Friday, 19 October 2012

यवतमाळातील दुर्गोत्सव

 बालाजी चौक येथील दुर्गा देवी .


देवी समोरील  प्रवेश दारावर  लाईट च्या साह्याने बाल कृष्ण लीला व पौराणिक कथा साकारल्या आहेत           विजेच्या कमी वापरात अधिक प्रकाश देणारी हि रोषणाई सर्वांच्या आकर्षणाची  ठरली आहे                  



देवी समोरील इलेक्ट्रिक रोबोट
एकता  मंडळ दुर्गादेवी
एकता मंडळाने रामेश्वरम मंदिराची लक्षवेधक प्रतिकृती
साकारली असून मंदिर उगला पत्त्यापासून बनवण्यातआले आहे

                                                   गांधी चौक दुर्गादेवी मंडळ
                                   गांधीचौक दुर्गोत्सवाचे यंदाचे सुवर्ण मोहोत्सवी वर्ष असून इथे कलकत्याच्या मंदिराची                                            प्रतिकृती साकारली आहे तिरुपती बालाजीची भव्य प्रतिमा संगीताच्या तालावर                                            नाचणारे पाण्याचे कारंजे लोकांना आकर्षित करत आहे
                                           देवी समोरील बालाजीची मूर्ती व  Musical  Fountain



नवशक्ती दुर्गादेवी मंडळ
इथे दोनशे एक्काव्वन्न  अखंड दीप तेवत ठेवले आहेत
देवीची हि नौका विहाराची मूर्ती विलोभनीय असून इथे
गरिबांसाठी दररोज अन्नदान केले जाते
शंकर पार्वतीची विलोभनीय मूर्ती
माळीपुरा येथील  दुर्गा देवी

यावतमाळ मध्ये दररोज देवी पाहण्यासाठी लोकांचीअखंड रीघ लागली असून आजूबाजूच्या खेड्यातून लोक रोषणाई पाहण्या साठी गर्दी करत आहेत यवतमाळ संध्याकाळच्या वेळेस ठीक ठीकांणच्या लायटिंगच्या
झगमगाटात न्हाऊन निघत आहे  बरयाच ठिकाणी लोकांच्या पीण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असून त्यांना फोडणीच्या भाताचे प्रसाद म्हणून वाटप  केल्या जात आहे  
फोटो -पुजा दुद्दलवार (BE(soft)BMC

Friday, 28 September 2012

गणपतीकार भरत दाभोलकर

                                                   
                                          गणपतीकर भरत दाभोळकर  
         (   यवतमाळ एथील  दैनिक लोकदूतच्या स्वामिनी ह्या महिला  मंडळा च्या   सरचिटणीस  पदी असताना   गणपतीकार भरत  दाभोलकर ह्यांची मुक्त वार्ताहर  म्हणून मी घेतलेली  हि  मुलाखत )


