Saturday, 19 October 2019

Christina Koch आणि Jessica Meir ह्यांचा पहिला ऐतिहासिक Women Astronaut स्पेसवॉक संपन्न


NASA spacewalkers Christina Koch and Jessica Meir
     Christina Koch Jessica Meir पहिला महिला Astronauts Space Walk  करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -19 Oct.
नासाच्या अंतराळमोहीम 61 ची फ्लाईट इंजिनीअर Christina Koch आणि Jessica Meir ह्या दोन महिला Astronautsनी मिळून अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी अंतराळातील पहिला ओन्ली महिला ऐतिहासिक स्पेसवॉक यशस्वी केला आहे शुक्रवारी 18ऑक्टोबरला हा ऐतिहासिक स्पेसवॉक संपन्न झाला ह्या  महिलांच्या स्पेसवॉक बद्दल साऱ्यांनाच उत्सुकता होती कारण ह्या आधीचा मार्च मधला नियोजीत फक्त Women Astronaut Space Walk स्पेससूटच्या कमतरते मुळे ऐनवेळी रद्द झाला होता
सकाळीच ह्या दोघींनी आपले स्पेससूट चार्ज करून स्पेसवॉकची तयारी सुरु केली होती Christina ने लाल रंगांच्या रेषा असलेला स्पेससूट परिधान केला होता तर Jessicaचा स्पेससूट रेषाविरहित होता 
NASA astronauts Jessica Meir (left) and Christina Koch
     Jessica Meir आणि Christina Koch स्पेसवॉक पूर्वी Space suit चार्ज करताना -फोटो -नासा संस्था

7.50 वाजता सकाळी सुरु झालेला हा स्पेसवॉक सात तास सतरा मिनिटांनी 2.55 ला संपला ह्या सात तासांच्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघींनी अंतराळस्थानकाच्या बाहेरील भागातील जुन्या बिघडलेल्या बॅटऱ्या आणि चार्ज डिस्चार्ज युनिट काढून त्या जागी नव्या बॅटऱ्या बसवल्या आणि युनिटचे  फिटिंग केले
Christina Koch हिचा हा चवथा स्पेसवॉक होता तर Jessica चा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता ह्या दोघींचीही  2013मध्येच नासा संस्थेत अंतराळस्थानकात जाण्यासाठी निवड झाली होती मात्र 2019 मध्ये त्यांना अंतराळ स्थानकात राहायला जाण्याची संधी मिळाली आणि ह्या संधीचे सोने करत ह्या दोघींनी फक्त महिला अंतराळ स्पेसवॉक करण्याचा बहुमान मिळवला
मार्च मध्येच पहिला Women Astronaut Space Walk आयोजित केला होता Anne McClain आणि Christina Koch ह्या दोघी हा ऐतिहासिक स्पेसवॉक करणार होत्या त्याची भरपूर प्रसिद्धीही झाली असल्याने सर्वांनाच तो स्पेसवॉक पाहण्याची इच्छा होती पण दोघिंनाही एकच स्पेससूट फिट बसत असल्याने स्पेससूटची कमतरता भासली आणि हा स्पेसवॉक ऐनवेळी रद्द करावा लागला पण अठरा तारखेला मात्र हा पहिला Women स्पेसवॉक यशस्वी झाला आहे
आजवरच्या अंतराळ मोहीमेत अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठीच्या तांत्रिक कामासाठी झालेल्या स्पेसवॉक मध्ये 14 महिला Astronauts नी सहभाग नोंदवला होता आता हि संख्या 15 झाली असून Jessica पंधरावी महिला स्पेसवॉकर झाली आहे 1984 पासून महिलांनी स्पेसवॉक करायला सुरवात केली रशियन महिला Astronaut Svetlana Savitskaya ह्यांनी प्रथम जुलै मध्ये स्पेसवॉक मध्ये सहभाग नोंदवला नंतर नासाच्या महिला Astronaut  Kathryn Sullivan ह्यांनी ऑक्टोबर मध्ये दुसरा स्पेसवॉक केला
ह्या ऐतिहासिक स्पेसवॉक पाहण्यासाठी नासा संस्थेत संस्थेचे प्रमुख Jim Bridenstine आणि  Human Exploration & Operations Administrater Ken Bowersox हजर होते ह्या शिवाय नासा संस्थेतील अधिकारी मॅनेजर्स आणि शास्त्रज्ञ यांनीही हा ऐतिहासिक स्पेसवॉक पाहिला नासा t.v. वरून ह्या स्पेसवॉकचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते
ह्या ऐतिहासिक स्पेसवॉक बद्दल बोलताना Jim Bridenstine म्हणाले कि,अखेर हा महिलांचा स्पेसवॉक यशस्वी झाला ह्या दोघीनीहि अभिमानास्पद कामगिरी करून देशाचे नाव उज्वल केले आहे अमेरिकेच्या इतिहासातील हा मोलाचा क्षण आहे आणि प्रेरणादायी सुद्धा! हा अनुभव आगामी महिला स्पेसवॉकर साठी पथदर्शक ठरेल! आतापर्यंत पंधरा महिलांनी अंतराळात स्पेसवॉक केला असून त्यातल्या चवदा महिला अमेरिकन आहेत म्हणूनच ह्या क्षेत्रातील अमेरिकेचे प्रातिनिधीत्व निश्चितच अभिनंदनीय आहे
Ken Bowersox ह्या स्पेसवॉक बद्दल बोलताना म्हणाले कि,ह्या दोघींनी ह्या फक्त महिलांच्या स्पेसवॉकची यशस्वी सुरवात केलीय एक दिवस असा स्पेसवॉक करण रुटीन होईल हा खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे!
नासा संस्थेच्या House Speaker Nancy Pelosi ,D-Calif ह्यांनी ह्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन करताना आणि  Christina Koch आणि Jessica Meir ह्यांच्याशी संवाद साधताना,तुम्ही आता ह्या ऐतिहासिक घटनेचे रोल मॉडेल झाला आहात अमेरिकन महिला आणि तरुणींसाठी हा पथदर्शी आणि प्रेरणादायी अनुभव आहे असे मत व्यक्त केले
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump ह्यांनी देखील Washington मधील नासा संस्थेतून हा ऐतिहासिक स्पेसवॉक पाहिला आणि Christina Koch आणि Jessica Meir ह्या दोघींचे अभिनंदन केले
Christina Koch अंतराळस्थानकात 328 दिवस राहणार आहे तिने ह्या आधीच पृथ्वीवर परतण्याऐवजी तिचा स्थानकातील मुक्काम वाढवून घेतला होता

