गुरु ग्रहांजवळील ज्यूनो अंतरिक्ष यान फोटो - नासा संस्था
नासाच्या संस्थेतील आनंद व्यक्त करणारे संशोधक - फोटो नासा संस्था
नासा संस्था -5 जुलै
नासाच्या ज्यूनो अंतरिक्ष यानाने तब्बल पाच वर्षाच्या अंतराळ प्रवासानंतर
चार जुलैला अखेर गुरूच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे
गेल्या पाच वर्षांपासून पृथ्वीवरून गुरु ग्रहाकडे अंतरिक्षात अखंड प्रवास करत असलेल ज्यूनो अंतरिक्ष यान गुरूच्या कक्षेत सुखरूप पोहोचल्याचा संदेश नासा संस्थेतील संशोधकांना प्राप्त होताच त्यांनी आनंदान जल्लोष केला अखेर त्यांच्या पाच वर्षांच्या कठोर परिश्रमाला मिळालेल यश होत ते! गेले पाच वर्ष ते ह्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते कारण ह्या आधी गुरु ग्रहावर गेलेल ह्या आधीच अंतराळ यान काही तासातच नष्ट झालं होत चार जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्य दीन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना हे संशोधक मात्र नासाच्या लॅब मध्ये बसुन ज्यूनोच गुरु ग्रहावरील कक्षेत शिरण आणि तिथे स्थिराऊन गुरु भोवती भ्रमण करण ह्याच निरीक्षण करत होते
पृथ्वीवर रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ज्यूनोन गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केल्याची बातमी मिळताच नासाचे प्रमुख चार्ली बोल्डेन आनंदित होऊन म्हणाले की आजच्या ऐतिहासिक घटनेमुळे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या आनंदात आता ज्यूनोच्या गुरु ग्रहाच्या कक्षा प्रवेशाच्या यशाची भर पडलीय त्या मुळे आमचा आनंद द्विगुणित झालाय
नासाचे संशोधक व ज्यूनोचे प्रिन्सिपल इन्वेस्टीगेटर स्कॉट बोल्टन देखील आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले आम्ही आज जरी खिडकीही नसलेल्या बंद खोलीत असलो तरी आमचा आनंद शब्दातीत आहे कारण आमच्या साठी नासाच्या संशोधक चमुच हे यश अमूल्य आहे ही त्यांच्या साठी अत्यंत कठीण कामगिरी होती आणि कठोर परिश्रमानंतर त्यांनी ती उत्तम रित्या पार पाडलीय
ज्यूनो गुरूजवळ जाताच त्याचे इंजिन जवळपास पस्तीस मिनिटे पर्यंत जळत होते त्या नंतर हळू हळू प्रचंड उष्णता व वेगामुळे तप्त झालेले त्याचे इंजिन थंड झाले आणि काही वेळातच त्याने गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला ज्यूनोने गुरूच्या कक्षेत प्रवेश केल्याचा संदेश नासाच्या कॅलिफोर्नियातील पसाडेना येथील जेट प्रपोर्शन लॅब (JPL) मध्ये आणि कोलेरॅडो येथील ज्यूनो ऑपरेशन सेंटर मध्ये प्राप्त झाला आणि ज्यूनो तिथे व्यवस्थित स्थिर झाल्याची माहिती नासाच्या कॅलिफोर्निया ,Goldstone, Canberra ,Australia येथे नासाच्या डीप स्पेस अँटेना द्वारे प्राप्त झाली तेव्हा पृथ्वीवर रात्रीचे 8.53 मी (PDT) झाले होते
पूर्व नियोजनानुसार ज्यूनो स्थिर असून त्याचे अंतर नियंत्रित व त्याचे स्वतः:भोवतीचे भ्रमण दोन फेऱया वरून पाच फेऱया पर्यंत आल्या आहेत त्याच्या इंजिनाच्या ज्वलन प्रक्रियेला नियोजित वेळात सुरवात झाली आणि काही वेळातच त्याची सौर प्रणाली कार्यान्वित झाली
ज्यूनो अंतरिक्ष यानाद्वारे माहिती मिळवण्याचे काम आताच सुरू होणार नाही ते जरी ऑक्टोबर मध्ये सुरू होणार असले तरी पण त्या आधीच आम्ही ही माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करू अशी आशा नासा प्रमुख Bolton व्यक्त करतात
ज्युनो अंतराळ यान गुरूच्या कक्षेत वीस महिने राहील आणि गुरु भोवती फेरया मारेल आजवरच्या मोहिमेतील गुरु ग्रहाभोवती भ्रमण करणारे ज्युनो हे पहिलेच अंतराळ यान आहे गुरूच्या कक्षेतील कार्यकाळात ज्युनो यान गुरु भोवती 37 फेरया पूर्ण करेल ह्या दरम्यान ज्यूनो यांनाद्वारे गुरु ग्रहावर खडडा करून तेथील घन पदार्थाचे अस्तित्व , तिथले वातावरण तेथील शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र ,पाण्याचे अस्तित्व ,अमोनियाचे व इतर घटकाचे प्रमाण ह्या बाबतीत संशोधन केल्या जाईल तसेच गुरु ग्रहाची उत्पत्ती कशी झाली त्याची रचना , सौरमालेतील त्याचे स्थान ,सौरमालेचा विकास कसा झाला आणि सौर मालेतील इतर मोठया ग्रहांबद्दल उपयुक्त माहिती ह्या मोहिमे मुळे मिळेल तसेच ह्या अंतरीक्ष यान मोहिमेमुळे शास्त्रज्ञांना गुरु ग्रहावरील अनेक गूढ रहस्याची उकल होण्यास मदत मिळेल
सद्या तरी मानवाने आपल्या अचाट बुद्धी कौशल्याच्या जोरावर गुरु ग्रहापर्यंत झेप घेतलीय आणि ती तितकीच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे हे निश्चित
No comments:
Post a Comment