Saturday 27 December 2014

वर्ष सरताना

                                            पाहता वर्ष सरल देखील ! तस ते दरवर्षीच सरत अन पुन्हा नव्यान नव्या उत्साहात उगवतही अगदी सूर्यासारखच रोजच उगवण अन मावळण.  पण सूर्य रोज उगवतो तर वर्ष एकदाच भारतात वर्षातून तीनदा वर्ष बदलत हिंदुधर्माप्रमाणे गुडीपाडवा ,दिवाळीच्या पाडव्याला व्यावसायीकांच नव वर्ष सुरु होत जूनमध्ये शाळा ,कॉलेजेस आणि ऑफिसेसच वर्ष बदलत आणि जानेवारीत कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष सुरु होत. पण बदलत म्हणजे नेमक  काय होत? तर सार तेच तसच रहात ! काही चांगले बदल सुखकारक तर वाईट दुख:दायक!
                                           पण तरीही ३१डिसेंबरला रात्रीच उत्साहाला उधाण येत .हॉटेल्स लाईटिंगन झळाळतात, पार्ट्या रंगतात गायन,नृत्यात रात्र साजरी होते आणि जुन्याची कात टाकत नववर्ष नवा आकडा लेवून वर्षभर कॅलेंडरवर विराजमान होत नवे संकल्प केले जातात अन लवकरच विसरलेही जातात          
                                        नेहमी प्रमाणे हेही वर्ष अनेक चांगल्या वाईट घटनांनी गाजल भारतीयांची सगळ्यात अभिमानास्पद बाब म्हणजे यशस्वी मंगळ मोहीम .  Nov.२०१३ला इस्रो ने प्रक्षेपित केलेल मंगळयान दिवाळीच्या आधी २४सप्टें ला मंगळावर पोहोचल शास्त्रज्ञानी आपल्या कुशाग्र बुद्धींन,कुशल नेतृत्वात ,कमी खर्चात उच्च प्रतीच तंत्रज्ञान वापरून मंगळ मिशन यशस्वी केल आणि दिवाळीला आपल्या कर्तुत्वाचा दिवा थेट मंगळावरच चेतवला आजवर मंगळ अपशकुनी ,अपयश देणारा म्हणून दोषारोपित होता तो क्षणार्धात आत्मतेजान उजळला आणि अफवा पसरवणारयास त्यान "रेड सिग्नल " दिला तिथे तो पोहोचला तेही " सर्वपित्री अमावस्या" ह्या अपवित्र समजल्या जाणारया दिवशी.मंगळयानान तिथे पोहोचताच वक्री मंगळाचे विलोभनीय सुंदर फोटो पाठवून लोकांना घरबसल्या मंगळाच अमंगळपण पुसत मंगल दर्शन घडवल आणि आता मंगळावर जीवसृष्ठी, पाणी होत ह्या गोष्टीला पृष्ठी देणारे पुरावे तो पाठवू लागलाय त्या मुळे मंगळवारचे प्रगत सूक्ष्म स्वरूपातले लोक तबकडीतून पृथ्वीवर येतात ह्या अफवांना आता पूर्ण विराम मिळालाय
                                       भारत पहिल्याच प्रयत्नात स्वबळावर कमी खर्चात मंगळमोहीम यशस्वी करणारा पहिला देश तर मंगळ मोहीम राबवणारा चवथा देश ठरलाय विशेष म्हणजे ह्या मोहिमेत काही महिला वैज्ञानिकांचाही सहभाग आहे . नुकताच भारतान इस्रो ह्या संशोधन संस्थेतून GSLV mark३ ह्या Rocket च यशस्वी प्रक्षेपण केलय हे रॉकेट ४०००kg वजनाचा उपग्रह आणि मानवालाही अंतराळात पोहचवू शकेल शिवाय दूरसंचार क्षेत्रातही मोठी क्रांती होईल.
                                       ह्या वर्षी निवडणूक होऊन सत्ता पालट झाला  हे वर्ष खरया अर्थान मोदींनी गाजवलं निवडुन येण्याआधी आणि नंतरही त्यांनी देशात सभा गाजवल्या विशेषत: काश्मीर सारख्या संवेदनशील भागातला त्यांचा यशस्वी प्रचार दौरा विलक्षण होता त्यांनी तिथल्या लोकांची मने जिंकली त्यांना दिलेली आश्वासने मात्र ते पाळतात का ? हे लवकरच कळेल दरम्यान दहशदवाद आणि पूराच थैमान ह्या मुळे परिस्थिती बदलली असली तरीही भाजप तिथे दुसरया स्थानावर निवडून आलाय आणि लवकरच पी डी पी च्या सोबत सत्ता स्थापण्याच्या तयारीत आहे.
                                     त्यांचा शेजारील राष्ट्रांचा परदेश दौराही विशेष गाजला पाकिस्तानन नेहमी प्रमाणे आपला दुटप्पीपणा दाखवला पण इतर देशांनी मोदींच सहर्ष स्वागत केल मोदिभेटीच्या परदेश दौरयाच वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांनी लोकांना घरबसल्या जपानच "Golden  Pavilion Temple  ", नेपाळच "पशुपतीनाथ मंदिर" च नव्हे तर "अमेरिका वारी "घडवली अमेरिकेतल्या भारतीयांची दुकाने ,हॉटेल्स तिथे मिळणारे भारतीय पदार्थ ,इडली,डोसा,साउथ इंडियन नार्थ इंडियन जेवण ,भारतीय वस्तु ,तिथल्या लोकांच राहणीमान ,गरजा अपेक्षा सारच पत्रकारांनी लोकांपुढे आणल "Madison  square " इथल भाषण ऐकायला आलेल्या तिथल्या भारतीयांची उपस्थिती लक्षणीय होती आणि त्या निमित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलेली मोदी फरसाण लाडू ,मिठाईची पाकिटेही
                                     गृहिणींसाठी हे वर्ष आनंददायी ठरल ते आताच्या कमी झालेल्या सोन्याचांदीच्या भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील उतरलेले कच्च्या तेलाचे भाव ,डॉलरचे वाढते भाव ,शेअर्सची वाढती किंमत आणि ह्या मुळे काही देशात विक्रीस निघालेले सोने ह्या मुळे सोन्या चांदीचे भाव उतरले पण लगेचच सोने व्यापाऱ्यांची बैठक झाली सोने आयात केल्या गेले त्या मुळे भाव काही प्रमाणात वाढले अजूनही भावात चढ उतार सुरु आहे.
                                     ह्या वर्षी विशेष नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला आणि कित्येक वर्षापासून भोळ्या भाबड्या भक्तांचा गैरफायदा उठवणाऱ्या आसारामबापू ,त्याचा मुलगा नारायण साई,भोंदू साधू रामपाल ह्यांचा पर्दाफाश होऊन त्यांना अटक झाली त्यांच्या अगम्य लीला पाहून लोक आवाक झालेत असे भोंदू साधू आणि त्यांचे चेले त्यात महिलाही असतात लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवत आपल्या जाळ्यात ओढतात त्यांना अंधश्रद्धेच्या नादी लावून भजन कीर्तनात अडकवतात जे नागरिक भजन कीर्तनाला जात नाहीत त्यांना एकी करून त्रास दिल्या जातो विशेष म्हणजे ज्या नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धेला विरोध केला त्यांची हत्या झाली आणि वर्षानंतरही मारेकरी सापडत नाहीत हे दुर्दैव! ह्या वर्षीही गुप्त धनासाठी बळी दिल्या गेले आणि त्यांना पकडण्यात यशही आल.ह्या वर्षी आफ्रिकेत इबोला रोगाची साथ आली त्याचे काही रुग्ण भारतातही आढळले ह्या रोग्यांवर उपचार करणारया काही  डॉक्टरांनाही ह्या रोगाची लागण झाल्याने प्राणास  मुकावे लागले डेंगू ह्या डासामुळे होणारया रोगाचीही साथ आली आणि अजूनही सुरु आहे डेंगू मुळे ही काहीजण मरण पावले
                                  ह्या वर्षी उशिराने आलेल्या पावसान काश्मिरात हाहा:कार उडवला रस्ते ,पूल वाहून गेले घर,शेती पाहता,पाहता उध्वस्त झाली कोट्यावधीच नुकसान झालं बरयाच वर्षांनी पर्यटकांनी गजबजलेल अध्ययावत काश्मीर क्षणात होत्याच नव्हत झाल पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीला लष्कर धावल त्यांच्या राहण्याची जेवण खाण्याची औषधाची त्यांनी सोय केली आता हळू हळू काश्मीर सावरलय हे तिथे झालेल्या निवडणुकीन सिद्ध केलय",माळीण"  गावही असच एका रात्रीत उध्वस्त झाल अवकाळी झालेल्या गारपिटीन ह्याही वर्षी शेतकऱ्यांच  नुकसान झाल आणि काही प्रमाणात थांबलेलं शेतकरी आत्महत्या सत्र पुन्हा सुरु झाल हि चिंतनीय बाब आहे.
                                ह्या वर्षी दुनियादारीप्रमाणे" टाईम पासन" लोकांना सिनेमागृहा पर्यंत आणल fandry ,टपालन आंतरराष्ट्रीय बक्षीस पटकावल सुचित्रा सेन ,नंदा ,रवि चोपडा ,देवेन वर्मा ,स्मिता तडवळकर ,विनय आपटे ,कुलदीप पवार,जोहरा सैगल नयनतारा आपटे ,सदाशिव आम्रापुरकर ह्या सारखे दिग्गज सिनेतारे काळाच्या  पडद्याआड गेले. टी वी जगतात काही नवीन मालिका आल्या काही बंद झाल्या पण काही अपवाद वगळता मालिकेत तोचतो मसाला, कुटील कारस्थान सुरु आहेत अमिताभ बच्चन यांनी मात्र करोडपतीतून आपली लोकप्रियता कायम राखलीय
                               नव्या वर्षात लोकांना नव्या सरकारकडून नवे बदल अपेक्षित आहेत त्यांना सुरक्षित ,शांत,महागाई ,भ्रष्टाचार मुक्त जीवन जगायचय त्यांच्या दैनदिन गरजा भागवून चोर ,दरोडेखोरांना पकडून तुरुंगात डांबून कठोर कारवाई करावी अशी लोकांची रास्त अपेक्षा आहे पाहूयात काय होतय ते !
 तूर्तास वर्ष संपतय नव उगवतय ते चांगल असू दे अशी अपेक्षा करू यात !

Saturday 20 December 2014

यवतमाळ येथे बंद नाल्यांची आवश्यकता

             यवतमाळ येथे गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांची उघड्या नाल्या बंद करा अशी मागणी आहे पण नगरपरिषद ह्या बाबतीत उदासीन आहे. यवतमाळात सद्या डासांचा प्रादुर्भाव वाढला असून हि समस्याही बरयाच वर्षाची आहे यवतमाळकरांना सतत डास पिटाळून लावणाऱ्या साधनांचा वापर करावा लागतो मध्यंतरी डासांचा त्रास होऊ नये म्हणून डास फवारणी यंत्र आणले गेले काही दिवस फवारणी करण्यात आली पण नंतर ते यंत्र व फवारणी दोन्हीही दिसेनासे झाले. 
               सद्या सर्वत्र डासांमुळे उदभवणारया मलेरिया व डेंग्यू ह्या रोगाची साथ आहे काही ठिकाणी हत्तीरोगाचे रुग्णही आढळले आहेत पण तरीही नगर परिषदेकडून डास निर्मूलनाचे उपाय केल्या जात नाहीत. 
डासांची उत्पत्ती उघडया नाल्यामुळेही होते.नाल्यात उडून आलेल्या कचरयामुळे किंव्हा काही नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे नाल्या  तुंबतातआणि त्या भरून वाहू लागतात त्याच घाण पाण्यात रोगजंतू व डासांची पैदास होते ह्या नाल्या नियमित साफ केल्या जात नाहीत नगरसेवक व नगरपरिषद ह्या कडे दुर्लक्ष करतात  नागरिक तक्रार करतात त्याहीकडे ते दुर्लक्ष करतात त्या मुळे  नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते कधी,कधी नाली भरल्याने हे घाणपाणी  रस्त्यावरून वहात नागरिकांच्या घरातही शिरते. शिवाय ह्या नाल्यात डूकरेही शिरतात आणि घाणीत भर टाकतात म्हणूनच नगराध्यक्षांनी ह्या कडे लक्ष देऊन कडक कारवाई करणे आवश्यक आहे शिवाय जे नगर सेवक कामे करत नाहीत त्यांच्यावरही कडक  कारवाई करणे आवश्यक आहे पण तसे होत नाही 
नाली अंडर ग्राउंड करणेही अत्यंत आवश्यक आहे त्या मुळे डासांचा त्रास कमी होईल शिवाय दोन्ही बाजूच्या उघडया नाल्यांमुळे रस्त्याची रुंदी कमी होते व रहदारीस अडथळा होतो तो होणार नाही. पण अंडर ग्राउंड नाल्यांना प्राधान्य न देता  नको तिथे खर्च केल्या जातोय विशेषत: बागेवर पण बागेपेक्षा लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे डेंगू मुळे काहींना जीव गमवावा लागलाय ही गंभीर बाब असतानाही त्या कडे दुर्लक्ष केल्या जातेय .  
                 आता नागरिकांनी अशा गोष्टींना विरोध करावा आणि नगरपरिषदेची निवडणूक दरवर्षी धेणे भाग पाडावे कारण एकदा निवडून आले की हे नेते पाच वर्षे निश्चिंत होतात व काहीही करत नाहीत रस्त्यावरचे खड्डे, नियमित पाणीपुरवठा या सारख्या  नागरिकांच्या अनेक समस्येशी त्यांना काहीही  देणेघेणे नसते.  

