नासा संस्था -11एप्रिल
नासा संस्थेने राबविलेल्या veggie प्रोजेक्टला अंतराळवीरांच्या व शास्त्रज्ञाच्या अथक प्रयत्नांनी पुन्हा एकदा यश प्राप्त झाले आहे अंतराळ स्थानकात अंतराळवीरांनी नेलेले व पेरलेले गहू अंकुरले,त्याची रोपे जोमाने वाढली फोफावली आणि आता त्यांना गव्हाच्या ओंब्यांनी लगडलेली कणसे लागली आहेत
अंतराळ स्थानकात ह्या VEG-3 ह्या प्रोजेक्ट अंतर्गत नवीन अत्याधुनिक( APH ) चेंबर बसवण्यात आला ह्या चेम्बरचा आकार आधीच्या तुलनेत वाढवण्यात आला आहे साधारणपणे छोट्या फ्रिजच्या आकाराच्या ह्या चेम्बरची रचना अशी करण्यात आली कि जेणेकरून ह्यात लावण्यात आलेल्या रोपांच्या वाढिस मोठी मोकळी जागा मिळेल त्यांची मुळे चेम्बरमधल्या मातीत खोलवर रुजतील त्यांच्या फांद्या मोकळेपणी फोफावतील
ह्या चेम्बरची जागाही मोठी व रुंद ठेवण्यात आली त्या मुळे एकाच वेळी तिथे जास्ती व वेगवेगळ्या आकारांची रोपे लावता आली
अंतराळ स्थानकातील अत्याधुनिक कलर लाईट सिस्टिम नियंत्रित चेंबरमध्ये फोफावलेले गव्हाचे पीक
ह्या चेंबरमध्ये Arabidopsis,छोट्या फुलांची रोपे विशेषतः कोबी ,मोहरी आणि छोट्या आकाराच्या गव्हाचे रोप लावण्यात आले होते आणि पृथ्वीवरील वातावरण आणि अंतराळातील स्थानकातील सुक्षम गुरुत्वाकर्षणात त्यांच्या वाढीतील बदलांवर संशोधन करण्यात आले
ह्या चेम्बरमधील वातावरणातील आवश्यक तेव्हढे तापमान ,कार्बन डाय ऑक्साईड व oxygen चे प्रमाण नियंत्रित करण्यात आले तशी ह्या चेम्बरची सिस्टिम स्वयंचलित होती तरीही अंतराळवीरांनी त्यांची योग्य जोपासना करत त्यांना आवश्यक तेव्हा पाणी कार्बन डाय ऑक्साईड ,oxygen( ,ethylene ,bottles आणि filters )ह्यांचे योग्य व्यवस्थापन केले हि सर्व कामे पृथ्वीवरून नासाच्या लॅबमधून शास्त्रज्ञांच्या टीमच्या सूचनेनुसार comp .च्या साहाय्याने अंतराळवीरांनी केली
पृथ्वीवरील रोपांना वाढीसाठी आणि अन्न धान्य व फुले उगवण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची आवश्यकता असते पण अंतराळात झिरो ग्रॅव्हिटी असते ह्या वातावरणात झाडे कशी वाढतात त्यांना फळे फुले कशी येतात आणि ती तिथे कशी तग धरतात ह्यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले
ह्या अत्याधुनिक A.P.H चेंबरमध्ये LED लाईट द्वारे प्रकाश व्यवस्था केली गेली त्यासाठी बसवण्यात आलेल्या लाईट सिस्टिम द्वारे हिरवा ,लाल ,निळ्या रंगाचा व आवश्यक तीव्रतेचा रंगाचा वापर करण्यात आला ह्या रोपांना आवश्यक तेव्हढी आद्रता व तापमान नियंत्रित केल्या गेले व ह्या वातावरणातील रोपांच्या वाढीचे निरीक्षण नोंदवून संशोधन केल्या गेले
आणि अखेर नासा संस्थेतील शास्त्रज्ञ आणि अंतराळवीरांच्या ह्या अथक परिश्रमाला यश आले आणि झिनिया ,कोबी ,lettuce आणि आता अंतराळस्थानकात गहूही उगवले आहेत त्यामुळे लवकरच अंतराळस्थानकात वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांना स्वत: पिकवलेले ताजे अन्न खायला मिळेल सध्या त्यांना पृथ्वीवरील प्रिझर्व अन्न खावे लागते शिवाय ह्या यशामुळे दूरवरच्या आगामी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांनाही फायदा होईल म्हणून नासाचे शास्त्रज्ञ ह्या यशावर सध्या खुश आहेत
स्थानकात उगवलेल्या lettuce आणि कोबीची भाजीची Scott Tingle ह्यांनी केली तोडणी
नासाच्या अंतराळस्थानकातील अत्याधुनिक चेम्बरमधील गुलाबी प्रकाशात वाढणारी भाजी -फोटो- नासा संस्था
नासा संस्था -13 एप्रिल
ह्या आठवड्यात स्थानकातील अत्याधुनिक ग्रोथ चेंबरमध्ये VEG-03 ह्या Veggie प्रोजेक्ट अंतर्गत लावलेल्या दोन भाज्या प्रथमच एकदम उगवल्या अंतराळवीर Scott Tingle ह्यांनी ह्या lettuce आणि कोबीची कापणी केली आणि सर्वच अंतराळ वीरांनी जेवणात ह्या भाज्यांचा आस्वाद घेतला आणि थोडी भाजी त्यांनी पृथ्वीवर संशोधन करण्यासाठी ठेवली
आता अंतराळवीर Monocot Plant Adoption to spaceflight (APEX -06) ह्या विषयी नवीन संशोधन
करणार आहेत ह्याद्वारे अंतराळस्थानकातील व पृथ्वीवरील वनस्पतींच्या वाढीतील बदल नोंदविले जातील
अंतराळ स्थानकातील चेम्बरमध्ये समांतर लावलेली व प्रथमच एकदम वाढलेली भाजी दाखवताना अंतराळवीर
Scott Tingle-फोटो -नासा संस्था
No comments:
Post a Comment