Tuesday, 17 May 2016

ग्रीनलंडच्या पश्चिम किनारयावरील आईसब्रीज

            ग्रीनलंडच्या पश्चिम किनारयावरील बर्फ व हिमनदी -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 12 मे 
ग्रीनलंडच्या पश्चिम किनारयावर जमलेल्या बर्फाचे व बर्फामुळे तयार झालेल्या हिमनदीचा हा फोटो नासाच्या वैमानिकांनी NOAA-3 ह्या विमानातून टिपला आहे ऑपरेशन आइस ब्रिज हि नासाची मोहीम असून हे ह्या मोहिमेचे आठवे वर्ष आहे मागच्या सात वर्षात ह्या मोहिमे अंतर्गत नासाच्या शास्त्रज्ञांनी उत्तर धृवावरील बर्फीय थराची उपयुक्त माहिती जमा केली असून ह्या मोहिमे दरम्यान बर्फाच्या वाढणारया वा कमी होणारया उंचीच्या बदलाच्या निरीक्षण करताना शास्त्रज्ञांना 460 मैल लांब खोल दरी सापडली आहे ग्रीनलंडच्या दक्षिणेकडे देखील बर्फाखाली पाण्याचा प्रचंड साठा सापडला आहे
आइस ब्रिज मोहिमे अंतर्गत केलेल्या पाहणीमुळे शास्त्रज्ञांना उन्हाळ्यात बर्फ वितळण्याच्या वेळेचा अचूक अंदाज समजण्यास मदत  तर झालीच शिवाय बर्फाच्या रुंदीमध्ये होणारया बदलाचीही माहिती मिळाली आहे

सूर्याचे बुध ग्रहण

               बुध ग्रहण - फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 मे
मंगळवारी नऊ मेला सूर्याला बुधाचे ग्रहण लागले होते  अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतीयांना सूर्यावर टिंबाच्या रूपातील बुध ग्रहणाचे दुर्मिळ दृश्य पहायला मिळाले  तसेच अमेरिकेतूनही हे बुध ग्रहण दिसले
नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी पेनिसिल्विनिया  व बोयेरटावऊन ( Boyertown ) येथुन दुर्बिणीच्या सहाय्याने छायाचित्रीत केलेले हे दृश्य 
 शंभर वर्षात फक्त तेरावेळा बुधग्रहण होते  सूर्य व पृथ्वी ह्यांच्या मधून बुध ग्रह जेव्हा मार्गक्रमण करतो तेव्हा तो सूर्याच्या पृष्ठभागावर छोट्या काळ्या टिंबाच्या रुपात दिसतो त्यालाच बुध ग्रहण म्हणतात  ह्या आधी 2006 साली  सूर्याला बुध ग्रहण लागले होते बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असून त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास 88 दिवस लागतात 
भारतात दुपारी चार साडेचारला बुध ग्रहण सुरु झाले व रात्री उशिरा संपले हे ग्रहण सूर्य मावळण्याच्या वेळेस लागल्याने भारतीयांना फक्त सहा साडेसहाच्या दरम्यान पाहता आले भारतातील इतर भागांप्रमाणेच ते विदर्भातही दिसले यवतमाळ येथूनही ते  साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान सूर्यावर छोटया बिंबाच्या रुपात दिसले अर्थात हे ग्रहण काळ्या फिल्म व दुर्बिणीच्या तसेच आरशा वरून परावर्तीत करून पाहिले गेले 