शास्त्री नगर मधली तुंबलेली नाली 
भरून वाहणारी नाली 

Friday 12 December 2014

तिरुपती तिरुमला देवस्थानात भाविकांची गर्दी ,सुरक्षा व्यवस्था कडक

     

       सप्तगीरीच्या पर्वत रांगेच्या निसर्गरम्य व घनदाट वृक्ष राईत वसलेल्या तिरुपतीच्या दर्शनाला नेहमीच हजारो भाविकांची गर्दी असते सहा डिसेंबरला बाबरी मशीद पाडल्या नंतर झालेल्या दंगलीमुळे इथे सहा डिसेंबरला नेहमीच कडक तपासणीला सामोरे जावे लागते ह्या वर्षी सहा डिसेंबर व सात डिसेंबरला विक एन्ड आल्याने पर्यटन प्लस श्रद्धा साधत ,आंध्र ,तेलंगणा व इतर भागातील लोकांनी तिरुपती दर्शनासाठी गर्दी केली होती त्या मुळे चेकपोष्ट जवळ वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या तेथे येणारया पर्यटकांची ,वाहनांची कडक तपासणी होत होती त्या नंतरच तिरुपतीत प्रवेश मिळत होता.

           " गोविंदा ,गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा  S S s s s "च्या गजर करत हजारो भाविक तिरुपतीचे दर्शन घेत होते.  धर्म दर्शन ,स्पेशल दर्शन आणि तिरुपतीच्या नियमित सेवांचे दर्शन घेणारया भाविकांच्या लांबचलांब रांगा मंदिराच्या बाहेर पर्यंत लागल्या होत्या नेहमीच्या सुप्रभातामच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केल्याने  सभामंडप भरून गेला त्या मुळे  बरयाच भाविकांना सभा मंडपा बाहेर थांबावे लागले.


              मंदिरात लोटांगण प्रदक्षिणा घालणारया भाविकांचीही रांग होती त्यांना त्या नंतर मोफत दर्शन दिल्या जाते असे काहींनी सांगितले सद्या काही समाजसेवक तिथे तिरुपतीची मोफत सेवा करण्यासाठी आले असून त्यात काही शिक्षित तरुणही होते ते नियमित तिथे आठवडाभरासाठी येतात व रांग नियंत्रण ,भोजन व्यवस्था व इतर कामे करतात असेही त्यांनी सांगितले.
           तिरुपतीला आलेले काही भाविक तिरुपतीला केस अर्पण करतात त्यात सुशिक्षित तरुण जोडपे लहान,थोर नागरिक ,काही कुटुंबही आपले मुंडन करतात हिंदु संस्कृतीत सवाष्ण बायका मुंडण करत नसल्या तरी आंध्र तेलंगणात मात्र सर्रास बायका देवाला केस अर्पण करतात त्या साठीही कल्याण कट्टयावर रांग लागते मागे एक महाराष्ट्रीयन तरुणांचा ग्रुप भेटला तेव्हा त्यांनी ते सारेच नियमित तिरुपतीला येतात व केस अर्पण करतात असे सांगितले होते.
          तिरुपतीचा लाडूचा प्रसाद हा जगप्रसिद्ध आहे त्या मुळे लाडू विकत घेण्यासाठीहि रांग लावावी लागते तेही कुपन काढून दररोज इथे लाखो लाडूंची विक्री होते शुद्ध तुपातल्या लाडूत भरपूर सुका मेवा,खडीसाखरेचा वापर केलेला असतो तिरुपती दर्शना नंतर लाडूचा प्रसाद दिल्या जातो पण आता त्याचा आकार वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे खूप छोटा झाला आहे तिरुपतीला आलटून पालटुन दही भात,चिंचेचा भात गोड भाताचाही प्रसाद वाटल्या जातो तिरुपतीचा उडीद वड्याचा प्रसादही प्रसिद्ध आहे पण आता तो मिळत नाही फक्त दिवसभरच्या विशिष्ठ सेवांच्या दर्शन तिकीट घेणारयांनाच तो दिल्या जातो तोही अल्प प्रमाणातच मिळतो
                खाली गोविंदराज टेंपल मधेही भाविक गर्दी करतात इथे तिरुपती बालाजीची मापावर डोके ठेवलेली निद्रिस्थ मूर्ती आहे तिरुपती हा श्रीमंत देव त्या मुळे पैसे मोजता मोजता त्याला झोप लागली अशी आख्यायिका सांगितल्या जाते तिरुपतीला असलेल्या हुंडीत दररोज लाखो रुपये व सोने दान स्वरूपात जमा होते. 

Monday 1 December 2014

काश्मिरी शाल विक्रेते विदर्भात दाखल

                               काश्मीर मध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे आलेल्या पुराच्या तांडवान काश्मीर मधल्या व्यावसायिकांच आतोनात नुकसान झाल श्रीनगर मधल्या लाल चौक मधली अध्ययावत काश्मिरी शोरूमस पुर बाधित झाल्यान करोडोच नुकसान झाल त्यातल्या वस्तू ,कपडे चिखलान माखाल्यान मातीमोल झाले ज्यांची दुकाने पुरापासून लांब होती व ज्यांनी पुराचा धोक्याचा इशारा मिळताच थोडफार सामान बाहेर काढण्यात यश मिळवल त्याचं सामान वाचल पण बहुसंख्य लोकांची दुकान पुराच्या तडाख्यात सापडल्यान आपल नुकसान कस भरून काढाव ह्या विवंचनेत ते आहेत.

  काश्मिरी  कशिदा विणकर महिला -फोटो सौजन्य - साहिल भट
                            दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी थंडी सुरु होताच काश्मीरमधून काश्मिरी शाल,स्वेटर्स ,साड्या ,ड्रेस मटेरियल ,स्कार्फ व इतर वस्तू विक्रीसाठी आलेले अनंतनाग इथल्या" मटन नम्बई" ह्यागावचे रहिवासी "साहिल भट व मोहोम्मद भट" सांगत होते ,गेल्या ३६ वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय आहे त्यांचे एकत्र कुटुंब आहे त्यांची तीन घरे व हॉटेल आहे त्यातली दोन घरे,शेती ,त्यातली तांदूळ,आक्रोड्ची झाडे व इतर पिके पुरात वाहून गेल्याच ते सांगतात एक घर व हॉटेल पुराच्या क्षेत्रापासून लांब असल्याने ते वाचल" नम्बईमटन" गावात त्याचं " जन्नत ई काश्मीर{क्राफ्ट ऑफ काश्मीर }" नावाच शोरूम आहे त्यांचे कुटुंबीय कापड विकत घेऊन त्यावर काश्मिरी कशिदाकारी करतात. एक ड्रेस विणायला चार दिवस लागतात पण त्याचा मोबदला मात्र फार कमी पोटापुरता मिळतो कारण तिथे घराघरात विणकर आहेत त्या मुळे स्पर्धा असतेच आणि त्यांचा माल दलाला मार्फत विकल्या जातो ह्या वर्षी मात्र त्यांच्यावर निसर्गाची अवकृपा झालीय त्यांनी काही माल आधीच विक्रीसाठी पाठवल्याने तो वाचला त्यांच्या लुधियानातील एका मित्रांनी त्यांना ह्या संकटकाळात मदत केलीय व आपल्या जवळील स्वेटर्स विक्रीसाठी उधारीवर दिलेत पण श्रीनगर मधल्या पूरग्रस्तांचे लाकडी  हातमाग यंत्र व इतर साधन पुराच्या पाण्याने खराब झाली त्या मुळे तिथला धंदा  ठप्प आहे शिवाय ज्या मेंढया पासून पश्मीना वूल मिळते त्या देखील पुरात वाहून गेल्यान नुकसान झालय

     काश्मिरी काशिदाकरीत मग्न असलेल्या महिला -फोटो सौजन्य -साहिल भट
                              म्हणूनच ह्या वर्षी त्यांच्या जवळील शाल साड्या ,  ड्रेस मटेरियल्स महाग आहेत त्यांची किंमत ५००ते १५-२०हजरा पर्यंत आहेत ह्या वर्षी त्यांनी पश्मीना वूलच्या तलम व मऊ पण उबदार शाली विक्री साठी आणल्यात त्यांच्याकडे ४०gm वजनाची सिल्कची साडी व शाल विक्रीसाठी उपलब्ध आहे
                              साहिल भट व महम्मद चाचा सांगतात कि काश्मिर मध्ये पर्यटक आले कि आमच्या मालाला चांगला भाव मिळतो बरेच दिवसांनी काश्मीर पर्यटकांनी गजबजल होत आता तिथे सिनेमाच शुटींगही सुरु झाल होत पण निसर्गाची अवकृपा झाली अन होत्याच नव्हत झाल तिथल्या परिस्थिती बद्दल सांगताना ते म्हणतात असा पूर आम्ही ह्या आधी पहिला नव्हता भयंकर हाहाकार उडाला सार क्षणात पाहता,पाहता जमीनदोस्त झाल ज्यांची घर पक्क्या विटांची होती ती वाचली पण ज्यांची घर कच्या मातीची होती ती घर ,दुकान शेत त्यातली पिक सारी वाहून गेली आक्रोड ,सफरचंदाच्या बागा ,बदाम सुकामेवा ,तांदूळ आणि इतर पिक तर गेलीच पण सर्वात जास्त नुकसान केशर बागेच झालय त्या मुळे त्याच पिक अत्यल्पच उरल्यान त्याचे भावही भरपूर असतील
                                 काश्मीर हळू,हळू पुरातून सावरत असल तरीही अजूनही ५० टक्के लोक टेंट किव्हा पत्र्याच्या घरात राहताहेत ज्यांची घरे,दुकान,शेती पुरात वाहून गेली त्यांचा परतीचा मार्ग बंद झालाय तिथले लोक सरकारवर नाराज आहेत कारण त्यांना कायमस्वरूपी निवारा हवा आहे सरकारन  प्रत्येक कुटुंबाला  २५kg  तांदूळ ,पीठ व इतर आवश्यक सामान मोफत देण सुरु केलय पण ते किती दिवस पुरणार?  असा प्रश्न तिथली जनता विचारतेय. 
                               लोक काश्मिरमध्ये यायला घाबरतात पण फक्त सीमेवरच तणाव असतो बाकी  ठिकाण शांत आहेत अस ते सांगतात त्यांच्या भागात कितीतरी हिंदू कुटुंबीय आहेत व ते बरयाचर्षापासून एकत्र शांततेत  राहतात काहीची मुले शिक्षणासाठी,नोकरीनिमित्याने बाहेरगावी परदेशी गेलीत ते तर एकटे  राहतात! त्यांना कोणतीही भीती नाही अस ते म्हणतात . 
                               तिथल्या सरकारवर लोकांचा राग आहे ते जनतेच्या हिताची कामे करत नाहीत शिवाय यंदाची निवडणूक घाईन घेण्यापेक्षा पुरग्रस्तांचा प्रश्न सोडवण महत्वाच होत अस तिथल्या जनतेच म्हणण होत त्या मुळे तिथल्या जनतेन मतदाना कडे पाठ फिरवली आहे पंतप्रधान मोदीवर मात्र ते खुश आहेत व त्यांना त्यांच्या सरकारकडून बरयाच अपेक्षाही आहेत  
       