Saturday, 12 October 2019

अंतराळवीर Andrew Morgan आणि Christina Koch ह्यांचा दुसरा Space Walk यशस्वीपणे संपन्न


NASA astronaut Andrew Morgan conducts a spacewalk
 अंतराळवीर Andrew Morgan ह्यांनीस्पेसवॉक दरम्यान घेतलेला अंतराळातील स्पेससेल्फी -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 12 Oct
नासाच्या अंतराळ मोहीम 61चे अंतराळवीर Andrew Morgan आणि Christina Koch  ह्यांनी 11oct ला केलेला Space Walk यशस्वीपणे पार पडला अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी नियोजित केलेल्या पाच Space Walk पैकी हा दुसरा Space Walk होता ह्या आधी सहा तारखेला अंतराळवीर Andrew Morgan आणि Christina Koch ह्या दोघांनी पहिला स्पेसवॉक पूर्ण केला होता
ह्या दोनही अंतराळवीरांनी सकाळीच 7.38 वाजता त्यांचे स्पेससूट चार्ज करून स्पेसवॉकसाठी तयारी सुरु केली होती अंतराळवीर Andrew ह्यांनी लाल रंगांच्या रेषा असलेला स्पेससूट परिधान केला होता तर Christina हिने घातलेला स्पेससूट रेषाविरहित होता

Astronauts Christina Koch and Andrew Morgan
        Christina Koch आणि अंतराळवीर Andrew Morgan स्पेसवॉक तयारीत -फोटो -नासा संस्था

सकाळी 7.38 वाजता सुरु झालेला हा स्पेसवॉक सहा तास पंचेचाळीस मिनिटांनी संपला ह्या स्पेसवॉक दरम्यान दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळस्थानकाच्या दुरुस्तीचे काम केले त्यांनी स्थानकाच्या शेवटच्या पोर्ट truss ह्या भागातील जुन्या Nickel Hydrogen Batteries बदलून त्या जागी नव्या जास्त पॉवरफुल Lithium -ion Batteries बसविल्या ह्या नव्या बॅटऱ्या कमी वजनाच्या आकाराने लहान आणि जास्त पॉवरफुल आहेत ह्या शिवाय ह्या दोघांनी स्थानकाच्या दुरुस्तीसाठी करण्यात येणाऱ्या आगामी स्पेसवॉकच्या तयारीसाठीची उपयुक्त कामेही पूर्ण केली
ह्या नव्या बदललेल्या बॅटऱ्या जास्त पॉवरफुल असल्यामुळे स्थानकात जेव्हा रात्रीच्या वेळेस अंधार असतो तेव्हा जास्त उजेड पाडण्याकरिता होतो जेव्हा स्थानक रात्रीच्या वेळी पृथ्वीच्या कक्षेत असते तेव्हा ह्या बॅटऱ्यांमध्ये स्टोअर केलेली स्थानकातील सौर पॅनल मधली सौरऊर्जा वापरली जाते
ह्या पुढचा तिसरा स्पेसवॉक सोळा तारखेला होईल तेव्हा ह्याच भागातील दोन पॉवर चॅनल पैकी एका चॅनेल मधील बॅटऱ्या बदलवण्यात येतील हा तिसरा स्पेसवॉक अंतराळवीर  Andrew आणि Jessica Meir हे दोघे करणार आहेत ह्या शिवाय चवथा आणि पाचवा स्पेसवॉक एकवीस आणि पंचवीस तारखेला करण्यात येईल तेव्हा उर्वरित भागातील बॅटऱ्या बदलण्यात येतील
अंतराळस्थानकातील बॅटऱ्या बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर मध्ये पुन्हा स्थानकातील Spectrometer दुरुस्तीचे काम करण्यासाठी स्पेसवॉक करण्यात येईल 
अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठीअंतराळवीरांनी केलेला हा 220वा स्पेसवॉक होता आणि अंतराळवीरांनी त्या साठी 57 दिवस 13तास आणि 12 मिनिटे व्यतीत केले आहेत
 