                                दाभोलकर म्हटलं कि डोळ्या पुढे  उभी राहतात  ती वेगवेगळ्या आकारातली गणपतीची  सुंदर  अलंकृत चित्रे ,त्या चित्रातून जाणवणारा कलेचा सहज सुंदर वैविध्य पूर्ण अविष्कार त्यांची ग्रीटींग्स चित्रे पाहून दाभोलकारांविशयीच कुतूहल जाग होत त्यांची  वैविध्य पूर्ण चित्रशैली ,त्याचं  गणपती प्रेम ह्या विषयी जाणून घेण्याची त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची  बरयाच वर्षाची इच्छा होतीच . लोकदुतच्या स्वामिनी मूळे
मला संधी मिळाली आणि मुलाखतीला सुरवात केली
तुम्ही मुळचे कोठले ?तुम्ही लहानपणापासूनच चित्रे काढायचात का ?
ह्या प्रश्नावर दाभोलकर  उत्तरतात हो: मला लहान पणा पासून चित्रे काढायची आवड होती .पण तेव्हा अगदी चित्रकारच व्हायचं हे मात्र ठरलेल नव्हत मी  मुळचा वेंगुर्ल्याचा ,कोकणातला .कोकण म्हणजे निसर्ग  सौन्दर्याची खाणच .त्या मुळे तिथली सगळीच लहान मुले चित्रे रेखाटतात तसा मीही चित्रे  काढायचो वेंगुर्ल्याला एस एस सी पर्यन्तच शिक्षणाची सोय असल्याने  पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला  आलो मग चित्रकलेतच  शिक्षण करायचं ठरवलं.
कोठल्या कॉलेजात शिकलात आणि काय काय शिकलात ?
दाभोळकर उत्तरतात ,मी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकलो त्यांनी जी डी आर्ट्स ,फाइन आर्ट्स ,कमर्शीअल आर्ट्स मास्टर आर्ट्स वैगरे डिग्र्या मिळवल्या सकाळी अंधेरीला परांजपे शाळेत शिक्षक म्हणून नोकरी तर दुपारी विध्यार्थी बनून शिक्षण घ्यायचं अस सुरु  होत थोडक्यात शिकता शिकता अर्थार्जन केल.  शिक्षणात ते हुशार असल्याने नेहमी प्रथम यायचे ते साऱ्या  कोर्स मध्ये कोकण महाराष्ट्र तून प्रथम आलेत त्यांच्या दाभोलकरी शैली विषयी ते सांगतात शिक्षण आणि अभ्यासातून वेळ फारच कमी उरायचा म्हणून थोड्या वेळात  पटापट अन चांगल चित्र काढायचा मी  प्रयत्न  करायचो मग पुढे पुढे त्यात सातत्य येत गेल   अन तीच माझी शैली बनली
मग गणपतीची चित्रे कधी पासून काढायला लागलात ?
अर्थार्जनासाठी चित्रे काढावीत असे मनाशी ठरवले मग शुभारंभ करायचा तर एखाद्या चांगल्या आकाराने करूयात अस ठरवून गणेशाच चित्र काढायला घेतल तेव्हा एक प्रकारची उर्मी मनात दाटून आली आणि त्या तंद्रीत एकामागून एक अशी च्यक्क सत्तर.ऐशी चित्रे आपोओप काढल्या गेली इतकी स्फूर्ती आली विशेष म्हणजे लोकांना ती चित्रे खूपच आवडली
  प्रदर्शन केव्हापासून भरवायला लागलात ?
दाभोळकर सांगतात ,खरेतर मी ग्लासी पेपर ,विलायती पेपर वर वाटर प्रुफ इंक वापरून सहज म्हणून चित्रे काढत होतो हि चित्रे जेव्हा लता मंगेशकर ,बाबासाहेब पुरंदरे ,नानासाहेब गोरे ,पू.ल देशपांडे ह्या सारख्या प्रभूतींनी पाहिली तेव्हा त्यांनी मला म्हटल कि तुम्ही ह्या चित्रांचे प्रदर्शन का भरवत नाही? तेव्हा केवळ ह्या सर्वांच्या  प्रोत्साहना मुळे पुण्यामध्ये एकोणीसशे ब्ब्याऐशी सालीतो  "गणराज रंगी नाचतो" ह्या नावाने   प्रदर्शनाचा श्री गणेशा झाला पुढे मग छोट्या छोट्या गावातून प्रदर्शने भरवू लागलो  लोकांच प्रोत्साहन  मिळू लागल ,उत्स्फूर्त प्रतीसाद मिळू लागला मग तिथेच  प्रात्यक्षिक दाखवू लागलो लोक चित्रे मागत अगदि हजारो रुपये देवून चित्रे घेण्यासाठी रांगा  लावत
