Sunday, 23 September 2018

पार्कर सोलर प्रोब यशस्वी पणे कार्यरत - प्रकाशाचे पाठवले फोटो




पार्कर सोलर प्रोबने पाठवलेल्या डावीकडील फोटोत मिल्की आकाशगंगेतील तारकासमूह आणि उजवीकडील फोटोत तेजपुंज तारकांमध्ये प्रकाशमान गुरु ग्रह -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -21सप्टेंबर
मागच्या महिन्यात सूर्याकडे झेपावलेल्या पार्कर सोलर प्रोब सौर यानाचा प्रवास निर्विघ्न पणे सुरु आहे हे यान प्रचंड आगीचे लोळ उठणाऱ्या सूर्याच्या प्रभामंडळात प्रवेशून तिथल्या वातावरणाची सखोल माहिती मिळवणार आहे त्या साठी ह्या यानाला आगीपासून बचाव करणारे संरक्षक कवच बसवले आहे नोव्हेंबरमध्ये पार्कर प्रोब सूर्याजवळ पोहोचेल आणि प्रत्यक्ष कार्याला सुरवात होईल पण त्या आधीच
पार्कर सौर यानाने प्रवासात असतानाच कार्यरत होऊन अवकाशातील प्रकाशाचे सुंदर प्रकाशमान फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत 
पार्कर सोलर प्रोब वर बसविलेली चार अत्याधुनिक उपकरणे आता कार्यान्वित झाली असून पार्कर प्रोब सूर्याच्या जवळ जात आहे आणि त्यावर बसवलेली अत्याधुनिक यंत्रणा चार्ज होऊन व्यवस्थित काम करत असल्याचे संकेत शास्त्रज्ञांना मिळत आहेत
पार्कर सोलर प्रोब सौरयानावर बसवलेल्या कॅमेऱ्याने यानाभोवतीच्या वातावरणातील प्रकाशाच्या सूक्ष्म कणांचे अत्यंत प्रकाशमान फोटो टिपले आहेत हा अवकाशातील दक्षिणेकडचा भाग आहे ह्या फोटोत सूर्य दृष्टीस पडत नाही पण उजव्या बाजूला गुरु ग्रह दिसतोय तर डाव्या बाजूला अत्यंत तेजपुंज मिल्की आकाशगंगेचा प्रकाशमान पट्टा दिसत आहे हे फोटो पार्कर प्रोब सौर यानाच्या WISPR' ह्या उपकरणाने टेलिस्कोपच्या साहाय्याने टिपले आहेत
सध्या हि उपकरणे कमी क्षमतेने काम करत आहेत पण जसजसे पार्कर प्रोब सूर्याच्या कक्षेजवळ पोहोचेल तसतशी त्यांची कार्यक्षमता वाढत जाईल पार्कर सोलर प्रोब नोव्हेंबर मध्ये सूर्याच्या जवळ पोहोचेल आणि सूर्याभोवतीचे प्रभामंडळ भेदून त्याच्या कक्षेत शिरेल तेव्हा पूर्ण क्षमतेने पार्कर प्रोब कार्यरत होईल
ह्या प्रभामंडळातील प्रचंड आगीच्या लोळातील इलेक्ट्रिकल व मॅग्नेटिक फिल्डमधल्या प्रकाश किरणांचा आकार,गती आणि प्रकाशाची तीव्रता ह्या विषयी पार्कर प्रोब सखोल माहिती मिळवेल त्या मुळे सूर्याचा करोना (तेजोवलय ) हा  सूर्याच्या खालच्या पृष्ठभागापेक्षा शम्भरपटीने का उष्ण आहे ह्याची माहिती मिळेल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करतात

Sunday, 9 September 2018

मंगळावरील धुळीच्या वादळाला तोंड देत नासाचे Curiosity Mars Rover पुन्हा कार्यरत

NASA's Curiosity rover at its location on Vera Rubin Ridge
 Curiosity Mars Rover कार्यरत असलेला  मंगळावरील Vera Rubin Ridge हा भाग -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -8 सप्टेंबर

