यवतमाळ येथील लोकल फोन आणि इंटरनेट सेवा नोव्हेंबर महिन्यापासून बंद असल्याने नागरिक त्रस्त आहेत कधी जीवन प्राधिकरणाच्या कामासाठी तर कधी रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी रस्ते खोदल्याने वायर disconnect केल्याचे कारण सांगितल्या जाते तक्रार करूनही दखल घेतल्या जात नाही जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइन बसवण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने आम्ही लोकल फोन व इंटरनेट सेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याचे टेलिफोन ऑफिसमधले अधिकारी सांगतात तसेच जीवन प्राधिकरणातील अधिकारी काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन देतात आता तीन महिने उलटूनही फोन सेवा बंदच आहे आणि विशेष म्हणजे फोन व इंटरनेट बंद असताना ग्राहकांना बिल मात्र वेळेवर पाठवण्यात आलय हीच तत्परता फोन सुरु करण्यासाठी दाखवली तर ग्राहक बिल भरू शकतील कारण इंटरनेट न वापरता आणि फोन बंद असताना ग्राहक नाहक भुर्दंड का सोसतील? तरी संबंधितांनी दखल घेऊन इंटरनेट सेवा सुरु करावी अशी नागरिकांची मागणी आहे
No comments:
Post a Comment