Takuya Onishi (Japan Aerospace) केट रुबिन्स (नासा )Anatoly Lvanishin (Roscosmos )
अंतराळ प्रवासाला जाताना
विकसित M S-01 ह्या सोयूझ यानातून अंतराळवीर अंतराळाकडे झेप घेताना
नासा संस्था -7 जुलै
अमेरिका,जपान आणि रशियाच्या तीन अंतराळवीरांना घेऊन नवीन विकसित M S-01 ह्या सोयूझ यानाने बुधवारी सहा जुलैला नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी अंतराळ स्थानकाकडे यशस्वी झेप घेतली आहे सोयूझ यानाने कझाकस्थानातील बैकानूर मधून अंतराळात उड्डाण केले त्याच्या या उड्डाणाच्या ऐतिहासिक क्षणाचे नासा टी वी वरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले
मानवाच्या अफाट कर्तृत्वाने आणि तंत्रज्ञानाच्या आश्चर्यकारक प्रगतीमुळे प्रेक्षकांना घरबसल्या ह्या सोयूझ उड्डाणाचा आणि अंतराळवीरांच्या स्थानकाकडे प्रयाणाचा रोमांचकारी थरार अनुभवता आला
शिवाय अंतराळवीर होण्याआधी व नंतरचे अंतराळवीरांचे अथक परिश्रम व त्यांना द्यावी लागणारी कठोर चाचणी पाहता आली अंतराळातील कठीण परिस्थितीत व प्रतिकूल वातावरणात राहून मानवी आरोग्याशी निगडित पृथ्वीवासीयांसाठी व सृष्टीसाठी उपयुक्त असे संशोधन हे अंतराळवीर कसे करतात हेही जाणुन घेता आले
आता केट रुबिन्स (नासा ), Anatoly Lvanishin (Roscosmos ) व Takuya Onishi (Japan Aerospace) हे तीन अंतराळवीर दोन दिवसांनी नऊ जुलैला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी स्थानकात पोहोचतील तिथे त्यांचे सुधारित सोयूझ यान स्थानकाच्या Rassvet मोड्युलला जोडले जाईल आणि अडीच वाजता त्यांचा स्थानकात प्रवेश होईल तेव्हा आधीच्या बातमीत दिल्या प्रमाणे नासाचे स्थानकात राहात असलेले तीन अंतराळवीर त्यांचे स्वागत करतील नंतर सहाहीजण मिळून तिथे सुरू असलेल्या अडीचशेहून अधिक प्रयोगात सहभाग नोंदवतील Biology, Earth science, Human research,Physical Science आणि technology ह्या विषयांवर स्थानकात संशोधन सुरू आहे
ह्या मोहीम 48 च्या अंतराळवीरांवर नासाने नवीन संशोधित केलेले International Docking Adapter receive करून ते Install करण्याची जबाबदारी सोपवली आहे हे Adapter आगामी काळात स्थानकात जाणारया स्पेस क्राफ्ट साठी उपयुक्त ठरेल
अंतराळ स्थानकातील मानवी निवासाला आता जवळपास पंधरा वर्षाहून अधिक काळ झाला आहे ह्या काळात संशोकांनी स्थानकात अनेक उपयुक्त संशोधन करण्यात यश मिळवले आहे हे संशोधन पृथ्वीवर करणे अशक्य होते त्यांनी गोळा केलेल्या माहितीचा आणि संशोधनाचा उपयोग आगामी अंतराळ मोहीम विशेषतः मंगळ मोहिमेत मानवी निवासासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच रोबोटिक एक्सप्लोरेशन साठीही उपयुक्त ठरेल अशी शात्रज्ञाना आशा आहे
सध्या हे तीनही अंतराळवीर सोयुझच्या सुधारित यानाने अंतराळात प्रवास करत असून त्यांनी आतापर्यंत कित्येक की.मी.चे अंतर पार केले आहे ते जेव्हा स्थानकात पोहोचतील तेव्हा त्या क्षणांचे नऊ जुलैला नासा टीव्ही वरून लाईव्ह प्रक्षेपण केल्या जाईल
केट रूबिन्स आकटोबर मध्ये व Anatoly व Takuya हे दोघे सप्टेंबर मध्ये पृथ्वीवर परततील
फोटो सौजन्य- नासा संस्था

No comments:
Post a Comment