ग्रीटिंग च्या व्यवसायाकडे कधी वळलात
लोकांची चित्रांची मागणी वाढतच होती इतकी चित्र काढण अशक्य व्हायचं मग त्या चित्राची छपाई सुरु  केली त्यातूनच मग पुढे छोटे छोटे कार्ड्स बनवण सुरु केल
यश मिळाल्यावर कस वाटल ?टीका झाली का? अजून काय करायची इच्छा आहे ?
दाभोळकर सांगतात , सुरवातीला  लोक चांगल म्हणायचे तेव्हा आनंद व्हायचा पण मनात मात्र खिन्नता वाटायची वाटायचं हे तर खूप साध आहे ,आपल्याला अजून खूप चांगल काहीतरी करायचय आतापर्यन्त  साऱ्या  वर्तमान पत्रांनी माझी दखल घेतलीय ,पुरवणीत भ्रमंतीवर लेख आलेत मी खूप भ्रमंती करतो  खास पुरवण्यातून माझ्यावर लेख आलेत बक्षिसे पण खूप मिळवलीत  एकदा अकोल्याला एका टेंटमध्ये माझ प्रदर्शन भरवलं होत तेव्हा अचानक खुप पाऊस आला आणि माझी चित्रे  भिजली तेव्हा लोक हळहळले पण उन पडल्यावर ती चित्रे वाळवून मी पुन्हा चांगली केली .मी टेम्पल्स, पक्षी ,भारतीय संस्कृतीवरची  चित्र काढलीत
कुसुमाग्रजांनी "कवितेशी नात सांगणारा कलावंत" म्हणून माझ्यावर लेख लिहलाय
आयुष्याच्या संध्याकाळी मात्र मी फक्त कलेसाठी चित्रे काढीन ती विकणार नाही .आता मी कलेचा उपजीविके साठी उपयोग करतोय नाहीतर मी कलंदर झालो असतो शेवटी जगण्यासाठी अर्थार्जन आवश्यक असतच ना:  आणि आजकालच्या जगात हे आवश्यक आहे नाहीतर लोक फायदा उठवतात
लोकांची टीका झाली आणि त्रास सारयांनाच होतो मोठे लोकही त्यातून सुटत नाहीत ,म्हणून मी चांगल लक्षात ठेवलं वाईट सोडून दिल माणसांन  जेव्हढा  विरोध होईल त्याच्या दुप्पट वेगन पुढे जाव हे तत्व मी ध्यानात ठेवलं .लोकांनीच मला प्रेरित केल ,प्रसीद्ध केल.
तुमच्या जीवनातला एखाधा अविस्मरणीय प्रसंग सांगा
दाभोलकर सांगतात , एकदा ठाण्यात प्रदर्शन  भरवलं होत तेव्हा तिथे बरेच मान्यवर लोक उपस्थित होते खेडूत,मर्मज्ञ ,रसिक आजू बाजूला बसलेले होते .मी प्रात्यक्षिक दाखवत होतो .एक माणूस मात्र माझ चित्र पाहून सारखा अस्वस्थ होत होता शेवटी ते गृहस्थ इतके भावविवश झाले   कि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले .मी त्या गृहस्थांना ओळखत नव्हतो पण आजू बाजूच्या लोकांनी मला सांगितलं कि ते प्रसिध्द गीतकार पी. सावळाराम आहेत तेव्हा मी पटकन उठून त्यांच्या पाया पडलो ,तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पडलेले दोन अश्रू माझ्या चित्रावर पडले .मला तो प्रसंग विसरणे अशक्य आहे.
 साध्या,  मनमिळाऊ  ,निगर्वी दाभोलकराचं  प्रदर्शन पाहून ,बाळासाहेब ठाकरे देखील प्रभावित झाले होते .

