Friday, 13 April 2018

आता अंतराळ स्थानकात गहूही अंकुरले

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/iss055e001920.jpg
         अंतराळ स्थानकात उगवलेल्या गव्हाच्या ओंब्यांनी लगडलेली गव्हाची कणसे -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -11एप्रिल

नासा संस्थेने राबविलेल्या veggie प्रोजेक्टला अंतराळवीरांच्या व शास्त्रज्ञाच्या अथक प्रयत्नांनी पुन्हा एकदा यश प्राप्त झाले आहे अंतराळ स्थानकात अंतराळवीरांनी नेलेले व पेरलेले गहू अंकुरले,त्याची रोपे जोमाने वाढली फोफावली आणि आता त्यांना गव्हाच्या ओंब्यांनी लगडलेली कणसे लागली आहेत
अंतराळ स्थानकात ह्या VEG-3 ह्या प्रोजेक्ट अंतर्गत नवीन अत्याधुनिक( APH ) चेंबर बसवण्यात आला ह्या चेम्बरचा आकार आधीच्या तुलनेत वाढवण्यात आला आहे  साधारणपणे छोट्या फ्रिजच्या आकाराच्या ह्या चेम्बरची रचना अशी करण्यात आली कि जेणेकरून ह्यात लावण्यात आलेल्या रोपांच्या वाढिस मोठी मोकळी जागा मिळेल त्यांची मुळे चेम्बरमधल्या मातीत खोलवर रुजतील त्यांच्या फांद्या मोकळेपणी फोफावतील
 ह्या चेम्बरची जागाही मोठी व रुंद ठेवण्यात आली त्या मुळे एकाच वेळी तिथे जास्ती व वेगवेगळ्या आकारांची रोपे लावता आली 

     अंतराळ स्थानकातील अत्याधुनिक कलर लाईट सिस्टिम नियंत्रित चेंबरमध्ये फोफावलेले गव्हाचे पीक 

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/iss055e001934.jpg


ह्या चेंबरमध्ये Arabidopsis,छोट्या फुलांची रोपे विशेषतः कोबी ,मोहरी आणि छोट्या आकाराच्या गव्हाचे रोप लावण्यात आले होते आणि पृथ्वीवरील वातावरण आणि अंतराळातील स्थानकातील सुक्षम गुरुत्वाकर्षणात त्यांच्या वाढीतील बदलांवर संशोधन करण्यात आले
ह्या चेम्बरमधील वातावरणातील आवश्यक तेव्हढे तापमान ,कार्बन डाय ऑक्साईड व oxygen चे प्रमाण नियंत्रित करण्यात आले तशी ह्या चेम्बरची सिस्टिम स्वयंचलित होती तरीही अंतराळवीरांनी त्यांची योग्य जोपासना करत त्यांना आवश्यक तेव्हा पाणी कार्बन डाय ऑक्साईड ,oxygen( ,ethylene ,bottles आणि filters )ह्यांचे योग्य व्यवस्थापन केले हि सर्व कामे पृथ्वीवरून नासाच्या लॅबमधून शास्त्रज्ञांच्या टीमच्या सूचनेनुसार comp .च्या साहाय्याने अंतराळवीरांनी केली
पृथ्वीवरील रोपांना वाढीसाठी आणि अन्न धान्य व फुले उगवण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची आवश्यकता असते पण अंतराळात झिरो ग्रॅव्हिटी असते ह्या वातावरणात झाडे कशी वाढतात त्यांना फळे फुले कशी येतात आणि ती तिथे कशी तग धरतात ह्यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले
ह्या अत्याधुनिक A.P.H चेंबरमध्ये LED लाईट द्वारे प्रकाश व्यवस्था केली गेली त्यासाठी बसवण्यात आलेल्या लाईट सिस्टिम द्वारे हिरवा ,लाल ,निळ्या रंगाचा व आवश्यक तीव्रतेचा रंगाचा वापर करण्यात आला ह्या रोपांना आवश्यक तेव्हढी आद्रता व तापमान नियंत्रित केल्या गेले व ह्या वातावरणातील रोपांच्या वाढीचे निरीक्षण नोंदवून संशोधन केल्या गेले
आणि अखेर नासा संस्थेतील शास्त्रज्ञ आणि अंतराळवीरांच्या ह्या अथक परिश्रमाला यश आले आणि झिनिया ,कोबी ,lettuce आणि आता अंतराळस्थानकात गहूही उगवले आहेत त्यामुळे लवकरच अंतराळस्थानकात वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांना  स्वत: पिकवलेले ताजे अन्न खायला मिळेल सध्या त्यांना पृथ्वीवरील प्रिझर्व अन्न खावे लागते शिवाय ह्या यशामुळे दूरवरच्या आगामी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांनाही फायदा होईल म्हणून नासाचे शास्त्रज्ञ ह्या यशावर सध्या खुश आहेत

