अंतराळवीर Douglas आणि Robert Space Suite ची ट्रायल घेताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -26 मे
अमेरिकन भूमीवरून अमेरिकन बनावटीच्या Space X Dragon मधून अंतराळवीर उद्या अंतराळात झेपावणार आहेत त्यांच्या उड्डाणांसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे नेहमी प्रमाणे ह्या अंतराळवीरांनी जाण्याआधी २३ मे ला पत्रकारांशी संवाद साधला परंतु कोरोना मुळे अमेरिकेत लॉक डाऊन सुरु असल्याने हा संवाद ट्विटर आणि फोनवरून साधण्यात आला त्याचाच हा वृत्तांत
Douglas Hurley आणि Robert Behnken ह्यांनी Kennedy Space Station च्या Crew Quarters मधून ह्या संवादाला सुरवात केली
Marina Corn -(Atlantic) - उड्डाणापूर्वी कुटुंबियांशी शेवटची भेट कधी होईल आणि लॉक डाऊन मुळे त्यांना social distance चे नियम पाळावे लागतील का ?
Douglas -हो ! आम्हाला कुटुंबीयांची भेट घेता येईल पण अर्थातच दुरूनच कारण लॉक डाऊन सुरु आहे आणि नियम पाळण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे आम्ही Crew Quarters मधून Tesla मध्ये बसून launch pad कडे जाताना आम्ही उतरल्यानंतर त्यांना भेटू व बोलू शकू ते launch पॅड च्या windows मधून आम्हाला पाहू शकतील आणि ती आमची शेवटची भेट असेल
Joey Roulette (Reuters )- अंतराळवीर Chris Cassidy ने तुम्हाला पाठवलेल्या email बद्दल सांगा त्यांनी ह्या मिशन बद्दल तुम्हाला काय सांगितले आणि फ्लाईटने केनेडी स्पेस स्टेशन मध्ये येताना Robert आणि तुमच्यात काय बातचीत झाली ?
Douglas - Chris Cassidy ला आम्ही दोघेही चांगले ओळखतो त्याच्या email बद्दल सांगण योग्य होणार नाही पण Chris एकांतप्रिय आहे आम्ही दोघे स्थानकात गेल्यावर तिथल्या अंतराळवीरांची संख्या वाढेल पण तरीही आमच्या येण्याने त्याला आनंद होईल आणि तो आमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतोय
Robert - आम्ही लगेच Land झालो नाही Timing Issues मुळे आजूबाजूचा परिसर न्याहळता आला ह्या आधीही आम्ही दोघे इथे बरेचदा आलो होतो कामानिमित्य तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या केनेडी स्पेस सेंटरचा परिसर पुन्हा पाहतानाचा क्षण आनंददायी होता
Marsha Dunn -Associated Press - कोरोना मुळे तुमची नियमित Covid -19 टेस्ट घेतल्या जात होती का ? ह्या आधी कधी तुम्ही इतक्या टेस्टला सामोरे गेला होतात का ?