Wednesday, 9 October 2019

यवतमाळातील दुर्गोत्सव



                    Video-पुजा दुद्दलवार BE(soft)& BMC

यवतमाळ -8 Oct.
दरवर्षी प्रमाणे यंदाही य वतमाळात दुर्गोत्सव उत्साहात साजरा झाला यंदा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने दुर्गोत्सवातील राजकारण्यांचा सहभाग आणि खर्चावर नियंत्रण आल्याचे चित्र दुर्गादेवी पाहताना जाणवत होते
ह्या वर्षी देखील अनेक दुर्गा मंडळाने चलत चित्र देखावे सादर केले होते सुभाष क्रीडा मंडळाने यंदाही आकर्षक देखावा सादर केला होता डोंगराचा देखावा सादर करून आत गुहेत झोपाळ्यावर दुर्गादेवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती झोपाळ्यावरील झोका घेतानाची हि दुर्गादेवी नागरिकांना विशेष आकर्षित करत होती हा देखावा पाहण्यासाठी लोकांनी भरपूर गर्दी केली होती
बालाजी दुर्गोत्सव मंडळाने यंदा वैष्णोदेवीच्या मंदिराची प्रतिकृती साकारली होती त्या साठी पर्वताचा आभास निर्माण करून डोंगराळ मार्ग तयार केला होता त्यासाठी प्लायवूडचा वापर करून पायऱ्या तयार केल्या होत्या पण त्या चढताना खरोखरच सावधगिरी बाळगावी लागत होती (जागोजागी खिळे असल्यामुळे कदाचित वेळेअभावी काम लवकर आटोपल्यामुळे ) नागरिकांना डोंगरावर चढतानाचा आभास होत होता अर्ध्या वाटेवर अर्धकुमारी  आणि बाजूला हेलिकाफ्टरची प्रतिकृती साकारली होती तर गुहेत वैष्णोमाताची मूर्ती विराजमान होती ह्या मंडळाची दुर्गामातेची मूर्तीही आकर्षक होती गुहेत l.E D दिव्यांचा वापर करून ज्योतीचा आभास निर्माण केला होता लोकांनी हा देखावा पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती
आर्णी रोड वरील लोकमान्य दुर्गा मंडळाने यंदा वृक्ष लागवड आणि बेटी बचाव हा संदेश देणारा देखावा सादर केला होता
नवीन दुर्गा उत्सव मंडळाने यंदा दुर्गादेवी समोर कुंभकर्ण वधाचा सुंदर लाईव्ह देखावा सादर केला होता त्या मुळे लोकांनी इथेही देवी पाहण्यासाठी गर्दी केली होती
या शिवाय आझाद दुर्गोत्सव मंडळाची गुहेतील निळसर प्रकाशातील दुर्गादेवीची मूर्ती समोरील शंकराची आकर्षक मूर्ती आणि भिंतीवरील कोरीव मुर्त्या लोकांना आकर्षित करत होत्या समोर सुदर कारंजे लोकांना आकर्षित करत होते
एकता दुर्गोत्सव मंडळाने देखील यंदा पर्यावणाचा संदेश देत वेताचा उपयोग करून सुंदर सजावट सादर केली होती
ह्या शिवाय यवतमाळात इतर ठिकाणच्या दुर्गा मंडळांनिही दुर्गादेवीसमोर आकर्षक देखावे सादर केले होते
नेहमीप्रमाणेच दुर्गामंडळातर्फे अन्नदानही करण्यात आले होते दुर्गादेवीच्या आजूबाजूला लागलेल्या खेळण्या आणि इतर वस्तूंच्या दुकानांमुळे दुर्गोत्सवाला जत्रेचे स्वरूप आले होते काही ठिकाणी दुर्गेच्या दर्शनासाठी रांगाही लागल्या होत्या

Friday, 27 September 2019

अंतराळवीर Oleg Skripochka ,Jessica Meir आणी पहिले अंतराळ प्रवाशी Hazza Ali स्थानकात सुखरूप पोहोचले

Soyuz MS-15 crewmates wave before boarding rocket
 नासाची महिला Astronaut Jessica Meir अंतराळ प्रवाशी Hazza Ali आणि Oleg Skripochka उड्डाणा आधी -फोटो-नासा संस्था

