फोटो -नासा संस्था -सूर्यमालेबाहेरील तारा व त्या भोवती फिरणारे दोन ग्रह
नासा संस्था - 24 जुलै
नासाच्या हबल टेलिस्कोपच्या साहाय्याने टिपलेल्या छायाचित्रामुळे खगोल संशोधकांना आपल्या सूर्यमाले बाहेरील दोन पृथ्वी सारख्या वातावरण असण्याची शक्यता असलेल्या नवीन ग्रहांचा शोध लागला आहे
Trappist- 1 b व Trappist- 1 c असे नाव असलेले हे दोन पृथ्वी सदृश्य भासणारे ग्रह पृथ्वीपासून जवळपास चाळीस प्रकाशवर्ष दूर असून ताऱ्याचे वय अंदाजे पाचशे दशलक्ष असावे असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे हे दोन ग्रह सूर्यमालेबाहेर एका लाल रंगाच्या सूर्यापेक्षा लहान व सूर्यापेक्षा थंड अशा छोटया ताऱया भोवती फिरत आहेत
ह्या ग्रहांच्या शोध पहिल्यांदा 2015 साली इसाच्या खगोल संशोधकांनी लावला चिली मधल्या La Silla Observatory येथील Belgian Robotic दुर्बिणीच्या साहाय्याने संशोधकांनी केलेल्या निरीक्षणामुळे ह्या ग्रहांचा शोध लागला
Trappist-1 b ह्या ग्रहाला त्याच्या ताऱ्याभोवती एक परिक्रमा करण्यास दिड दिवस तर Trappist -1 c ह्या ग्रहाला एक परिक्रमा करण्यास अंदाजे अडीच दिवस लागतो
चार मेला हे दोन्ही ग्रह त्यांच्या ताऱ्यासमोरून काही मिनिटांच्या फरकांनी परिक्रमा करत असतानाचा क्षण खगोल संशोधकांनी अचूक पकडला कारण असा योग दर दोन वर्षातून एकदाच येतो ह्या ग्रहाच्या वातावरणातुन फिल्टर होऊन आलेल्या प्रकाशाचे त्यांनी मोजमाप केले त्याचे रासायनिक पृथ:करण अजून पूर्ण व्हायचे असले तरीही तिथल्या वातावरणात हायड्रोजनचे प्रभुत्व नसल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केलाय जर वातावरणात हैड्रोजन व हेलियमचे प्रमाण जास्त असले तर जीवसृष्टी अस्तित्वात असू शकत नाही कारण अशा वातावरणात सजीव गुदमरुन मरू शकतात त्या मुळेच तिथे जीवसृष्ठी असावी अशी शक्यता संशोधकांना वाटतेय
ह्या ग्रहांचे त्यांच्या ताऱ्यापासूनचे अंतर पृथ्वीचे सूर्यापासून असलेल्या अंतरापेक्षा वीस ते शंभर पटीने कमी असून तो तारा सूर्या एवढा प्रखर तळपता नाही ह्या ग्रहांवर समशीतोष्ण वातावरण असल्यामुळे Trappist -1c वर खासकरून पाणी असण्याची शक्यता संशोधकांना वाटतेय
संशोधकांच्या एका चमूने Julien de Wit (MIT Combridge) ह्याच्या नेतृत्वात दुर्बिणीच्या फिल्ड कॅमेरा 3 चा वापर करून ग्रहांच्या वातावरणातुन येणाऱ्या प्रकाश किरणांचे इन्फ्रा रेड लाईट मध्ये निरीक्षण केले या प्रकाशकिरणांचे Spectroscopy द्वारे पृथ:करण करून त्यांनी ग्रहांवरील वातावरणातील रासायनिक घटक शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्यात हैड्रोजन व हेलियमचे प्रमाण कमी प्रमाणात असल्याचे आढळले त्यामुळेच त्यांची तिथे जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता बळावली
अर्थात हे सध्याचे प्राथमिक निरीक्षण आहे आगामी काळात ह्या ग्रहांचे सूक्ष्म व सखोल निरीक्षण संशोधक करतील आणि त्या नंतरच ह्या दोन्ही ग्रहांचे पृष्ठभाग खडकाळ आहे का ? तिथे पाणी अस्तित्वात आहे का? तेथील वातावरण सजीवांना जिवंत राहण्यासाठी पोषक आहे का? पृथ्वी व शुक्राप्रमाणे तेथील वातावरण विरळ आहे का? तिथल्या वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड ,ओझोन ,मिथेन व पाण्याच्या वाफेचे अंश आहेत का? ह्याचे सखोल संशोधन केल्यानंतरच तिथे जीवसृष्ठी अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतील असे मत संशोधक व्यक्त करतात
No comments:
Post a Comment