Douglas - गेल्या वीस वर्षांपासून आम्ही नासा संस्थेत कार्यरत आहोत त्या मुळे वैद्यकीय टेस्टची आम्हाला सवय झालीय पण ह्या वेळेस कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आपण सारेच लॉक डाऊनचा सामना करत आहोत आम्ही 15मार्च पासून Quarantine मध्ये होतो आमची दोनदा Covid-19 टेस्ट घेण्यात आलीय आणि जाण्याआधी कदाचित पुन्हा एकदा टेस्ट घेतली जाईल आमच्यासाठी हि ऐतिहासिक घटना ह्या साठीही आहे कारण आजवर इतका काळ कोणी Space Mission साठी Quarantine झाल नसेल
Robert - आम्ही नेहमीच अशा टेस्टना सामोरे जातो पण सध्याचा काळ सर्व जगासाठीच काळजीचा आहे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अशा टेस्ट आवश्यक आहेत आणि ह्या वेळेस आमच्यासाठी एक चांगली गोष्ठ घडली आम्हाला घरीच Quarantine राहण्याची मुभा देण्यात आली होती आणि सगळीकडेच लॉक डाऊन असल्यामुळे आमचे कुटुंबीयही घरीच होते त्या मुळे त्यांच्या सोबत राहता आल हे चंदेरी सुखाचे क्षण अनुभवता आले एरव्ही ते आमच्या Quarantine Facility मध्ये येऊ शकले नसते त्यांची कामे आणि शाळा सुरु असती त्या मूळे हे शक्य झाल नसत पण लॉक डाऊन मुळे launching आधीचा आमचा वेळ छान गेला
Jackie Goddard -(Times Of London )- मी तुम्हाला विचारल की तुम्ही कसे Bad Ass (Excellent )आहात ? तर तुम्ही नम्रतेने उत्तरलात आम्ही आमच काम करतो आहोत तुम्ही स्वत:बद्दल सांगू शकत नाही तर एकमेकांबद्दल सांगा
Robert - चांगला प्रश्न आहे तसही स्वत:बद्दल सांगण्यापेक्षा दुसऱ्याबद्दल सांगण्याची कल्पना चांगली आहे खरतर मी ह्या सारख्या मिशनसाठी Douglas पेक्षा उत्तम सोबती मागू शकलो नसतो तो सदैव सतर्क आणि कोणत्याही आव्हानासाठी सदैव तत्पर असतो त्या मुळे त्याच्या सोबत जाताना काहीही अडचण आली तर तो त्यावर मात करून त्यातून सुखरूप मार्ग काढेल ह्याची मला खात्री आहे
Douglas - Robert (Bob ) शांत आणि बुद्धिमान आहे ह्या मिशन संबंधित कुठलाही प्रश्न विचारा त्याच्याकडे उत्तर तयार असतच त्याने ह्या मिशनची पूर्ण तयारी केलीय येणाऱ्या आव्हानाचा सामना कसा करायचा अडचणींवर मात करून मिशन यशस्वी कस करायच ह्याचा त्याने पूर्ण विचार केलाय त्या मुळेच Robert माझा सहकारी आहे हे माझ्यासाठी आनंददायी आहे
Robert - नासा संस्थेने ह्या मिशन साठी आमची निवड केली त्यांना आम्ही दोघे हे मिशन यशस्वीपणे पार पाडू अशी खात्री वाटली असेल आमच्यासाठी हि अभिनंदनीय बाब आहे आणि आम्ही निश्चितच हि जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू
Rober(twitter वरून ) - अमेरिकेच्या Crew असलेल्या Space Craft ला नावे देण्यात आली होती जस 3-3 चे Freedom 7 Gemini-3ला Molly Brown तस तुम्ही तुमच्या Crew Dragon ला कुठल नाव दयायच ठरवलय ?
Douglas - हो!नक्कीच!हि एक चांगली परंपरा आहे आणि Crew1,Crew2 ऑफिस मधले आमचे सहकारी बोईंगचे सहकारी अंतराळवीर हि परंपरा पुढे चालू ठेवणार आहोत पण त्या नावाच सस्पेन्स मात्र launching पर्यंत आम्ही न सांगण्याच ठरवलय ते तसच राहू द्या
Owen Plum (13 years-Twitter)- तुम्ही तुमच्या सोबत Payload नेणार आहात का? आणखी काय,काय नेणार?
Robert- आमचा मूळ उद्देश Flight Test आणि स्थानकात पोहोचणे हा आहे त्या मुळे Payload कमी आहे आम्ही स्थानकात येणाऱ्या आगामी Space Dragon साठी आवश्यक असणारे Hardware नेणार आहोत बाकी अंतराळ स्थानकातील सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगासाठी आणी Space Walk ला लागणारे साहित्य आम्ही स्थानकात पोहोचल्यावर कार्गोशिप मधून पाठवण्यात येईल
Miriam Kramer(Axios)- सध्या अमेरिकेत कोरोनाच्या थैमानामुळे आणि लॉक डाऊन मुळे वातावरण गंभीर आहे अशा विपरीत परिस्थितीतील ह्या मिशनचा परिणाम Launch पाहणाऱ्या लोकांवर कसा होईल अस तुम्हाला वाटत ?