मंगळावर गेल्या महिन्यात धुळीचे भयानक वादळ घोंघावले होते तिथल्या प्रचंड धुळीच्या लोटात काहीकाळ   Curiosity मंगळयानाचे काम ठप्प झाले होते त्याचा पृथ्वीशी असणारा संपर्कही काही काळ तुटला होता पण आता मंगळावरील धुळीवादळ शमले आहे
धुळीमुळे अंधारलेल्या मंगळावरील Curiosity कार्यरत असलेल्या भागात आता सूर्यदर्शन झाल्याने Curiosity यान पुन्हा व्यवस्थित स्थिरावले आहे धुळीवादळा मुळे भरकटलेले व ठप्प झालेले Curiosity यान सूर्यकिरणांच्या सौर ऊर्जेने बॅटरी चार्जित करून पुन्हा कार्यरत झाले आहे
अत्याधुनिक यंत्रणेने बनवलेल्या Curiosity मंगळ यानाने ऑगस्ट मध्ये त्याच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने Vera Rubin Ridge ह्या भागात ड्रिल करून नव्या खडकांचे नमुने शोधले आहेत आधी दोन वेळेस केलेल्या ड्रिल च्या वेळेस तिथे असलेल्या अत्यंत हार्ड खडकामध्ये खोदकाम करताना तांत्रिक अडचण येत होती म्हणून ह्या वेळेस  ड्रिलींगची जागा बदलली ह्या भागाला Stoer हे नाव दिले आहे 
Curiosity मंगळ यानाने शोधलेले नवे खडक अत्यंत कडक आहेत ते सिमेंट सारखेच कडक असल्याने त्यांचे ड्रिल करून पावडरच्या स्वरूपात सॅम्पल बनवणे अत्यंत कठीण काम आहे असे नासाचे ह्या प्रोजेक्टचे शास्त्रज्ञ म्हणतात
ह्या नव्या नमुन्यातील खडक विविध रंगांचे आहेत ते साध्या डोळ्यांनीही दिसतात पण काही नजरेच्या टप्प्याबाहेरच्या खडकाचे निरीक्षण करण्यासाठी इन्फ्रा रेड चा वापर करण्यात येतोय काही खडक टोकदार आहेत मंगळावर खूप पूर्वी पाणी वाहात होते ह्या पाण्याच्या प्रवाहामुळे ह्या खडकांची झीज झाली असावी व प्रचंड वादळाचा परिणाम होऊन Erosion झाले असावे त्या मुळे ह्या खडकांची झीज होऊन खडक कडक व टोकदार झाले असावे असे शास्त्रज्ञाचे मत आहे ह्या खडकांमध्ये Hematite Mineralचे कण सापडले आहेत आणि हे मिनरल पाण्यात तयार होतात
सप्टेंबर महिन्यात आणखी दोनवेळा ह्या भागात खोदकाम केले जाईल त्या नंतर Curiosity चे त्या भागातील काम संपेल सध्या सापडलेले हे खडक अत्यंत कडक असले तरीही आतून ते मऊही असू शकतील आणखी खोदकाम करून त्यांची सखोल माहिती मिळेल
विशेष म्हणजे मंगळावरील ह्या प्रचंड भयानक धुळीच्या वादळाला तोंड देत Curiosity मंगळ यान शाबूत राहिले आणि आता स्व-कार्यक्षमतेने कार्यरतही झाले आहे
आता तिथले आकाश निरभ्र असले तरी वादळाच्या काळात तिथे अंधार दाटला होता सूर्यदर्शन दुर्लभ झाले होते
तेव्हाही काही काळ Curiosity मंगळ यानाने प्रचंड मोठ्या धुळीच्या लोटातही त्याच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने काही दुर्मिळ वादळी दृश्ये टिपली आहेत त्यात Curiosity च्या डेस्कवरही पातळ धुळीचे आवरण दिसतेय




