सौर मालेबाहेरील पृथ्वीसारखा ग्रह बटू ग्रहाभोवती फिरताना नासाच्या Hubble Space Telescope ने टिपलेला हा फोटो
नासा संस्था -11सप्टेंबर
ह्या अथांग ब्रह्मांडात आपल्या सौरमालेसारख्याच अनेक सौरमाला आणि ग्रहमाला अस्तित्वात असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी अनेकदा व्यक्त केली आहे अशा मानवाला अज्ञात असलेल्या ग्रहांचा शोध खगोल शास्त्रज्ञ अनादि कालापासून घेत आहेत आणि नवनवीन ग्रहांचा शोधही लागत आहे आता तर मानवाने अवकाश क्रांती केली आहे आपला भारत देशही त्यात मागे नाही नुकतेच चांद्रयान चंद्रावर पोहोचले आहे तर मंगळावर मंगळयान कार्यरत आहे आता तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या साहाय्याने हा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ आणखी जोमाने करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यशहि मिळत आहे
नुकतेच अमेरिकेतील नासा संस्थेच्या शास्त्रज्ञांनी Hubble Space Telescope ने टिपलेल्या फोटो आणि माहितीच्या आधारे ह्या विशाल ब्रम्हांडात पृथ्वी सारखाच दुसरा ग्रह अस्तित्वात असल्याचा शोध जाहीर केला आहे
आपल्या पृथ्वीपासून 110 प्रकाशवर्षे दूर ह्या अथांग ब्रह्मांडात एक ग्रह फिरत असून तो आपल्या सौरमालेच्या बाहेर असल्याचा शोध नासाच्या Hubble Space Telescopeने घेतलेल्या छायाचित्रातून लागला ह्या ग्रहाचे नाव K2-18b असे ठेवण्यात आले
हा आपल्या सौरमालेच्या बाहेरील दूरस्थ ग्रह एका लाल रंगाच्या बटू तारयाभोवती फिरत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले तेव्हा शास्त्रज्ञांना ह्या बाह्य ग्रहाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली
त्या मुळे त्यांनी Hubble Space Telescope ने काढलेल्या फोटोंचे आणि माहितीचे सखोल संशोधन केले तेव्हा शास्त्रज्ञ अचंबित झाले कारण त्यांना ह्या फोटोत तेथील वातावरणातील हवेत बाष्फ असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे उत्साहित झालेल्या शास्त्रज्ञांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सखोल संशोधन केले आणी संशोधनाअंती तिथे पृथ्वीसारखे वातावरण असल्याचा निष्कर्ष काढला नवा बाह्यग्रह पृथ्वीसारखाच असून तो पृथ्वीपेक्षा आठपट जास्त वजनाचा आहे त्यामुळे साहजिकच त्याची Surface Gravity सुद्धा पृथ्वीपेक्षा जास्त असेल असे शास्त्रज्ञांना वाटते
हा ग्रह पृथ्वीसारखाच खडकाळ असून तिथल्या खडकाळ भागात पाण्याचे अस्तित्व आहे शिवाय तेथील वातावरणही पृथ्वीसारखेच आहे पृथ्वीसारखेच वातावरण व पाण्याचे अस्तिव असल्यामुळे तिथे सजीवाला पोषक वातावरण आहे आणि त्यामुळेच तिथे मानवालाही राहण्यायोग्य वातावरण असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे
पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखा आणि पृथ्वीसारखेच वातावरण व द्रवरूपात पाण्याचे अस्तित्व असलेला ग्रह सापडला आहे त्या मुळे शास्त्रज्ञ आनंदित आणि उत्साहित झाले आहेत हा ग्रह लाल रंगाच्या एका बटू तारयाभोवती फिरत असून तो Leo ह्या तारामंडलात स्थित असून ह्या ग्रहावरील वातावरणातील हवेत Nitrogen ,Hydrogen ,Heliumआणि Methane ह्या वायूंचे अस्तित्व असण्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे
Nature Astronomy ह्या पुस्तकातून हा शोध लागल्याची बातमी नुकतीच प्रकाशित झाली आहे
No comments:
Post a Comment