Wednesday 6 July 2016

नासाचे तीन अंतराळवीर आज अंतराळस्थानकात राहण्यासाठी रवाना होणार

           नासाची अंतराळ वीरांगना  काटे रूबिन्स ,रशियाचे अंतराळवीर Anatoly Lavanishin व जपानचे Takuya                       Onishi  -फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 6 जुलै
नासाच्या अंतराळ मोहीम 48-49 चे तीन अंतराळवीर आज अंतराळ स्थानकात राहण्यासाठी रवाना होणार आहेत
नासाची अंतराळ वीरांगना केट रूबिन्स ,रशियाच्या Rosmos चे अंतराळवीर Anatoly Lavanishin आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे Takuya Onishi  हे दोन अंतराळवीर आज कझाकस्थान येथील बैकोनूर येथून संध्याकाळी 9.36 वाजता सोयूझ MS-01ह्या सुधारित अंतरिक्ष यानाने अंतराळ स्थानकाकडे झेप घेतील या यानाच्या सुधारित सिस्टीमच्या दोन दिवसांच्या चाचणी नंतरच ते अंतराळस्थानकात पोहोचतील ह्या दरम्यान सोयूझ पृथ्वीच्या कक्षेत 34 फेऱया मारेल शनिवारी नऊ जुलैला  12.12 मिनिटांनी सोयूझ अंतराळ स्थानकात पोहोचेल दुपारी 2.50 मिनिटाला त्यांचे यान अंतराळस्थानकाला जोडले जाईल अंतराळ स्थानकात सध्या निवास करत असलेले नासाचे अंतराळवीर व मोहीम 48 चे कमांडर जेफ विल्यम्स Rosmos चे फ्लाईट इंजिनीअर Oleg Skripochka आणि Alexey Ovchinin  स्थानकात त्यांच्या स्वागताला हजर असतील हे सहा अंतराळवीर मिळुन अंतराळ स्थानकात सध्या सुरू असलेल्या सायन्स विषयक व इतर बाबींवर सखोल संशोधन करतील
अंतराळ प्रवासाची अशी केली तयारी 
ह्या अंतराळवीरांना ह्या मोहिमेत सहभागी होण्याआधी व आता अंतराळस्थानकात जाण्याआधी आवश्यक असलेल्या शारीरिक व मानसिक चाचणीला सामोरे जावे लागले त्यांची फिटनेस चाचणी घेण्यात आली
त्यांनी काल अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाचा व ज्यूनोच्या गुरुकक्षा प्रवेशाचा आंनद साजरा केला त्यांनी टेबलटेनीसचाही आनंद घेतला नंतर त्यांचे अंतराळवीरांचा पोशाख घालुन चेकिंग करण्यात आले त्यांना एकाग्रतेचे धडे देण्यात आले शिवाय त्यांना यानातील कमी जागेत बसण्याची चाचणी घेण्यात आली त्या साठी त्यांना एका विशिष्ट खुर्चीत बसवण्यात आले ,त्यांना एका फिरत्या खुर्चीवर बसवून ती खुर्ची ठराविक काळ वेगाने फिरवण्यात आली ह्या सर्व चाचणीतून ते फिट असल्याचा निर्वाळा मिळताच ते अंतराळ प्रवासासाठी सज्ज झाले
ह्या तिन्ही अंतराळवीरांनी वृक्षारोपणाचाही आनंद घेतला आणि ह्या नंतर अंतराळस्थानकात येणारया मोहीम 49 च्या अंतराळवीरांसोबत ग्रुप फोटोही काढला
     सोयूझ MS -01 चीही चाचणी 
सोयूझ MS -01 ह्या  सुधारित अंतरिक्ष यानाच्याही जाण्याआधी वेवेगळ्या स्थरावर आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या नंतर हे यान रेल्वेने कझाकस्थानातील बैकोनूर कास्मोड्रोम च्या लाँच पॅड वर पोहोचवण्यात आले त्यांच्या ह्या अंतराळ स्थानकाच्या प्रवासाचे  नासा T.V. वरून प्रक्षेपण केल्या जाईल
रुबिन्स केट विषयी 
रुबिन्स केट हि पहिलीच अंतराळ्वारी  आहे तिची ह्या अंतराळ मोहिमेसाठी 2009 साली निवड झाली होती रुबिन्स अमेरिकेतील कनेक्टिक्युट मधल्या फार्मिंगटन इथे जन्मली आणि कॅलीफोर्नियाच्या नापा मध्ये वाढली सन डियागो युनिव्हरसिटी मधून तिने Bsc molecular boilogy आणि stanford युनिव्हरसिटी मधून कॅन्सर Biology त Phd  केले आहे त्या आधी ती अमेरिकेच्या आर्मी मेडिकल रिसर्च Institute मध्ये कार्यरत होती तिथे तीने  संसर्गजन्य रोगांच्या संदर्भातील  संशोधनात सहभाग नोंदविला देवी रोगाच्या प्रसारावर नियंत्रण व प्रतिबंध ह्या संदर्भातील पहिले मॉडेल विकसित करण्यात तिचा महत्वपूर्ण सहभाग होता चौदा संशोधकांच्या संसर्गजन्य रोग नियंत्रण संशोधन चमूची ती प्रमुख होती त्यांनी सेन्ट्रल आफ्रिका व पश्चिम आफ्रिकेतील इबोला व monkey pox ह्या  संसर्गजन्य रोगाचे जीवाणू आणि त्यांचे अनुवंशिक दुष्परिणाम ह्या बाबतीत महत्वपूर्ण संशोधन केले आहे तिला रशियन म्युजिक ऐकायला आवडते
अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर  हे तिघेही तिथे आधीच वास्तव्यास असलेल्या अंतराळवीरांसोबत राहतील रुबिन्स अंतराळ स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत कमी गुरुत्वाकर्षाणाचा मानवी आरोग्यावर विशेषत: जीन्स ,हाडांच्या वस्तुमानातील बदल  हृदय ,रक्तवाहिन्या आणि रक्ताभिसरणातील अवकाशातील वातावरणात होणारे बदल ह्या संदर्भात सखोल संशोधन करणार आहे तसेच भौतिक विज्ञान ,पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान ,तंत्रज्ञान आणि विकास कामे ह्या संदर्भातही हे संशोधक संशोधन करतील अक्टोबर मध्ये तिचा अवकाश स्थानकातील संशोधनात्मक कार्यकाळ पूर्ण करून रुबिन्स तिच्या दोन सहकारी अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर परतेल

No comments:

Post a Comment