नासाची महिला Astronaut Jessica Meir अंतराळ प्रवाशी Hazza Ali आणि Oleg Skripochka उड्डाणा आधी -फोटो-नासा संस्था
नासा संस्था -26 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 61चे अंतराळवीर Oleg Skripochka,(Roscosmos )नासाची Jessica Meir आणि UAEचे पहिले Space Traveler Hazza Ali Almannsoori ह्या तीन अंतराळ वीरांनी सोयूझ MS -15 ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकाकडे प्रयाण केले
त्यांच्या सोयूझ MS -15 ह्या अंतराळ यानाने कझाकस्थानातील बैकोनूर ह्या Cosmodrome वरून 25 सप्टेंबरला 9.57a.m.(6.57p.m.स्थानिक वेळ ) वाजता स्थानकाच्या दिशेने अंतराळात उड्डाण केले आणि सहा तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 3.42p.m. वाजता यान स्थानकाजवळ पोहोचले यानाने चार फेऱ्या मारल्या सोयूझ यान अंतराळ स्थानकाच्या कक्षेत येताच आणि सोयूझ यान व स्थानक यांच्यातील अंतर कमी होताच सोयूझ यान आणि स्थानकातील hatch प्रक्रिया पूर्ण झाली आणि आणि स्थानकाचा दरवाजा उघडल्या गेला
प्रथम सोयूझ यानातून अंतराळवीर Oleg Skripochka ह्यांनी स्थानकात प्रवेश केला त्या नंतर Jessica Meir हिने स्थानकात प्रवेश केला आणि सगळ्यात शेवटी अंतराळ प्रवाशी Hazza Ali ह्यांनी स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळवीरांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले
आता स्थानकातील अंतराळ वीरांची संख्या नऊ झाली आहे 2015 नंतर प्रथमच नऊ अंतराळवीर एकत्रित स्थानकात राहून संशोधन करतील अंतराळवीर Scott Kelly ह्यांच्या वर्षभराच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान स्थानकातील अंतराळवीरांची संख्या वाढली होती
अंतराळवीर Oleg Skripochka आणि Jessica Meir हे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील
Hazza Ali हे मात्र फक्त आठ दिवसच स्थानकात राहतील ते अरब स्पेस एजन्सी (U.A.E) आणि रशियन स्पेस एजन्सी (Roscosmos )ह्यांच्यातील Space Flight Inter Government Contract अंतर्गत स्थानकात राहायला जाणारे पहिले अंतराळ प्रवाशी आहेत
तीन ऑक्टोबरला सोयूझ MS -12 ह्या यानातून अंतराळवीर Nick Hague आणि अंतराळवीर Ovchinin हे स्थानकातील त्यांचे 200 दिवसांचे वास्तव्य पूर्ण करून पृथ्वीवर परतणार आहेत त्यांच्या सोबतच Hazza Ali देखील पृथ्वीवर परत येतील
अंतराळवीर Oleg Skripochka ह्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे तर Jessica आणि Hazza Ali पहिल्यांदाच अंतराळस्थानकात राहायला गेले आहेत
स्थानकात पोहोचल्यानंतर ह्या अंतराळवीरांचा नासा संस्थेने त्यांच्या कुटुंबियांशी लाईव्ह संपर्क साधून दिला आणि संवादाची संधीही दिली
No comments:
Post a Comment