीत यंत्रणा कार्यरत होऊन hatching प्रक्रिया पूर्ण झाली आणि अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला अंतराळ स्थानकात त्यांचे स्वागत Victor, Shannon,Mike ,Mark,Vande ,Soichi आणी ईतर अंतराळवीरांनी केले

हा अंतराळप्रवास तेवीस तासांचा असल्यामुळे Space X Endeavor मध्ये अंतराळवीरांना खाण्यासाठी नास्ता  व जेवणाचे पॅक देण्यात आले होते शिवाय ह्या यानातील अत्याधुनिक यंत्रणेमुळे अंतराळवीरांना काही वेळ झोपण्याचीही सोय आहे अमेरिकन बनावटीचे हे Space X Endeavor यान अमेरिकन भूमीवरून अंतराळवीरांना घेऊन दुसऱ्यांदा स्थानकात पोहोचले आहे पहिल्या अंतराळ प्रवासानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्यानंतर आता दुसऱ्यांदा यान अंतराळवीरांना घेऊन स्थानकात पोहोचले आहे पहिल्यांदा दोन अंतराळवीर स्थानकात गेले होते  तर आता चार अंतराळवीर ह्या आधी देखील सहा महिन्यांपूर्वी चार अंतराळवीर अमेरिकन भूमीवरून Space X Crew Dragon मधून अंतराळस्थानकात पोहोचले असून लवकरच ते पृथ्वीवर परतणार आहेत 

ह्या अंतराळवीरांच्या लाँचिंग आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V.  वरून करण्यात आले होते अंतराळवीरांचे प्राथमिक आवश्यक चेकअप झाल्यानंतर त्यांच्या स्पेससूटचेही चेकअप करण्यात आले अंतराळवीरांनी पांढरा स्पेससूट आणि काळे बूट परिधान केले होते लॉक डाऊनच्या कडक निर्बंधामुळे अंतराळवीरांच्या ठराविक नातेवाईकांना भेटण्याची परवानगी होती त्या मुळे सुरक्षित अंतर ठेवून भेटण्यासाठी अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांची पत्नी आणि Megan ह्यांचे पती Bob Behnken आणि मुलगा आले होते हा क्षण ऐतिहासिक असल्याचे सांगताना ते म्हणाले पहिल्या Space X Dragonच्या उड्डाणाच्या वेळेस Megan  मला आली होती तर आता मी Megan ला आणी त्यांचा मुलगा एका वर्षात दोनदा म्हणजे आधी Dad आणी नंतर Mom ला सोडायला आला होता ह्या वेळेस Megan Space X ची Pilot असल्यामुळे ती पहिली महिला Pilot ठरली आहे Thomas Pesquet ह्यांची पत्नी देखील उपस्थित होती ती म्हणाली की,मला आता सहा महिन्यांपर्यंत Thomas फक्त टि.व्हि.च्या स्क्रीन वरच दिसेल.

स्थानकात पोहोचल्यानंतर ह्या चौघांचे स्वागत स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांनी केले सर्वानीच ह्या अंतराळवीरांचे जोशात स्वागत केले काही वेळांनी ह्या अकरा अंतराळवीरांनी एकत्रित येत पृथ्वीवरील नासा संस्थेशी संपर्क साधला  व सुखरूप पोहोचल्याचे सांगितले त्यावेळी नासा,ESA आणि JAXA संस्थेतील प्रमुखांनी ह्या अंतराळवीरांचे अभिनंदन केले ते म्हणाले ह्या सहा महिन्याच्या काळात दुसरा जपानी अंतराळवीर स्थानकात पोहोचला आहे नासा, स्पेस X ह्यांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे ह्या पुढील मोहिमेत देखील आमचे सहकार्य असेल Akihiko तुझे अभिनंदन तु ह्या संधीचा ऊपयोग करून आपल्या देशाचे नाव ऊंचावशील अशी आशा आहे तुला स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा! सर्व अंतराळवीरांचे अभिनंदन आणी शुभेच्छा! स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या 

आता सहा महिने हे अंतराळवीर स्थानकात राहून एकत्रित संशोधन करतील आणि लवकरच नासाच्या Space X चे Shannon ,Victor Mike व Soichi पृथ्वीवर परतणार आहेत

No comments:

Post a Comment