Friday 28 November 2014

मंगळ ग्रहाचे विलोभनीय फोटो


भारताच मंगळ यान मंगळावर पोहोचताच त्याने पाठवलेले मंगळ ग्रहाचे हे विलोभनीय फोटो  


पत्रिकेत कायम वक्री असणारा व शुभ कार्यात अडथळा आणणारा म्हणून ज्याची वल्गना केली जाते  त्या  मंगळ ग्रहाच हे सरळ फोटो व सुंदर वास्तव [twitter वरून प्राप्त ] 
   



यवतमाळ येथील डुमणापूर मंदिरात बायकांना गाभारयात प्रवेश बंद

                                       यवतमाळ येथील डूमणापूर येथे मारुतीचे पुरातन मंदिर आहे गावापासून दूर व बाग बागीच्यामुळे हे मंदिर पिकनिकसाठी प्रसिद्ध आहे इतके दिवस बायकांना मारुतीच्या दर्शनासाठी मूर्तीपुढे जाऊन नमस्कार करता येत होता पण आता मात्र मारुतीच्या मंदिरात बायकांना गाभारयात अर्थात बाहेरूनच दर्शन घेण्यास बंदी केली असून तसा बोर्डच लागलेला तिथले पुजारी दाखवतात बायकांना नमस्कार घ्यायचा असेल तर समोरच्या ओटयावर चढून घ्यावे लागते भाजप सरकार सत्तेवर येताच एकीकडे पंतप्रधान नरेंद्रमोदी सर्व देशांना भेटी देऊन देश प्रगतीपथावर नेत आहेत , भारताने यशस्वी मंगळ मोहीम राबवुन मंगळयानाने तिथले फोटो पाठवुन प्रत्यक्ष कामाला सुरवात केलेली असताना आणि विशेष म्हणजे भारतीय वंशाच्याच कल्पना चावला व सुनिता विल्यम्स ह्या दोघींनी अंतराळात प्रवेश करूनही अजूनही यवतमाळ येथे स्त्री,पुरुष भेदभाव केल्या जातोय. 

Saturday 8 November 2014

दिवाळी मालिकेतली

                  यंदा निवडणूक निकालामुळे उशिराने पण दिवाळी नेहमीच्याच उत्साहात ,दिव्यांच्या प्रकाशात तेजाळली, झेंडूच्या फुलान सजली .धनत्रयोदशी लक्ष्मीपूजनान पवित्र झालेल्या वातावरणात ,नरकचतुर्दशीच्या सुगंधीत उटण्याच्या पहाट स्नानान वातावरणात प्रसंन्नता आणत दिवाळी पाडवा,भाऊबीजे पर्यंत सर्वत्र साजरी झाली. प्रदूषणकारी फटाके विरहीत दिवाळी साजरी करण्याचा कलावंतानी दिलेला संदेश झुगारत हजारो रुपयाचे मोठ्या आवाजाचे फटाके उडवल्या गेले आणि त्यांच्या आतषबाजीत सारी गाव,शहर न्हाऊन निघाली.
घराघरातून टी वि. प्रेक्षकांना फराळा सोबतच मालिकेतील कलावंतांची पडद्यावरची व पडद्यामागची दिवाळी पाहायला मिळाली.काही कलावंतांना शुटींग मुळे घरी जाता न आल्याने सेटवरच दिवाळी साजरी करावी लागली कलाकारांच्या मुलाखती ,आठवणी आणि विनोदी मालिकेमुळे प्रेक्षकांची दिवाळी मनोरंजनात्मक झाली.
प्रेक्षकांना ह्या दिवाळीची सुंदर भेट " रेखाच्या मुलाखतीची"  मिळाली रेखान तिच्या आयुष्यातील आजवर न सांगितलेले सुरेख क्षण प्रेक्षकांपुढे उलगडले रेखा एकांत प्रिय आहे तिला शांतता आवडते ती आपल्या सौंदर्याची आरोग्याची विशेष काळजी घेते व्यायाम,आहारावर नियंत्रण ठेवते एकांतात विचार करताना आपल्या आंतरमनाचा आवाज ऐकते त्यालाच ती देवाचा आवाज मानते सिनेमात काम करण तिला आपल्या श्वासा इतक महत्वाच वाटत तिला खुबसुरतच्या रिमेक मधला सोनमचा अभिनय आवडला.रेखा म्हणते आजची तरुण पिढी talented,अपडेटेड आहे मग तो सिनेकलावंत असो की पत्रकार त्यांना सार माहित असत त्यांना पैसे प्रसिद्धी मिळवण जमत कारण आज टी वि.मोबाइल ,इंटरनेट मुळे ते जगात कोठेही पोहोचु शकतात पण पूर्वी तस नव्हत काम मिळण ,भूमिका साकारण्या आधी त्याचा अभ्यास करण ,माहिती मिळवण नृत्य शिकण सारच खूप कठीण होत विशेषत: उमरावजानच्या वेळेस.जवळपास तासभर रंगलेली हि मुलाखत रसिकांना रिझवून गेली.
                    त्या नंतर बाजी मारली ती" झी" वाहिनीवरील "चला हवा येऊ द्या" ह्या विनोदी मालिकेन निलेश साबळेच्या सुरेख सूत्र संचालनान नटलेल्या आणि भाऊ कदम,सागर कारंडे ,कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे ह्यांच्या विनोदी अभिनयात सादर झालेल्या धमाल विनोदी कार्यक्रमान प्रेक्षकांची मनमुराद दाद मिळवून दिली झी वरच्या" होणार सून मी ह्या घरची" ,"जावई विकत घेणे आहे" ,"जुळून येती रेशीम गाठी ", "अस्मिता "आणि "कारे दुरावा" ह्या मालिकेतील सासवा, सुना ,नायक नायिका व इतर कलावंतांनी "दिवाळी विशेष "भागात हजेरी लावली आणि धमाल उडवून दिली "रोहिणी हट्टंगडीना" विचारलेल्या एका मिश्किल  प्रश्नाचा धागा पकडत  तेव्हढ्याच मिश्किलीने उत्तर देत त्या म्हणाल्या कि मी तरुणपणी म्हातारी होते आता म्हातारपणी तरुण होतेय .,"उषा नाडकर्णींनी" सांगितलं कि लोक त्यांच्या सासुगीरी मुळे त्यांच्याशी बोलायला घाबरतात पण प्रत्यक्षात मात्र त्या खडूस नाहीत त्यांनीही त्यांच्या दिवाळीच्या आठवणी सांगताना बालपणीच्या उनाड आठवणी जागवत कार्यक्रमात रंगत आणली व सारयांना भरपूर हसवलं तर "चला हवा येऊ द्या" च्या नाटिकेतील" नाठाळ सुनेला" वटणीवर कस आणायचं हे त्यातल्या साध्या भोळ्या सासूला शिकवताना धमाल उडवून दिली त्यांच्या स्टेज नृत्याबद्दल सांगताना त्यांनी ४ थ्या वर्षानंतर एकदम ६४ व्या वर्षी स्टेज वर डान्स केल्याच सांगितलं " लीना भागवत"  ह्यांनी बरयाच विनोदी मालिकेत काम केल्याने त्यांना सहजतेन विनोद करता येतो हे " होणार सून मी ह्या घरची"  मधून पाहतोच आहोत त्यांनी आणि " सुकन्या कुलकर्णींनी"  आपल्या आयुष्यातील खरया नवऱ्याच्या गमतीदार गमतीजमती सांगत लोकांना हसवत ठेवलं " तेजश्री व शशांक केतकर"  ह्यांनीही आपल्या आठवणी सांगितल्या तेव्हा प्रत्यक्षात जानव्ही खूप बोलघेवडी आणि बोल्ड आहे तर शशांक मितभाषी असल्याच सांगितलं  "सविता प्रभूणेन"  प्रत्यक्षातला "राया"  साधा दिसतो पण खोडकर आहे अस सांगितलं " रमेश भाटकर " ह्यांनी कविता वाचून दाखवली तर " वर्षा उसगावकर" हिनही दिवाळीची आठवण सांगत नृत्य सदर केल.
                 सर्वात धमाल "विनोदी वार्तापत्र व गावाकडच्या दिवाळीचा" विनोदी कार्यक्रम पाहताना आली "जुळुन येती रेशीमगाठी" तल्या" सुकन्याला "भरत गणेशपुरे'  ह्यांनी जरा सुनेशी सासुसारख वागा कारण तमाम सासुवर्ग तुमच्यावर नाराज असल्याच सांगत "का रे दुरावातल्या" सासऱ्याला छळ करताना उपाशी ठेऊन ,पाणी भरताना,पायरया चढायला लावताना त्यांना व्यायाम होतो व पैसे न देता काटकसरीचा धडा मिळतो अशी कोपर खळी मारत गावातल्यांच्या वतीन बक्षीस देऊ केल तर सागर कारंडेन रोहिणी हट्टंगडीना तुमच्या कडे खूप सासवा आहेत त्यात माझ्याही सासूला ठेऊन घ्या ती मला खूप छळते म्हणत सारयांना हसवत ठेवलं ह्या हसवणुकीत भर टाकत जानव्हीला, "तुला आई आठवते,बाबा आठवतात ,पिंट्या आठवतो ऑफिस आठवत ,बॉसही आठवतात मग श्री अन सासरच कस विसरल ? "  आता खूप दिवस झालेत तुला आठवत नाही म्हणून मी एक औषध देतो ते सासरच्यांना दे म्हणजे सासरचेही पूर्वीच विसरतील अस सांगत प्रेक्षकांना मनमुराद हसवलं तर प्राजक्ता माळी च्या लकबीची नक्कल करत ती बदलण्याचा दिलेला सल्ला ती पुणेकर आहे हे कळताच त्या लकबीच कौतुक केल . अस्मितातल्या मयुरी वाघला कोड्यात टाकणारी उत्तरे विचारून पेचात टाकल थोडक्यात "चला हवा येऊ द्या" चा धमाल विनोदी " हास्य दिवाळी' विशेष प्रेक्षकांना सलग तासभर हसवत ठेवत त्यांची मनमुराद , भरभरून दाद मिळवून गेला पण ह्या कार्यक्रमातील भाउ कदम ,सागर कारंडे ,कुशल बद्रिके ,भरत गणेशपुरे ह्यांना हसवण्याची अंगभूत कला अवगत असताना स्रीवेष धारण करून बाष्कळ विनोद करण्याची गरज का भासावी? बालगंधर्वांनी स्री वेष धारण करून भूमिका केल्या कारण त्या काळात स्रीया नाटकात काम करत नसत आता स्री कलावंतांची वानवा नाही लठ्ठपणा ,स्रीवेश ,बाष्कळ विनोदाशिवाय निखळ विनोदी मालिका होऊ शकते "चला हवा येऊ द्या" ची थीम चांगली असूनही ह्या कलावंतांना स्री वेषात पाहण प्रेक्षकांना आवडत नाही कलर्स वाहिनीवरील कपिल शर्माच्या COMEDY NIGHTS मध्येही असगर अलीला सतत  स्री वेषात दाखवलं जात हे टाळायला हव.
           सीमा रमेश देव ह्या जोडीची मुलाखतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली पडद्यावरच्या साधी माणस सारखीच ह्या जोडीतले नवराबायकोचे साधेपण ,त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीतल्या आठवणी भाजी बाजारातील सीमा देव ह्यांचे चाहते व त्यांचा संघर्ष ऐकताना त्यांना सहजासहजी यश मिळाल नाही हे जाणवलं.