(टीप : ह्या   ब्लॉग वरच्या लेखाची  कॉपी केल्यास कारवाई केल्या जाईल.)

Wednesday, 26 September 2012

यवतमळातील गणपती

                                                                  यवतमाळचा  राजा
                                         मारवाडी चौकातील गणपती मंडळाने यंदा सुपाच्या साह्याने साकारलेल्या                                                         सजावटीची हि काही दृष्ये

प्रवेश द्वार

रांगोळी 

उंदीर

गणपती जवळील चांदीचा उंदीर
गणपती जवळील चांदीच्या उंदीराच्या
कानात आपल्या मनातील इच्छा सांगितल्यास ती गणपती पूर्ण करतो अशी  भाविकांची श्रद्धा आहे

यवतमाळ चा राजा


छातावरील सजावट

भिंतीवरील सजावट

फोटो -पुजा दुद्दलवार BE(Soft)BMC
          

Thursday, 6 September 2012

यवतमाळात पुन्हा साचताहेत कचऱ्याचे ढीग

                                            यवतमाळ पूर्वी अस्वच्छ  व असुंदर होत .नंतर निवडून आलेल्या काही
कर्तबगार नगरसेवक व नगराध्यक्षा मुळे यवतमाळात घंटागाडीचा प्रकल्प राबविला गेला .दररोज घंटा गाडी द्वारे कचरा गोळा केल्या जावू लागला हि मोहीम आजतागायत सुरु आहे परंतु आता पुन्हा रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत .शास्त्रीनगर दाते कॉलेजच्या  मागच्या बाजूला रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडून आहेत
तक्रार करूनही ते उचलल्या गेलेले नाहीत पावसाने ते सडत आहेत सध्या यवतमाळात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्या मुळे मलेरिया,डेंग्यू आणि कचरा  या सारखे रोग होत असून येथील शासकीय रुग्णालयात असे अनेक रोगी भरती आहेत
मध्यंतरी मलेरिया,हत्तीरोग होऊ नये म्हणून गोळ्या वाटण्यात आल्या पण हे रोग होऊ नये म्हणून आधीच असा साचलेला कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावावी  पूर्वी सुरु असलेली फागिंग मशीन पुन्हा परत  आणून डास निर्मुलन औषधाची नियमित फवारणी करावी व लोकांनी तोडलेल्या मोठ्या झाडांचा कचरा उचलण्यासाठी ट्रक पाठवण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे आणि कचरा रस्त्यावर टाकणारया  कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी

Friday, 31 August 2012

सोन्याचे भाव तेजीत

सोन्याचे  भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत सोन्याने सध्या एकतीस हजारावर  उसळी मारलीय त्या मुळे ग्राहकांचा कल मात्र नवीन सोने घेण्यापेक्षा  जुने  दागिने मोडून नवीन दागिने करण्याकडे दिसून येतोय चांदी
पण सोन्या मागोमाग वाढतच आहे  एकीकडे दिवसेंदिवस सोन्याचांदीच्या चोरीच्या   घटना   वाढत असताना सोन्याचे दर काही कमी होताना दिसत नाहीत व चोर काही पकडल्या जात नाहीत
  बायका मात्र कधी चोर पकडल्या जातील व त्यांची रवानगी तुरुंगात होईल  .सोन्याचे भाव देखील कमी होतील व कधी त्यांना   मंगळसूत्र आणि इतर दागिने घालून बिनधास्त  फिरायला मिळेल
ह्याची वाट पाहताहेत
भाव वाढलेलेच पण मोडीचा भाव मात्र कमी मिळतोय कारण सोन्यामध्ये घडणावळ ,झीज व इतर बाबी
मुळे सोन्याला कमी भाव तर मिळतोच शिवाय मोडीचा भाव देखील कमी लावल्या जातो
चांदी देखील तीन चारशेने कमी भावात व तीस ते   पन्नास टक्के घट धरून वीकत घेतली जाते  
   .  काही  सराफांकडे  तर मोडीचे पैसे न देता त्याच दुकानात मोडीच्या बदल्यात वस्तू घ्यावी लागते
त्या मुळे ग्राहकांना मोड दिली तरी वाढलेल्या भावाचा फायदा होताना दिसत नाही

Thursday, 9 August 2012

दुधातली भेसळ



                                                   सध्या यवतमाळ  भ्रष्टाचारामुळे गाजतंय .मुके बहिरे शिक्षक घोटाळा पाणीपुरवठा घोटाळा , दुधातली भेसळ ,बनावट खवा प्रकरण .नुकतेच काही दुग्ध व्यवसायीकांवर छापा टाकून दुध व  दुग्धजन्य पदार्थ ग्राहक संघटने द्वारे तपासणीसाठी पाठवण्यात आले .अजून रीपोर्ट यायचा आहे तरी  देखील काही  डेअरीतून दुध पातळ मिळत आहे .विशेष म्हणजे म्हशीचे म्हणून गाईचे दुध विकल्या जात आहे.म्हशीचे दुध दाट व पांढरे असते तर गाईचे दुध पातळ व पिवळे असते .गाईचे दुध स्वस्त तर म्हशीचे दुध महाग असते पण ग्राहकांना म्हशीच्या  दुधाच्या किमतीत गाईचे दुध विकल्या जात असून त्यांची फसवणूक होत आहे ह्या बाबतीत विचारले असता दुध तीन ठिकाणी चेक होऊन येते अशी माहिती मिळाली .ग्राहक संघटना ह्या कडे लक्ष  देईल का ?




Tuesday, 12 June 2012

मेळाव्याची दुसरी बाजू

                          सध्या प्रत्येक जातीत मेळावे भरू लागलेत आर्य वैश्य समाजाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास उपवर व उपवधू यांना आयुष्याचा जोडीदार योग्य रीतीने निवडता यावा म्हणून मेळाव्याची सुरवात झाली सुरवातीला त्याचा उद्देश चांगलाच होता मेळाव्यात तेव्हा ज्यांची लग्ने जमत नसत व जे आर्थिक दृष्ट्या गरीब असत अशीच मुलेमुली येत आप्पासाहेब आसेगावकर ह्यांनी पहिला मेळावा भरवला तेव्हा माझे वडील आमंत्रित होते तेव्हा मेळाव्याच स्वरूप चांगलच होत मेळाव्यातच तेव्हा गरीब मुलामुलीचे लग्न लावून दिल्या जात होत पण हळू हळू मेळाव्याची ख्याती पसरली त्यात थोडीफार चांगली मुले,मुली यायला लागली तेव्हा ह्या समाजकारणा कडे राजकारण्याचे लक्ष गेले आणि मेळाव्याचे अर्थकारण पण वाढले समाजकारण,अर्थकारण आणी राजकारण ह्या तिनी गोष्टी साध्य होतायत म्हटल्यावर मेळाव्याची गर्दी वाढू लागली आणि आता तर मेळावा इतका हायटेक झालाय कि लोक मेळाव्याकडे आपसूकच आकर्षित होऊ लागलेत
                             मग काय विचारता मेळावा समिती स्थापन झाली मग वर्गणी गोळा करण ओघान आलच त्यासाठी जास्त पैसे देणारे मोठे झाले त्यांना अध्यक्ष पद मिळू लागले जे जास्तीत जास्त वर्गणी देतील ते व्यासपिठावर दिसू लागले,पुस्तकात त्यांची नावे झळकू लागली उपवर,उपवधू यांची नावे द्या ,वर्गणी द्या म्हणून आग्रह होऊ लागला ज्यांची मुले मुली लग्नाची होती त्यांचे ठीक होते पण ज्यांचे कोणीही लग्नाचे नव्हते त्यांच्यावर भुर्दंड पडू लागला लोक ओरडतात हे लक्षात आल्यावर समाजातल्याच काहीना हाताशी धरून प्रत्येकाने मेळाव्यात यायलाच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण केली जाऊ लागली जे येत नाहीत व ज्यांना आपल्या मुलांची नावे द्यायची नाहीत त्यांची नावे त्यांना माहित नसताना घेण्यात आली त्या बद्दल विचारल्यास त्यांची लग्ने जमू न देणे व लग्न जमवायचे असेल तर ते मेळाव्यातच जमवावे लागेल अशी परिस्थिती निर्माण करण्यात येतेय ह्यामुळे मेळाव्याचा मूळ उद्देश तर दूर जातोच शिवाय त्या मुला,मुलींचे लग्नही लांबते ह्याची जाणीव ठेवायला हवी शिवाय मेळाव्यात जमा झालेल्या पैश्यांचा हिशोब विचारल्यास त्याचे उत्तर तर दिल्या जात नाहीच उलट ज्यांनी हिशोब  विचारला त्यांना सामुदायिक एकी करून एकटे पाडले जाते त्यांच्या मुलांची लग्ने अडकवली जातात कारण त्यांच्या पर्यंत कोणाला पोहचूच दिल्या जात नाही आता तर अशी परिस्थिती निर्माण झालीय कि मेळाव्यात याल तरच लग्न जमेल नाही तर नाही त्या मुळे नाइलाजास्तव समाज बांधव आपल्या मुलांना घेऊन मेळाव्यात जातात पण तिथे लग्न जमेलच असे नाही मेळाव्यात मेळावा पाहण्यासाठी व वेगवेगळी गावे पाहायला मिळतात म्हणूनही लोकांची खूप गर्दी जमते मग चहा,जेवण,नास्ता,मेकअप व ह्या अनुषंगाने येणाऱ्या इतर गोष्टीच बाजारीकरण होत,भरपूर कमाई होते शिवाय तरुणाई स्टेजवरच्या ramp walk ला भुलते पण आजच मेळाव्याच स्वरूप पाहता त्याला आधुनिक भाजीमंडईच स्वरूप आल अस म्हटल्यास वावग ठरू नये कारण मुलगी कितीही उच्च शिक्षित असली नोकरी करणारी असली तरीही तिला एकतर मेळाव्यात आणा नाहीतर मुलाच्या गावी आणुन दाखवा असा आग्रह करण्यात येतो
                            नोकरदार मुल मुली रजा घेवून मेळाव्याला हजेरी लावतात एकाच वेळेस खूप मुले,मुली एकत्र पाहायला मिळतात हि जमेची बाजू असली तरी त्याची दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी मुल,मुली लवकर निर्णय घेत नाहीत मुल जी चांगली असतात त्यांच्या मागे रांग लागते ती चढून बसतात दर वर्षी एक मेळावा झाला कि दुसरा असे पाच,सहा मेळावे तरी भरतातच मग पुढच्यावेळेस बघू अस करत करत आणि मेळाव्यांना हजेरी लावता लावता वर्षानुवर्षे निघून जातात आणि वयही मग कोणाशीही कित्येकदा तर आपल्याच गावातील मुला मुलीशी लग्न करावे लागते मग मेळाव्याने साधते काय ? हा प्रश्न पडतो मेळावे मेळावे फिरून ज्यांची लग्ने जमली नाहीत त्यांच काय! ह्याला जबाबदार कोण? मेळाव्यात जाउन आज अनेकांची लग्ने अड्कलीत.त्यांना नको त्या मनस्तापाला तोंड द्यावे लागतेय शिवाय चांगल्या मुलींना केवळ मेळाव्या मुळे वय वाढल्याने नकार दिला जातो म्हणजे सुंदर हुशार मुलींचे सहजा सहजी जुळणारे लग्न मेळाव्याने लांबते,अडते आणि ते होईल कि नाही इथपर्यंत अनिश्चिती येते त्यांना नैराश्य येत मग साहजिकच प्रश्न पडतो मेळावा हवाच कशासाठी ? शिवाय मेळाव्यामुळे मुलाचंही वय वाढतच पण हि मुल आपल्याच वयाच्या मुलीशी लग्न करायला तयार नसतात आपल्या पेक्षा दहा वर्षांनी लहान असलेली मुलगी त्यांना चालते मग ती दिसायला चांगली नसली तरी चालते चांगल्या मुली वय वाढल्याने अविवाहित राहतात त्यात त्यांचा दोष नसतोच कितीतरी सुंदर मुलामुलींची वय ४०-४५ पर्यंत वाढलीत  त्यांची नोंद matrimonial site वर केलेली असूनही त्याचं लग्न लांबल ते लांबलच
                 विशेष म्हणजे ज्यांना मेळाव्याची गरज नसते,ज्यांची नावे त्यांना न माहित होता घेतल्या गेलेली असतात त्यांचे काय?उगाचच त्यांची काहीही चूक नसताना बदनामी सहन करावी लागते त्याचं मौल्यवान आयुष्य वाया जात.मेळाव्यात मध्यस्थ सक्रीय होतात सारेच लग्न जमवण्यात रस घेतातच असे नाही काही जण जमणारे लग्न कसे मोडेल हे पाहतात त्यात काही नातेवाइक तर काही हितचिंतक म्हणवून घेणारे हितशत्रूही असतात   दरवर्षी अशी कितीतरी लग्ने मोडतात दर वर्षी मेळावे मेळावे फिरण्यापेक्षा जिथे चांगले मुले मुली आहेत तिथे जाउन पाहिल्यास वयही वाढणार नाही व वेळ आणि पैसाही वाचेल शिवाय योग्य वयात योग्य जोडीदार मिळेल.
               मेळावा भरवायचा आहे न जरूर भरवा पण जबरदस्तीने वर्गणी मागू नका खरे समाजकारणी आणा ज्यांना खरेच गरज आहे त्यांना आणा ज्यांना गरज नाही त्यांना येण्यास भाग पडू नका अन्यथा मेळावे बंद पडण्यास वेळ लागणार नाही.शिवाय जातीतून मेळाव्यातच यायला पाहिजे अशी सक्ती झाल्यास त्या विरुद्ध न घाबरता आवाज उठवणे केव्हाही योग्यच
मेळाव्यात नेऊन वय वाढवलेल्यांचा मग पुन्हा वेगळा मेळावा भरवून स्वत:चा फायदा उठवल्या जातोय लग्न जमत नाहीतच म्हणून मेळावा मुलांची लग्न जमवण्यासाठी भरवले जातात ना? आणि मूळ उद्देश लग्न जमवणे आहे ना? मग त्या साठी मेळाव्यातच यायचा आग्रह का ? हेच काम मेळाव्याच्या बाहेरही होऊ शकते त्या साठी इच्छाशक्ती आणि खरे समाजकारणी हवेत मेळाव्यांमुळे आज मुलामुलींची तिशी पस्तिशी उलटलीय हे कटू सत्य आहे