Friday, 7 September 2018

नासाच्या अंतराळमोहीम 58 चेअंतराळवीर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज


 Expedition 58 crew members Anne McClain, Oleg Kononenko and David Saint-Jacques
 नासाच्या मोहीम 58 ची अंतराळ वीरांगना  Anne McClain कॅनडाचे अंतराळवीर Davis Saint आणि  रशियन अंतराळवीर Oleg Kononenko अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज
-फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 58ची अंतराळ वीरांगना Anne McClain कॅनडाचे अंतराळवीर  Davis Saint-Jacques आणि रशियन अंतराळवीर Oleg Kononenko लवकरच अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत
जाण्याआधी ते सहा सप्टेंबरला नासाच्या Johnson Space Center मध्ये पत्रकारांशी संवाद साधतील व त्यांच्या या अंतराळ मोहिमेबद्दल माहिती सांगतील
 हे अंतराळवीर 20 डिसेंबरला कझाकस्थानातील बैकोनूर मधल्या Cosmodrome वरून  Soyuz MS-11ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकाकडे रवाना होतील आणि अंतराळ स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळवीरांसोबत तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील
अंतराळ वीरांगना Anne McClainआणि Davis Saint Jacques  ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे
रशियन अंतराळवीर Oleg Kononenko  मात्र चवथ्यांदा अंतराळस्थानकात राहण्यासाठी जातआहेत आणि ते ह्या मोहीम 59च्या पथकाचे कमांडरपद सांभाळतील
हे तिन्ही अंतराळवीर अंतराळस्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या वेगवेगळ्या सायंटिफिक प्रयोगाच्या संशोधनात सहभागी होतील McClain  पहिल्या Tissues on chip ह्या प्रोजेक्ट अंतर्गत सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवेल
  U.S.मधून मेकॅनिकल आणि Aeronautical engineering ची पदवी घेतल्यानंतर McClainने  इंग्लंड मधल्या Bath युनिव्हर्सिटीतून M.E  Aerospace Engineering केले आहे .ती ह्या प्रोजेक्ट अंतर्गत अंतराळ स्थानकातील micro gravity चा tissues वर होणाऱ्या परिणामावर संशोधन करणार आहे

Sunday, 2 September 2018

गुरु ग्रहावरही सापडले पाण्याचे अस्तित्व नासाच्या शास्त्रज्ञाच संशोधन प्रकाशित

infrared image of jupiter
                                         गुरु ग्रहावरील पाण्याचे अस्तित्व सापडलेला ग्रेट रेड स्पॉट
                                              फोटो -नासा संस्था