Wednesday 5 November 2014

सोने स्थीर चांदी स्वस्त

                                सद्या सोने चांदीच्या दरात चढ उतार होत असून सोने २६ हजाराच्या आसपास स्थिरावले आहे आतंरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे भाव उतरल्याने व सेन्सेक्सच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला असून सोन्याचा दर २६०००च्याही खाली आला आहे सेन्सेक्सचे दर २८०००पर्यंत गेल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत बरयाच वर्षानंतर सेन्सेक्सने २८०००पर्यंत उसळी मारल्यामुळे शेअर बाजारात आंनदाचे वातावरण आहे त्या मुळे सोन्यात पैसे गुंतविलेल्या गुंतवणूकदारांना जाणकार सोने विक्रीचा सल्ला देत आहेत आणि त्या मुळेही सोन्याचे दर उतरत आहेत शिवाय आतंराष्ट्रीय बाजरात सोन्याची विक्री होत असून त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला असून सोन्याचे दर कमी होत आहेत.
कच्या तेलाचे दर गेल्या तीन वर्षानंतर प्रथमच इतक्या खाली आल्याचे जाणकार सांगतात कच्या तेलाचे दर आणखी कमी झाल्यास व रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत स्थिर राहिला तर सोन्याचे भाव डिसेंबर अखेरीस २४००० पर्यंत खाली येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
                              सोन्यापाठोपाठ चांदीही स्वस्त
                              चांदीचे दरही सोन्या पाठोपाठ कमी होत असून दिवाळीच्या दिवसात ४०-४१ हजारावर असलेले चांदीचे दर दिवाळी संपताच गेल्या दोन दिवसापासून ३९ ते ४० हजार पर्यंत उतरले आहेत तर आज चांदी ३५०००रु. पर्यंत उतरली असून चांदीचे दरही कमी होत आहेत चांदी अजूनही स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. 

Thursday 30 October 2014

भाजी महागली

दिवाळी संपताच बाजारात भाजीचा तुटवडा जाणवत असून बाजारात भाजीचे भाव वाढले आहेत 
ह्या आठवडयात कोथिंबीर सर्वात महाग म्हणजे ५०रु. पाव किलॊ प्रमाणे विकल्या जात आहे तर बटाटे ,कांदे ४०रु. किलो ,मेथी २५ ते ३०रु. पाव किलो व इतर भाज्यांचे भावही ८० ते१००रु. किलोप्रमाणे वाढले आहेत बाजारात पालक कमी प्रमाणात विक्रीस आहे तर तुरीच्या शेंगाही विक्रीस आल्या असून त्यांचा भाव १५०-२००रु किलो आहे दरवर्षी दिवाळी नंतर कोथिंबीर(सांबार) व इतर पालेभाज्या बाजारात भरपूर प्रमाणात विक्रीस येतात ,त्यांचे भावही कमी असतात पण ह्या वर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे भाज्यांचे दर वाढल्याचे भाजी विक्रेते सांगतात 
बाजारात संत्रीही विक्रीस आली असून नेहमीप्रमाणेच त्यांचा भाव ४०ते ८०रु. डझन असा आहे विशेष म्हणजे भाव जास्त असूनही संत्रीचा आकार मात्र लहान आहे गेल्या पाचसहा वर्षात संत्र्याचे भाव जास्त आणि आकार लहान अशी परिस्थिती असते संत्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या व जास्त उत्पन्न असलेल्या यवतमाळ करांना मात्र मोठी व स्वस्त संत्री मिळत नाही  

Monday 13 October 2014

निवडणुकीचा गदारोळ

निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतसा प्रचाराचा जोर वाढतोय टी.वि. चानल्स दै.पेपर्स,रस्ते ,गावागावातल वातावरण निवडणूकमय झालय मागच्या वेळेस पक्षांची युती असल्यान निवडणूक सरळ,सरळ" नमो व्हर्सेस रागा "अशी होती शिवाय लोकांना बदल हवा होता त्या मुळे उत्साही वातावरण होत
पण ह्या वेळेस सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्यास सज्ज झालेत जाहीर सभांमधून आपली इतक्या वर्षाची युती होती हे विसरून एकमेकावर आरोप, प्रत्यारोप करत दुषणे देऊ लागलेत लोकांना ह्या साऱ्यांचा वीट आलाय लोक आधीच भ्रष्टाचार ,चोरया ,लुटालूट ,महागाई,भारनियमन,नियमित पाणीपुरवठा व इतर समस्येने त्रस्त झालेत ,वैतागलेत पण ह्या साऱ्यावर कुरघोडी करत निवडणूक प्रचार मात्र जोरात सुरु आहे
दररोज राजरोसपणे कोट्यावधी रकमेची ने-आण सुरु आहे आणि मतदारांना वाटण्यासाठी नेल्या जात असल्याच्या संशयावरून ती रक्कम पकडल्याही जातेय पण हि रक्कम बँकेची आहे व्यवसायाची आहे, पक्षाची आहे असे सांगून सुटका करून घेतल्या जातेय सामान्य नागरिक मात्र सतत चोरया होत असताना कोट्यावधी रकमेची पोत्यातून होणारी ने-आण पाहून आवाक झालाय शिवाय माध्यमांनी कितीही भ्रष्टाचार उघड करून,गुंडांची गुंडगिरी प्रकाशझोतात आणली तरीही काहींना पक्षांनी तिकीट दिलय काहीतर जेलमधून निवडणूक लढवत आहेत अशा वेळेस मतदार मत कोणाला ध्यावे ह्या संभ्रमात न पडला तरच नवल!
ह्या वेळेसच्या निवडणूकीची आणखी नवलाची गोष्ट  म्हणजे रोजदारीवर मजूर आणल्यागत निवडणूक प्रचारासाठी कार्यकर्ते आणल्या जात आहेत तेही शंभर ते सात-आठशे रुपये रोज देऊन वर जेवण,नास्ता चहा फुकट!
एव्हढे करूनही कार्यकर्ते मिळत नाहीत म्हणून नेते त्रस्त आहेत अशा बातम्या वाचण्यात येताहेत हे कार्यकर्ते जिथे जास्त पैसे तिकडे आपला मोर्चा वळवत आहेत तर काहीजण त्याही वरताण सकाळी एका पक्षात तर दुपारी दुसरया पक्षाचा प्रचार करताना दिसतात अर्थात नेतेच जिथे पक्षाशी एकनिष्ठ नाहीत तिथे कार्यकर्ते कसे असतील?
काही ठिकाणी तर दारूही पकडण्यात आलीय दहा पंधरा वर्षापूर्वी काही नेते पैसे,दारू व सोबत मिठाचा पुडाही देत असल्याच काही कामकरी खाजगीत सांगत कारण खाल्या मिठाला जागाव म्हणून! पण हि युक्ती आता अशक्यच! नेत्यांच्या पैसे वाटपामुळे  कामकरी वर्ग मात्र  निष्क्रिय ,व्यसनी ,कर्जबाजारी झालाय आणि त्यांचा त्रास सामान्य नागरिकांना होतोय पण  नेते मात्र त्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवतच  असतात
हे नेते निवडणुकीला उभे राहताच लोकांपुढे येतात सत्तेत असूनही आधी दिलेलं आणि पूर्ण न केलेलं आश्वासन विसरून पुन्हा नव्यान, नव्या जोशात मी हे करीन !ते करेन! अस आश्वासन देतात नियमित पाणीपुरवठा ,भारनियमन , महागाई ,रस्ते विकास(रस्त्यावरील खड्ड्यांचा विसर,पाडत)  व इतर समस्या दूर करण्यासाठीचे जाहीरनामे सादर करतात .जोरात प्रचार करतात रिक्षा मागून रिक्षे फिरतात. आणि  आता तर प्रचार हायटेक झालाय
प्रत्यक्षात हे नेते आपण आधी सत्तेत होतो हे मतदार जाणतात हे सोयीस्करपणे  विसरतात आणि  निवडूनआल्यावर गायब होतात मग  समस्या सोडवण ,विकास करण विसरून जातात अशांना मतदारांनी दिलेलं मत वाया जात तेव्हा अशा नेत्यांना मतदारांनी परत बोलवावं त्यांना राजीनामा द्यायला लावावा शिवाय आपला शब्द न पाळणाऱ्या नेत्याला परत बोलावण्यासाठी कायद्यातही कडक तरतुद करायला हवी.
जर एखादा नेता खरच कर्तुत्ववान असेल त्याने आपल्या मतदारसंघाचा विकास केला असेल ,समस्या सोडवल्या असतील भ्रष्टाचार केला नसेल तर त्याच काम हाच त्याचा प्रचार असू शकतो त्या साठी वेगळा प्रचार करावा लागत्त नाही ,रयालीसाठी ,सभेसाठी रोजदारीवर कार्यकर्ते आणावे लागत नाहीत हे सुज्ञ मतदार जाणतोच पण केवळ थोडया पैशासाठी आपल अमुल्य मत विकणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे
        

Wednesday 1 October 2014

यवतमाळ येथील दुर्गोत्सव

 विधानसभेची निवडणूक जाहीर होताच राजकीय गदारोळ उडाला प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी वेगळा झालाय राजकीय घडामोडींना वेग आलाय तरीही यवतमाळ येथे दुर्गोत्सव उत्साहात साजरा होतोय दुर्गादेवी बसवणाऱ्या मंडळाचे प्रमाणही  दिवसेंदिवस वाढत चाललेय संध्याकाळी यवतमाळ विद्युत रोषणाईने झगमगून जात असून गावोगावहून देवी पाहण्यासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीने रस्ता  फुलून गेला आहे. 
बालाजी चौक मंडळाने "White Temple" चा देखावा साकारला आहे. त्या साठी थर्माकोलचा वापर करून छतावर व बाजूला ग्यालरी  बनवून त्यावर आकर्षित सजावट केली आहे मूर्तीचे सिंहासन व सभामंडप चांदीने बनविले आहे
बालाजी चौक

बालाजी चौक
बालाजी चौक
रोषणाई
हितान्वेशी दुर्गादेवी मंडळ वर्ष २२वे 
नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ
इथे जवळच असलेल्या गणपती मंदिरात वैष्णोमातेच्या मूर्तीसमोर २५१ अखंड ज्योत तेवत ठेवण्यात येतात व गरिबांसाठी रोज अन्नदान करण्यात येते.
अखंड ज्योत 
नवयुवक  दुर्गोत्सव मंडळ गणपती मंदिराजवळ


श्रीसमर्थ  दुर्गोत्सव मंडळ
श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळाचे  हे आठवे वर्ष असून इथे  "शंकराचे तांडव" नृत्य हा चलतचित्र देखावा साकारण्यात आला असून अंबरनाथ येथिल कारागिरांनी जवळपास दीडदोन लाखाच्या भाडेतत्वावर हे चलचित्र उपलब्ध करून दिले आहे ह्या वर्षी झालेल्या "माळीण दुर्घटना" "क़ाश्मिर येथील पूर प्रलय" व नापिकीमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्ये मुळे ह्या देखावा कुठलेही शुल्क न घेता मोफत पाहण्यासाठी  ठेवला आहे शिवाय "अवयव दान करा" असे आवाहन करणारा फलक लावला आहे समोर पाण्याच्या कारंज्याचे विहंगम दृश्य लोकांना आकर्षित करत आहे 

                                               कारंजे 
श्रीसमर्थ मंडळाने साकारलेला" शंकराचे तांडव नृत्य "हा चलचित्र  देखावा 
संगम शारदा दुर्गोत्सव मंडळाची हि विलोभनीय मूर्ती  
नवीन दुर्गोत्सव मंडळाने ह्या वर्षी विष्णू पुरणाचा चलचित्र देखावा सादर केला आहे हा देखावा लोकांना आकर्षित करत आहे शिवाय  विद्युत रोषणाई ने सजलेला "मेरी गो राउंड "लहान मुलांचे मनोरंजन करत आहे आजूबाजूला कपडे,खेळण्या व इतर वस्तूची दुकानेही थाटलेली असल्याने मंडळाला जत्रेचे स्वरूप आले आहे  आजूबाजूला फुगेवालेही फिरत आहेत .
                                       नवीन दुगोत्सव मंडळाची मूर्ती
                                         नवीन दुगोत्सव मंडळाचा"विष्णू पुराण" हा  चलचित्र देखावा  
राणी झासी दुर्गोत्सव  मंडळाची अप्रतिम मूर्ती 
राणी झासी मंडळ
राणी झासी मंडळ 
राणी झासी मंडळाचे हे ३१वे वर्ष असून इथल्या बंगाली नागरिकांनी देवीची मूर्ती ,तिचे लाकडी दागिने व वाजंत्री खास कलकत्त्या वरून बनवून आणली आहे मूर्ती अप्रतिम असून देवी समोर सतत ढोल वाजवण्यात येत आहे इथेही भाविकांसाठी मोफत जेवणाचे प्रसाद वाटप करण्यात येत आहे 




                                         मा जगदंबा दुर्गोत्सव मंडळ

मा जगदंबा दुर्गोत्सव मंडळाची झोपाळ्यावरील सुंदर मूर्ती

मा जगदंबा दुर्गोत्सव मंडलातील हरिणाची मूर्ती 

मा जगदंबा दुर्गोत्सव मंडळ
मां जगदंबा दुर्गोत्सव मंडळाने भव्यमंदिर  उभारले  असून त्याला टोपल्या ने सजवले आहे मंदिराच्या  बाहेर fiber च्या वन्य  प्राण्यांचा देखावा तयार केला आहे.मूर्ती झोपाळ्यावर विराजमान असून सुंदर आहे

