अंतराळवीर Alexander Misurkin आणि अंतराळवीर Anton Shkaplerov स्पेसवॉकच्या तयारीत
फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 2 feb
नासाच्या मोहीम 54 चे रशियन अंतराळवीर व कमांडर Alexander Misurkin आणि Flight engineer Anton Shkaplerov ह्यांनी दोन तारखेला अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक पूर्ण केला
हे दोन अंतराळवीर सकाळी 10.34 मिनिटांनी रशियन कंपार्टमेंट मधून बाहेर पडले आणि त्यांनी स्थानकाच्या Pirs Docking ह्या रशियन भागात प्रवेश केला व संध्याकाळी 6.47 मिनिटांनी पुन्हा स्पेसवॉक संपल्यानंतर स्थानकात प्रवेश केला
हा स्पेसवॉक 8 तास 13 मिनिटांनी संपला हा आतापर्यंतचा अंतराळस्थानकाच्या कामासाठी जास्त वेळपर्यंत करण्यात आलेला स्पेसवॉक होता त्यामुळे ह्या दोन रशियन अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक मध्ये आधीच्या रशियन अंतराळवीरांपेक्षा जास्तकाळ काम करून विक्रम नोंदवला आहे
आधीच्या अंतराळ मोहीम 38 च्या रशियन अंतराळवीर Sergei Ryazanskiy आणि अंतराळवीर Oleg Kotov ह्यांनी 27 डिसेंबर 2013 साली अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी 8 तास 7 मिनिटांचा स्पेसवॉक केला होता तो विक्रम ह्या दोन अंतराळवीरांनी आता मोडला केला आहे
आठ तास तेरा मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये अंतराळवीरांनी रशियन flight controllersआणि रशियन module च्या high gain antenna च्या zvezda service module वर नवीन electronics आणि elemetry box फिक्स केला त्या मुळे संपर्क साधण्यास मदत होईल आता हि सिस्टीम व्यवस्थित काम करत आहे
अंतराळवीर Misurkin ह्याच्या अंतराळ कारर्कीर्दीतला हा चवथा स्पेसवॉक होता
आणि अंतराळवीर Shkaplerov ह्यांचा हा पाचवा आणि जास्तवेळपर्यंत चाललेला स्पेसवॉक होता
आजवर अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी केलेला हा 207 वा स्पेसवॉक होत
No comments:
Post a Comment