नासा संस्था -26 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 61चे अंतराळवीर Oleg Skripochka,(Roscosmos )नासाची Jessica Meir आणि UAEचे पहिले Space Traveler Hazza Ali Almannsoori ह्या तीन अंतराळ वीरांनी सोयूझ MS -15 ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकाकडे प्रयाण केले
त्यांच्या सोयूझ MS -15 ह्या अंतराळ यानाने कझाकस्थानातील बैकोनूर ह्या Cosmodrome वरून 25 सप्टेंबरला 9.57a.m.(6.57p.m.स्थानिक वेळ ) वाजता स्थानकाच्या दिशेने अंतराळात उड्डाण केले आणि सहा तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 3.42p.m. वाजता यान स्थानकाजवळ पोहोचले यानाने चार फेऱ्या मारल्या सोयूझ यान अंतराळ स्थानकाच्या कक्षेत येताच आणि सोयूझ यान व स्थानक यांच्यातील अंतर कमी होताच सोयूझ यान आणि स्थानकातील hatch प्रक्रिया पूर्ण झाली आणि आणि स्थानकाचा दरवाजा उघडल्या गेला
प्रथम सोयूझ यानातून अंतराळवीर Oleg Skripochka ह्यांनी स्थानकात प्रवेश केला त्या नंतर Jessica Meir हिने स्थानकात प्रवेश केला आणि सगळ्यात शेवटी अंतराळ प्रवाशी Hazza Ali ह्यांनी स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळवीरांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले
आता स्थानकातील अंतराळ वीरांची संख्या नऊ झाली आहे 2015 नंतर प्रथमच नऊ अंतराळवीर एकत्रित स्थानकात राहून संशोधन करतील अंतराळवीर Scott Kelly ह्यांच्या वर्षभराच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान स्थानकातील अंतराळवीरांची संख्या वाढली होती
अंतराळवीर Oleg Skripochka आणि Jessica Meir हे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील
 Hazza Ali हे मात्र फक्त आठ दिवसच स्थानकात राहतील ते अरब स्पेस एजन्सी (U.A.E) आणि रशियन स्पेस एजन्सी (Roscosmos )ह्यांच्यातील Space Flight Inter Government Contract अंतर्गत स्थानकात  राहायला जाणारे पहिले अंतराळ प्रवाशी आहेत
तीन ऑक्टोबरला सोयूझ MS -12 ह्या यानातून अंतराळवीर Nick Hague आणि अंतराळवीर Ovchinin हे स्थानकातील त्यांचे 200 दिवसांचे वास्तव्य पूर्ण करून पृथ्वीवर परतणार आहेत त्यांच्या सोबतच Hazza Ali देखील पृथ्वीवर परत येतील
अंतराळवीर Oleg Skripochka ह्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे तर Jessica आणि Hazza Ali पहिल्यांदाच अंतराळस्थानकात राहायला गेले आहेत
स्थानकात पोहोचल्यानंतर ह्या अंतराळवीरांचा नासा संस्थेने त्यांच्या कुटुंबियांशी लाईव्ह संपर्क साधून दिला आणि संवादाची संधीही दिली

Tuesday, 24 September 2019

हॉलीवूड सुपरस्टार Brad Pitt ह्यांनी साधला अंतराळवीर Nick Hague ह्यांच्याशी लाईव्ह संवाद

    
Image result for Ad Astra
 बॉलीवूड सुपरस्टार Brad Pitt अंतराळवीराच्या पोशाखात -फोटो नासा संस्था

नासा संस्था -17 सप्टेंबर
हॉलीवूड सुपरस्टार Brad Pitt ह्यांनी नुकताच अंतराळवीर Nick Hague ह्यांच्याशी पृथ्वीवरून लाईव्ह संवाद साधला "Ad Astra " ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी Brad Pitt नासाच्या ह्यूस्टन येथील संस्थेत आले होते त्या सिनेमात त्यांनी अंतराळवीराची भूमिका साकारली आहे तेव्हा नासा संस्थेने त्यांचा रिअल लाईफ मधील हिरो अंतराळवीर Nick  Hague ह्यांच्याशी संपर्क साधून दिला तेव्हा दोघांनी केलेली हि बातचीत
 Nick Hague - "Hi Brad ! Welcome!स्पेस स्टेशन मध्ये तुझ स्वागत आहे "