सुभाष दुर्गोत्सव मंडळ वडगाव रोड
इथल्या मंडळाने ह्या वर्षी प्रवेश दाराजवळ मोहोंजोदाडो संस्कृतीची आठवण देणारा देखावा साकारला असून समोर वाळू व पोत्यांच्या साह्याने डोंगर तयार केले असून आजूबाजूला ममीच्या प्रतिकृती साकारल्या आहेत गुहेचा फील येण्यासाठी अंधारातून देवीपर्यंत जाण्याचा मार्ग गुहेसद्रुश बनवला असून दारात आदिवासीच्या रूपातला पहारेकरी येणाऱ्यांचे स्वागत करत आहे 
पोत्याच्या सहाय्याने तयार केलेले डोंगर व ममी 
ममी च्या प्रतिकृती 
सुभाष दुर्गोत्सव मंडळ  
आदिवासीच्या वेशातला पहारेकरी 
ह्या वर्षी दुर्गादेवी मंडळाचे प्रमाण वाढलेले असून एकाच भागात तीनचार देवी बसवलेल्या आहेत बहुतेक सगळ्याच मंडळा तर्फे दररोज  प्रसाद वाटप केल्या जात असून काही ठिकाणी फोडणीचा भात तर काही ठीकाणी पूर्ण जेवण दिल्या जात आहे शिवाय बरयाच ठिकाणी फराळाच्या पदार्थाची दुकानेहि थाटण्यात आली आहेत .
जयहिंद दुर्गोत्सव मंडळाचा सुशोभित मंडप 
जयहिंद दुर्गोत्सव मंडळाची दुर्गेची मूर्ती 
हनुमान भक्तीचा चलचित्र देखावा 
जयहिंद दुर्गोत्सव मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ह्या वर्षी मंडळाने" हनुमान भक्ती"हा चलचित्र देखावा साकारला आहे हे चलचित्र मुंबई येथील कारागिरांनी बनविला आहे मंडळातर्फे दररोज प्रसाद वाटप होते शिवाय वेवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते  1oct.ला राज्यस्तरावर निवड झालेल्या ११ वर्षीय श्रावणी पाचखेडे हिने योगाचे प्रात्यक्षिक सादर केले
All Photos  taken by -Pooja Duddalwar BE(soft.) BMC ((UTS)

Monday 22 September 2014

Thank यु, thank यु आर्मी


                                        Thank you , thank यु  आर्मी ,शुक्रिया जवान ,अल्ला तुम्हे सलामत रखे लंबी उमर दे! एक महिला जवानाला दुवा देत होती गेल्या आठवड्यात झेलम नदीच्या पूराच तांडव सुरु असताना मृत्युच्या तावडीतून आपल्या जीवाची पर्वा न करता पूरग्रस्त काश्मिरी जनतेचा जीव वाचवणाऱ्या जावानांप्रती  जवळपास सर्वांचीच हीच भावना होती.
               वरून धो धो कोसळणारा पाऊस समोर झेलम नदीच्या पूराच तांडव, दल झीलही पुरान ओसंडून वाहू लागल्यान पूराच पाणी रस्त्यावरून घराघरात शिरलं आणि आपल्या बरोबर घरदार,शेती ,सामान,अन्नधान्य वाहून नेऊ लागल डोळ्यादेखत क्षणात आपल सर्वस्व उध्वस्त होताना पाहून विमनस्क , असहाय काश्मिरी जनतेच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला.
                 पुराच्या काळात जवळपास सर्वच चानल्स वरून लाइव टेलिकास्ट दाखवल्या जात होत चानल्सचे पत्रकार प्रत्यक्ष तिथे जाऊन पाण्यातुन वाट काढत आपला माइक व तोल सावरत पूरग्रस्तांची बितंबातमी लोकांपर्यंत , सरकार पर्यंत पोहोचवतानाच रडणाऱ्या काश्मिरींना धीर देत त्यांच सांत्वन करत होते त्यांना मदतीच आवाहन करतानाच तिथली संपर्क यंत्रणा बंद पडल्यान टी.वि. वरून त्यांची माहिती प्रकाशित करून त्यांना फोन लाईनही  उपलब्ध करून देत होते.
           काहीच्या मते गेल्या १०९ वर्षात तर काहीच्या मते साठ वर्षात एव्हढा प्रलयकारी पूर आला नव्हता पाणी वाहून जाणारे नाले बुजवल्या गेल्याने, दल झील जवळ बांधकाम झाल्याने आणि झीलमध्ये भराव टाकून केलेल्या फुले,भाजीपाल्याचा शेतीमुळे पूर आल्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात.
                 जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली  काश्मीर खोर पाण्याखाली गेल.शहरातील रस्ते ,घरे ,दुकाने दहा -पंधरा फुट पाण्यात बुडाल्याने स्थानिक लोक ,पर्यटक अडकून पडले ग़ाड्या पाण्यात वाहू लागल्यान मदतकार्य ठप्प झाल तेव्हा त्वरीत लष्कराला पाचारण करण्यात आल लष्कराच्या तिन्ही दलातील आणि N D R F चे जवान मदतीसाठी धावले लष्कराने आपली विमाने ,Helicopters व water बोट्स मदतीसाठी उपलब्ध करून दिली लष्कराची ,Helicopters ,विमाने लोकांच्या सुटकेसाठी त्यांना आवश्यक सेवा पुरवण्यासाठी सतत येजा करत होती दोरखंडाच्या साह्याने लोकांना वर ओढून वाचवण्यात येत होत आधी वृद्ध,रुग्ण व बालकांना वाचवण्यात आल ,पुलवामा जिल्यात लोकांच्या मदतीसाठी गेलेली बोट बुडाली त्यातले दोन जवान बेपत्ता झाले तरीही बोटींनी लोकांना वाचवण्यात येत होत पुरात दोनशे लोक ,जनावरे मेली  वीज गेली पूराच पाणी दोन मजल्याच्याही वर चढल्यान घरातल सामान अन्न धान्य वाहून गेल आणि पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद पडल्यान लोकांचे हाल झाले पण लष्कराने त्यांच्या साठीची खाण्याची बिस्किटे ,पाणी ,दुध,औषध ह्यांची पाकिटे ,Helicopters मधून अडकलेल्या लोकांसाठी टाकली .श्रीनगर विमानतळावर पूरग्रस्तांसाठी त्यांच्या जवळचे तंबू ठोकून लोकांच्या राहण्याची सोय केली त्यांना अंथरूण ,पांघरूण दिले जनरेटरवर वीज उपलब्ध केली ,आपल्यासाठीच अन्न शिजवून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली.
                      श्रीनगर मधले सात दवाखाने व मेडिकल कॉलेज पाण्याखाली गेल्याने पुरामुळे आजारी पडलेल्या रुग्णांचे हाल झाले तेव्हा लष्कराने विमानतळावर मेडिकल कॅम्प उभारून लष्करातील मेडिकल चमु स्थानिक रिटायर्ड डॉक्टर्स ,स्वयंसेवक ,नर्स ह्यांच्या मदतीने रुग्णावर उपचार केले इंजेक्शन्स,औषधाची सोय केली.
                           पुरामुळे जागोजागी रस्ते उखडले ,दरडी  कोसळल्या पुलावर पाणी साचल त्या मुळे रस्ते बंद झाले होते वैष्णो देवीचे यात्रेकरू चार दिवस रस्त्यात अडकले तेव्हा जवानांनी त्यांना पहाडी जुन्या रस्त्यांनी व्यवस्थित बाहेर काढल पुराच्या प्रचंड वेगाने आलेल्या प्रवाहाने जम्मू श्रीनगर हाय वे वरचा पुल [लेह पुंछ कडे जाणारा ] पाहता पाहता क्षणात वाहून गेला पण लष्कराच्या अभियांत्रिकी चमूंनी अहोरात्र मेहनत करून अवघ्या सोळा तासात पुन्हा पूल बनवला आणि दोन्हीकडे अडकलेल्या लोकांची सुटका केली.धोक्याचा इशारा दिल्यानंतर काहीजण सुखरूप बाहेर पडले पण काहीजण आपल सुस्थितीतल घर चोरी होईल ह्या भितीन सोडायला तयार नव्हते त्या मुळे ते अडकले तिथल्या स्थानिकांनी टाक्या दारे,टायर बांधून होडी तयार करून त्यांना वाचवले तर काही छतावर चढले   पुरात बेमिना मधली सुगंधी तांदळाची शेती वाहून गेली ,आक्रोड ,सफरचंद ,केशराच नुकसान झाल आधीच अतिरेक्यांचा त्रासान त्रस्त झालेले काश्मिरी नैसर्गिक ,विध्वंसक आपत्तीन बेहाल झाले अश्रू ढाळू लागले.                          
                            नव्वदच्या दशकापर्यंत स्वर्गीय सौदर्याच वरदान लाभलेलं काश्मीर खुशहाल होत कित्येक हिंदी सिनेमांच शुटींग इथे व्हायचं त्या मुळे  साहजिकच काश्मीर पर्यटकांनी गजबजायच इथल्या काश्मिरी विणकरांनी विणलेल्या  व कलावंतांच्या काश्मिरी काशिदाकारीनी अलंकृत झालेल्या शाली,गालिचे ,स्वेटर्स ,रेडीमेड  ड्रेसेस ,सिल्कच्या साडया त्यांनी बनवलेल्या धातूच्या व कागदी हस्तकलेच्या वस्तू लाल लाल सफरचंद पर्यटकांना आकर्षित करायचे अजूनही करतात ऐशीच्या दशकातल बर्फाच्छादित काश्मिरच निसर्ग सौदर्य पाहिलं अनुभल होत  काश्मीरचा कोपरान कोपरा नैसर्गिक सौंदर्यान नटलेला जिकडे तिकडे खळाळत पाणी झरे बर्फाच्छादित गिरिशिखरे ,बर्फाचा भुर भुरता पाऊस ,सुरुची झाडे  सारच विलोभनीय ,अप्रतिम !
                     तेव्हा  सुशोभित शिकारयातून जाताना हाउस बोटीतल्या काश्मिरी बायका पर्यटकांना"आओ बेहनजी चाय पिने"म्हणून बोलवायच्या काश्मिरी कारखानदार खास "काश्मिरी कहवा"  एकदा तरी पिऊन पहा असा आग्रह करायचे  थंडी पासून आपला बचाव करण्यासाठी कोळशांनी{मंद }पेटवलेली कांगडी ओव्हरकोट मध्ये घेऊन फिरणारे काश्मिरी पर्यटकांचे हसून स्वागत करायचे  तिथल्या हाउस बोटीतल्या वास्तव्यात काश्मिरी कलावंतांच्या अप्रतिम कलेच दर्शन तर घडलच शिवाय आपण एखाद्या अद्ययावत सुसज्य घरात आहोत की बोटीत असा प्रश्न पडला  तिथे एक दिवसाच्या वर राहू नका अस सांगण्यात आल होत कदाचित तेव्हाच दहशतवादी सक्रिय झाले असावेत नव्वद नंतर काश्मीर हळू हळू घुमसत गेल सतत भीतीच्या छायेखाली राहील आधी अटलजींनी काश्मिर मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण कारगिल युद्धान त्यावर पाणी पडल आणि आता पंतप्रधान मोदींनी तिथल्या सर्वच क्षेत्रातल्या विकासा साठी हजारो कोटीची आर्थिक तरतूद जाहीर केली त्या मुळे काश्मिरी आंनंदित होते पण पुराच्या तांडवान सर्वस्व गेल्याने काश्मिरी हतबल झाले पण काश्मिरी लोकांना लाभलेल्या कलेच्या वरदानामुळे ते पुन्हा आत्मनिर्भर होतील,धैर्याने उभे राहतील  मोदींनी मदतनिधी जाहीर केला आहेच अर्थात सार पुर्ववत व्हायला वेळ मात्र लागेलच .

