Thursday 21 May 2020

अंतराळवीर Robert Behnken आणी Douglas Hurley उड्डाणा आधी Quarantine मध्ये


 
अंतराळवीर Douglas Hurley आणी Robert Behnken Space X Dragon ची पहाणी करताना- फोटो-नासा संस्था

नासा संस्था -20 मे
सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढतच चाललाय खबरदारीचा उपाय म्हणून तिथे काही अत्यावश्यक सेवा वगळता अजूनही lock down सुरु आहे कोरोनावर औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञ शर्थीचे प्रयत्न करत आहेत परंतु अजूनही यश आले नाही अमेरिकेने अत्यावश्यक सेवेअंतर्गत आपली अंतराळ मोहीम मात्र सुरूच ठेवली आहे  नासाच्या अंतराळ मोहीम 63अंतर्गत 27 मेला अंतराळवीर Robert Behnken आणी Douglas Hurley अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत हि अंतराळ मोहीम नेहमीप्रमाणे नाही तर अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाची आहे पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर अमेरिकन अंतराळवीर अमेरिकन मेड अंतराळयान Space X  Dragonआणी Falcon 9 रॉकेट मधून अमेरिकन भूमीवरून अंतराळात झेपावणार आहेत अमेरिकेसाठी हि ऐतिहासिक घटना आहे आणी म्हणूनच ह्या मोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे
सध्याच्या कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीत ह्या दोन अंतराळ वीरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून उड्डाणाआधी quarantine मध्ये ठेवण्यात आले होते जाण्याआधी त्यांना आणि त्यांच्या मुळे स्थानकातील अंतराळ वीरांना  कोरोनाचा संसर्ग होऊ नये पृथ्वीवरून  कोरोनाचा व्हायरस अंतराळ स्थानकात जाऊ नये म्हणून हि खबरदारी घेण्यात आली अंतराळवीरांचे आरोग्य निरोगी राहावे ते आजारी पडू नये म्हणून प्रत्येक अंतराळ मोहिमे आधी अंतराळवीरांची विशेष काळजी घेतली जाते आणि आता तर कोरोनाचा अत्यंत जीवघेणा धोका असल्याने सतर्क राहणे आणि काळजी घेणे अत्यावश्यक आहे
अंतराळवीरांना घरीच quarantine राहण्याची मुभा देण्यात आली होती पर्यंतू quarantine च्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे बंधनकारक होते पण अंतराळवीरांना घरी राहून काही अत्यावश्यक कामामुळे quarantine चे नियम पाळणे शक्य होणार नाही असे वाटल्यास नासाच्या Jonson Space Center मध्ये त्यांना quarantine मध्ये राहण्याची सोय उपलब्ध होती quarantine च्या काळात त्यांना भेटायला येणाऱ्या VIPs आणि अत्यावश्यक व्यक्तींची कोरोना तपासणी करूनच त्यांना भेटण्याची मुभा देण्यात आली होती आणि अंतराळवीरांचीही नियमित तपासणी करण्यात आली
अंतराळ स्थानकात गेल्यानंतर ह्या अंतराळवीरांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे शक्य होणार नसल्यामुळे ह्या अंतराळवीरांच्या उड्डाणाआधीच त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात आली आता त्यांचा quarantine चा काळ संपल्यानंतर हे दोन्ही अंतराळवीर पुढच्या तयारीसाठी Kennedy Space Center मध्ये रवाना होतील

No comments:

Post a Comment