नासाचे अंतराळवीर Scott Tingle अंतराळस्थानकात उगवलेली lettuce ची पाने चाखताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -
नासाच्या अंतराळ मोहीम 55- 56 चे अंतराळवीरScott Tingle ह्यांनी नुकतीच अंतराळ स्थानकात उगवलेली lettuce ह्या भाजीची पाने तोडली ह्या भाजीची चव त्यांनी चाखलीआणि स्थानकातील सर्वच अंतराळवीरांनीही ह्या ताज्या भाजीचा आस्वाद घेतला त्यातील काही पाने त्यांनी पृथ्वीवर आणण्यासाठी ठेवली आहेत
पृथ्वीवर उगवलेली भाजी आणी अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मधील फिरत्या प्रयोगशाळेत पृथ्वीवरील वातावरणा सारख कृत्रिम वातावरण निर्माण करून कमी आणि टाकाऊ पाण्यात उगवलेल्या ह्या भाजीत काय फरक आहे ह्यावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत
अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना पृथ्वीवरील भाज्यांवर अवलंबून राहाव लागत कारण तिथे पाणी नसत आणि गुरुत्वाकर्षणही अत्यंत कमी त्या मुळे भाज्या किंवा फळे उगवण अत्यंत कठीण असत हे अंतराळवीर पृथ्वीवरील प्रिझर्व व प्रोसेस केलेल्या भाज्यांचा समावेश त्यांचा जेवणात करतात
अशाही कठीण वातावरणात संशोधन करून स्थानकात भाज्या उगवण्यासाठी नासा संस्थेने VEG-03 हा प्रकल्प राबवला आणि त्यांना त्यात यश आले ह्या प्रकल्पा अंतर्गत आजवर अंतराळ स्थानकात राहायला गेलेल्या अंतराळवीरांनी झिनियाची फुले lettuce आणि Mizuna ची (नवीन जातीच्या कोबीची ) यशस्वी लागवड केली होती विशेषतः Scott kelly, Peggy Whitson वै. (ह्या संदर्भातील बातम्या ह्याच ब्लॉगवर प्रकाशित केल्या आहेत )
ह्या रोपांची निगा राखणे त्यांना खत व पाणी (अर्थातच टाकाऊ) देणे हे काम अंतराळवीरांनी त्यांच्या व्यस्त दीनचर्येतून आवडीने केले होते व करतात कारण ह्याचा उपयोग त्यांच्या प्रमाणेच आगामी दूरवरच्या मोहिमांसाठी अंतराळ स्थानकात राहणाऱ्या अंतराळवीरांना होईल
अंतराळ स्थानकातील चेंबरमधील कृत्रिम वातावरणात उगवलेली lettuce ची भाजी
No comments:
Post a Comment