Monday 8 September 2014

धरण ओव्हरफ्लो पण पाणी कपात सुरूच

यवतमाळ येथे आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असून गेल्या दोनचार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसा मुळे नदीनाले दुथडी भरून वहात आहेतकाही ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावरून वहात आहे तर काही गावात शेतात पाणी साचले आहे यवतमाळ जिल्ह्याला पाणीपुरवठा होत असलेले निळोणा चापडोह बोरगाव ,सायखेड,वाघाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहेत बेम्बळा धरणाची दारे क्षमते पेक्षा जास्तपाणी भरल्याने उघडण्यात आली असून आसपासच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे इतर धरणे देखील पावसाच्या पाण्याने भरली असून जास्तीच्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
              पाणी असे रस्त्यावरून वाहून वाया जात असतान यवतमाळ करांची पाणी टंचाई अजूनही संपली नाही योग्य नियोजना अभावी पाणी पुरवठा अजूनही तीन दिवसांनीच होत आहे म्हणजे तब्बल पाचव्या दिवशी पाणी सोडण्यात येतेय गेल्या तीन चार दिवसा पासून पाणी दोन दिवसाआड सोडण्यात येईल असे सांगण्यात येत असून यवतमाळ येथे चवथ्या दिवशीही पाणी सोडण्यात आलेले नाही पुणे मुंबई व इतर शहरातील धरणातील जलसाठा वाढताच पाणी पुरवठा नियमित म्हणजे दररोज केला गेला पण यवतमाळ येथे मात्र जास्तीचे पाणी रस्त्यावर सोडून दिल्या जात आहे पण जनतेला मात्र कृत्रिम पाणी टंचाईला तोंड ध्यावे लागतेय कारण पाणी कपात करून पाणी आठवड्यातून एकदाच सोडल्या जातेय.
                    त्या मुळे नागरिक चिडलेले असून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी जनतेची मागणी आहे पाणी टंचाई मुळे एकदिवसा आड होणारा पाणी पुरवठा यवतमाळ जिल्ह्यात दोनदा पूर येऊनही पुन्हा नियमित झाला नाही आता देखील भरपूर पाऊस येऊनही अजूनही पाणी आठवडयातून एकदाच सोडण्यात येतेय तो तसाच राहिल्यास नागरिक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत कारण पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेला बेंबळा प्रकल्प पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा विचार सुरु आहे पर्यटन केंद्र करायचे असल्यास वेगळे तळे खोदुन त्यात जास्तीचे पाणी साठवून करता येऊ शकेल जनतेला पाणी पुरवण्यासाठी बांधलेल्या पाणी प्रकल्पाचा उपयोग जनतेसाठी पाणी पुरवण्यासाठीच करावा अशी जनतेची मागणी आहे.
दि. ९
 आठवड्याभर पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणारे जलप्रकल्प ओव्हरफ्लो तरीही आजपासून पाणी दोन दिवसाआड म्हणजे आठवडयातून दोनदाच सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय 
जिल्ह्यातील लघु,मध्यम,व मोठे प्रकल्प भरले असून जास्तीच्या पाण्याचा विसर्ग सुरु असूनही यवतमाळ करांना नियमित पाणी पुरवठा केल्या जात नसून नागरिक पावसाळ्यातल्या कृत्रिम पाणी टंचाईने त्रस्त आहेत 

Wednesday 3 September 2014

यवतमाळ येथील गणेशोत्सव

यवतमाळ येथे गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस सुरु असताना सुद्धा गणपतीचे सर्वत्र उत्साहात 
स्वागत झाले यवतमाळ येथील मारवाडी युवक मंडळाने 31  हजार मडक्यांच्या सहाय्याने  साकारलेला  
हा सुबक देखावा सारयांना आकर्षित करत आहे  त्या साठी कलकत्ता येथील कारागिरांना बोलावण्यात आले असुन त्यांनी महिनाभरात हा देखावा साकारला तर मूर्ती सचिन वनकर ह्यांनी तयार केली आहे 
यवतमाळचा राजा

 
मडक्यांनी सजवलेले सभामंडप  
मडक्यांनी सजवलेला प्रवेश द्वारावरील देखावा 


एकता मंडळांनी  थर्माकोलच्या सहाय्याने साकारलेला अष्ठ विनायकाचा देखावा 
व गणेशाची सुबक मूर्ती 
फोटो  -पुजा दुद्दलवार BE(Soft )BMC  


Tuesday 2 September 2014

धरण ओव्हरफ्लो पण पाणी कपात सुरूच

यवतमाळ येथे आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असून गेल्या दोनचार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसा मुळे नदीनाले दुथडी भरून वहात आहेत  काही ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावरून वहात आहे तर काही गावात शेतात पाणी साचले आहे यवतमाळला पाणीपुरवठा होत असलेले निळोणा  चापडोह ,बोरगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहेत  तर बेम्बळा धरणाची दारे क्षमते पेक्षा जास्त पाणी भरल्याने उघडण्यात आली असून आसपासच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे
पाणी असे रस्त्यावरून वाहून वाया जात असताना यवतमाळ करांची पाणी टंचाई अजूनही संपली नाही योग्य नियोजना अभावी पाणी पुरवठा ,तीन दिवसांनीच होत आहे म्हणजे तब्बल पाचव्या दिवशी पाणी सोडण्यात येतेय  त्या मुळे नागरिक चिडले असून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी जनतेची मागणी आहे पाणी टंचाई मुळे एकदिवसा आड होणारा पाणी पुरवठा यवतमाळ जिल्ह्यात दोनदा पूर येऊनही पुन्हा नियमित झाला नाही आता देखील भरपूर पाऊस येऊनही अजूनही पाणी तीन दिवसांनी सोडण्यात येतेय तो तसाच राहिल्यास नागरिक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत कारण यवतमाळकरांना पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या बेंबळा प्रकल्प पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा विचार सुरु आहे


Wednesday 30 July 2014

हि धग शांत कधी होणार

                 कारगिल युद्धाच्या आधी भाजप सरकार सत्तेत आल अन काश्मिरी जनतेचा आशावाद जागा झाला अटलजींनी पाकिस्तानशी सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्नही  केला पण लाहोर यात्रेच फलित कारगिल युद्धान मिळाल तर  आग्र्याच्या शिखर परीषदेच फलित जम्मु रेल्वे स्थानकावर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारान आधी काश्मिरी पंडितांना तेथून हुसकावून लावलं गेल आणि नंतर दहशतवाद जम्मूपर्यंत पोहोचला होता अतिरेक्यांच्या गोळीबारात निरपराधांचा बळी गेल्याची बातमी वाचून मन सुन्न झाल होत आणि मनात येत होत धगधगत काश्मीर शांत कधी होणार?माझ्या डोळ्यापुढे मला भेटलेले जवान येत होते  आणि मला तो प्रवासातला प्रसंग आठवत होता.
          साधारण ९८च्या मे महिन्यातली गोष्ट आम्ही दुसरयांदा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालो होतो जम्मुतावी एक्स्प्रेस पकडण्यासाठी घाई,घाईन नागपुरात पोहोचलो गाडी यायला अगदी थोडासा अवधी होता तितक्यात अनाउन्समेंट झाली गाडी ५-६तास उशिरा येतेय आणि पुन्हा पुन्हा अनाउन्समेंट होत,होत अख्खी रात्र गेली आता येईल,मग येईल म्हणता म्हणता गाडी सकाळी आठ साडे आठला आली स्टेशनवर सर्वत्र आर्मितले जवान त्यांच खूपसार सामान बायका मुले दिसत होते  गाडीन पार विरस केल्यान कोणी कोणाशी बोलत नव्हत गाडी आली आणि सारयांनी गाडी पकडण्यासाठी गर्दी केली आम्हीही गाडीत शिरलो ते  आता सामान व्यवस्थित ठेवून मस्त आराम करायचा विचार करूनच कारण रात्रभर स्टेशनवर बसून वैताग आला होता आमच्या डब्यात बरेचसे जवान होते आमची जागा एका साऊथ इंडियन कुटुंबीयांनी काबीज केली होती सर्वत्र सामानच सामान कस,बस सामान इकडेतिकडे सरकवून त्यांनी आम्हाला बसायला जागा दिली त्यांचा थोडा विरस झाला कारण ते विशाखा पट्टणमहून एकटेच होते थोड्याच वेळात त्यांच्या छोटया मुलीमुळे ओळख झाली चौकशी केल्यावर कळाल की तो आर्मितला जवान आहे आणि विशाखापट्टनमहून आपल्या कुटुंबीय व सामानासोबत श्रीनगरला जात आहे थोडयाच वेळात गप्पांना सुरवात झाली सुरवातीला अलिप्त असलेला तो जवान देखील गप्पात सामील झाला अर्थातच विषय काश्मीरवर घसरला ८१ मध्ये बर्फातल शांत सुंदर काश्मीर मनसोक्त पाहिलेल ,तिथल स्वर्गीय सौंदर्य मनात साठवलेलं ते जणू साद घालत होत म्हणून विचारल,बर्फवृष्टी मुळे बंद असलेला काश्मीरचा भाग पुन्हा पहायला आम्ही येऊ शकतो का? आता तिथली परिस्थिती कशी आहे ?
               त्यांनी सांगितल तिथली परिस्थिती आता बरीच निवळलीय भाजप वाल्यांनी खूप छान काम केलय म्हणुनतर आम्ही आमच्या कुटुंबियांना तिथे घेउन जातोय जवळ जवळ ५-६ वर्षानंतर मी यांना घेउन जातोय तुम्हाला यायचं तर येऊ शकता पण आमच्या प्रोटेक्शन मध्ये रहाव लागेल रात्री फिरता येणार नाही. बायकोची चेष्टा मस्करी करत छोटीचे लाड करत तो तिथली माहिती देत होता खरेतर सैनिक म्हटलं कि डोळ्यापुढे येते ती  करडया शिस्तीची गणवेशधारी ,बंदुकीनी शत्रूला टिपणारी व्यक्ती पण आम्हीतर त्याच हे दुसर रूप न्याहाळत होतो आणि मग सुरवातीच्या त्याच्या अलिप्ततेची कल्पना आली सैनिक म्हटलं कि कधी युद्धावर जाव लागेल सांगता येत नाही शिवाय ५-६वर्ष एकट्याने काढल्याने मिळालेला प्रत्येक क्षण त्याला त्याच्या कुटुंबीयांसोबत घालवायचा असेल शिवाय श्रीनगर ते विशाखापट्टनम म्हणजे दुसर टोकच आणि श्रीनगरला पोहोचाल कि लगेच ड्युटी जॉईन करायची मग त्यांच्यामध्ये त्याला दुसरा वाटेकरी आलेला कसा आवडेल त्याची बायको मात्र खूप बोलकी होती ,खुश होती तिला खूप दिवसांनी नवरयासोबत जायला मिळाल्याचा आनंद ती माझ्यासोबत शेअर करत होती ती साऊथ इंडियन असल्याने इडली उत्तप्पाच्या गोष्टी झाल्या मग तिला छोटीच्या गोष्टी किती सांगू,किती नको अस झाल बोलताबोलता तीन हळूच सामानातुन अलबम काढून तिच्या मोठीचा फोटो दाखवला कारण तिला मात्र तिच्या नवऱ्यान सोबत आणु दिल नव्हत कारण तो ड्युटीवर गेल्यावर ती एकटी दोघींना कशी सांभाळणार ? शिवाय पहाडावर एकदा ड्युटी लागली कि मग चारपाच दिवस खाली येता येत नाही आणि अतिरेक्यांची भीती होतीच तीच मन मात्र साहजिकच मोठीकडे धाव घेत होत उत्साहाने ती मला ट्रंकेच कुलूप उघडून ड्रेस,साड्या दाखवत होती मग मीही तिच्या आनंदात सहभागी होत होते तेव्हाचे दिवस निर्धास्त होते आणि ती सैनिकाची पत्नी होती आम्ही विचारलेल्या अतिरेक्यांच्या बाबतीतल्या  प्रश्नाच उत्तर देण मात्र तो टाळत होता कदाचित बायकोपूढे त्याला ते देता येत नसाव किव्हा माहिती न देण बंधन कारक असेल किती जपत होता तो आपल्या बायकोलेकीला!  तीन सांगितलं आपण जम्मूला पोहचू तेव्हा आम्हाला न्यायला स्पेशल बस येईल मी म्हटलं मजा आहे बाई तुझी!पण रेल्वे जम्मूला पोहोचली तेव्हा पाहिलं त्यांना न्यायला आर्मीचे ट्रक आले होते त्यात सैनिक ,त्यांचे सामान आणि नातेवाइक कसेबसे कोंबले जात होते तरीही सगळे आनंदात होते भाजप सरकारवर खुश होते
                येतानाही आमच्या कम्पार्टमेंट मध्ये काही मध्यमवयीन जवान आणि तरुण अविवाहित एअर फोर्स मधले पायलट होते त्यांच्या मनमोकळ्या स्वभावान त्यांनी आम्हाला आपलस केल पुन्हा काश्मीर प्रश्न राजकारण ह्या वर चर्चा झाली त्यांच्याही मते भाजपन काश्मीर मध्ये शांती आणली लोक मोकळा श्वास घेताहेत मग काश्मीर मधल्या विस्थापित झालेल्या जम्मूत दिसलेल्या काश्मिरी जनतेच काय?ते अजून काश्मीर मध्ये का परतत नाहीयेत सरकार ह्या बाबतीत काय करतेय ? अतिरेकी निरपराध्यांना का मारताहेत? ते म्हणाले आपल सरकार सुसज्य आहे तुम्ही पहा लवकरच सार सुरळीत होईल आता लवकरच एक चांगली घटना घडेल आणि पाकिस्तानला धडा मिळेल.  तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही पण नंतर अटलजींनी अणुचाचणी घेतली आणि त्या दोघांची आठवण झाली ते म्हणाले होते आपण पाकिस्तान पेक्षा सरस आहोत ते आपल्या संरक्षण यंत्रणेपुढे टिकणार नाहीत आपल्याला खरा धोका आहे तो चीन कडून आणि खरेच चीन सिमेपलीकडून घुसखोरी करतोय. सैन्यात असले तरी तेही आपल्यासारखेच आहेत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होत त्याचं पोस्टिंग दिल्लीला झाल होत खूप दिवसांनी त्यांना त्यांच्या मित्राच्या बायकोंनी दिलेला घरचा नास्ता मिळाला होता तोही ते शेअर करत होते आम्ही अर्थातच तो नाकारला त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार  त्यांना पुरेसा नसल्याच सारेच सांगत होते मनात आल खरेच आपल्या देशासाठी थंडी,पाऊस,उन वादळ आणि प्राणाचीही पर्वा न करता प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आयुष्य जगतो त्यांना पुरेसा पगार मिळायला हवाच
                      जेमतेम वर्षही झाल नसेल तोच कारगिल युद्ध झाल आणि अनेक वीर जवानांनी आपल बलिदान दिल आणि माझ्या मनाला चुटपूट लागली अरे उणेपुरे आठदहा महिनेही झाले नसतील ती दोघ एकत्र राहिलेल्या,सार काश्मीर पाहणार होती ती,पाहिलं असेल?त्यांची छोटी बॉम्बच्या आवाजाला घाबरली असेल का ?आणि ती तिथेच होती कि परत केरळला परतली असेल मला भेटलेले ते जवान त्यांच काय झाल असेल? असतील की ----मनात नको त्या शंका येतात तिचा उत्साही चेहरा आठवतो नवीनच केलेलं मंगळसूत्र दाखवणारी ती आठवते ,आम्ही आमच्या लग्नाला तुम्हाला नक्की बोलावू म्हणणारे ते दोघे पायलट आठवतात,त्याचं लग्न झाल असेल ?
                    नुकताच कारगिल विजयदिन साजरा झाला तेव्हा हे सार आठवलं सुदैवान आताही पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे केलाय त्याला सकारात्मक  प्रतिसाद देत पाकिस्तान सीमेकडून घूसखोरी करत निरपराध नागरिक, सैनिकाचे बळी घेतोच आहे मोदींनी दिल्ली कटरा रेल्वेचा शुभारंभ केलाय काश्मीर मधेही पॉवरप्लांटच ओपनिंग केलय आता पुन्हा एकदा काश्मिरी जनता आनंदित आशावादी झालीय ह्या पंधरा वर्षात काश्मीर सुधारलय पुन्हा पर्यटकांनी बहरलय भारत अत्याधुनिक संरक्षक  शस्त्रांस्त्रांनी  सुसज्य  झालाय ,सुरक्षित बंकर्स बनवले गेलेत पण अतिरेकी कारवाया मात्र सुरूच आहेत दिल्ली,मुंबई ,हैद्राबाद पुणे शहरात बॉम्बस्पोट झाले.  चीनही सीमेपलीकडून सीमेलगतच्या" डेमच्याक" मध्ये घुसखोरी करतोय अशी बातमी पाहण्यात आली पण
                 आता नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्न सोडवण्याला ,सुरक्षेला प्राधान्य दिलय.  पाहूयात आता तरी धगधगत काश्मीर शांत होतंय का ? शूर जवानांच बलिदान कामी येतंय का ?        
                                                                                                                    yojana.duddalwar@gmail.com