Robert - इच्छाशक्ती आणि ठाम निर्णयक्षमता असली कि आपल ध्येय साध्य करता येत सध्याच्या विपरीत गंभीर काळातही अमेरिकेने हे दाखवून दिलय सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळातही हि मोहीम न थांबवता सुरु ठेवली गेली लॉक डाऊन मूळे आलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करून नासा संस्थेतील सर्वच विभागातील कार्यालयातील टीमने खूप बदल केले पाच वर्षांपासून आम्ही एकत्रित ह्या मिशनमध्ये काम केले पण लॉक डाउनच्या काळात मात्र आम्ही सुरक्षित अंतर ठेवून काम केले खरतर निर्बंध पाळत हे मिशन पूर्ण करण कठीण होत पण अखेर सर्वांनी ते यशस्वी केल त्या मुळे अमेरीका कोरोनाच्या संसर्गातही हि मोहीम सुरक्षित आणि यशस्वीपणे पार पाडू शकतो हे लोकांना कळेल त्या मुळे लोकांवर ह्या मिशनचा चांगलाच परिणाम होईल
ह्या ऐतिहासिक उड्डाणाची लोक उत्सुकतेने वाट पाहात आहेत ह्या वर्षी प्रत्यक्षात जरी त्यांना हा launching सोहळा पाहायला मिळणार नसला तरीही सोशल मीडियावरून लोकांना त्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे
Lucas (Space X )- आताचा तुमचा Space Suite आधीच्या तुम्ही घातलेल्या मिलिटरी टेस्ट पायलट सूट आणि Astronaut Suite पेक्षा वेगळा आहे का ?
Douglas -हो ! Dragon crew Space Suite चे डिझाईन वैशिष्ठपूर्ण आहे जर अंतराळ प्रवासादरम्यान यानातील
pressure कमी जास्त झाले तर ह्या सूटमधील यंत्रणेमुळे तो नियंत्रित केल्या जाईल आणि अंतराळवीर सुरक्षित राहतील पूर्वी Shuttle मध्ये घातल्या जाणारा अंतराळवीरांचा सूट मोठा बोजड सर्वांसाठी एकाच मापाचा केशरी रंगाचा होता पण आता आमच्या मापाचे सूट बनविल्या गेले आहेत आम्ही त्याची ट्रायल घेतली आणि योग्य आहेत कि नाही हे पाहिले ते योग्य आणि सुरक्षित आहेत सहसा दुसऱ्या कंपनीला सूट तयार करण्यासाठी देण्यात येतात पण Space X ने यंदा हे सूट तयार केले आहेत आणि हे सूट घातल्यावर छान दिसतात अस सर्वांच मत आहे
Rachael Joy(Florida Today)- हा Week End तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीही Memorial Day आहे ह्या वेळेस launching आधी तुम्ही Quarantine आहात तरीही तुमचे काही plans आहेत का ? एरव्ही तुमच्या आवडीची
शहरातील प्रेक्षणीय स्थळ,रेस्टारंट किंवा बीच कुठे जायला तुम्हाला आवडल असत ?
Douglas - हो ! हा मेमोरियल Week end आहेच आम्ही Quarantine मध्ये आहोत आणि आवश्यक शेड्युल पाळत आहोत उद्या Launch ची Dry Dress Rehearsal आहे सोमवारी,मंगळवारी आम्ही व्यस्त आहोत कारण बुधवारी आमच launching आहे भरपूर तयारी असते उद्या आमचे कुटुंबीय येतील तेव्हा आमची भेट होईल आणि एरव्ही जसा बीचवर किंवा रेस्टारंट मध्ये वेळ घालवतो तसा आम्हाला आमच्या कुटुंबियांसोबत घालवता येईल
आवडते ठिकाण सांगायच तर कुठेही बीचवर किंवा वेगवेगळ्या रेस्टारंट मध्ये जायला आवडत पण ह्या वेळेस आमचे डॉक्टर तिथे जाण्याची परवानगी आम्हाला देऊ शकत नाहीत
Rachael -अरे ! आम्हाला तुम्ही ह्या वेळेस Sandbar मध्ये दिसणार नाही !
