Space X Dragon अंतराळात झेपावल्यानंतर -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -30मे
खराब हवामानामुळे 27 मेची लांबलेली नासाची Space X Crew Dragon मोहीम अखेर शनिवारी तीस मेला यशस्वीपणे पार पडली अमेरिकन निर्मित Space X Crew Dragonआणि Falcon 9 Rocket मधून नासाचे अंतराळवीर Douglas Hurley आणि Robert Behnken हे दोन अंतराळवीर अमेरिकन भूमीवरून अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले
जाण्याआधी ह्या दोनही अंतराळवीरांची आवश्यक तपासणी करण्यात आली कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे त्यांना काही काळ Quarantine करण्यात आले होते त्यांची launching ची पूर्ण तयारी झाल्यानंतरआणी सर्व व्यवस्थित आहे हे चेक केल्यानंतर दोन्ही अंतराळवीर बाहेर आले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या नासा संस्थेतील निवडक अधिकारी व ह्या मोहिमेतील कर्मचाऱ्यांची टीम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे टाळ्या वाजवून जोशात स्वागत केले Launching पॅड कडे जाण्याआधी कार मध्ये बसल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी काही क्षण बोलण्याची परवानगी देण्यात आली होती कुटुंबीयांचा निरोप घेऊन अंतराळवीर Launching साठी रवाना झाले
अमेरिकेतील Kennedy Space Center Florida येथून Space X अंतराळ यानाची व्यवस्थित चाचणी केल्यानंतर तीस मेला 3.22a.m.ला Space X Crew Dragon ह्या दोन्ही अंतराळवीरांना घेऊन अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठी अंतराळात झेपावले त्यानंतरही अंतराळवीरांनी आवश्यक चाचणी करून सर्व ठीक असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले Space X रविवारी 10.29a.m.ला अंतराळ स्थानकात पोहोचेल ह्या Space X Crew Dragon च्या वैशिष्टपूर्ण बनावटीमुळे यान स्थानकाजवळ पोहोचताच autonomously डॉकिंग प्रक्रिया सुरु होईल पण अंतराळवीर आणि पृथ्वीवरील नासाचे कर्मचारी हि प्रक्रिया diligently monitor करतील ह्या Space X Dragon मध्ये touch Screen Computers बसविले आहेत अंतराळवीर अंतराळ स्थानकात प्रवेशल्यानंतर अंतराळ स्थानकात सध्या राहात असलेले अंतराळवीर Chris Cassidy आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर त्यांचे अंतराळ स्थानकात स्वागत करतील
2011नंतर बंद पडलेली नासाची अंतराळ मोहीम तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा सुरु झाली विशेष म्हणजे अकरा वर्षांपूर्वी ह्याच भूमीवरून नासाचे अपोलो 11अंतराळयान चंद्रावर झेपावले होते आताच्या ह्या यशस्वी ऐतिहासिक मोहिमेमुळे पुन्हा एकदा अमेरिकन भूमीवरून अमेरिकन निर्मित यान आणि रॉकेट मधून अंतराळवीरांनी अंतराळात उड्डाण केले त्या मुळे नासाचे अधिकारी आणि अमेरिकन नागरिक आनंदित झाले आहेत
नासाचे प्रमुख Jim Bridenstine ह्यांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल अंतराळवीर Douglas Hurley आणि Robert Behnken ह्या दोघांचे अभिनंदन केले शिवाय ह्या मोहिमेतील सर्व टीम आणि Space X co.चेही आभार मानले ह्या सर्वानीच उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे अंतराळ विश्वात अमेरिकेचे नाव उंचावले आहे आता अमेरिका स्वयंपूर्ण देश झाला असून ह्या पुढील आगामी काळातील मंगळ आणि चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांना त्याचा फायदा होईल असेही ते म्हणाले
हा launching चा ऐतिहासिक सोहळा अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump आणि vice President Mike Pence आणि त्यांच्या पत्नी Karen Pence ह्यांनी Kennedy Space Center च्या Building मधून पाहिला
President Donald Trump ,vice President Mike Pence आणी Karen Pence launching पाहताना
फोटो -नासा संस्था
नासाच्या ह्या अंतराळमोहिमेतील Space X Dragon co.चे चीफ इंजिनिअर Elon Musk देखील ह्या मोहिमेच्या यशाने आनंदित झाले आहेत ते म्हणतात ह्या मोहिमेच्या यशाने माझे कित्येक वर्षाचे स्वप्न साकार झाले आहे ह्या यशात नासाच्या टीमचा आणि ह्या मोहिमेत काम करणाऱ्या साऱ्यांचाच वाटा आहे त्यांनी केलेले कष्ट अखेर कामी आले
ह्या मोहिमेच्या Manager Kathy Lueders म्हणतात हे यश अभिमानास्पद आणि शब्दातीत आहे ह्या ऐतिहासिक क्षणी आनंद व्यक्त करताना मला शब्द सुचत नाहीत! गेल्या पाच वर्षांपासून आम्ही ह्या मोहिमेची तयारी करत होतो आणि नेमकी हि मोहीम पूर्णत्वास येण्याचा वेळेस अमेरिकेतच नाही तर सर्व जगातच कोरोनान थैमान घातलय त्याचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर झालेल्या लॉक डाऊन आणि work at home मुळे निर्बंध आले अत्यंत कमी व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ह्या मोहिमेची अंतिम तयारी पूर्ण करावी लागली आणि आमच्या टीममधल्या कर्मचाऱ्यांनी लॉक डाऊनची कडक अंमल बजावणी करत ह्या कठीण काळातही अत्यंत कुशलतेने
हे काम पूर्णत्वास नेलेल पाहून मीही क्षणभर अचंबित झाले ह्या मोहिमेचे यश पाहून आमचा उत्साह वाढला आहे
आगामी काळात ह्या अंतराळ मोहिमेला आणखी यश मिळेल यात शंका नाही
ह्या Space X Dragon चा उपयोग अंतराळवीरांना अंतराळस्थानकात जाण्यासाठी आणि परत आणण्यासाठी होईल इतर देशातील अंतराळवीरांसाठीही ह्या अंतराळयानाचा व्यावसायिक उपयोग केल्या जाणार आहे
ह्या अंतराळवीरांच्या ऐतिहासिक उड्डाणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. आणि सोशल मीडियावरून करण्यात आले होते लॉक डाऊन मुळे प्रत्यक्ष तिथे जाऊ न शकणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी ह्या संधीचा लाभ घेतला शिवाय लाईव्ह चॅट चीही संधी उपलब्ध असल्याने अनेकांनी आपल्या शंकांचे निरसन प्रश्न विचारून केले ह्या मोहिमेआधी नागरिकांसाठी नासा संस्थेने # launch America हि मोहीम राबवण्यात आली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेकांनी गण्याचा व्हिडिओ पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या
Launching साठी जाण्याआधी सर्वांचा निरोप घेताना अंतराळवीर Robert आणि अंतराळवीर Douglas Hurley
फोटो -नासा संस्था
जाता जाता अंतराळवीरांनी Space X च्या आतील भागाचे दर्शन घडविले आणि पत्रकार परिषदेत त्यांच्या यानाला त्यांनी कुठले नाव देण्याचे ठरवलेय असे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तरही दिले त्या वेळेस त्यांनी ह्या नावाचे सरप्राईझ आम्ही लाँचिंगच्या वेळेस देऊ अस सांगितल होत त्यांनी त्यांच्या यानाला Endeavor असे नाव ठेवल्याचे सांगितले
No comments:
Post a Comment