Tuesday, 3 May 2016

मंगळाच्या नाऊक्लुफ्ट पाठारावरील आटलेले पाण्याचे स्त्रोत व खडकाळ भाग

         मंगळाच्या नाऊक्लुफ्ट  पाठारावरील आटलेले पाण्याचे स्त्रोत व खडकाळ भागाचा हा फोटो नासाच्या
         Curiosity ह्या मंगळ यानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञांनी छायांकित केला आहे
               मंगळावरील Naukluft पाठारावरील नदीचा प्रवाह व खडक -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-
ह्या फोटोत दिसणारा हा उंच सखल भाग " नाउक्लुफ्ट पाठार" ह्या नावाने ओळखला जातो एप्रिल मध्ये नासाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात ह्या फोटोतील सखल भागात खोलवर पूर्वी वाहत्या व आता आटलेल्या नदीचा सबळ पुरावा सापडला आहे ह्या नदीच्या वाहत्या पाण्यासोबत (आधीच्या बातमीत लिहल्या प्रमाणे) वाहात आलेला कचरा दगड ,माती ,वाळू  व इतर गाळ वर्षानुवर्षे तिथेच साचून त्या पासून तयार झालेले  सेडीमेंटरी खडक ,वाळूचे खडक व काही मिनरल्स आढळले आहेत त्यात सापडलेल्या चिखलाच्या अंशामुळे तिथे पूर्वी पाणी वहात होत ह्या गोष्टीला पृष्ठी मिळाली आहे शिवाय तिथल्या वाळूचे खडक वारयामुळे  धूप होऊन उडून आलेल्या वाळूमुळे व नंतर नदीतील वाहत आलेल्या गाळाच्या थरांमुळे तयार झाल्याच्या खुणा आढळल्या आहेत नंतर पाणी आटल्यामुळे किंवा नष्ट झाल्यामुळे ह्या दगडांचे थर कठीण व जाड झाले असावेत  ह्या फोटोमुळे शास्त्रज्ञांना मंगळावरील मातीत असलेल्या मिनरल्स व इतर घटकांच्या अस्तित्वाचे  अधिक संशोधन करता येईल नासा संस्थेतर्फे येत्या काही वर्षात मंगळावर मानव पाठवण्याची तयारी सुरु असून मंगळावरील मानवी वास्तव्यासाठी आवश्यक वातावरण व आवश्यक घटकाचे संशोधनही  सुरु आहे

Sunday, 1 May 2016

यवतमाळ येथे उन्हाचा तडाखा पाणी टंचाईने नागरिक हैराण

यवतमाळ -३० एप्रिल २०१६
ह्या वर्षी एप्रिल मध्येच उन्हाची तीव्रता जाणवत असून अजून मे महिना बाकी आहे एप्रिल मध्येच  उष्णतेचा पारा  यवतमाळ येथे चाळीसच्या वर गेला होता काल यवतमाळ येथे पारा ४३ अंश सेल्सिअस येव्हढा नोंदल्या गेला  उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य झाले असून सकाळी नऊ नंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे त्यातच पाणी टंचाई मुळे घरातील कुलरही बंद आहेत  शिवाय झाडेही पाण्याविना वाळू लागल्या मुळे उन्हाची दाहकता नागरिकांना असह्य झाली आहे विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपूर येथे ४५. ३ तर चंद्रपूर येथे ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले

                               पाणी पुरवठा तीन दिवसांनी आणि अशुद्ध 
     
आधीच असह्य उन्हाळा त्यात सततच्या दुष्काळामुळे यवतमाळ येथील नदी ,विहरी आटल्या आहेत त्यात आता एक महिना पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती प्रसारित झालीय त्या मुळे लोकांना आता दर तीन दिवसानंतर पाणी पुरवठा केल्या जातोय कधी कधी तर टाकी साफ करण्याच कारण तर कधी आणखी काही कारण सांगून अचानक पाणी येणार नाही असे सांगण्यात येते तेव्हा नागरिकांच्या त्रासात भर पडते  विशेष म्हणजे हा पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो त्या मुळे तीन दिवस पुरेल इतका पाणी साठा करण्यातच गृहिणींचा वेळ जातो शिवाय हे पाणी अत्यंत गढूळ असते गेल्या काही दिवसात तर पाण्याला इतका ब्लिचिंग पावडरचा वास येतोय कि ते पाणी नागरिक पिऊ शकत नाहीत हि पावडर आरोग्याला घातकही आहे त्या मुले नागरिकांचे आरोग बिघडत आहे असले अशुध्द पाणी पाहुन पाणी शुद्धीकरण यंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही ? पाणी व्यवस्थित  शुध्द केल्या जातेय कि नाही? हे संबंधित अधिकारी तपासतात कि नाही असा प्रश्न पडतो ह्या बाबतीत विचारणा करण्यासाठी पाणी पुरवठा विभागात फोन केल्यास फोन कधीच उचलल्या जात नाही फोनची रिंग वाजतच रहाते पण फोन उचलल्या जात नाही त्या मुळे इतर संबंधितांना फोन करावा लागतो पण त्यांचेही फोन उचलल्या जात नाहीत त्या मुळे नागरिकांना माहितीही मिळत नाही पाइप लाइन फोडण्याचे प्रकार तर सतत घडत असतात ब्लीचिंगचा वास असलेले पाणी पिऊ न शकल्याने लोकांना पाणी विकत घ्यावे लागते त्या मुळे त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतोय तर पाणी विक्री करणाऱ्यांचा मात्र धंदा जोरात सुरु आहे
    पिवळे व ब्लीचिंग पावडरचा वास असलेले पिण्यास अयोग्य पाणी (शास्त्री नगर )
गेल्या दहा वर्षात आणि आता नवीन सरकार आल्यावरही कोट्यावधीचा निधी पाणी व्यवस्थापनेसाठी मंजूर होऊन खर्च झाल्याची माहितीही प्रसारित झालीय तरीही पाणी टंचाई निवारण का झाले नाही ? यवतमाळात ह्या वर्षी पुरेसा पाऊस अल्पावधीतच झाला काही ठिकाणी तर पूरही आला पण योग्य नियोजनाभावी धरण भरताच जास्तीचे पाणी रस्त्यावर सोडले जाते त्या मुळे कित्येकांच्या शेतीचे ,घराचेही नुकसान होते आणि लोक मात्र पाणी टंचाईने दरवर्षी त्रासतात आता काही स्वयंसेवी संघटना लोकांच्या मदतीने तलावातील गाळाचा उपसा करत आहेत शिवाय त्या साठी निधीही गोळा केल्या जातोय म्हणजे पुन्हा नागरिकांच्या माथी  पैशाचा भुर्दंड !  ह्या संघटनांनी संबंधीत आमदार खासदार व सरकारकडून मंजूर झालेला निधी मागावा त्यांना तो देण्यास बाध्य करावे आणि गाळ साफ करण्यासाठीही कर्मचारी नित्युक्त करायला लावावे हि कामे शेतकरयांना दिल्यास त्यांना रोजगार मिळेल शिवाय ते आत्महत्त्याहि  करणार नाहीत
हा नागरिकांचा हक्क आहे  असे झाल्यासच निधीचा योग्य वापर होईल व पाणी टंचाई आगामी काळात होणार नाही त्या साठी लोक जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे

Thursday, 14 April 2016

शनीच्या कड्यांचे हे मनमोहक दृश्य

      फोटो-नासा व इसा संस्था
नासा संस्था -13 एप्रिल 2016          
शनीच्या कड्यांचे हे मनमोहक दृश्य नासाच्या शास्त्रज्ञांनी नुकतेच टिपले आहे शनीच्या कड्याचा हा प्रकाशमान  दिसणारा रुंद भाग छायाचित्रीत करणे अत्यंत कठीण असले तरीही नासा व इसा संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कॅसिनी ह्या स्पेस क्राफ्ट च्या narrow angle कॅमेऱ्याच्या सहाय्याने हा फोटो टिपला आहे
शनीच्या कड्याच्या ह्या भागाची रुंदी मोजणेही कठीणच असले तरी शास्त्रज्ञांच्या मते हा भाग बुध ग्रहा एव्हढा  रुंद असून त्याची रुंदी 2980 मैल आहे
 हा भाग शनीच्या Mimas ह्या चंद्रामुळे तयार झाला असावा असे शास्त्रज्ञांना वाटते ह्या फोटोत दिसणारया शनीच्या कड्याचा भाग शनीच्या mimas ह्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातील फिरणाऱ्या धुळ व वायूंच्या कणांमुळे तयार झाला असावा जेव्हा mimas हा चंद्र शनिभोवती एक फेरी पूर्ण करतो तेव्हा ह्या कॅसिनी भागातील पार्टिकलस मात्र दोन फेरया पूर्ण करतात  

