अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियातील बीचवर सध्या निळ्या रंगाच्या प्रकाशित लाटा उसळत आहेत हे नैसर्गिक नेत्रसुखद दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी अमेरिकन नागरिक समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करतात यंदा मात्र अमेरिकेतील कोरोनाच्या थैमानामुळे तिथे लॉकडाउन सुरु आहे Stay At Home मुळे लोक घरातच बंदिस्त आहेत पण लॉक डाउन मध्ये शिथिलता मिळताच नागरिकांनी ह्या नैसर्गिक रंगीत लाटा पाहण्याचा आनंद घेतला अर्थात दुरूनच
एप्रिलमध्ये सुरु झालेल्या ह्या रंगीत लाटा अजूनही समुद्रकिनारी उसळत आहेत
नुकताच आम्हा मैत्रिणींच्या Whats app ग्रुप वर ह्या नैसर्गिक जैविक रंगीत प्रकाश लाटांचा व्हिडिओ पाहायला मिळाला आणि आपसूकच खूपच सुंदर !अप्रतिम !अशा प्रतिक्रिया आमच्या तोंडून बाहेर पडल्या
ह्या व्हिडिओत एक माणूस वाळूतून समुद्राकडे पळत जातोय आणि त्याच्या मोगोमाग वाळूतून निळ्या रंगाचा प्रकाशझोत बाहेर पडतोय आणि हे तो समुद्रातील पाण्यात गेल्यावरही चालूच आहे शिवाय पाण्यात अनेक लोक पोहोण्याचा आनंद घेत आहेत आणि त्याच्या मागोमाग निळ्या रंगाच्या प्रकाशित लाटा उसळत आहेत सारच सुंदर अचंबित करणार! हे पाहून हि कसली जादू ? असं मनात आल तर आश्चर्य वाटणार नाही
Laguna beach वरील Bioluminesce निळ्या रंगांच्या लाटा
ती म्हणते ,"It Was Magical &Amazing! We Saw Bio-luminescent Waves at Laguna beach What a Wonderful experience ! आमच्या घरापासून जवळ असल्याने आम्ही लॉकडाऊन शिथिल झाल्यावर चार मेला दुरूनच ह्या रंगीत प्रकाशमान लाटा पाहण्याचा आनंद घेतला सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढतोय अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे नागरिक फक्त आवश्यक सामान आणण्यासाठी बाहेर पडतात त्या मुळे आम्ही दुरूनच त्या लाटा पाहिल्या आणि फोटोत कॅमेराबद्ध केल्या तसही Red Algae toxic असतात !" ह्या लाटांबद्दल प्रकाशित माहितीही तिने सांगितली तेव्हा कॉलेज मध्ये शिकताना सरांनी आम्हाला सांगितलेली ह्या algae च्या वैशिष्ठ्याची माहिती आठवली
अमेरिकेत ह्या लाटांना Glowing Blue Waves Red Tide किंवा Algal Bloom म्हणतात खासकरून उन्हाळ्यात हे micro organisms खूप मोठया संख्येने एकत्र येतात तेव्हा असा नैसर्गिक जैविक रंगीत प्रकाश बाहेर पडतो ह्या सूक्ष्म एकपेशीय पाणवनस्पती (Micro Organisms )म्हणजेच algae सुमुद्राच्या किनाऱ्यावर किंवा पाण्यात वाढतात त्यांच्या पेशीत काही केमिकल्स असे असतात कि थोड्याशा घर्षणाने किंवा इतर मनुष्य प्राणि,पक्षी,मासे आणी समुद्रीजीव ह्यांच्या स्पर्शाने त्यांच्यात ऊर्जा निर्माण होते आणि त्यांच्या पेशीतून रंगीत प्रकाश बाहेर पडतो दिवसा ह्या algae मधून लाल रंगाचा प्रकाश बाहेर पडतो तर रात्री निळा नियान रंगाचा प्रकाश बाहेर पडतो ह्या शिवाय काही Algae केशरी आणि हिरवा रंगाचा प्रकाशही तयार करतात निसर्गाने शत्रूपासून स्वसंरक्षणासाठी त्यांच्यात हि क्षमता निर्माण केली आहे शत्रू पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लाल प्रकाश निर्माण केल्या जातो ह्या Algae toxic असतात एखाद्या सुमुद्रीजीव किंवा मानवापासून धोका वाटल्यास,त्यांचा स्पर्श झाल्यास इतरांना धोक्याची सूचना देण्यासाठी थोडक्यात रेड अलर्ट देण्यासाठी algae लाल प्रकाश निर्माण करतात
एकाच वेळी असंख्य algae जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच concentration झाल्याने Red Tide Waves निर्माण होतात लाटांवर algae निर्मित रंगीत प्रकाश विरानमान होतो आणि नागरिकांना ह्या जादुई उसळत्या रंगीत निळ्या लाल रंगांच्या लाटाच अप्रतिम सौन्दर्य पाहण्याचा आनंद मिळतो
No comments:
Post a Comment