Sunday 1 May 2016

यवतमाळ येथे उन्हाचा तडाखा पाणी टंचाईने नागरिक हैराण

यवतमाळ -३० एप्रिल २०१६
ह्या वर्षी एप्रिल मध्येच उन्हाची तीव्रता जाणवत असून अजून मे महिना बाकी आहे एप्रिल मध्येच  उष्णतेचा पारा  यवतमाळ येथे चाळीसच्या वर गेला होता काल यवतमाळ येथे पारा ४३ अंश सेल्सिअस येव्हढा नोंदल्या गेला  उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य झाले असून सकाळी नऊ नंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे त्यातच पाणी टंचाई मुळे घरातील कुलरही बंद आहेत  शिवाय झाडेही पाण्याविना वाळू लागल्या मुळे उन्हाची दाहकता नागरिकांना असह्य झाली आहे विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपूर येथे ४५. ३ तर चंद्रपूर येथे ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले

                               पाणी पुरवठा तीन दिवसांनी आणि अशुद्ध 
     
आधीच असह्य उन्हाळा त्यात सततच्या दुष्काळामुळे यवतमाळ येथील नदी ,विहरी आटल्या आहेत त्यात आता एक महिना पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती प्रसारित झालीय त्या मुळे लोकांना आता दर तीन दिवसानंतर पाणी पुरवठा केल्या जातोय कधी कधी तर टाकी साफ करण्याच कारण तर कधी आणखी काही कारण सांगून अचानक पाणी येणार नाही असे सांगण्यात येते तेव्हा नागरिकांच्या त्रासात भर पडते  विशेष म्हणजे हा पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो त्या मुळे तीन दिवस पुरेल इतका पाणी साठा करण्यातच गृहिणींचा वेळ जातो शिवाय हे पाणी अत्यंत गढूळ असते गेल्या काही दिवसात तर पाण्याला इतका ब्लिचिंग पावडरचा वास येतोय कि ते पाणी नागरिक पिऊ शकत नाहीत हि पावडर आरोग्याला घातकही आहे त्या मुले नागरिकांचे आरोग बिघडत आहे असले अशुध्द पाणी पाहुन पाणी शुद्धीकरण यंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही ? पाणी व्यवस्थित  शुध्द केल्या जातेय कि नाही? हे संबंधित अधिकारी तपासतात कि नाही असा प्रश्न पडतो ह्या बाबतीत विचारणा करण्यासाठी पाणी पुरवठा विभागात फोन केल्यास फोन कधीच उचलल्या जात नाही फोनची रिंग वाजतच रहाते पण फोन उचलल्या जात नाही त्या मुळे इतर संबंधितांना फोन करावा लागतो पण त्यांचेही फोन उचलल्या जात नाहीत त्या मुळे नागरिकांना माहितीही मिळत नाही पाइप लाइन फोडण्याचे प्रकार तर सतत घडत असतात ब्लीचिंगचा वास असलेले पाणी पिऊ न शकल्याने लोकांना पाणी विकत घ्यावे लागते त्या मुळे त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतोय तर पाणी विक्री करणाऱ्यांचा मात्र धंदा जोरात सुरु आहे
    पिवळे व ब्लीचिंग पावडरचा वास असलेले पिण्यास अयोग्य पाणी (शास्त्री नगर )
गेल्या दहा वर्षात आणि आता नवीन सरकार आल्यावरही कोट्यावधीचा निधी पाणी व्यवस्थापनेसाठी मंजूर होऊन खर्च झाल्याची माहितीही प्रसारित झालीय तरीही पाणी टंचाई निवारण का झाले नाही ? यवतमाळात ह्या वर्षी पुरेसा पाऊस अल्पावधीतच झाला काही ठिकाणी तर पूरही आला पण योग्य नियोजनाभावी धरण भरताच जास्तीचे पाणी रस्त्यावर सोडले जाते त्या मुळे कित्येकांच्या शेतीचे ,घराचेही नुकसान होते आणि लोक मात्र पाणी टंचाईने दरवर्षी त्रासतात आता काही स्वयंसेवी संघटना लोकांच्या मदतीने तलावातील गाळाचा उपसा करत आहेत शिवाय त्या साठी निधीही गोळा केल्या जातोय म्हणजे पुन्हा नागरिकांच्या माथी  पैशाचा भुर्दंड !  ह्या संघटनांनी संबंधीत आमदार खासदार व सरकारकडून मंजूर झालेला निधी मागावा त्यांना तो देण्यास बाध्य करावे आणि गाळ साफ करण्यासाठीही कर्मचारी नित्युक्त करायला लावावे हि कामे शेतकरयांना दिल्यास त्यांना रोजगार मिळेल शिवाय ते आत्महत्त्याहि  करणार नाहीत
हा नागरिकांचा हक्क आहे  असे झाल्यासच निधीचा योग्य वापर होईल व पाणी टंचाई आगामी काळात होणार नाही त्या साठी लोक जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे

No comments:

Post a Comment