यवतमाळ येथे सध्या तीव्र पाणीटंचाई सुरुआहे लोक पाणीटंचाईने त्रस्त आहेत बारा दिवसानंतर पाणी पुरवठा करणार असल्याच जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले असले तरीही पाणी पुरवठा अनियमित आहे काही ठिकाणी चवदा दिवस तर काही ठिकाणी त्याहून जास्त दिवसांनी पाणी पुरवठा होतो तोही अत्यंत कमी दाबाने लोक टँकरचे पाणी आणून पाण्याची गरज भागवत आहेत त्यासाठी त्यांना तीनशे ते सहाशे रुपये द्यावे लागत आहेत पाणीपुरवठा अनियमित झाल्याने संतप्त नागरिकांचा मोर्चा पाणीपुरवठा विभागात धडकत आहे घेराव घालून महिला पाणीपुरवठ्याची मागणी करत आहेत बोअरलाही पाणी लागत नाही अभावानेच लागते बांधकामावर बंदी आहे तरीही कित्येक ठिकाणी बांधकाम सुरु आहेच नागरिक मात्र पाण्यासाठी हैराण झालेत
काही नागरिकांनी पाणी कमी दाबाने येते म्हणून जमिनीखाली टाकी बांधून त्यात नळ कनेक्शन करून त्यालाच मोटार बसवली आहे त्यामुळे नेहमीच्या उंचीवर ज्यांचे नळ कनेक्शन आहे त्यांच्या नळांना पाणी चढतच नाही मागे टिल्लू पंपांना बंदी होती पण आता त्या शिवाय पर्यायच नाही पण डायरेक्ट मोटार नळांना लावण्यांवर बंदी केल्यास फायदा होईल
यवतमाळकर गेल्या चारपाच वर्षांपासूनच पाणीसमस्यांनी हैराण आहेत पाणी कमी दाबाने आणि वेळेवर न येणे हे तर नेहमीचेच शिवाय वारंवार नाल्या फुटणे त्या मुळे पाणी गढूळ व कमी दाबाने येणे पाण्यात नारू,अळी
निघणे वै समस्या नेहमीच्याच (ह्या संदर्भातील बातम्या ह्याच ब्लॉगवर प्रकाशित )
मागच्या वर्षी आणि त्याआधीही विदर्भात भरपूर पाऊस पडला होता तरीही दोनतीन वर्षांपासून पाणी एक दिवसाआड तर नंतर चार दिवसानी सोडण्यात येत होते जेव्हा जास्त पाऊस येतो तेव्हा धरणे भरून पाणी वाहू लागते पूर येतो तेव्हाही हीच परिस्थिती उदभवते अशा वेळेस धरणांची दारे उघडून पाणी बाहेर सोडल्या जाते आणि विशेष म्हणजे त्या वेळेस बाहेर धो,धो पाऊस बरसत असताना घरातील नळांना मात्र पाणी येत नाही
योग्य नियोजनाअभावी हि वेळ आली असल्याने नागरिक आता संतप्त झालेत दरम्यान सिंचन घोटाळा उघड झाला आणि आताही सिंचनातील भ्रष्टाचार अधून मधून बाहेर येतो पण समस्या जैसे थे आता नवीन सरकार आले पाणी समस्या सोडवण्यासाठी कोट्यवधीचा निधीही मंजूर झाला पण राजकीय अनास्था ,दिरंगाई आणि अयोग्य नियोजना अभावी पाणीप्रश्न न सुटल्याने लोकांना चोवीसतास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणारे नेते आता चोवीस दिवसातून एकदा पाणीपुरवठा करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत
पाणी गढूळ आणि अशुद्ध
यवतमाळात ह्या वर्षी अपुरा पाऊस पडला परिणामी यवतमाळला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली नाहीत आता तर धरणांनी तळ गाठलाय त्या मुळे मृत साठ्यातून पाणीपुरवठा होतोय त्या मुळे येणारे पाणी गढूळ मातीयुक्त असल्याचे सांगण्यात येतेय पाणीशुद्धीकरण यंत्रणा असताना पाणी शुद्ध करून सोडण्यात येत नाही का ?कारण कितीही गढूळ पाणी शुद्ध केल्यानंतर स्वच्छ व्हायला हवे तसे न होता पाणी मातीमिश्रीत येते
पाण्यात तुरटी फिरवल्यास भांड्याच्या तळाशी हि माती साचते तेही दोनदा गाळल्यावरही ! मग पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यरत आहे कि नाही असा प्रश्न नागरिकांना पडतोय असे अशुद्ध पाणी पिण म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ आहे आरोग्याला हानिकारक आहे विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात फ्लोराईड युक्त पाण्याचे नमुने सापडले आहेत आणि कित्येक लोकांना त्या मुळे आजार देखील झाला आहे आणि कित्येकजण किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत तेही केवळ दूषित पाण्यामुळे आणि त्यांचा काहीही दोष नसताना त्या मुळे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी यवतमाळकरांची रास्त अपेक्षा आहे
पाणीप्रश्न सोडवणार आणि यवतमाळ करांना चोवीसतास भरपूर पाणी पुरवणार अशी घोषणा करून नवे नेते निवडून आले पण ज्या बेंबळा प्रकल्पातून पाणीपुरवठा करणार त्याचे काम पूर्ण होण्यास दिरंगाई होतेय आणि विशेष म्हणजे पाणीपुरवठा करण्यासाठी, पाईप बसवण्यासाठी जागोजागी रस्ते खोदल्यामुळे यवतमाळातील फोनसेवा व इंटरनेट सेवाही चारपाच महिन्यांपासून खंडित करण्यात आलीय तक्रार करूनही उपयोग होत नसल्यामुळे लोक त्रस्त आहेत ह्या खोदलेल्या रस्त्यांमुळे रहदारीसही अडथळा होतोय आणि आता दोन महिने तरी बेंबळा प्रकल्पातून पाणी येण्याची आशा फोल ठरली आहे त्या नंतर पावसाळा सुरु होईल आणि पुन्हा हे काम थंड बस्त्यात जाईल आणि पुढच्या निवडणुकीत नेते हा मुद्दा मांडायला तयार होतील
सध्या तरी लोक पाणीटंचाईने त्रासलेत टँकर आणि बिस्लेरीचा नाहक खर्च करत आहेत अजून उन्हाळ्याची दोन महिने कशी काढायची ह्या चिंतेत यवतमाळवासी आहेत त्यातून विदर्भ म्हणजे उन्हाची तीव्रता अधिक एरव्ही कुलर शिवाय उन्हाळा असह्य आणि अती उष्णतेत तर कुलरही निकामी होतात अशात ह्या उन्हाळ्यात तर पाणी नाही म्हणजे कुलरही नाही त्या मुळे अवकाळी पाऊस यावा आणि भरपूर बरसून धरणात पुरेसे पाणी साठावे अशी यवतमाळ मधील नागरिकांची इच्छा आहे अर्थात ती पूर्ण होणे अशक्यच! पण नेते आणि संबंधित अधिकाऱयांनी ठरवल्यास आजूबाजूच्या गावातून उपलब्ध धरणातून पाणीपुरवठा करणे आणि बेंबळा प्रकल्पाचे काम त्वरित केल्यास मात्र पाणी समस्या सुटण्यास मदत होईल
No comments:
Post a Comment