      स्थानकात उगवलेल्या lettuce आणि कोबीची भाजीची Scott Tingle ह्यांनी केली तोडणी

Image of Destiny module aboard the International Space Station, with green and pink glowing lights
 नासाच्या अंतराळस्थानकातील अत्याधुनिक चेम्बरमधील गुलाबी प्रकाशात वाढणारी भाजी -फोटो- नासा संस्था

नासा संस्था -13 एप्रिल
ह्या आठवड्यात स्थानकातील अत्याधुनिक ग्रोथ चेंबरमध्ये VEG-03 ह्या Veggie प्रोजेक्ट अंतर्गत लावलेल्या  दोन भाज्या प्रथमच एकदम उगवल्या अंतराळवीर Scott Tingle ह्यांनी ह्या lettuce आणि कोबीची कापणी केली आणि सर्वच अंतराळ वीरांनी जेवणात ह्या भाज्यांचा आस्वाद घेतला आणि थोडी भाजी त्यांनी पृथ्वीवर संशोधन करण्यासाठी ठेवली
आता अंतराळवीर Monocot Plant Adoption to spaceflight (APEX -06) ह्या विषयी नवीन संशोधन
 करणार आहेत ह्याद्वारे अंतराळस्थानकातील व पृथ्वीवरील वनस्पतींच्या वाढीतील बदल नोंदविले जातील

Image of NASA astronaut Scott Tingle pointing to vegetable crops
अंतराळ स्थानकातील चेम्बरमध्ये समांतर लावलेली व प्रथमच एकदम वाढलेली भाजी दाखवताना अंतराळवीर
Scott Tingle-फोटो -नासा संस्था

Tuesday, 10 April 2018

अंतराळस्थानकात उगवली lettuce ची भाजी

Astronaut Scott Tingle Tries the Space-Grown Lettuce
 नासाचे अंतराळवीर Scott Tingle अंतराळस्थानकात उगवलेली lettuce ची पाने चाखताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -
नासाच्या अंतराळ मोहीम 55- 56 चे अंतराळवीरScott Tingle ह्यांनी नुकतीच अंतराळ  स्थानकात उगवलेली lettuce ह्या भाजीची पाने तोडली ह्या भाजीची चव त्यांनी चाखलीआणि स्थानकातील सर्वच अंतराळवीरांनीही ह्या ताज्या भाजीचा आस्वाद घेतला त्यातील काही पाने त्यांनी पृथ्वीवर आणण्यासाठी ठेवली आहेत
पृथ्वीवर उगवलेली भाजी आणी अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मधील फिरत्या प्रयोगशाळेत पृथ्वीवरील वातावरणा सारख कृत्रिम वातावरण निर्माण करून कमी आणि टाकाऊ पाण्यात उगवलेल्या ह्या भाजीत काय  फरक आहे ह्यावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत
अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना पृथ्वीवरील भाज्यांवर अवलंबून राहाव लागत कारण तिथे पाणी नसत आणि गुरुत्वाकर्षणही अत्यंत कमी त्या मुळे भाज्या किंवा फळे उगवण अत्यंत कठीण असत हे अंतराळवीर पृथ्वीवरील प्रिझर्व व प्रोसेस केलेल्या भाज्यांचा समावेश त्यांचा जेवणात करतात
अशाही कठीण वातावरणात संशोधन करून स्थानकात भाज्या उगवण्यासाठी नासा संस्थेने VEG-03 हा प्रकल्प राबवला आणि त्यांना त्यात यश आले ह्या प्रकल्पा अंतर्गत आजवर अंतराळ स्थानकात राहायला गेलेल्या अंतराळवीरांनी झिनियाची फुले lettuce आणि Mizuna ची (नवीन जातीच्या कोबीची ) यशस्वी लागवड केली होती विशेषतः Scott kelly, Peggy Whitson वै. (ह्या संदर्भातील बातम्या ह्याच ब्लॉगवर प्रकाशित केल्या आहेत )
ह्या रोपांची निगा राखणे त्यांना खत व पाणी (अर्थातच टाकाऊ) देणे हे काम अंतराळवीरांनी त्यांच्या व्यस्त दीनचर्येतून आवडीने केले होते व करतात कारण ह्याचा उपयोग त्यांच्या प्रमाणेच आगामी दूरवरच्या मोहिमांसाठी  अंतराळ स्थानकात राहणाऱ्या अंतराळवीरांना होईल