Wednesday 16 July 2014

यवतमाळ येथे पाऊस

             गेल्या दोन महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या यवतमाळकरांना अखेर पावसाने दिलासा मिळाला असून सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर पर्यंत सतत पाऊस पडत होता
         
पांणी पुरवठा मात्र चार दिवसांनीच
उशिराने का होईना आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता मिटली असली तरी गृहिणींना मात्र अजूनही पाणी टंचाईला तोंड ध्यावे लागत असून गेल्या कित्येक वर्षापासून एक दिवसाआड  होणारा पाणीपुरवठा आता चार दिवसांनी होत असल्याने महिलांची तारांबळ उडत आहे चार दिवसांनी जास्ती वेळ पाणी सोडण्यापेक्षा तेच पाणी नेहमीप्रमाणे एक दिवसाआड  सोडण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे कारण एव्हढे पाणी साठवून ठेवताना त्यांची दमछाक तर होतेच शिवाय पाणी साठवण्यासाठी साधनेही कमी पडतात

Tanker चे पाणी गढूळ
पाणी पुरवठा चार दिवसांनी होत असल्यामुळे पाणी कमी पडल्यास Tanker चे पाणी आणल्यास ते अत्यंत गढूळ व दुर्गंधीयुक्त असते ते पाणी वापरणे आरोग्यास हानिकारक असल्याने नागरिक ते वापरू शकत नाहीत विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी सोडणार असल्याचे सांगण्यात येतेय पण अजूनही पाणी सोडल्या गेले नाही त्या मुळे नागरिक संतप्त झालेत. त्या मुळे संबंधीत अधिकाऱ्यांनी ह्याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी नागरिकांची मागणी आहे
यवतमाळ येथे पावसाची  सततधार 
यवतमाळ येथे थोडया विश्रांती नंतर शनिवार दुपारनंतर सोमवार पर्यंत सतत पाऊस पडत आहे कधी रिमझिम तर कधी जोरात पाऊस पडत आहे पावसाचा जोर शनिवारपासून मंगळवार सकाळपर्यंत अजूनही सुरु आहे गेल्या दोन महिन्यापासून पावसाची आतुरतेने वाट पाहणारे शेतकरी नागरिक ह्या पावसाने आनंदित  झाले असले तरी पाणी साठयात अजूनही समाधान कारक वाढ न झाल्याने पाणी पुरवठा मात्र चार दिवसांनी होत आहे त्या मुळे बाहेर पाऊस पण नळाला मात्र पाणी नाही अशी इथली स्थिती आहे नागरिक पाणी टंचाईने त्रासलेले असून कधी पाणीपुरवठा नियमित होतोय याची वाट  पाहत आहेत
पावसामुळे भाजीपाला महागला 
आधी पाऊस नसल्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाला महाग होता विशेषत: कोथिंबीर ,कोबी,आले,मिरचीचे भाव वाढलेले होतेच आता पावसामुळे भाजी मार्केट मध्ये न आल्याने भाजीचे भाव वाढलेले आहेत एका भाजीवाल्याकडे भाजीचे भाव विचारले असता कोथिंबीर ८०रु. पाव किलौ व इतर भाजीपाल्याचे भाव देखील त्याच प्रमाणात वाढलेले होते फुल कोबी ४०रु ,कांदा बटाटा ,मेथी ,मिरची पालक यांचेही भाव ४०रु पाव ह्या प्रमाणात वाढलेले आहेत त्या मुळे पाऊस आला तरी पाणी पुरवठा चार दीवसांनी आणि भाजीचे भाव आवक्या बाहेर वाढल्याने आधीच महागाईने त्रासलेल्या गृहिणींना मात्र पावसा मुळे दिलासा मिळाला नाही
            

Wednesday 9 July 2014

वारी चालली पंढरपुरा

                   दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी वारकरी लाखोंच्या संख्येन पंढरपुरात दाखल झालेत ह्या वर्षी वारीतून काहीजणांनी पर्यावरणाच्या संतुलनाचा संदेश देत वारीच्या वाटेवर वृक्षारोपण करत प्लास्टिक वापरू नका असे आवाहन केले तर काहींनी पथनाट्यातून जनजागृती अभियान राबविले वारीतील गोंधळी,भारुडकार वासुदेव ,नकलाकार ह्यांनी आपल्या कला सादर करून वारीत रंगत आणली काही टाळकरयांनी टाळ मृदुंगाच्या सहाय्याने आपली वेगळी कला सादर केली काहींनी फुगडी खेळत वारीत मार्ग क्रमण केले त्यात बबनराव पाचपुते, हर्षवर्धन पाटील ह्यांचाही समावेश होता वारीचा इतिवृत्तांत वारीचा मुक्काम त्यांचे खाणेपिणे ,काहीठिकाणी मैलोनमैल चालूनही वारीतल्या महिलांनी केलेला चुलीवरचा स्वयंपाक तोही साधासुधा नाही तर हजारोंच्या संख्येत केलेल्या पुरणपोळ्या T. V. वरील मराठी वाहिनीचे पत्रकार लोकांपर्यंत पोहोचवत होते
       ह्या वर्षी पावसान एकदोनदाच हजेरी लावल्यान उन्हाची तीव्रता होती तरीही वारीतील अबालवृद्ध न थकता पायी चालत पंढरपुरला जात होते वारीत सर्व थरातील लोक सामील झाले होते वारीत शेवटच्या मुक्कामात पाऊस आला तेव्हा थोडी तारांबळ उडाली तरीही हव्या असलेल्या पावसाचा आनंद लुटत वारकरी पंढरीकडे निघाले  
         वारीतील सुसूत्रता ,एकोपा आणि ,शिस्त ह्याच दर्शन ठिकठिकाणच्या रिंगण सोहळ्याच्या वेळेस पाहायला मिळाले शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम सोलापूर इथे तीन दिवस होता तेथील भाविकांनी त्यांना जेवण दिले ह्या पालखीकडे मात्र t.v. वाहिनीच्या पत्रकारांचे लक्ष गेलेले दिसले नाही गेल्या अनेक वर्षापासून शेगावची पालखी सोलापुरात्त विसावते 
   
  पंढरपुरात लोखोंच्या संख्येत भाविक दाखल
आषाढी एकादशी निमित्य आज पंढरपूर येथे जवळपास सहा सात लाख भाविक आले असून चंद्रभागेचा काठ भाविकांनी फुलून गेलाय.ह्या वर्षी पावसाअभावी चंद्रभागेत पाणी कमी असल्याने उजनी येथून पाणी सोडण्याची मागणी होती  वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपुरातील जुन्या दगडी पुलाजवळील बंधाऱ्यातून नदीत पाणी सोडण्यात आले  त्या मूळे वारकऱ्यांना नदीत स्नान करता आले गर्दीमुळे नदी माणसांनी गजबजली सार पंढरपुरच माणसांनी भरून गेलय आणि विठूनामाच्या गजरात न्हावून निघालय 
    
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न पण पूजेआधी मुख्य मंत्र्यांची केली अडवणूक
आज पहाटेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नींच्या हस्ते विठोबाची महापूजा करण्यात आली पण पूजेला उशीर झाला कारण वारकरी संप्रदायाचे प्रमुख बंड्यातात्या कराडकर ह्यांनी गोहात्त्या बंदी चा कायदा करावा त्या शिवाय त्यांना पूजा करू दिल्या जाणार नाही अशी भूमिका घेतली तसा इशारा त्यांनी आधीच दिला होता जेव्हा मुख्यमंत्र्यांनी तसा कायदा आहे लवकरच त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले तेव्हा त्यांना आत सोडण्यात आले. ह्या वर्षी पहिल्या पूजेचा मान शेळके दाम्पत्यांना मिळाला 
    
दर्शनाला लांबच लांब रांगा
दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून दर्शन रांग सहा Km पर्यंत पोहोचली आहे काही भाविक आदल्या दिवसापासून रांगेत उभे होते एका मिनिटाला तीस,चाळीस भाविक दर्शन घेत असून मुखदर्शनासाठी वेगळी रांग लावण्यात आली आहे. मंदिरात व मंदिराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून त्या साठी सोलापूरहून ३००० ग्रामीण पोलिस बोलावण्यात आले आहेत काही सामाजिक संघटना वारकरयांसाठी लागेल ती मदत देण्यास हजर आहेत.  वारकरयांसाठी मंदिर प्रशासनातर्फे बुंदीच्या लाडवाचा प्रसाद तयार केला असून काही भाविकांनी बाहेर गावाहून शेंगदाण्याचे लाडू करून पाठवले आहेत पंढरपूर नगरपरिषद देखील नागरिकांच्या सोयी,सुविधेसाठी प्रयत्न करत आहे. 

