नासा संस्था - 6 मे
नासाच्या अंतराळ मोहीम 63चे सध्याचे कमांडर Chris Cassidy (U.S. Navy SEAL आणि अंतराळवीर ) ह्यांनी सहा तारखेला नासा संस्थेशी संपर्क साधत अमेरिकेतील कोरोना वॉरिअर्सचे आभार मानले आहेत
Chris Cassidy म्हणाले," सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग चिंताजनक आहे मी ह्या देशाचा नागरिक आहे आणि नासा संस्थेत येण्याआधी आर्मीत कार्यरत होतो त्या मुळे शत्रूशी लढताना काय अडचणी येतात हे मी जाणतो पण सैनिक लढतात तेव्हा त्यांना शत्रू डोळ्यासमोर दिसतो त्या मुळे त्यांना नष्ट करता येत पण कोरोनाचा व्हायरस हा अदृश्य आहे हा लाखो लोकांना सतावतोय हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत पण तो दिसत नसल्याने त्याला नष्ट करण कठीण जात आहे
ह्या COVID-19 च्या अदृश्य शत्रूशी मुकाबला करताना अमेरिकेतील Hospital मधील सर्व डॉक्टर्स,नर्सेस पोलीस अग्निशमन दलातील कर्मचारी आपल्याला मदत करणारे Ware house person ,किराणा दुकानदार आणि तेथील कर्मचारी,फळ,भाजी विक्रेते हे सारे आपल्याला मालाचा पुरवठा करतात ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ह्या बिकट संसर्गजन्य परिस्थितीतही सर्वांना मदत करत आहेत
त्या सर्वांचे मोहीम 63 मधील माझे सहकारी आणि मी विशेष आभार मानतो आम्ही तुमचे आभारी आहोत ! तुमच्या कडे पाहून साऱ्यांना प्रेरणा मिळते आणि सुरक्षितताही ! Thanks ! तुमच्या मुळे अमेरिकेतील लोक healthy आणि सुरक्षित आहेत त्या मुळे तुमच्या प्रत्येकाचे स्पेशल आभार !आम्ही पृथ्वीवर नसलो तरीही आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद !"
No comments:
Post a Comment