            अंतराळ स्थानकातील चेंबरमधील कृत्रिम वातावरणात उगवलेली lettuce ची भाजी

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/iss055e003121.jpg

Saturday, 17 March 2018

यवतमाळात पाणीबाणी


यवतमाळ येथे सध्या तीव्र पाणीटंचाई सुरुआहे लोक पाणीटंचाईने त्रस्त आहेत बारा दिवसानंतर पाणी पुरवठा करणार असल्याच जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले असले तरीही पाणी पुरवठा अनियमित आहे काही ठिकाणी चवदा दिवस तर काही ठिकाणी त्याहून जास्त दिवसांनी पाणी पुरवठा होतो तोही अत्यंत कमी दाबाने लोक टँकरचे पाणी आणून पाण्याची गरज भागवत आहेत त्यासाठी त्यांना तीनशे ते सहाशे रुपये द्यावे लागत आहेत पाणीपुरवठा अनियमित झाल्याने संतप्त नागरिकांचा मोर्चा पाणीपुरवठा विभागात धडकत आहे घेराव घालून महिला पाणीपुरवठ्याची मागणी करत आहेत बोअरलाही पाणी लागत नाही अभावानेच लागते बांधकामावर बंदी आहे तरीही कित्येक ठिकाणी बांधकाम सुरु आहेच नागरिक मात्र पाण्यासाठी हैराण झालेत

काही नागरिकांनी पाणी कमी दाबाने येते म्हणून जमिनीखाली टाकी बांधून त्यात नळ कनेक्शन करून त्यालाच मोटार बसवली आहे त्यामुळे नेहमीच्या उंचीवर ज्यांचे नळ कनेक्शन आहे त्यांच्या नळांना पाणी चढतच नाही मागे टिल्लू पंपांना बंदी होती पण आता त्या शिवाय पर्यायच नाही पण डायरेक्ट मोटार नळांना लावण्यांवर बंदी केल्यास फायदा होईल