 NASA astronaut Nick Hague during a HAM radio session
 अंतराळवीर Nick Hague अंतराळस्थानकातुन संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
Brad Pitt - "Hi ! Thank you ! मी खूप लकी आहे मला तुझ्याशी बोलायची संधी मिळालीय मला खूप छान वाटतय " आता संपर्क झालाय तर सांग आमच्या सिनेमाच ट्रेलर पाहीलस का? आमच काम कस झालय ?
Nick - मी सुद्धा तेव्हढाच लकी आहे !तुमच्या सिनेमाच ट्रेलर काही आठवड्यांपूर्वी पहायची संधी मिळाली तुम्ही खूप छान अभिनय केलाय शिवाय ह्या सिनेमामुळे अंतराळस्थानक,स्पेसमिशन ह्या बद्दल लोकांना माहितीही मिळाली लोक जागृती केल्याबद्दल आभार! येणाऱ्या पिढीसाठी हा सिनेमा  निश्चितच प्रेरणादायी ठरेल
Brad  Pitt - Thanks Nick ! तू आधी कोणी जास्त छान अभिनय केलाय ते सांग ! ग्रॅविटीचा अभिनेता की Pitt ? आणि त्यातली झिरो ग्रॅव्हिटी कशी होती ?
IMAX Ad Astra Trailer
बॉलीवूड सुपरस्टार Brad Pitt "Ad Astra" ह्या सिनेमात अंतराळवीराच्या भूमिकेत -फोटो -नासा संस्था
Nick Hague - खरच कमाल केलीत तुम्ही ! तुम्हीच छान अभिनय केलाय मी खूपच प्रभावित झालोय सेटिंग छान जमलय त्यातल खरखूर वाटत अगदी माझ्या आजूबाजूला आहे तसच झिरो ग्रॅव्हिटीच वातावरण तयार केलत तुम्ही! पण मी ज्या सहजतेन इथे तरंगत वावरतोय तेव्हढ सहज वावरण तुम्हाला शक्य झाल नसेल ना! खूप कठीण गेलअसेल अभिनय करायला त्या साठी  Harness cable किंवा CGI  तंत्र वापराव लागल असेल ना ?
Brad Pitt -आमच्या चित्रपटातली ship तुमच्या पेक्षा स्वच्छ होती सामान कमी होत,तुला तिथल्या भिंतीवर असलेल सगळ सामान कोणकोणत्या कामासाठी आहे ते माहिती आहे का? सध्या तिथे कसल संशोधन सुरु आहे?
Nick Hague -मी जेव्हा स्थानकात आलो तेव्हा गोंधळून गेलो होतो पृथ्वीवरील ट्रेनिंगच्या ठिकाणची ship वेगळी होती भिंतीवर फोटो वै.होते इथे मात्र सगळीकडे केबलचे जाळे आहे, हळू हळू सवय झाली इथे सगळीकडे यंत्रे व storage  आहे
सध्या आम्ही ह्या भागात Flame वर संशोधन करतोय कारण झिरो ग्रॅव्हिटी मध्ये दिव्याची ज्योत पृथ्वीसारखी ठराविक आकारात पेटत नाही वेगवेगळ्या आकारात पसरलेल्या स्वरूपात पेटते इथे पेटत्या ज्योतीतील प्रक्रिये दरम्यान होणाऱ्या बदलाची नोंद घेऊन आम्ही त्यावर संशोधन करतोय हे संशोधन Car Engines मधल्या इंथनातून जास्त energy मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल
Brad Pitt - आता तिथे दिवस आहे कि रात्र? ह्या वेळा तुम्हाला कशा कळतात कारण तुम्ही सोळा सूर्यास्त आणि सूर्योदय पहाता मग दर 45 मिनिटांनी सकाळ,संध्याकाळ होत असताना हे चक्र ठरवण कठीण जात असेल तुमच्या शरीरावर ह्याचा विपरीत परिणाम होतो का ?
Nick Hague - ह्या साठी विशेष काळजी घेतली जाते आम्ही Greenwich Mean Time follow करतो आम्हाला सपोर्ट करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीम्स  जगभर आहेत अमेरिका,रशिया,जपान त्या मुळे सगळयांच्या वेळेचा ताळमेळ जुळवण आवश्यक आहे त्या मुळेच Mean time follow करण आवश्यक आहे
 इथे रात्र आणि दिवसाच चक्र ठरवण्यासाठी खास रंगांच्या लाईटची प्रकाश सिस्टिम फिट केलेली आहे सकाळी अगदी प्रखर निळ्या रंगांचे लाईट्स लावले जातात दुपारी थोडा कमी प्रकाश आणि रात्री मंद लाईटचा प्रकाश असतो त्याची हळूहळू सवय होते पण सुरवातीला इथे आल्यावर मात्र खूप कठीण जात आपल काम संपल कि जर खिडकीतून बाहेर लक्ष गेल कि कधी कधी बाहेरचा प्रखर प्रकाशझोत डोळ्यावर पडतो आणि झोप उडते मग मात्र पुन्हा लवकर झोप येण कठीण होत
