दत्त चौकातील रस्त्यावरील खड्डे
यवतमाळ -28 जुलै
सध्या यवतमाळ मधील कुठल्याही रस्त्यांवर नजर टाकली कि, खड्डेच खड्डे दिसतात विशेष म्हणजे पावसाळ्या पूर्वी उन्हाळ्यात काही ठिकाणचे रस्ते दुरुस्त करण्यात आले होते आणि आता उशिराने सुरु झालेल्या पावसाला दिड महिने होत नाही तोच आणि दुरुस्तीनंतर तीन चार महिन्यातच ह्या रस्त्यांचे मूळ रूप लोकांना दिसू लागलेय
यवतमाळ येथील दारव्हा रोड ते आर्णी रोड ,वडगावरोड ,दत्तचौक ते जाजु चौक , माईंदे चौक ,वीर वामनराव चौक ,दाते कॉलेज रोड ,तिथून पुढे आर्णी नाक्याकडे जाणारा रोड ,भाजी मंडई ,आठवडी बाजार अशा यवतमाळातील असंख्य रस्त्यांची अशीच दुरावस्था झाली आहे
आर्णी रोडवरील रस्त्याचा तर काही ठिकाणी चुराडाच झालाय सर्वच रस्ते उखडले आहेत जागोजागी रस्त्याचा मुरूम बाहेर पडल्यामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत ,स्पीड ब्रेकरही उखडलेल्या अवस्थेत आहेत काही ठिकाणी लोकांनी ह्या खड्ड्यात गिट्टी ,फरशीचे तुकडे भरल्यामुळे रस्त्यांवरून जाणारे नागरिक रिक्षाचालक ,दुचाकीस्वार ,गाडीवाले ह्या साऱयांनाच थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास त्रास होत आहे
भाजी मंडईच्या रस्त्यांचे खडकाळ रूप
दत्त चौकातून दुभाजकाचा भाजी मार्केट कडे जाणारा रस्तादेखील नुकताच दुरुस्त करण्यात आला होता विशेष म्हणजे दुरुस्ती नंतर हा रस्ता त्यात वापरलेल्या मोठ्या दगड गोटयांमुळे खडकाळ झाला होता त्या मुळे तिथून पायी जाणारया नागरिकांना आपला तोल सावरतच जावे लागत होते त्या रस्त्याचे काम अर्धवट सपाटीकरण न करता तसेच ठेवले होते त्या मुळे आपण रस्त्यावरून चालतोय का एखाद्या खेड्यातील खडकाळ पायवाटेवरून अशी शंका नागरिकांना येत होती आणि आता तर त्या रस्त्यांची दुरावस्था झालीय तिथे मोठमोठे खड्डे पडलेत त्यातून गिट्टी ,दगड बाहेर आलेत त्या मुळे इथे भाजी घेण्यास येणारया लोकांना हा रस्ता धोकादायक ठरतोय
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर पण रस्त्यांची अवस्था दयनीय
यवतमाळ मधील रस्ते दुरुस्तीसाठी शासनातर्फे कोट्यवधीचा निधी मंजूर झाला होता तशा बातम्याही पेपरमधून प्रकाशित झाल्या होत्या तरीही रस्त्यांचे काम अर्धवट ,निकृष्ठ दर्जाचे का झाले ? हा निधी कोठे गायब झाला? ह्याचा शोध संबंधितांनी घेणे आवश्यक आहे रस्त्यांचे काम करणारे अधिकारी ,कर्मचारी ,नगरसेवक व कंत्राटदार ह्या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे त्या साठी आता लोकांनीच जागृत होणे आवश्यक आहे कारण लोकांनीच ह्या नेत्यांना .नगरसेवक ,नगराध्यक्षांना निवडून दिले आहे आता पुन्हा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे ह्या निवडणुकी आधीच लोकांनी ह्या सर्वांना रस्ते दुरुस्त करण्यास भाग पाडावे
फोटो - पुजा दुद्दलवार (BE Soft & BMC )
No comments:
Post a Comment