यवतमाळकर गेल्या चारपाच वर्षांपासूनच पाणीसमस्यांनी हैराण आहेत पाणी कमी दाबाने आणि वेळेवर न येणे हे तर नेहमीचेच शिवाय वारंवार नाल्या फुटणे त्या मुळे पाणी गढूळ व कमी दाबाने येणे पाण्यात नारू,अळी
निघणे  वै समस्या नेहमीच्याच (ह्या संदर्भातील बातम्या ह्याच ब्लॉगवर प्रकाशित ) 
मागच्या वर्षी आणि त्याआधीही विदर्भात भरपूर पाऊस पडला होता तरीही दोनतीन वर्षांपासून पाणी एक दिवसाआड तर नंतर चार दिवसानी सोडण्यात येत होते जेव्हा जास्त पाऊस येतो तेव्हा धरणे भरून पाणी वाहू लागते पूर येतो तेव्हाही हीच परिस्थिती उदभवते अशा वेळेस धरणांची दारे उघडून पाणी बाहेर सोडल्या जाते आणि विशेष म्हणजे त्या वेळेस बाहेर धो,धो पाऊस बरसत असताना घरातील नळांना मात्र पाणी येत नाही
योग्य नियोजनाअभावी हि वेळ आली असल्याने नागरिक आता संतप्त झालेत दरम्यान सिंचन घोटाळा उघड झाला आणि आताही सिंचनातील भ्रष्टाचार अधून मधून बाहेर येतो पण समस्या जैसे थे आता नवीन सरकार आले पाणी समस्या सोडवण्यासाठी कोट्यवधीचा निधीही मंजूर झाला पण राजकीय अनास्था ,दिरंगाई आणि अयोग्य नियोजना अभावी पाणीप्रश्न न सुटल्याने लोकांना चोवीसतास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणारे नेते आता चोवीस दिवसातून एकदा पाणीपुरवठा करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत

पाणी गढूळ आणि अशुद्ध

यवतमाळात ह्या वर्षी अपुरा पाऊस पडला परिणामी यवतमाळला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली नाहीत आता तर धरणांनी तळ गाठलाय त्या मुळे मृत साठ्यातून पाणीपुरवठा होतोय त्या मुळे येणारे पाणी गढूळ मातीयुक्त असल्याचे सांगण्यात येतेय  पाणीशुद्धीकरण यंत्रणा असताना पाणी शुद्ध करून सोडण्यात येत नाही का ?कारण कितीही गढूळ पाणी शुद्ध केल्यानंतर स्वच्छ व्हायला हवे तसे न होता पाणी मातीमिश्रीत येते
पाण्यात तुरटी फिरवल्यास भांड्याच्या तळाशी हि माती साचते तेही दोनदा गाळल्यावरही ! मग पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यरत आहे कि नाही असा प्रश्न नागरिकांना पडतोय असे अशुद्ध पाणी पिण म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ आहे आरोग्याला हानिकारक आहे विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात फ्लोराईड युक्त पाण्याचे नमुने सापडले आहेत आणि कित्येक लोकांना त्या मुळे आजार देखील झाला आहे आणि कित्येकजण  किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत तेही केवळ दूषित पाण्यामुळे आणि त्यांचा काहीही दोष नसताना त्या मुळे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी यवतमाळकरांची रास्त अपेक्षा आहे

पाणीप्रश्न सोडवणार आणि यवतमाळ करांना चोवीसतास भरपूर पाणी पुरवणार अशी घोषणा करून नवे नेते निवडून आले पण ज्या बेंबळा प्रकल्पातून पाणीपुरवठा करणार त्याचे काम पूर्ण होण्यास दिरंगाई होतेय आणि विशेष म्हणजे पाणीपुरवठा करण्यासाठी, पाईप बसवण्यासाठी जागोजागी रस्ते खोदल्यामुळे यवतमाळातील फोनसेवा व इंटरनेट सेवाही चारपाच महिन्यांपासून खंडित करण्यात आलीय तक्रार करूनही उपयोग होत नसल्यामुळे लोक त्रस्त आहेत ह्या खोदलेल्या रस्त्यांमुळे रहदारीसही अडथळा होतोय आणि आता दोन महिने तरी बेंबळा प्रकल्पातून पाणी येण्याची आशा फोल ठरली आहे त्या नंतर पावसाळा सुरु होईल आणि पुन्हा हे काम थंड बस्त्यात जाईल आणि पुढच्या निवडणुकीत नेते हा मुद्दा मांडायला तयार होतील

