Friday 28 September 2012

गणपतीकार भरत दाभोलकर

                                                   
                                          गणपतीकर भरत दाभोळकर  
         (   यवतमाळ एथील  दैनिक लोकदूतच्या स्वामिनी ह्या महिला  मंडळा च्या   सरचिटणीस  पदी असताना   गणपतीकार भरत  दाभोलकर ह्यांची मुक्त वार्ताहर  म्हणून मी घेतलेली  हि  मुलाखत )


                                दाभोलकर म्हटलं कि डोळ्या पुढे  उभी राहतात  ती वेगवेगळ्या आकारातली गणपतीची  सुंदर  अलंकृत चित्रे ,त्या चित्रातून जाणवणारा कलेचा सहज सुंदर वैविध्य पूर्ण अविष्कार त्यांची ग्रीटींग्स चित्रे पाहून दाभोलकारांविशयीच कुतूहल जाग होत त्यांची  वैविध्य पूर्ण चित्रशैली ,त्याचं  गणपती प्रेम ह्या विषयी जाणून घेण्याची त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची  बरयाच वर्षाची इच्छा होतीच . लोकदुतच्या स्वामिनी मूळे
मला संधी मिळाली आणि मुलाखतीला सुरवात केली
तुम्ही मुळचे कोठले ?तुम्ही लहानपणापासूनच चित्रे काढायचात का ?
ह्या प्रश्नावर दाभोलकर  उत्तरतात हो: मला लहान पणा पासून चित्रे काढायची आवड होती .पण तेव्हा अगदी चित्रकारच व्हायचं हे मात्र ठरलेल नव्हत मी  मुळचा वेंगुर्ल्याचा ,कोकणातला .कोकण म्हणजे निसर्ग  सौन्दर्याची खाणच .त्या मुळे तिथली सगळीच लहान मुले चित्रे रेखाटतात तसा मीही चित्रे  काढायचो वेंगुर्ल्याला एस एस सी पर्यन्तच शिक्षणाची सोय असल्याने  पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला  आलो मग चित्रकलेतच  शिक्षण करायचं ठरवलं.
कोठल्या कॉलेजात शिकलात आणि काय काय शिकलात ?
दाभोळकर उत्तरतात ,मी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकलो त्यांनी जी डी आर्ट्स ,फाइन आर्ट्स ,कमर्शीअल आर्ट्स मास्टर आर्ट्स वैगरे डिग्र्या मिळवल्या सकाळी अंधेरीला परांजपे शाळेत शिक्षक म्हणून नोकरी तर दुपारी विध्यार्थी बनून शिक्षण घ्यायचं अस सुरु  होत थोडक्यात शिकता शिकता अर्थार्जन केल.  शिक्षणात ते हुशार असल्याने नेहमी प्रथम यायचे ते साऱ्या  कोर्स मध्ये कोकण महाराष्ट्र तून प्रथम आलेत त्यांच्या दाभोलकरी शैली विषयी ते सांगतात शिक्षण आणि अभ्यासातून वेळ फारच कमी उरायचा म्हणून थोड्या वेळात  पटापट अन चांगल चित्र काढायचा मी  प्रयत्न  करायचो मग पुढे पुढे त्यात सातत्य येत गेल   अन तीच माझी शैली बनली
मग गणपतीची चित्रे कधी पासून काढायला लागलात ?
अर्थार्जनासाठी चित्रे काढावीत असे मनाशी ठरवले मग शुभारंभ करायचा तर एखाद्या चांगल्या आकाराने करूयात अस ठरवून गणेशाच चित्र काढायला घेतल तेव्हा एक प्रकारची उर्मी मनात दाटून आली आणि त्या तंद्रीत एकामागून एक अशी च्यक्क सत्तर.ऐशी चित्रे आपोओप काढल्या गेली इतकी स्फूर्ती आली विशेष म्हणजे लोकांना ती चित्रे खूपच आवडली
  प्रदर्शन केव्हापासून भरवायला लागलात ?