Thursday 26 June 2014

पाणी टंचाई

            उन्हाळा संपून जुलै महिना आला  तरीही विदर्भात वरून उन्हाचा प्रकोप होतोय तर दुसरीकडे पाणी टंचाईन जनता त्रस्त झालीय  साऱ्यांचाच जीव उन्हान त्रासलाय  विदर्भातले उन्हाळ्याचे शेवटचे दिवस नवतपाचे असतात म्हणजे ह्या नउ दिवसात पारा शेवटचे टोक गाठतो चंद्रपूर ,नागपूर इथे तो ४७.५ सेल्सिअस च्याही वर जातो आणि त्या खालोखाल इतर शहरातही पारा ४५ अंशाच्याही वर जातो ह्या वर्षी ६ जून हा दिवस सर्वात जास्त उष्ण तापमानाचा दिवस म्हणून नोंद झालीय तर २००७ साली तापमान ४८. सेल्सिअस वर गेल होत नवतपाचे नउ दिवस संपल्या नंतरही विदर्भात  उन्हाचा तडाखा होताच  त्यातून पावसाच आगमनही लांबलय  म्हणूनच लोक आतुरतेन पावसाची वाट पहाताहेत शेवटचे नवतपाचे दिवस आणि उन्हाळ्याचे एकदोन महिने सोडले तर ह्या वर्षीचा उन्हाळा त्या मानाने सुसह्य होता कारण पावसान ह्या वर्षी अधून मधून हजेरी लावली होती हिवाळा संपता,संपता तर गारपिटीन कहर केला शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं नष्ट झाली पण ह्याच गारपीटीन पाणी पातळी वाढली नंतर जरास जास्त उन तापल कि पावसान थोडाफार शिडकावा करत वातावरणात गारवा आणला म्हणूनच पहिल्या पावसाचा नेहमीचा नवखा आनंद ह्या वेळेस जरा कमीच जाणवेल अस वाटत असताना पावसान चांगलीच दडी मारलीय  एव्हाना जून महिना संपून  जुलै महिना सुरु झालाय आणि यवतमाळ येथे पावसान जूनमध्ये फक्त दोनतीनदा हजेरी लावलीय अशीच परिस्थिती इतरत्रही आहे त्या मुळे पाऊस आला नाहीतर नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही एव्हाना ऑगस्टचा  पहिला आठवडा संपत आला तरीही यवतमाळ मध्ये पाणी टंचाई सुरु आहे पाणी तीन दिवसांनी सोडण्यात येतेय त्याचे कारण धरण ४५%भरले असल्याचे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले विशेष म्हणजे पाऊस रोजच थोडयाफार प्रमाणात पडत आहे लोक आता पाणी टंचाईन त्रासलेत 
             मागच्या वर्षी भीषण दुष्काळान नदी,नाले कोरडे पडले जमिनीच्या खालच पाणी आटलं शेतातली फळ,पिक पाण्याविना करपली गुर,ढोर पाण्याविना मृत्युमुखी पडली ,पाणी टंचाईन जनता हैराण झाली काही ठिकाणी आठ ,पंधरा दिवसातून तर काही ठिकाणी तीनचार दिवसातून पाणी सोडल गेल काही ठीकाणची पाण्याची भीषण दाहकता टी.वी.चानल्स वरून पाहताना मने हेलावली लोक मिळेल तिथल गढूळ डबक्यातल घाण पाणी तेही फक्त एक तांब्या बुडेल इतक घेत होते तर काही बायका रेल्वे थांबताच रेल्वेच्या डब्यातल पाणी घागरीन भरत होते पण नंतर पावसान कृपा केली अन तो धो,धो बरसला इतका कि,नदी नाले दुधडी भरून वाहू लागले धरणे भरली .लोक आनंदित झाले आता शेती छान पिकेल पाण्याचा प्रश्नही मिटेल अस वाटत असतानाच अतिवृष्टी झाली नदयांना पूर आला धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली पूराच पाणी गावात शिरलं नदीकाठची माणस,दुकान घर,गाडी ,सार पूरान गिळंकृत केल त्यातून थोडफार सावरता,सावरता विदर्भात दोन तीनदा पूर आला धरणाची दार उघडावी लागल्यान गावात पुन्हा पाणी शिरल आधी कोरडा दुष्काळ मग ओला दुष्काळ ह्याला तोंड देत पुन्हा शेती बहरली ,पाणी साठा वाढला पण मध्यंतरी पुन्हा गारपिटीन हाहा:कार माजवला आणि धरणात पाणी साठा भरपूर असतानाही योग्य नियोजना अभावी पाणी टंचाई निर्माण झाली दरम्यान सिंचन घोटाळा उघड झाला राजीनामा नाटय रंगल आणि आता निवडणूक पार पडून नवीन सरकार सत्तेत आलय मोदींनी पाणी स्वच्छतेला प्राधान्य दिलय ,कामही सुरु झालय आता तरी पाणी टंचाई संपेल का ? नियमित पाणीपुरवठा होईल का ? जनतेला पडणारे हे प्रश्न !
                       पूर्वी मुंबईतल्या चाळ संस्कृतीतली पाणी टंचाई सिनेमातून प्रतिबिंबित व्हायची आता सगळीकडेच पाणी टंचाईचा प्रश्न उदभवलाय काही ठिकाणी आठ दिवसातून काही ठिकाणी पंधरा दिवसातून पाणी सोडल्या जातय अस अकोला,लातूर,सोलापूर आणि इतर शहरी लोकांनी सांगितलं पूर्वी सोलापुरात सकाळ संध्याकाळ पूर्ण दाबान व्यवस्थित पाणी पुरवठा व्हायचा रंगपंचमी,ग्रहणात,ग्रहण संपल्यावर पाणी सोडल्या जायचं पण आता लोक पाणी टंचाईचा सामना करताहेत अकोल्यात  बायका आठ दिवसाच पाणी साठवून ठेवतात त्या ऐवजी दररोज पाणी सोडा अस त्याचं म्हणण आहे कारण अस जास्त दिवस साठवलेलं  पाणी आरोग्याला अहितकारक असत यंदा यवतमाळातही पाणी प्रश्न चांगलाच पेटला इथे वर्षभर एकदिवसा आड पाणी येत कधी तीनचार दिवसातून कमी दाबाने तर कधी केव्हाही अनियमित वेळी पाणी सोडल्या गेल्यान बायकांनी संतप्त मोर्चा काढून " आता अधिकारयांनाच पाणी पाजू " असा इशारा दिला तेव्हा जिल्हाधिकारी आणि संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीन बैठक घेवून पाणी पुरवठा सुरळीत  करण्यासाठी पावले उचलली अनियमित पाणी पुरवठयाच कारण कधी भारनियमन ,कधी फुटलेली जलवाहिनी ,खराब झालेले व्हाल्व आणि वाढत्या लोकसंखेच्या तुलनेत कमी पडणारया पाण्याच्या टाक्या अस देण्यात येत पावसाळ्यापूर्वी ह्या अडचणींच निवारण होण आवश्यक आहे कारण यवतमाळ येथे बाहेर धो धो पाऊस कोसळत असताना आणि धरणाचे दरवाजे उघडले असताना घरात मात्र नळाला पाणी नाही आणि आल तर थेंब,थेंब अशी परिस्थिती कित्येकदा होती फार पूर्वी यवतमाळात दुष्काळ होता पण वसंतराव नाईकांनी हरित क्रांती केली आणि पाणीप्रश्न सुटला खरोखरच २५-३० वर्षापूर्वी इथे पाण्याचा सुकाळ होता दररोज खूप फोर्सने पाणी यायचं ते वरपर्यंत चढायच टिल्लू पंप तर तेव्हा नव्हतेच आता लोकसंख्या वाढलीय ,दोनतीनदा दुष्काळही पडला,तेव्हा जिल्ह्यात अनेक धरण बांधल्या गेली यवतमाळ शहराला निळोना धरणाचे पाणी पुरवल्या जाते बेम्बळा प्रकल्प नुसताच गाजतोय दिग्रस मध्ये अरुणावती धरण होण्याआधी घरापुढे खडडा करून त्यात उतरून पाणी भराव लागे कारण पाणी खूप कमी दाबान येई पण अजूनही पाणी टंचाई असतेच घावंडा नदीला पूर येउन पाणी गावात शिरत  विशेष म्हणजे धरणग्रस्तांना अजूनही  योग्य मोबदला न मिळाल्यान संघर्ष करत ते न्यायालयात  गेलेत .
                        पाणी टंचाईची समस्या आता जागतिक झालीय ग़्लोबल वार्मिंग ,वाढती लोकसंख्या आणि जमिनीखालची आटत चाललेली पाणी पातळी ही कारण वैज्ञानिक सांगताहेत वाढलेल्या उष्णतेन  हिमालयातील बर्फ वितळू लागलाय आणि समुद्रातल पाणी बाष्फीभवना मुळे आटतय जाणकारांच्या मते तर तिसर युद्ध झाल तर ते पाण्यासाठी होईल म्हणूनच ह्या प्रश्नाकडे गांभीर्यान पाहिल जातय.
                  पाणी टंचाई वर उपाय म्हणून "Rain Water Harvesting" हि संकल्पना राबवल्या जातेय छतावरच पाणी पावसाळ्यात पाईप द्वारे जमिनीखाली टाकीत साठवून पंपाद्वारे फिल्टर करून त्याचा उपयोग सांडपाण्यासाठी करता येउ शकतो "चेंबूर इथल्या "मैसूर हौसिंग को ऑ. सोसायटीत" हा प्रकल्प बरयाच वर्षापासून यशस्वी पणे राबवल्या जातोय .
               पाऊस नियमित यावा या साठी वृक्ष संवर्धन हि संकल्पना राबवल्या जातेय पण घरगुती वृक्ष वाढीवर भर न देता जंगलातली अवैध वृक्षतोड रोखणे आवश्यक आहे कारण घरातील वृक्ष लागवड ऐछ्चीक असते त्यावर कर लावला जातो पण जंगलात बिनधास्तपणे अवैध वृक्षतोड होते त्या कडे लक्ष दिल्या जात नाही शिवाय शहराबाहेर  रस्ता रुंदीकरणाच्या वेळेस जर झाड तोडले गेले तर त्याच्या मागे दुसरे झाड लावणे बंधनकार केले जात नाही  विशेष म्हणजे जंगलातील झाडे तोडल्यान ती ओसाड होतात आणि जंगली प्राणी शहरात शिरतात  ह्या वर्षी वाघाने{बिबट्या}कित्येक ठिकाणी शहरात शिरून धुमाकूळ घातला होता.
                पाण्याची शुद्धताही तितकीच महत्वाची आहे कित्येकदा पाणी गढूळ असत ,काही ठिकाणी पाण्यात नारू ,जंतू निघण्याचे प्रकार घडतात मागे यवतमाळ येथील "सायखेडा धरण"व काही गावात फ्लोराईड युक्त दुषित पाणी पुरवठ्याने तिथल्या लोकांची हाडे व दात खराब झाले होते म्हणूनच पाणी पुरवठयासाठी योग्य नियोजन पावसाळा येण्यापूर्वी करणे आवश्यक आहे नवीन वस्त्यांमध्ये पाणीटाक्या बांधून नळाद्वारे पाणी सोडण्याची सोय करावी कारण नियमित नळ कनेक्शन असणारयांच पाणी कपात करून त्यांना दिल जात तर काही जण मधेच जलवाहिनी फोडून तिथूनच पाणी भरतात त्या मुळेही पाणी कमी फोर्सने व थेंब,थेंब येते शिवाय रखडलेले प्रकल्प सुरु करणे ,नदीकाठी बंधारा बांधून नदीतला गाळ पावसाळ्या पूर्वी साफ करणही  आवश्यक आहेच