सध्या तरी लोक पाणीटंचाईने त्रासलेत टँकर आणि बिस्लेरीचा नाहक खर्च करत आहेत अजून उन्हाळ्याची दोन महिने कशी काढायची ह्या चिंतेत यवतमाळवासी आहेत त्यातून विदर्भ म्हणजे उन्हाची तीव्रता अधिक एरव्ही कुलर शिवाय उन्हाळा असह्य आणि अती उष्णतेत तर कुलरही निकामी होतात अशात ह्या उन्हाळ्यात तर पाणी नाही म्हणजे कुलरही नाही  त्या मुळे अवकाळी पाऊस यावा आणि भरपूर बरसून धरणात पुरेसे पाणी साठावे अशी यवतमाळ मधील नागरिकांची इच्छा आहे अर्थात ती पूर्ण होणे अशक्यच! पण नेते आणि संबंधित अधिकाऱयांनी ठरवल्यास आजूबाजूच्या गावातून उपलब्ध धरणातून पाणीपुरवठा करणे आणि बेंबळा प्रकल्पाचे काम त्वरित केल्यास मात्र पाणी समस्या सुटण्यास मदत होईल 

Friday, 16 March 2018

यवतमाळ येथे अवकाळी पाऊस

 यवतमाळ -16 मार्च
यवतमाळ येथे काल सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते हवामान खात्याकडून 14 ते 18 मार्च पर्यंत पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि काल रात्री जोरदार यवतमाळात पाऊस बरसला
तो सकाळपर्यंत सुरु होता आज सकाळी देखील तुरळक सरी बरसल्या आज दिवसभर वातावरण ढगाळ असले तरी पाऊस पडला नाही
भर उन्हाळ्यात पडलेल्या ह्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा तर पडलाच शिवाय यवतमाळ येथे तीव्र पाणीटंचाई असताना बरसलेल्या पावसामुळे लोक आनंदित झाले .

Sunday, 18 February 2018

अंतराळमोहीम 54च्या Mark Vande आणि Noishige Kanai ह्यांनी केला spacewalk


              अंतराळवीर Mark Vande आणि Noishige Kanai स्पेसवॉक दरम्यान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -16 feb
नासाच्या अंतराळमोहीम 54 चे फ्लाईट इंजिनिअर Mark Vande Hei आणि जपानचे अंतराळवीर Noishige Kanai ह्या दोघांनी 16 फेब्रुवारीला अंतराळस्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी स्पेसवॉक पूर्ण केला
स्पेसवॉक पाच तास सत्तावन्न मिनिटांनी संपला ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळस्थानकाच्या रोबोटिक आर्मवर काम केले
ह्या रोबोटिक आर्मच्या दोन Latching End Effector पैकी एक long term storage location मध्ये ठेवला हा पार्ट भविष्यात स्पेअर पार्ट म्हणून उपयोगी पडेल आणि दुसरा पार्ट काढून अंतराळस्थानकात आणला तो नंतर पृथ्वीवर परत आणल्या जाईल
हे काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण करून उरलेल्या वेळात ह्या अंतराळवीरांनी आणखीही कामे पूर्ण केली
तेवीस जानेवारीला केलेल्या स्पेसवॉक दरम्यान बसवण्यात आलेल्या LEE चे लुब्रिकेशन व त्याच्या एक भागात grounding strap बसवला त्यांनी स्थानकाच्या cooling system  चेही काम पूर्ण केले ह्या शिवाय इतर आवश्यक कामेही पूर्ण केली अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आजवर केलेला हा 208 वा स्पेसवॉक होता
अंतराळवीर Mark Vande ह्यांच्या करिअर मधला हा चवथा स्पेसवॉक होता तर जपानचे अंतराळवीर Noishige ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता आणि जपानी अंतराळवीरांमध्ये ते चवथे स्पेसवॉकर आहेत
Mark Vande ह्यांनी ह्या स्पेसवॉक मध्ये परिधान केलेल्या सूटवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणि त्यांच्या हेल्मेटवर 18 अंक प्रिंट केला होता तर Kanai ह्यांच्या स्पेससूटवर रेषा नव्हत्या पण त्यांच्या हेल्मेटवर 17अंक प्रिंट केलेला होता
 

