यवतमाळ -9 जुलै
पावसाची यवतमाळात आठ दिवस उशिराने पण दमदार सुरवात झाली असून जूनमध्ये सुरू झालेला पाऊस आज नऊ जुलै पर्यंत कधी तुरळक तर कधी जोरदार बरसला गेल्या आठ दिवसापासून तर पावसाची सततधार सुरू आहे गुरुवारी थोडा वेळ उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळ पासून अखंड बरसणे सुरू केले असून तो दिवसातून दोनदा मुसळधार बरसला आणि ह्या आठवड्यातही अनेकदा पावसाचा जोर वाढला त्या मुळे विदर्भातली आणि यवतमाळ जिल्यातली धरणाची पाणी पातळी वाढली आहे
पावसाची यवतमाळात आठ दिवस उशिराने पण दमदार सुरवात झाली असून जूनमध्ये सुरू झालेला पाऊस आज नऊ जुलै पर्यंत कधी तुरळक तर कधी जोरदार बरसला गेल्या आठ दिवसापासून तर पावसाची सततधार सुरू आहे गुरुवारी थोडा वेळ उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळ पासून अखंड बरसणे सुरू केले असून तो दिवसातून दोनदा मुसळधार बरसला आणि ह्या आठवड्यातही अनेकदा पावसाचा जोर वाढला त्या मुळे विदर्भातली आणि यवतमाळ जिल्यातली धरणाची पाणी पातळी वाढली आहे
तरीही पाणी पुरवठा आठवडयातून एकदाच
गेले दीड महिने यवतमाळकर पाणीटंचाईची झळ सोसत असून आता पाऊस भरपूर पडत असताना तरी पाणी टंचाईतून मुक्तता मिळावी अशी रास्त अपेक्षा यवतमाळचे नागरिक व्यक्त करत आहेत ह्या महिन्यात बरेचदा बाहेर धो,धो, पाऊस बरसत असताना घरातील नळाला मात्र पाणी नाही अशी अवस्था होती
शिवाय पाणीटंचाईने त्रस्त नागरिक पाणी पुरवठा विभागात फोन करतात तेव्हा तो कधीच उचलल्या जात नाही पाणी अनियमित तेही कमी दाबाने येते त्या मुळे पाणी भरण्यात गृहिणींचा दिवसभर वेळ जातो शिवाय आठ दिवस पाणी येणार नसल्यामुळे पाणीसाठा आठ दिवस पुरेल एव्हढा करावा लागतो उन्हाळ्यात धरणातील अत्यल्प पाणीसाठयामुळे लोकांनी पाणीपुरवठा विभागाला साथ दिली पण आता पाऊस सतत बरसत आहे तेव्हा आता तरी पाणी पुरवठा नियमित व्हावा अशी मागणी यवतमाळकर करत आहेत
निधी मंजूर पण नियोजनाचा अभाव
पाणी टंचाईच्या निवारणासाठी शासनाने निधी मंजूर केल्याची बातमी मिळाली असली तरीही अजूनही पाणी टंचाई आहेच! एका टाकीवरच अनेक विभागात पाणीपुरवठा करण्याचा भार असल्याचे सांगितले जाते मग जास्तीच्या पाणीटाक्या का बांधल्या गेल्या नाहीत ? काही टाक्यांचे बांधकाम अर्धवटच का राहिले? पाणिपुरवठा करणारया पाईपलाईन सतत का फुटतात? आलेला निधी कोठे गायब होतो ? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेले असून संबंधितांनी ह्या बाबतीत लोकांच्या प्रश्नांचे निरसन करावे पाणी अजूनही गढुळच येते पाणी गाळून घेतले तरी त्यात माती राहातेच पाण्यातून तुरटी फिरवली की ही माती टाकीच्या तळाशी जमते सध्या पावसाळा सुरू असून असे पाणी निरोगी लोकांच्या आरोग्यालाच अपायकारक असताना ज्यांना विविध आजार आहेत त्यांच्यासाठी असे पाणी पिणे किती घातक ठरू शकते ह्याचा विचार करून पाणी व्यवस्थित शुद्ध होते की नाही हेही संबंधितांनी पाहणे आवश्यक आहे निवडून येण्याआधी दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देणारे नेते अजूनही आठ दिवसांचं पाणी चार दिवसांनी सोडण्यात येणार म्हणून आश्वासन देतात पण आधी म्हटल्या प्रमाणे बाहेर धो,धो, पाऊस आणि घरातल्या नळांना पाणी नाही अशी परिस्थिती का आहे ? विषेश म्हणजे मुसळधार पाऊस पडत असताना अंगणात बादल्या ठेऊन व पाणीटाक्यांचे झाकण उघडे ठेऊन त्यात जमलेले पाणी घरात वापरून लोक पाणीटंचाईवर मात करत आहेत
सध्या नागरिक शांत असले तरी ते जागृत झाले की कसा उद्रेक होतो हे नुकतेच यवतमाळकरांनी दाखवून दिले आहे तेव्हा लवकरात लवकर आलेला निधी पाणीटंचाई निवारण्यासाठी वापरून लोकांना नियमित पाणीपुरवठा करावा अशी यवतमाळकरांची रास्त मागणी आहे हि बातमी लिहताना यवतमाळ येथे पाऊस बरसत आहेच
No comments:
Post a Comment