Thursday 7 May 2020

अमेरिकन बनावटीचे पहिले Space X Crew Dragon 27मेला स्थानकाकडे झेपावणार

NASA astronauts Behnken and Hurley participated in Commerical Crew Program first flight test.

अंतराळवीर Robert Behnken आणि अंतराळवीर Doug Hurley अंतराळ प्रवासाच्या ट्रेनिंग दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था -2 मे
सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढतच चाललाय त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे नुकतेच नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी व्हेन्टिलेटरची निर्मिती केली आहे शिवाय ह्या बिकट परिस्थितीतही नासा संस्थेने आपली पूर्वनियोजित अंतराळमोहीम सुरूच ठेवली आहे मागच्या महिन्यात तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहायला गेले आणि तीन अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत
आता 27 मेला नासाच्या पूर्वनियोजित अंतराळ मोहिमे अंतर्गत अमेरिकेने निर्मित केलेल्या Space X Crew Dragon अंतराळात झेपावणार आहे ह्या यानाची चाचणी पूर्ण झाली असून ह्या अंतराळ यानातून नासाचे दोन अंतराळवीर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत
ह्या नव्या Space x Crew Dragon ह्या यानाची निर्मिती अमेरिकेने केली असून 2011नंतर प्रथमच अमेरिकेच्या भूमीवरून नऊ वर्षांनी पुन्हा एकदा अंतराळ यान अंतराळात उड्डाण करणार आहे आणि अंतराळवीरांना स्थानकात पोहोचवणार आणि स्थानकातून पृथ्वीवर परत आणणार आहे 2011साली हि मोहीम बंद करण्यात आली होती त्या मुळे अंतराळवीर रशियन बनावटीच्या सोयूझ अंतराळ यानातून आणि रॉकेट मधून अंतराळ प्रवास करत होते अंतराळ यान देखील रशियाच्या कझाकस्थानातून अंतराळात उड्डाण करत होते
आता अमेरिका ह्या बाबतीत स्वयंपूर्ण देश झाला असून ह्या पुढची अंतराळ मोहीम अमेरिकेच्या भूमीवरूनच राबविली जाणार आहे आणि अमेरिकन यानातून आणि रॉकेट मधून अंतराळवीर अंतराळ प्रवास करणार आहेत अमेरिकन बनावटीच्या Space X Crew Dragon व Falcon Rocketच्या ऐतिहासिक उड्डाणाचा शुभारंभ 27 मेला करण्यात येणार आहे  नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center मधल्या Complex 39 A इथून Space X अंतराळ यान नासाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे नासाच्या Robert Behnken आणि Doug Hurley ह्या दोन अंतराळवीरांना घेऊन Space X  Crew Dragon बुधवारी 27 मेला पृथ्वीवरून 4.32p.m.ला अंतराळ प्रवासाला निघेल आणि 28 मेला 11.29a.m.ला स्थानकात पोहोचेल मागच्या वर्षी ह्या यानाची पहिली यशस्वी चाचणी झाली होती आता हि दुसरी आणि अंतिम चाचणी असेल
ह्या अंतराळयाना मार्फत पृथ्वीवरून यानाचे उड्डाण,अंतराळ प्रवास,स्थानकातील docking आणि landing ह्या सर्वाचा डाटा गोळा करण्यात येणार आहे शिवाय ह्या यानाचा उपयोग कमर्शियल crew launching साठी आणि त्यांना स्थानकातून परत पृथ्वीवर आणण्यासाठीही करण्यात येणार आहे
ह्या Space X Crew Dragon मधून अंतराळवीर Robert Behnken आणि Doug Hurley हे दोघे अंतराळ स्थानकात जाणार असून सध्या तिथे राहात असलेल्या अंतराळवीरांसोबत राहून संशोधन करणार आहेत ह्या दोघांनीही ह्या आधी दोन वेळा अंतराळवारी केली आहे ह्या अमेरिकन बनावटीच्या अंतराळ यानातून आणि रॉकेट मधून अंतराळ प्रवास करण्यासाठी हे दोघे सज्ज झाले असून दोघेही म्हणतात आम्ही ह्या ऐतिहासिक अंतराळप्रवासाची आतुरतेने वाट पाहात आहोत आम्ही excited आहोत,दोघेही 2000 साली नासा संस्थेत सिलेक्ट झालो त्या मुळे आम्हा दोघा मित्रांना एकत्र प्रवास करायला मिळणार म्हणून आनंदित आहोत दोघांनीही pilot म्हणून काम केलय Pilot School मध्ये शिकताना सर्वांचीच नव्या कोऱ्या Spaceship मधून उड्डाण करायची ईच्छा असते आणि आता आम्हाला ह्या अमेरिकन बनावटीच्या अंतराळ यानातून प्रथम उड्डाण करण्याची ऐतिहासिक सुवर्ण संधी मिळालीय त्या मुळे आमची ईच्छा पूर्ण होणार म्हणून आम्ही उत्साहित आहोत
Hurley म्हणतात आम्ही ह्या ऐतिहासिक मिशन मध्ये सहभागी आहोत हि आमच्या साठी सन्मानिय बाब आहे
सध्या अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे lock down सुरू आहे त्यामुळे ह्या launching च्या वेळी आमचे कुटुंबीय आणी मित्र ऊपस्थीत राहु शकणार नाहीत पण सद्यस्थितीत तो निर्णय योग्यच आहे शेवटी आपली सुरक्षितता महत्वाची आहे आपण निरोगी आणी आनंदी असण महत्त्वाचे आहे
अंतराळ वीर Robert Behnken हे Mechanical engineer आहेत आणि नासा संस्थेत येण्याआधी ते U.S.Air Force मध्ये Flight test Engineer म्हणून कार्यरत होते तर  Doug Hurley हे Civil Engineer आहेत आणि नासा संस्थेत येण्याआधी त्यांनी U.S. Marine Crop मध्ये Fighter Pilotआणि Test Pilot म्हणून काम केले आहे
नासाचे Jim Bridenstine म्हणतात तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा एकदा अमेरिकन भूमीवरून स्वनिर्मित अंतराळ यान आणि रॉकेट मधून अंतराळवीर अंतराळ प्रवास करणार आहेत हि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण सध्या अमेरिका कोरोना संसर्गाने त्रस्त आहे त्या मुळे देशापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत ह्या बिकट परिस्थितीतही ह्या उड्डाणाची सर्व तयारी आणि आवश्यक चाचणी पूर्ण झाली असून यंत्रणा ह्या उड्डाणासाठी सज्ज झाली आहे आमच्या साठी lock down च्या काळात ह्या launching ची तयारी करण आव्हानात्मक होत पण नासा संस्थेतील कर्मचारी, शास्त्रज्ञ आणी ह्या मिशनच्या टिमने lock down च्या नियमांची कडक अंमलबजावणी करुन हे मिशन पुर्णत्वास नेलय
ह्या अंतराळ यानाची यंत्रणा व्यवस्थित काम करतेय ना? त्यात काही त्रुटी राहिली नाही ना? ह्याची चाचणी घेण्यात आली शिवाय अंतराळ वीरांना पृथ्वीवर ऊतरण्यासाठी लागणारे parachute व्यवस्थित काम करतेय ना?हेही तपासण्यात आलय कारण शेवटी अंतराळविरांची सुरक्षितता महत्वाची आहे

No comments:

Post a Comment