Brad Pitt- तुम्ही सगळे एकाच वेळेस काम करता का? तुम्हाला नाईट शिफ्ट पण करावी लागते का?
Nick Hague -आम्ही सगळे जण एकच वेळापत्रक follow करतो सकाळी 7.30 ला आमच काम सुरु होत आणी  संध्याकाळी साडेसात पर्यंत चालत पृथ्वीवरील आम्हाला सपोर्ट करणाऱ्या टीमच आमच्या कामावर 95 टक्के  कंट्रोल असत आणि ते पण आमच्या बरोबर चोवीस तास आठवडाभर अहोरात्र काम करत असतात हे काम एकट्यादुकट्याच नाही त्या साठी टीमवर्क आवश्यक असत वेगवेगळे देश एकत्रितपणे एकमेकांच्या सहकार्याने
हे संशोधनाचे काम करत असल्यामुळेच हे अंतराळस्थानाक गेले विस वर्षे यशस्वीपणे कार्यरत आहे
Brad Pitt - अमेझिंग ! मी मागच्या आठवड्यात J.P.L Lab मध्ये गेलो होतो तेव्हा भारतातील ईसरो संस्थेत चंद्रावर विक्रम चांद्रयानाच लाँचिंग सुरु होत तुम्हाला तिथून विक्रम लँडर दिसल का?
Nick Hague - नाही ! आम्हाला news मधून माहिती मिळाली स्पेस मध्ये सोप्या सोप्या गोष्ठी करण पण काठिण असत नासा संस्था आणि त्यांचे इंटरनॅशनल सहकारी अशा काठीण आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्ठीही सहजतेने  शक्य करून दाखवतात आणि जागतिक स्थरावर  सहकार्य करतात त्या मुळेच मानवाच भवितव्य उज्वल आहे 
Brad Pitt - मी J.P.L.मध्ये Mars Rover ची development पाहिली सगळे इंटरनॅशनल Efforts आहेत वेगवेगळे देश वेगवेगळे पार्टस Develop करत आहेत तुमचे सध्याचे मिशन काय आहे
Nick Hague - माझ 200 दिवसांच मिशन आहे आता इथले थोडेच दिवस बाकी आहेत ऑक्टोबर मध्ये मी पृथ्वीवर परतणार आहे इथे सुरु असलेल्या अनेक सायंटिफिक प्रयोगातील संशोधनात मी सहभाग नोंदवलाय शिवाय मी स्पेसवॉकही केलाय माझ्या इथल्या कामात वैविध्य आहे मी इथे रबर तयार करण्याचे विविध प्रयोग केले आहेत Fiber Optics वर संशोधन केलेय त्या मुळे communication मध्ये सुधारणा होईल शिवाय आम्ही Genes वर संशोधन करतोय हे संशोधन अल्झायमर,Cancer, डायबेटीस ह्या सारख्या रोगांवरील अत्याधुनिक उपचारासाठी उपयुक्त ठरेल खरतर शेतात बालपण गेलेल्या मला कधीही मी अंतराळवीर होऊन अंतराळ स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत इतक्या वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करेन असं वाटल नव्हत माझ्यासाठी हि अकल्पनीय अभूतपूर्व संधी आहे
Brad Pitt - अमेझिंग ! तू Kansas चा आहेस आणि मी Missouri चा म्हणजे आपण शेजारी आहोत!
Nick Hague -हो!तो देशाचा सुंदर भाग आहे मी खूप फोटो घेतलेत इथून ह्या सहा महिन्यात
Brad Pitt - Good Thing! अंतराळ स्थानकात 180 दिवस वास्तव्य पूर्ण केल्या बद्दल तुझ अभिनंदन ! तुम्ही तुमच्या फॅमिली पासुन फ्रेंड पासूनच नाही तर पृथ्वीपासून इतके दूर आहात,इतके busy असता अशा वेळेस तुम्ही तुमच मन:स्वास्थ कस नॉर्मल ठेवता ?
Nick Hague-  पृथ्वीपासून आपल्या कुटुंबियांपासून दूर इथे अंतराळातील स्थानकात झिरो ग्रॅव्हिटी मध्ये तरंगत राहण खरच आव्हानात्मक असत पण सुदैवाने आम्ही लोऑर्बिट मध्ये असल्यामुळे पृथ्वीवर व्हिडीओ कॉल करता येतो इंटरनेट मुळे संपर्क साधता येतो आठवड्याच्या शेवटी आम्ही आमच्या फॅमिलीशी संवादही साधतो मी माझ्या मुलांबद्दल जाणून घेतो आणि माझे इथले अनुभव त्यांच्याशी शेअर करतो सध्या हे शक्य आहे पण आगामी दूरवरच्या अंतराळ मोहिमांमध्ये मात्र कुटुंबियांशी संपर्क साधण सध्या तरी कठीण आहे शिवाय फावल्या वेळात
आम्ही स्पेस स्टेशन मधल्या veggie project ची देखभाल करतो कधी सिनेमा पहातो संगीत ऐकतो,स्टेशनच्या  खिडकीतून बाहेर पहातो,फोटो काढतो त्या मुळे आमच मन आनंदी राहत
