बुध ग्रहण - फोटो -नासा संस्था
नासा संस्था -10 मे
मंगळवारी नऊ मेला सूर्याला बुधाचे ग्रहण लागले होते अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतीयांना सूर्यावर टिंबाच्या रूपातील बुध ग्रहणाचे दुर्मिळ दृश्य पहायला मिळाले तसेच अमेरिकेतूनही हे बुध ग्रहण दिसले
नासा संस्था -10 मे
मंगळवारी नऊ मेला सूर्याला बुधाचे ग्रहण लागले होते अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतीयांना सूर्यावर टिंबाच्या रूपातील बुध ग्रहणाचे दुर्मिळ दृश्य पहायला मिळाले तसेच अमेरिकेतूनही हे बुध ग्रहण दिसले
नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी पेनिसिल्विनिया व बोयेरटावऊन ( Boyertown ) येथुन दुर्बिणीच्या सहाय्याने छायाचित्रीत केलेले हे दृश्य
शंभर वर्षात फक्त तेरावेळा बुधग्रहण होते सूर्य व पृथ्वी ह्यांच्या मधून बुध ग्रह जेव्हा मार्गक्रमण करतो तेव्हा तो सूर्याच्या पृष्ठभागावर छोट्या काळ्या टिंबाच्या रुपात दिसतो त्यालाच बुध ग्रहण म्हणतात ह्या आधी 2006 साली सूर्याला बुध ग्रहण लागले होते बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असून त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास 88 दिवस लागतात
भारतात दुपारी चार साडेचारला बुध ग्रहण सुरु झाले व रात्री उशिरा संपले हे ग्रहण सूर्य मावळण्याच्या वेळेस लागल्याने भारतीयांना फक्त सहा साडेसहाच्या दरम्यान पाहता आले भारतातील इतर भागांप्रमाणेच ते विदर्भातही दिसले यवतमाळ येथूनही ते साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान सूर्यावर छोटया बिंबाच्या रुपात दिसले अर्थात हे ग्रहण काळ्या फिल्म व दुर्बिणीच्या तसेच आरशा वरून परावर्तीत करून पाहिले गेले
No comments:
Post a Comment