दाभोळकर सांगतात ,खरेतर मी ग्लासी पेपर ,विलायती पेपर वर वाटर प्रुफ इंक वापरून सहज म्हणून चित्रे काढत होतो हि चित्रे जेव्हा लता मंगेशकर ,बाबासाहेब पुरंदरे ,नानासाहेब गोरे ,पू.ल देशपांडे ह्या सारख्या प्रभूतींनी पाहिली तेव्हा त्यांनी मला म्हटल कि तुम्ही ह्या चित्रांचे प्रदर्शन का भरवत नाही? तेव्हा केवळ ह्या सर्वांच्या  प्रोत्साहना मुळे पुण्यामध्ये एकोणीसशे ब्ब्याऐशी सालीतो  "गणराज रंगी नाचतो" ह्या नावाने   प्रदर्शनाचा श्री गणेशा झाला पुढे मग छोट्या छोट्या गावातून प्रदर्शने भरवू लागलो  लोकांच प्रोत्साहन  मिळू लागल ,उत्स्फूर्त प्रतीसाद मिळू लागला मग तिथेच  प्रात्यक्षिक दाखवू लागलो लोक चित्रे मागत अगदि हजारो रुपये देवून चित्रे घेण्यासाठी रांगा  लावत
ग्रीटिंग च्या व्यवसायाकडे कधी वळलात
लोकांची चित्रांची मागणी वाढतच होती इतकी चित्र काढण अशक्य व्हायचं मग त्या चित्राची छपाई सुरु  केली त्यातूनच मग पुढे छोटे छोटे कार्ड्स बनवण सुरु केल
यश मिळाल्यावर कस वाटल ?टीका झाली का? अजून काय करायची इच्छा आहे ?
दाभोळकर सांगतात , सुरवातीला  लोक चांगल म्हणायचे तेव्हा आनंद व्हायचा पण मनात मात्र खिन्नता वाटायची वाटायचं हे तर खूप साध आहे ,आपल्याला अजून खूप चांगल काहीतरी करायचय आतापर्यन्त  साऱ्या  वर्तमान पत्रांनी माझी दखल घेतलीय ,पुरवणीत भ्रमंतीवर लेख आलेत मी खूप भ्रमंती करतो  खास पुरवण्यातून माझ्यावर लेख आलेत बक्षिसे पण खूप मिळवलीत  एकदा अकोल्याला एका टेंटमध्ये माझ प्रदर्शन भरवलं होत तेव्हा अचानक खुप पाऊस आला आणि माझी चित्रे  भिजली तेव्हा लोक हळहळले पण उन पडल्यावर ती चित्रे वाळवून मी पुन्हा चांगली केली .मी टेम्पल्स, पक्षी ,भारतीय संस्कृतीवरची  चित्र काढलीत
कुसुमाग्रजांनी "कवितेशी नात सांगणारा कलावंत" म्हणून माझ्यावर लेख लिहलाय
आयुष्याच्या संध्याकाळी मात्र मी फक्त कलेसाठी चित्रे काढीन ती विकणार नाही .आता मी कलेचा उपजीविके साठी उपयोग करतोय नाहीतर मी कलंदर झालो असतो शेवटी जगण्यासाठी अर्थार्जन आवश्यक असतच ना:  आणि आजकालच्या जगात हे आवश्यक आहे नाहीतर लोक फायदा उठवतात
लोकांची टीका झाली आणि त्रास सारयांनाच होतो मोठे लोकही त्यातून सुटत नाहीत ,म्हणून मी चांगल लक्षात ठेवलं वाईट सोडून दिल माणसांन  जेव्हढा  विरोध होईल त्याच्या दुप्पट वेगन पुढे जाव हे तत्व मी ध्यानात ठेवलं .लोकांनीच मला प्रेरित केल ,प्रसीद्ध केल.
तुमच्या जीवनातला एखाधा अविस्मरणीय प्रसंग सांगा
दाभोलकर सांगतात , एकदा ठाण्यात प्रदर्शन  भरवलं होत तेव्हा तिथे बरेच मान्यवर लोक उपस्थित होते खेडूत,मर्मज्ञ ,रसिक आजू बाजूला बसलेले होते .मी प्रात्यक्षिक दाखवत होतो .एक माणूस मात्र माझ चित्र पाहून सारखा अस्वस्थ होत होता शेवटी ते गृहस्थ इतके भावविवश झाले   कि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले .मी त्या गृहस्थांना ओळखत नव्हतो पण आजू बाजूच्या लोकांनी मला सांगितलं कि ते प्रसिध्द गीतकार पी. सावळाराम आहेत तेव्हा मी पटकन उठून त्यांच्या पाया पडलो ,तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पडलेले दोन अश्रू माझ्या चित्रावर पडले .मला तो प्रसंग विसरणे अशक्य आहे.
 साध्या,  मनमिळाऊ  ,निगर्वी दाभोलकराचं  प्रदर्शन पाहून ,बाळासाहेब ठाकरे देखील प्रभावित झाले होते .

(टीप : ह्या   ब्लॉग वरच्या लेखाची  कॉपी केल्यास कारवाई केल्या जाईल.)

No comments:

Post a Comment