Brad Pitt - खरच खूप कठीण आहे हे माझ्यासाठी ! मी बऱ्याच Astronauts चे अनुभव वाचले ते म्हणतात , अंतराळस्थानकात राहायला गेल्यावर ह्या अथांग अंतराळात आपण किती छोटे आहोत ह्याची जाणीव होते आपण एका छोट्या बिन्दुसारखे आहोत अस वाटत! तुमचा अनुभव कसा आहे ?
Nick Hague -  इथे अंतराळस्थानकात राहण्याचा फायदा म्हणजे पृथ्वीच्याऑर्बिटवर 250 मैलांवरून फिरताना पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य न्याहळता येत पृथ्वी उगवताना पाहण तिथे शक्य नाही पृथ्वीला फिरताना पाहताना आणी चंद्राला क्षितिजावर उगवताना पाहताना आपण पृथ्वीवर नाही तर अंतराळात आहोत ह्याची जाणीव होते आपल जग खाली आहे आणि ते खूप संदर असल्याच जस जाणवत तसच ह्या अफाट अंतराळात आपण खूपच छोटे असल्याचीही जाणीव होते इथे राहिल्यावर जगाकडे पाहण्याचा दृष्ठीकोनच बदलून जातो
Brad Pitt -खरच तुझ्या कडून हे सार ऐकताना खूप रोमांचक वाटतय!आता महत्वाचा प्रश्न विचारतोय Jam Box (Music Box ) चा कंट्रोल कोणाकडे आहे ?
Nick Hague - आलटूनपालटून सगळ्यांकडे असतो आम्ही वेगवेगळ्या देशातून आलेले असल्यामुळे आम्हाला विविध प्रकारच संगीत ऐकायला मिळत जेवताना पारंपारिक रशियन संगीताची धून ऐकायला मजा येते
Brad Pitt -मला वाटत कि तिथे कोणी ना कोणी तुला गावाकडच संगीत लाऊ नको अस म्हणत असतील ना!
Nick Hague -हो ! फक्त तेच नाही तर bad Jokes करू नकोस असही म्हणतात
Brad Pitt - तू एका जागेवर स्थिर कसा राहू शकतोस?तिथे Foot Hold आहे का?
Nick Hague - हो ! Foot Hold आहे इथे खूप ठिकाणी Hand Rails पण आहेत त्यात पाय अडकवून आम्ही आरामात स्थिर राहू शकतो मी पायाचे बोट आणि अंगठ्याचा वापर पाय अडकवण्यासाठी सतत करतो शिवाय मी चालायसाठी तळपायाचा वापर करू शकत नाही इथे आल्यावर आपल शरीर इथल्या झिरो ग्रॅविटीत किती लवकर adjust झाल ह्याच खरच आश्चर्य वाटत
Brad Pitt -आम्हाला चित्रपटात 3D Printing करण जमल नाही पण तुम्ही ते स्थानकात साध्य करून दाखवलत !
Nick Hague - हो !आम्ही इथे आगामी  दूरवरच्या अंतराळ मोहोमांसाठी विशेषतः मंगळ किंवा आताच्या चांद्र (Artemis ) मोहीमांसाठी उपयुक्त ठरेल अशा नव्या तंत्रज्ञानाचे संशोधन सतत करत असतो कारण ह्या दूरवरच्या मोहिमांमध्ये आवश्यक त्या जास्तीच्या गोष्ठी सोबत नेण्यापेक्षा जर Raw Materials सोबत नेल तर तिथेच 3D Printing करता येईल म्हणून आम्ही Human Organच  Print काढताना प्रिंटर मध्ये शाई भरली आणि Tissue Print होताना पाहिले 
Brad Pitt -खरच आपल भवितव्य उज्ज्वल आहे ! O.K. मला खूप प्रश्न विचारायची संधी मिळाली आता वेळ संपत आलीय पण मला तुझ्या स्पेसवॉक बद्दल जाणून घ्यायचय !
Nick Hague -स्पेससूट म्हणजे स्वतंत्र स्पेस स्टेशन असल्याच तो घातल्यावर जाणवत Hatch Way च्या बाहेर पाहिल की आधी पृथ्वी दिसते आणि नंतर स्पेस स्टेशनच्या खिडकीतून छोट दिसणार पण प्रत्यक्षात अंत नसलेल अफाट अंतराळ ! वातावरणात निरव शांतता!आजूबाजूला कोणी नाही फक्त स्पेससूट मधल्या हवेचा आवाज ऐकू येतो क्षणाचाही विलंब न करता आम्ही काम सुरु करतो सोबत स्थानकातून टीम गाईड करत असतेच ह्या वेळेस मी स्पेस्टेशनच्या पुढच्या भागात काम केल आणि त्या वेळेस स्पेस स्टेशन 17000 मैल वेगाने फिरत होत त्या वेगासोबत आपणही  स्पेसचाच भाग झालोय ह्याची जाणीव ठेऊन काम करण म्हणजे खूपच थरारक रोमांचकारी अनुभव होता तो !
Brad Pitt - Thank You Nick ! तू माझ्याशी बोलण्यासाठी वेळ दिल्याबद्दल !
 Nick Hague - मलाही तुमच्याशी बोलायची संधी मिळाली Thanks !