Douglas -नाही ना ! पण लॉक डाऊन मध्ये ते सुरु आहे कि नाही मला माहिती नाही कदाचित निर्बंध पाळून मर्यादित काळासाठी सुरूही असेल मला माहिती नाही !
Steven Clark (Space Flight )-तुम्ही Manual Flying बद्दल सांगितलत तुमच्या पैकी अंतराळ यानाचा ताबा कोणाकडे असेल ?तुम्ही नासा संस्थेत Join झालात तेव्हा Space Shuttle वापरल्या जायच तेव्हा तुम्हाला Shuttle ची जागा दुसर कोणी घेईल असं वाटल होत का ?
Douglas -अंतराळयानाचा ताबा Dragon कमांडर म्हणून माझ्याकडे असेल त्या मूळे Manual Flying मीच करणार आहे आधी free flight मध्ये आम्ही demo घेणार आहोत आणि नंतर स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर ह्या Manual Flying चा वापर करू ह्या साठी आम्हा दोघात समन्वय असण आवश्यक असल्यामुळे आम्ही दोघांनी ट्रेनिंग दरम्यान खूप practice केली आहे
Robert -आम्ही नासा संस्थेत 2000 साली Join झालो होतो तेव्हा Space Station उभारणीच काम सुरु होत ते पूर्णत्वाला जाताना आम्ही पाहिलय Space Flight मध्ये सहभागी होण्याची तेव्हाची इच्छा प्रत्यक्षात साकारेल अस तेव्हा वाटल नव्हत आम्ही ह्या मिशनमध्ये सहभागी आहोत हि आमच्यासाठी सन्माननीय बाब आहे तेव्हा Space Station आकाराला येत होत आणि नवीन वेगळ अंतराळ यान चालवायला आम्हाला नक्कीच आवडल असत आणी आता वीस वर्षांनी आमच स्वप्न प्रत्यक्षात उतरलय Michael Fossum म्हणाले तस स्वप्नात जगल्यासारख स्वप्नवत आहे हे !
Dove Moser -(Business Inside )- तुम्ही दोघांनी सांगितल्या प्रमाणे तुम्हाला Test Flight ची संधी मिळण अभिमानास्पद आहे पण हि प्रायोगिक Flight असल्याने हे काम जोखमीच आणि धोकादायक आहे ह्या आव्हानात्मक कामासाठी तुम्ही Confident आहात का ? तुम्हाला LOC,LM no. ची माहिती देण्यात आलीय का?
Robert - Commercial Crew Program,Space X टीमने आम्हाला ह्या बाबतीतली पूर्ण माहिती दिली आहे पाच वर्षांपासून आम्ही ह्या मिशन साठी कार्यरत आहोत त्या मुळे ह्याची सखोल माहिती आम्ही जाणून घेतली ह्या no. मुळे धोक्याची सूचना मिळते आणि अशा वेळेस Hardware आणि Procedures मध्ये काय बदल करावेत ह्याची माहिती मिळाली दोन दिवसांपासून Agency च्या Flight Readiness Review मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली शिवाय व्यवस्थापन टीममध्ये risk बद्दल होण्याऱ्या चर्चांमध्येही आमचा सहभाग होता माझ्या माहिती प्रमाणे आजवरच्या अंतराळ मोहिमांमध्ये जीतकी सखोल माहिती दिली गेली नसेल तितकी आम्हाला दिली गेली त्या मुळे ह्या मोहिमेची जोखीम आणि महत्व आम्ही जाणतो आम्ही confident आणि आतुर आहोत Launching साठी
Douglas - Space X ला Falcon आणि Cargo चा खूप अनुभव आहे आम्ही Join केलं तेव्हा Space X co. नव्हती पण अल्पावधीतील त्यांच अंतराळ मिशन मधल यश कौतुकास्पद आहे
शेवटी दोघांचे आभार मानून आणि त्यांना Launching साठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली
No comments:
Post a Comment