Christina Koch Jessica Meir पहिला महिला Astronauts Space Walk करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -19 Oct.
नासाच्या अंतराळमोहीम 61 ची फ्लाईट इंजिनीअर Christina Koch आणि Jessica Meir ह्या दोन महिला Astronautsनी मिळून अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी अंतराळातील पहिला ओन्ली महिला ऐतिहासिक स्पेसवॉक यशस्वी केला आहे शुक्रवारी 18ऑक्टोबरला हा ऐतिहासिक स्पेसवॉक संपन्न झाला ह्या महिलांच्या स्पेसवॉक बद्दल साऱ्यांनाच उत्सुकता होती कारण ह्या आधीचा मार्च मधला नियोजीत फक्त Women Astronaut Space Walk स्पेससूटच्या कमतरते मुळे ऐनवेळी रद्द झाला होता
सकाळीच ह्या दोघींनी आपले स्पेससूट चार्ज करून स्पेसवॉकची तयारी सुरु केली होती Christina ने लाल रंगांच्या रेषा असलेला स्पेससूट परिधान केला होता तर Jessicaचा स्पेससूट रेषाविरहित होता
Jessica Meir आणि Christina Koch स्पेसवॉक पूर्वी Space suit चार्ज करताना -फोटो -नासा संस्था
7.50 वाजता सकाळी सुरु झालेला हा स्पेसवॉक सात तास सतरा मिनिटांनी 2.55 ला संपला ह्या सात तासांच्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघींनी अंतराळस्थानकाच्या बाहेरील भागातील जुन्या बिघडलेल्या बॅटऱ्या आणि चार्ज डिस्चार्ज युनिट काढून त्या जागी नव्या बॅटऱ्या बसवल्या आणि युनिटचे फिटिंग केले
Christina Koch हिचा हा चवथा स्पेसवॉक होता तर Jessica चा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता ह्या दोघींचीही 2013मध्येच नासा संस्थेत अंतराळस्थानकात जाण्यासाठी निवड झाली होती मात्र 2019 मध्ये त्यांना अंतराळ स्थानकात राहायला जाण्याची संधी मिळाली आणि ह्या संधीचे सोने करत ह्या दोघींनी फक्त महिला अंतराळ स्पेसवॉक करण्याचा बहुमान मिळवला
मार्च मध्येच पहिला Women Astronaut Space Walk आयोजित केला होता Anne McClain आणि Christina Koch ह्या दोघी हा ऐतिहासिक स्पेसवॉक करणार होत्या त्याची भरपूर प्रसिद्धीही झाली असल्याने सर्वांनाच तो स्पेसवॉक पाहण्याची इच्छा होती पण दोघिंनाही एकच स्पेससूट फिट बसत असल्याने स्पेससूटची कमतरता भासली आणि हा स्पेसवॉक ऐनवेळी रद्द करावा लागला पण अठरा तारखेला मात्र हा पहिला Women स्पेसवॉक यशस्वी झाला आहे
आजवरच्या अंतराळ मोहीमेत अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठीच्या तांत्रिक कामासाठी झालेल्या स्पेसवॉक मध्ये 14 महिला Astronauts नी सहभाग नोंदवला होता आता हि संख्या 15 झाली असून Jessica पंधरावी महिला स्पेसवॉकर झाली आहे 1984 पासून महिलांनी स्पेसवॉक करायला सुरवात केली रशियन महिला Astronaut Svetlana Savitskaya ह्यांनी प्रथम जुलै मध्ये स्पेसवॉक मध्ये सहभाग नोंदवला नंतर नासाच्या महिला Astronaut Kathryn Sullivan ह्यांनी ऑक्टोबर मध्ये दुसरा स्पेसवॉक केला
ह्या ऐतिहासिक स्पेसवॉक पाहण्यासाठी नासा संस्थेत संस्थेचे प्रमुख Jim Bridenstine आणि Human Exploration & Operations Administrater Ken Bowersox हजर होते ह्या शिवाय नासा संस्थेतील अधिकारी मॅनेजर्स आणि शास्त्रज्ञ यांनीही हा ऐतिहासिक स्पेसवॉक पाहिला नासा t.v. वरून ह्या स्पेसवॉकचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते
ह्या ऐतिहासिक स्पेसवॉक बद्दल बोलताना Jim Bridenstine म्हणाले कि,अखेर हा महिलांचा स्पेसवॉक यशस्वी झाला ह्या दोघीनीहि अभिमानास्पद कामगिरी करून देशाचे नाव उज्वल केले आहे अमेरिकेच्या इतिहासातील हा मोलाचा क्षण आहे आणि प्रेरणादायी सुद्धा! हा अनुभव आगामी महिला स्पेसवॉकर साठी पथदर्शक ठरेल! आतापर्यंत पंधरा महिलांनी अंतराळात स्पेसवॉक केला असून त्यातल्या चवदा महिला अमेरिकन आहेत म्हणूनच ह्या क्षेत्रातील अमेरिकेचे प्रातिनिधीत्व निश्चितच अभिनंदनीय आहे
Ken Bowersox ह्या स्पेसवॉक बद्दल बोलताना म्हणाले कि,ह्या दोघींनी ह्या फक्त महिलांच्या स्पेसवॉकची यशस्वी सुरवात केलीय एक दिवस असा स्पेसवॉक करण रुटीन होईल हा खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे!
नासा संस्थेच्या House Speaker Nancy Pelosi ,D-Calif ह्यांनी ह्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन करताना आणि Christina Koch आणि Jessica Meir ह्यांच्याशी संवाद साधताना,तुम्ही आता ह्या ऐतिहासिक घटनेचे रोल मॉडेल झाला आहात अमेरिकन महिला आणि तरुणींसाठी हा पथदर्शी आणि प्रेरणादायी अनुभव आहे असे मत व्यक्त केले
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump ह्यांनी देखील Washington मधील नासा संस्थेतून हा ऐतिहासिक स्पेसवॉक पाहिला आणि Christina Koch आणि Jessica Meir ह्या दोघींचे अभिनंदन केले
Christina Koch अंतराळस्थानकात 328 दिवस राहणार आहे तिने ह्या आधीच पृथ्वीवर परतण्याऐवजी तिचा स्थानकातील मुक्काम वाढवून घेतला होता
No comments:
Post a Comment