नासा संस्था -30 ऑगस्ट

सध्या जगभरातील शास्त्रज्ञ परग्रहावरील पाण्याचा ,सजीव सृष्टीच्याअस्तित्वाचा सतत शोध घेतआहेत ह्या मोहिमेअंतर्गत सध्या नासाची वेगवेगळी अत्याधुनिक यंत्रणा असलेली अंतराळयाने ग्रहावर पोहोचलीही आहेत आणि त्या त्या ग्रहाभोवती भ्रमण करत नवनवीन माहितीही पृथ्वीवर पाठवत आहेत
गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा व सूर्याच्या जवळचा ग्रह असल्याने शास्त्रज्ञांना ह्या ग्रहाबद्दल नेहमीच कुतूहल वाटते हा ग्रह नेमका कसा आहे आणि तो कसा तयार झाला हे शोधल्यास सूर्यमालेच्या उगम व विकास कसा झाला ह्याची आणखी सखोल माहिती मिळवणे सोपे जाईल असे त्यांचे मत आहे
ह्याच संशोधना अंतर्गत गुरु ग्रहावर पूर्वी पाणी अस्तित्वात होते का ?असल्यास  कोठे आणि किती प्रमाणात होते आणि सध्या तेथे पाणी उपलब्ध आहे का? ह्याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत आणि आश्चर्य म्हणजे शास्त्रज्ञाच्या ह्या प्रयत्नांना यश देखील आले आहे नासाच्या गुरु ग्रहावरील Juno अंतराळयाने नुकत्याच पाठवलेल्या संशोधित माहितीनुसार गुरु ग्रहावर पाण्याचे अस्तित्व सापडले आहे
नासाच्या Maryland Space Flight Center मधील  Gordon L.Bjoraker (Astrophysicist ) ह्या शास्त्रज्ञानीं Astronomical Journal मधून हि माहिती प्रकाशित केली आहे
नासाचे Juno अंतराळ यान गुरु ग्रहाभोवती भ्रमण करीत असून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत दर 53 दिवसातून एकदा चक्कर मारतोय
गुरु ग्रहावर 350 वर्षांपूर्वी प्रचंड वादळ झाले होते ज्या ठिकाणी हे भयानक वादळ झाले त्या ठिकाणाला ग्रेट रेड स्पॉट असे नाव देण्यात आले त्याच ठिकाणाचे Juno अंतराळ यानामार्फत संशोधन केल्या जात असून तिथल्या पाण्याचे अस्तित्वाचे ठिकाणही शोधले जात असताना त्याच भागात पाण्याचे अस्तित्व सापडले आहे
ह्या संशोधित पाण्याच्या नमुन्यात ऑक्सिजन व कार्बन मोनो ऑक्साईड असल्यामुळे तेथे सूर्यापेक्षा दुप्पट ते नऊपट जास्त ऑक्सिजन असल्याचे निष्पन्न झाले आणि ह्या मुळे तिथे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याच्या शक्यतेलाही दुजोरा मिळाला आहे
सध्या ह्या ग्रेट रेड स्पॉट मधील भाग घनदाट ढगांनी व्यापलेला आहे त्या मुळे त्या भागातून electromagnetic energy बाहेर पडण्यास अडथळा येत असल्याने पाण्याच्या अस्तित्वाची सखोल माहिती संशोधकांना मिळाली नसली तरीही लवकरच ह्या परिस्थितीवर मात करून संशोधन करण्यात शास्त्रज्ञ यश मिळवतील असे मत शास्त्रज्ञ Gordon Bjoraker ह्यांनी व्यक्त केले आहे ह्या संशोधनाने ते आनंदित झाले असून ह्या शोधाचा उपयोग आगामी गुरु ग्रहावरील मानवसहित अंतराळ मिशन साठी होईल असे शास्त्रज्ञांना वाटतेय


Tuesday, 21 August 2018

यवतमाळात भर पावसाळ्यातही पाणी आठवड्यातून एकदाच

यवतमाळ -२१ ऑगस्ट

यवतमाळ येथे गेल्या दोन महिन्यात भरपूर पाऊस पडला त्या मुळे यवतमाळला पाणी पुरवठा करणारी धरणे ओसंडून वाहू लागली तरीही यवतमाळातील पाणी पुरवठा मात्र नियमित केल्या गेला नाही अजूनही नळाला आठ दिवसातून एकदाच पाणी सोडण्यात येतेय विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरापासून यवतमाळात सतत पाऊस पडत आहे तरीही बाहेर मुसळधार पाऊस पण घरातील नळाला अर्थातच घरात पाणी नाही अशी अवस्था यवतमाळकरांची झाली आहे
आणि हे केवळ प्रशासनाची उदासीनता,निष्क्रियता आणि योग्य नियोजनाअभावी झाले आहे नागरिकांना अजूनही बिसलेरी आणि टँकरचा नाहक खर्च सोसावा लागतोय आधीच उन्हाळ्यात टँकर,बिसलेरी ,कॅन,स्टील टाक्या प्लॅस्टिकच्या मोठ्या टाक्या ,फिल्टर आदीचा खर्च सोसावा लागल्याने ते त्रस्त होते आता पावसाळ्यातही लोकांना कृत्रिम पाणीटंचाईमुळे आणि नेते आणि संबंधितांच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा खर्च करावा लागतोय त्या मुळे लोक त्रासले नसले तरच नवल
आता भरपूर पाऊस पडलाय जिल्यात अनेक ठिकाणी पूर आलाय त्या मुळे पाणी समस्या संपली आहे निदान आता तरी संबंधीतांनी ह्या समस्येकडे लक्ष देऊन नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी यवतमाळकर सतत करत आहेत
यवतमाळला पाणी पुरवठा करणारे निळोणा व चापडोह प्रकल्प पावसाळा सुरु होताच अवघ्या दोन महिन्यातच भरून वाहू लागले त्या मुळे ह्या वर्षीच्या दुष्काळातील पाणीटंचाईने त्रस्त झालेले यवतमाळचे नागरिक आनंदित झाले टंचाईच्या काळात दोन महिने बंद झालेला पाणीपुरवठा आता नियमित होईल ह्या आशेत असलेल्या नागरिकांचा आता भ्रमनिरास झाला असून अजूनही पाणी दररोज किंवा एक दिवसाआड सोडण्यास प्रशासन तयार नाही मध्यंतरी काही नागरिकांनी मोर्चा नेऊन पाणीपुरवठा विभागाला चार दिवसातून एकदा पाणी सोडण्याची विनंती केली तरीही प्रशासन पाणीपुरवठा नियमित करण्यात असमर्थ आहे
यवतमाळकरांना गेल्या पाचसहा वर्षांपासूनच पाणीसमस्येचा त्रास सोसावा लागतोय पाणी कमी दाबाने येणे पाईपलाईन फुटणे ,नियमित न येणे नित्याचेच आहे ,पाणी बेसिनच्या नळाच्या उंचीपर्यंतही पोहोचत नाही वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही सतत नवीन पाईपलाईन टाकत असल्याचे सांगितले जाते पण वर्षभरानंतरही काम पुर्ण होत नाहीच
नागरिकांना गेले वर्षभर बेंबळा प्रकल्पातून पाणी पुरवठा करणार असे आश्वासन दिल्या जात होते ते कामही पूर्ण झाले नाहीच आणि ह्या कामासाठी जिथपर्यंत पाईप टाकण्यात आले ते पाइपही निकृष्ट दर्जाचे निघाल्याने टेस्टिंगच्या वेळी पाण्याच्या दाबाने पाइपच फुटले त्या मुळे आधीच उशिराने सुरु करणार असलेला  प्रकल्प लांबणीवर पडला शिवाय पाईप फुटल्याने दुष्काळात पाणीच वाया गेले नाही तर आसपासच्या शेतीचेही नुकसान झाले
निवडणुकीआधी नागरिकांना चोवीसतास भरपूर पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन देणारे मंत्री सध्या भरपूर पाऊस पडून धरणे भरून वाहत असताना दररोज तर सोडाच एक दिवसाआड पाणीपुरवठा करू शकत नाहीत आणि हि परिस्थिती पावसाळ्यातली आहे म्हणजे पावसाळा संपल्यावर काय होईल ?  ह्याच कामामुळे रस्ते खोदल्याने गेल्या ऑक्टोबर पासून इंटरनेट सेवा व लोकल फोनही बंदच आहेत आता त्यालाही वर्ष होत आले आहे अजूनही प्रशासन ढीम्म आहे आता वायफाय देण्याचे आश्वासन देण्यात येतेय हि सेवा जेव्हा सुरु होईल तेव्हा होईल तोवर इंटरनेट आणि लोकल फोन सुरु ठेवण्यास काहीच हरकत नाही
पाणीटंचाई निवारणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही यवतमाळकरांना पाणीटंचाईचा त्रास होत आहे
अजून दोन महिने पावसाळा असल्याने पाऊस आला आणि धरणे भरून पाणी वाहू लागली कि जास्तीचे पाणी
रस्त्यांवर सोडले जाईल आणि पाणी नाहक वाया जाईल त्या ऐवजी लोकांना दररोज पाणीपुरवठा केल्यास हि वेळ येणार नाही
मागच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागला लोकांनी त्या काळात संयमाने प्रशासनाला साथ दिली पण आता मुसळधार पाऊस पडूनही आणि धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही पाणी योग्य नियोजना अभावी नियमित सोडल्या जात नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत पावसाळ्यातील कृत्रिम पाणीटंचाईला ते साथ तर देणार नाहीतच शिवाय पुढच्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवतील त्या मुळे संबंधितांनी ह्या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन फोर्सने नियमित पाणीपुरवठा करावा अशी यवतमाळ मधील नागरिकांची रास्त मागणी आहे
पाण्याअभावी शासनाची वृक्ष संवर्धन मोहीमही फोल आहे पाणी अत्यल्प आठवड्यातून एकदाच सोडल्यास पाणी पिण्यासाठी आणि इतर आवश्यक कामासाठीही पुरणार नाहीच आधीच दुष्काळात झाडे वाळून गेलीत सध्या पावसाळा आहे नंतरचे काय ? त्या मुळे ह्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे



Sunday, 19 August 2018

नासाच्या मोहीम 56 चे अंतराळवीर Oleg आणि Sergey ह्यांचा स्पेसवॉक यशस्वी


Flight Engineers Oleg Artemyev and Sergey Prokopyev
          नासाच्या अंतराळ मोहीम 56 चे अंतराळवीर Oleg आणि Sergey  -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -17 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 56 चे फ्लाईट इंजिनीअर  Oleg Artemyev आणि रशियाचे अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनी अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आणि आगामी स्पेसवॉक व कार्गोशिपच्या आगमनाच्या तयारीसाठी 15 ऑगस्टला यशस्वी स्पेसवॉक केला
हा स्पेसवॉक सात तास सेहचाळीस मिनिटांचा होता हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकातून 12.17 p.m. ला स्पेसवॉक साठी बाहेर पडले आणि 8.05 p.m. ला स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले
ह्या सात तासांच्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकातील रशियन सेगमेंटचा बाहेरील भागात Small Technology Satellites आणि नव्या सायंटिफिक प्रयोगासाठी लागणारे आवश्यक पार्ट बसविण्यासाठी केबल बसवण्याचे काम पूर्ण केले

Roscosmos cosmonaut Sergey Prokopyev
       अंतराळवीर Sergey Prokopyev स्पेसवॉक दरम्यान केबल बसवताना -फोटो -नासा संस्था

जर्मन अंतराळ एजन्सी D LR आणि रशियन अंतराळ एजन्सी Roscosmos ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने नवा Icarus सायंटिफीक प्रयोग करण्यात येणार आहे ह्या प्रयोगांतर्गत पृथ्वीवरील  स्थलांतरित प्राण्याच्या हालचाली टिपण्यात येतील स्थानकाला बसवलेल्या अँटेना आणि GPS hardwareच्या मदतीने पृथ्वीवरील छोट्या प्राण्यांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाण्याच्या हालचाली ,त्यांच्या मुळे पसरणारे रोग आणि इतर घडामोडी ट्रॅक केल्या जातील आणि त्या वर संशोधन केल्या जाईल
आजवर स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी केलेला हा 212 वा स्पेसवॉक होता  Oleg Artemyev ह्यांच्या अंतराळवारीतील हा तिसरा स्पेसवॉक होता त्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परिधान केलेल्या सूटवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणि  20 नंबरचा आकडा असलेला हेल्मेट घातला होता
अंतराळवीर Sergey ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता त्यांनी 18 नंबरचे लेबल असलेले हेल्मेट घातले होतेआणि त्यांनी परिधान केलेल्या सुटवर निळ्या रंगाच्या रेषा होत्या

Friday, 10 August 2018

Curiosity Mars Rover ने केले सहाव्या वर्षात यशस्वी पदार्पण


                            मंगळावरील Curiosity Mars Rover -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -6 ऑगस्ट
नासाने मंगळावर पाठवलेले क्युरिओसिटी मंगळ यान गेल्या पाच वर्षांपासून मंगळावर अविरतपणे कार्यरत असून आता त्याने सहाव्या वर्षात यशवी पदार्पण केले आहे आणि नुकतेच Curiosity Rover ने त्याचा सहावा वाढदिवस साजरा करत असल्याच ट्विट पृथ्वीवर पाठवलय
Curiosity मंगळ यान 2011 सालच्या नोव्हेंबर मध्ये मंगळाकडे झेपावले आणि ऑगष्ट 2012 मध्ये मंगळावर पोहोचले तेव्हापासून ते मंगळावर कार्यरत आहे ह्या मंगळयानावर 17अत्याधुनिक कॅमेरे व लेन्स बसविलेले असून
त्याच्या साहाय्याने मंगळावरच्या जीवसृष्टीचे अस्तित्व शोधले जात आहे आणि त्या संबंधित माहिती व फोटो Curiosity पृथ्वीवर पाठवत आहे आणि संशोधित माहीती नुसार पूर्वी तिथे जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे पुरावेही मिळत आहेत
Curiosity मंगळ यानाने पाच वर्षात मंगळावरील पाण्याचे अस्तित्व शोधून पुराव्यादाखल तिथल्या  आटलेल्या आणि पूर्वी तिथे पाण्याचे अस्तित्व असल्याचे सबळ पुरावे देणारे काही ठिकाणचे फोटो पाठवले आहेत आहेत विशेष म्हणजे नुकतेच तिथल्या एका भागात गोठलेल्या बर्फाखाली वाहत्या पाण्याचे सरोवरही ESA ला सापडले आहे
ह्या मंगळयानाने त्याच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने गोळा केलेल्या भूगर्भातील मातीच्या उत्खननाचे नमुनेही पाठवले आहेत ते नमुने संशोधित केल्यानंतर त्यात जैविक अणूचे अंश ,सल्फर ,ऑक्सिजन ,कार्बन आणि नायट्रोजनचे अस्तित्व सापडले आहे

moving image showing darkening dust storm

          मंगळावरील वादळी वातावरणात Curiosity Mars Rover -फोटो -नासा संस्था

सध्या मंगळावर धुळीच्या वादळी वाऱयांचे प्रचंड वादळ उठले असून त्या वादळामुळे प्रचंड धुळीचे लोट वाहात आहेत त्या मुळेच तिथे असलेले दुसरे मंगळ यान रोवर अपारच्युनिटीचा संपर्क तुटला आहे पण Curiosity ने ह्या धुळीच्या वादळाचे फोटो जुलै मध्ये पाठवले असून सध्या ह्या यानाच्या साहाय्याने शास्त्रज्ञ ह्या वादळाची तीव्रता  आणि त्यातील धूलिकणांचा आकार व प्रमाण परमाणु ऊर्जेद्वारे संशोधित करत आहेत ह्या संशोधनाचा उपयोग आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी होईल अस संशोधकांच मत आहे
 2013 साली Curiosity मंगळयानाने त्याच्या पहिल्या वाढदिवशी " Happy Birthday " चा संदेश पृथ्वीवर पाठवला होता आता त्याच्या सहाव्या वाढदिवशी Curiosity वरून ट्विट करण्यात आलेय कि ,तो त्याचा सहावा वाढदिवस साजरा करतोय तेही तिथे असलेल्या आयर्न ऑक्साइड सोबत ह्या आयर्न ऑक्साईड मुळेच मंगळ ग्रहाला लाल रंग प्राप्त झालाय