Friday, 16 February 2018

यवतमाळ येथे फोन व इंटरनेट सेवा तीन महिन्यापासून ठप्प

यवतमाळ येथील लोकल फोन आणि इंटरनेट सेवा नोव्हेंबर महिन्यापासून बंद असल्याने नागरिक त्रस्त आहेत कधी जीवन प्राधिकरणाच्या कामासाठी तर कधी रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी रस्ते खोदल्याने वायर disconnect केल्याचे कारण सांगितल्या जाते तक्रार करूनही दखल घेतल्या जात नाही जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइन बसवण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने आम्ही लोकल फोन व इंटरनेट सेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याचे टेलिफोन ऑफिसमधले अधिकारी सांगतात तसेच जीवन प्राधिकरणातील अधिकारी काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन देतात आता तीन महिने उलटूनही  फोन सेवा बंदच आहे आणि विशेष म्हणजे फोन व इंटरनेट बंद असताना ग्राहकांना बिल मात्र वेळेवर पाठवण्यात आलय  हीच तत्परता फोन  सुरु करण्यासाठी दाखवली तर ग्राहक बिल भरू शकतील कारण इंटरनेट न वापरता आणि फोन बंद असताना ग्राहक नाहक भुर्दंड  का सोसतील?  तरी संबंधितांनी दखल घेऊन इंटरनेट सेवा सुरु करावी अशी नागरिकांची मागणी आहे
 

Sunday, 4 February 2018

नासाच्या मोहीम 54 च्या अंतराळवीरांनी केला रेकॉर्डब्रेक स्पेसवॉक


         अंतराळवीर Alexander Misurkin आणि अंतराळवीर Anton Shkaplerov स्पेसवॉकच्या तयारीत
फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 2 feb
नासाच्या मोहीम 54 चे रशियन अंतराळवीर व कमांडर Alexander Misurkin आणि Flight engineer Anton Shkaplerov ह्यांनी दोन तारखेला अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक पूर्ण केला
हे दोन अंतराळवीर सकाळी 10.34 मिनिटांनी रशियन कंपार्टमेंट मधून बाहेर पडले आणि त्यांनी स्थानकाच्या Pirs Docking ह्या रशियन भागात प्रवेश केला व संध्याकाळी 6.47 मिनिटांनी पुन्हा स्पेसवॉक संपल्यानंतर स्थानकात प्रवेश केला
हा स्पेसवॉक 8 तास 13 मिनिटांनी संपला हा आतापर्यंतचा अंतराळस्थानकाच्या कामासाठी जास्त वेळपर्यंत  करण्यात  आलेला स्पेसवॉक होता त्यामुळे ह्या दोन रशियन अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक मध्ये आधीच्या रशियन अंतराळवीरांपेक्षा जास्तकाळ काम करून विक्रम नोंदवला आहे
आधीच्या अंतराळ मोहीम 38 च्या रशियन अंतराळवीर Sergei Ryazanskiy आणि अंतराळवीर Oleg Kotov ह्यांनी 27 डिसेंबर 2013 साली अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी 8 तास 7 मिनिटांचा स्पेसवॉक केला होता तो विक्रम ह्या दोन अंतराळवीरांनी आता मोडला केला आहे
आठ तास तेरा मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये अंतराळवीरांनी रशियन flight controllersआणि रशियन module च्या high gain antenna च्या zvezda service module वर नवीन electronics आणि elemetry box फिक्स केला त्या मुळे संपर्क साधण्यास मदत होईल आता हि सिस्टीम व्यवस्थित काम करत आहे
अंतराळवीर Misurkin ह्याच्या अंतराळ कारर्कीर्दीतला हा चवथा स्पेसवॉक होता
आणि अंतराळवीर Shkaplerov ह्यांचा हा पाचवा आणि जास्तवेळपर्यंत चाललेला स्पेसवॉक होता
आजवर अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी केलेला हा 207 वा स्पेसवॉक होत