Thursday, 19 September 2019

खगोल शास्त्रज्ञांनी शोधला ब्रम्हांडातील पृथ्वीसारख्याच ग्रहाचा शोध



exoplanet K2-18b illustration
 सौर मालेबाहेरील पृथ्वीसारखा ग्रह बटू ग्रहाभोवती फिरताना नासाच्या Hubble Space Telescope ने टिपलेला हा फोटो

नासा संस्था -11सप्टेंबर
ह्या अथांग ब्रह्मांडात आपल्या सौरमालेसारख्याच अनेक सौरमाला आणि ग्रहमाला अस्तित्वात असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी अनेकदा व्यक्त केली आहे अशा मानवाला अज्ञात असलेल्या ग्रहांचा शोध खगोल शास्त्रज्ञ अनादि कालापासून  घेत आहेत आणि नवनवीन ग्रहांचा शोधही लागत आहे आता तर मानवाने अवकाश क्रांती केली आहे आपला भारत देशही त्यात मागे नाही नुकतेच चांद्रयान चंद्रावर पोहोचले आहे तर मंगळावर मंगळयान कार्यरत आहे आता तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या साहाय्याने हा शोध घेण्याचा  प्रयत्न शास्त्रज्ञ आणखी जोमाने करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यशहि  मिळत आहे
नुकतेच अमेरिकेतील नासा संस्थेच्या शास्त्रज्ञांनी Hubble Space Telescope ने टिपलेल्या फोटो आणि माहितीच्या आधारे ह्या विशाल ब्रम्हांडात पृथ्वी सारखाच दुसरा ग्रह अस्तित्वात असल्याचा शोध जाहीर केला आहे
आपल्या पृथ्वीपासून 110 प्रकाशवर्षे दूर ह्या अथांग ब्रह्मांडात एक ग्रह फिरत असून तो आपल्या सौरमालेच्या बाहेर असल्याचा शोध नासाच्या Hubble Space Telescopeने घेतलेल्या छायाचित्रातून लागला ह्या ग्रहाचे नाव K2-18b असे ठेवण्यात आले
हा आपल्या सौरमालेच्या बाहेरील दूरस्थ ग्रह एका लाल रंगाच्या बटू तारयाभोवती फिरत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले तेव्हा शास्त्रज्ञांना ह्या बाह्य ग्रहाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता  निर्माण झाली
त्या मुळे त्यांनी Hubble Space Telescope ने काढलेल्या फोटोंचे आणि माहितीचे सखोल संशोधन केले तेव्हा शास्त्रज्ञ अचंबित झाले कारण त्यांना ह्या फोटोत तेथील वातावरणातील हवेत बाष्फ असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे उत्साहित झालेल्या शास्त्रज्ञांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सखोल संशोधन केले आणी संशोधनाअंती तिथे पृथ्वीसारखे वातावरण असल्याचा निष्कर्ष काढला  नवा बाह्यग्रह पृथ्वीसारखाच असून तो पृथ्वीपेक्षा आठपट जास्त वजनाचा आहे त्यामुळे साहजिकच त्याची Surface Gravity सुद्धा पृथ्वीपेक्षा जास्त असेल असे शास्त्रज्ञांना वाटते
हा ग्रह पृथ्वीसारखाच खडकाळ असून तिथल्या खडकाळ भागात पाण्याचे अस्तित्व आहे शिवाय तेथील वातावरणही पृथ्वीसारखेच आहे पृथ्वीसारखेच वातावरण व पाण्याचे अस्तिव असल्यामुळे तिथे सजीवाला पोषक वातावरण आहे आणि त्यामुळेच तिथे मानवालाही राहण्यायोग्य वातावरण असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे
पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखा आणि पृथ्वीसारखेच वातावरण व द्रवरूपात पाण्याचे अस्तित्व असलेला ग्रह सापडला आहे त्या मुळे शास्त्रज्ञ आनंदित आणि उत्साहित झाले आहेत हा ग्रह लाल रंगाच्या एका बटू तारयाभोवती फिरत असून तो Leo ह्या तारामंडलात स्थित असून ह्या ग्रहावरील वातावरणातील हवेत Nitrogen ,Hydrogen ,Heliumआणि Methane ह्या वायूंचे अस्तित्व असण्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे
Nature Astronomy ह्या पुस्तकातून हा शोध लागल्याची बातमी नुकतीच प्रकाशित झाली आहे

Saturday, 31 August 2019

सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर गगनाला

 31 ऑगस्ट
ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर गगनाला भिडले ह्या महिन्यात 27 तारखेला सोन्याने 40 हजारापर्यंत उसळी मारली सोन्या पाठोपाठ चांदीच्या दारातही सतत वाढ होत आहे अजूनही सोने 40 हजाराच्या आसपास आहे
अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध ,डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि त्याचाच परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली सोने खरेदी ह्या मुळे हे भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोन्याला गुंतवणूक म्हणून पसंती दिली जात असल्याने सोन्याची खरेदी वाढली आहे
भारतात आधीच सोन्यावर लावलेल्या अतिरिक्त आयात करामुळे सोन्याचे भाव वाढलेलेच होते त्यात आता आंतरराष्ट्रीय सोने खरेदीआणि रुपयाचे अवमूल्यन ह्याचा परिणाम होऊन सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाली ह्या आठवड्यात दोनदा सोन्याने 40 हजाराचा उच्चांक गाठला
सोनेवाढीचा परिणाम सोने खरेदीवर झाला असून सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय आधीच सोन्याच्या वाढत्या भावामुळे लोकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती त्यात आता सोन्याच्या भावाने 40 हजाराच्या आसपास दराचा उच्चांक गाठल्याने सोने खरेदी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे सोन्याच्या वाढत्या भावासोबतच सततच्या चोऱ्यांनीही नागरिक त्रस्त झाल्याने सोने खरेदी मंदावली आहे
पाकीस्तानातही सोन्याच्या दरात वाढ झालीअसून सोन्याचे दर 90 हजारावर गेले आहेत
सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरातही सतत वाढ होत आहे जुलैच्या अखेरीस चांदी कधी 37 तर कधी 38 हजारापर्यंत स्थिर होती गेल्या सहा महिन्यात चांदीचे भाव उतरलेलेच होते पण अचानक सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ होऊ लागली आणि आता चांदीचे दर 46 हजाराच्याही वर गेले आहेत