नासाचे पहिले Viking यान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लॅन्ड झाले -फोटो नासा संस्था
मंगळ ग्रहावरील Viking यान व मंगळाचा पृष्ठभाग -फोटो नासा संस्था
नासा संस्था -18 जुलै अमेरिकेच्या नासा संस्थेने मंगळमोहीमेद्वारे पहिल्यांदा Viking यान मंगळ ग्रहावर पाठवले होते त्या ऐतिहासिक यशस्वी घटनेला वीस जुलैला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत
त्याचा आनंद साजरा करण्यासाठी ह्या मंगळमोहिमेशी संबंधीत नासाचे संशोधक 19-20 जुलैला (अमेरिकन तारीख )Viking चा चाळिसावा वाढदिवस साजरा करीत आहेत ह्या वाढदिवसाच्या आयोजना सोबतच चर्चासत्रही आयोजित केले गेले आहे अमेरिकेने मंगळाच्या दिशेने सोडलेले Viking यान वीस जुलैला 1976 साली सकाळी 8वाजून 12 मिनिटाला मंगळावर सुखरूप पोहोचले होते Viking च्या चाळीसाव्या वाढदिवसाच्या ह्या कार्यक्रमात
ह्या मंगळ मोहिमेशी व आगामी मंगळ मोहिमेशी संबंधीत नासाचे संशोधक ,तंत्रज्ञ ,अभियंते व इतर मेम्बर्स सहभागी झाले आहेत शिवाय नासाच्या स्पेस टेक्नॉलॉजीचे असोसिएट Administrator Steve Jurczyk व मंगळ मोहिमे संबंधित माहितीपर व काल्पनिक मानवी मंगळ निवासावरील Martian कादंबरीचे लेखक Andy Weir हे देखील सहभागी झाले आहेत ह्या कार्यक्रमात जवळपास वीस वक्त्यांच्या परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे एकोणीस व वीस जुलैला साजरा होणाऱया ह्या कार्यक्रमात नासाच्या नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचे इतिहासकार Roger Launius ह्यांनी नासाच्या ऐतिहासिक Viking मंगळ मोहिमेबद्दल माहिती दिली Martian कादंबरीचे लेखक Andy Weir हे मंगळ ग्रहावरील भावी मानवी निवासाबद्दल बोलले तर नासाचे मुख्य संशोधक Ellen Stofan ह्यांनी Exploration of Marsबदल माहिती दिली 1976च्या वीस जुलैला Viking 1 हे यान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरले तेव्हाचे हे छायाचित्र आहे त्याच वर्षी सप्टेंबर मध्ये Viking 2 हे ऑर्बिटर मंगळ ग्रहाभोवती फेरया मारू लागले ह्या दोन मंगळ मोहिमांमुळे संशोधकांना मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाची रचना ,तिथले खडक तिथे पूर्वी पाणी वाहात असल्याच्या ,डोगर ,दऱ्या ,पाण्याचा आटलेला नदी प्रवाह व तिथल्या गोळा केलेल्या माती व खडकातील मिनरल्स मुळे तिथे पूर्वी असलेल्या सजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा सापडल्या आहेत आता नासाचे संशोधक मंगळ ग्रहावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहेत
|
No comments:
Post a Comment