गेल्या दोन महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या यवतमाळकरांना अखेर पावसाने दिलासा मिळाला असून सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर पर्यंत सतत पाऊस पडत होता
पांणी पुरवठा मात्र चार दिवसांनीच
उशिराने का होईना आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता मिटली असली तरी गृहिणींना मात्र अजूनही पाणी टंचाईला तोंड ध्यावे लागत असून गेल्या कित्येक वर्षापासून एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता चार दिवसांनी होत असल्याने महिलांची तारांबळ उडत आहे चार दिवसांनी जास्ती वेळ पाणी सोडण्यापेक्षा तेच पाणी नेहमीप्रमाणे एक दिवसाआड सोडण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे कारण एव्हढे पाणी साठवून ठेवताना त्यांची दमछाक तर होतेच शिवाय पाणी साठवण्यासाठी साधनेही कमी पडतात
Tanker चे पाणी गढूळ
पाणी पुरवठा चार दिवसांनी होत असल्यामुळे पाणी कमी पडल्यास Tanker चे पाणी आणल्यास ते अत्यंत गढूळ व दुर्गंधीयुक्त असते ते पाणी वापरणे आरोग्यास हानिकारक असल्याने नागरिक ते वापरू शकत नाहीत विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी सोडणार असल्याचे सांगण्यात येतेय पण अजूनही पाणी सोडल्या गेले नाही त्या मुळे नागरिक संतप्त झालेत. त्या मुळे संबंधीत अधिकाऱ्यांनी ह्याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी नागरिकांची मागणी आहे
यवतमाळ येथे पावसाची सततधार
यवतमाळ येथे थोडया विश्रांती नंतर शनिवार दुपारनंतर सोमवार पर्यंत सतत पाऊस पडत आहे कधी रिमझिम तर कधी जोरात पाऊस पडत आहे पावसाचा जोर शनिवारपासून मंगळवार सकाळपर्यंत अजूनही सुरु आहे गेल्या दोन महिन्यापासून पावसाची आतुरतेने वाट पाहणारे शेतकरी नागरिक ह्या पावसाने आनंदित झाले असले तरी पाणी साठयात अजूनही समाधान कारक वाढ न झाल्याने पाणी पुरवठा मात्र चार दिवसांनी होत आहे त्या मुळे बाहेर पाऊस पण नळाला मात्र पाणी नाही अशी इथली स्थिती आहे नागरिक पाणी टंचाईने त्रासलेले असून कधी पाणीपुरवठा नियमित होतोय याची वाट पाहत आहेत
पावसामुळे भाजीपाला महागला
आधी पाऊस नसल्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाला महाग होता विशेषत: कोथिंबीर ,कोबी,आले,मिरचीचे भाव वाढलेले होतेच आता पावसामुळे भाजी मार्केट मध्ये न आल्याने भाजीचे भाव वाढलेले आहेत एका भाजीवाल्याकडे भाजीचे भाव विचारले असता कोथिंबीर ८०रु. पाव किलौ व इतर भाजीपाल्याचे भाव देखील त्याच प्रमाणात वाढलेले होते फुल कोबी ४०रु ,कांदा बटाटा ,मेथी ,मिरची पालक यांचेही भाव ४०रु पाव ह्या प्रमाणात वाढलेले आहेत त्या मुळे पाऊस आला तरी पाणी पुरवठा चार दीवसांनी आणि भाजीचे भाव आवक्या बाहेर वाढल्याने आधीच महागाईने त्रासलेल्या गृहिणींना मात्र पावसा मुळे दिलासा मिळाला नाही

No comments:
Post a Comment