Wednesday, 13 April 2016

एअर फोर्सच्या T-380 विमानाने घातली सूर्याला गवसणी



    फोटो -नासा संस्था
नासा संस्था -12 एप्रिल 2016
नासाच्या एअर फोर्स टेस्ट पायलट स्कुलच्या  T-380 ह्या विमानाने नुकतीच आकाशात सुर्यासामोरून भरारी मारली तेव्हा अत्यंत वेगाने जाणारया ह्या विमानाच्या वेगामुळे  निर्माण झालेल्या Super Sonic Waves नासाच्या शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून छायाचित्रीत केल्या आहेत
schlieren imagery हि जर्मनीतली दीडशे वर्षे जुनी छायाचित्रण पद्धत आहे त्याच पद्धतीला संशोधित आधुनिक पद्धतीची जोड देऊन नासाच्या शास्त्रज्ञांनी हा फोटो टिपला आहे
ह्या आधुनिक पद्धतीने सूर्याचा पृष्ठभाग व कॅमेरा ह्या मधून एखाधी वस्तू किंवा विमान जाते तेव्हा वेगामुळे निर्माण होणारया Super Sonic Waves  छायाचित्रीत करणे शक्य होते
ह्या फोटोत एअर फोर्सच्या विमानाच्या वेगामुळे Super Sonic Waves तयार झाल्या आहेत आणि ह्या छायाचित्राच्या माहितीचा उपयोग आता कमी Super Sonic Waves निर्माण करणारया एअर क्राफ्टची निर्मिती करण्यासाठी होईल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटतेय

Monday, 4 April 2016

तप्त ग्रहावरील उष्ण वारयाच वादळ

            फोटो -नासा संस्था      तप्त ग्रहावरील उष्ण वारयाच वादळ
 नासा संस्था -3 एप्रिल
नासाच्या स्पीटझर स्पेस दुर्बिणीने H D 80606b ह्या ग्रहावरील अति उष्ण वायूच्या वादळाचे हे छायाचित्र टिपले आहे हा ग्रह  दर 111 दिवसांनी त्याच्या तारयांच्या जवळ येतो तेव्हा अतिशय तप्त होतो ह्या ग्रहाचे अत्युच्च तापमान 2000 डिग्री f. आहे तर त्याचे सर्वात न्यूनतम तापमान  400 f . आहे
गेल्या दशकात शास्त्रज्ञांनी अंतराळाचा वेध घेत सुर्यमालेबाहेरील जवळपास दोन हजार ग्रहांचा शोध लावला असून अजूनही हजारो ग्रह अंतरिक्षात भ्रमण करत असल्याचा शास्त्रज्ञांचा कयास आहे
हे शोधलेले नवीन ग्रह तप्त गुरु (Hot Jupiters) ह्या गटात येतात हे ग्रह गुरु सारखेच तप्त वायु ग्रह असले तरी त्यांची ग्रहाभोवती फिरण्याची कक्षा मात्र वेगळी आहे कधी ती तारयापासून खूप दूर तर कधी अगदी जवळ असते तप्त गुरूची माहिती शास्त्रज्ञांनी शोधुन काढली असली तरीही हे ग्रह कधी व कसे तयार झाले आणि त्यांची भ्रमण कक्षा एकसारखी का नाही ? ह्याचे गूढ  उकलण्यात मात्र अजूनही शास्त्रज्ञांना यश आलेले नाही
ह्या  फोटोतला  H D 80606b हा ग्रह पृथ्वीपासून 190 प्रकाश वर्षे दूर असून त्याच्या वेगवेगळ्या भ्रमण काक्षेनुसार तो तारयांच्या जवळ येताच त्याचे उष्णतामान अत्युच्च होत 2000 डिग्री f . इतके होते संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षा नुसार हा ग्रह मोठ्या कक्षेतून लहान कक्षेत भ्रमण करत असावा व त्याच्या जवळील ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो त्या ग्रहांच्या कक्षेत ओढला जाऊन त्याची कक्षा अशी बदलत असावी संशोधक ह्या विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत