दिवाळी संपताच बाजारात भाजीचा तुटवडा जाणवत असून बाजारात भाजीचे भाव वाढले आहेत
ह्या आठवडयात कोथिंबीर सर्वात महाग म्हणजे ५०रु. पाव किलॊ प्रमाणे विकल्या जात आहे तर बटाटे ,कांदे ४०रु. किलो ,मेथी २५ ते ३०रु. पाव किलो व इतर भाज्यांचे भावही ८० ते१००रु. किलोप्रमाणे वाढले आहेत बाजारात पालक कमी प्रमाणात विक्रीस आहे तर तुरीच्या शेंगाही विक्रीस आल्या असून त्यांचा भाव १५०-२००रु किलो आहे दरवर्षी दिवाळी नंतर कोथिंबीर(सांबार) व इतर पालेभाज्या बाजारात भरपूर प्रमाणात विक्रीस येतात ,त्यांचे भावही कमी असतात पण ह्या वर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे भाज्यांचे दर वाढल्याचे भाजी विक्रेते सांगतात
बाजारात संत्रीही विक्रीस आली असून नेहमीप्रमाणेच त्यांचा भाव ४०ते ८०रु. डझन असा आहे विशेष म्हणजे भाव जास्त असूनही संत्रीचा आकार मात्र लहान आहे गेल्या पाचसहा वर्षात संत्र्याचे भाव जास्त आणि आकार लहान अशी परिस्थिती असते संत्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या व जास्त उत्पन्न असलेल्या यवतमाळ करांना मात्र मोठी व स्वस्त संत्री मिळत नाही
No comments:
Post a Comment