दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी वारकरी लाखोंच्या संख्येन पंढरपुरात दाखल झालेत ह्या वर्षी वारीतून काहीजणांनी पर्यावरणाच्या संतुलनाचा संदेश देत वारीच्या वाटेवर वृक्षारोपण करत प्लास्टिक वापरू नका असे आवाहन केले तर काहींनी पथनाट्यातून जनजागृती अभियान राबविले वारीतील गोंधळी,भारुडकार वासुदेव ,नकलाकार ह्यांनी आपल्या कला सादर करून वारीत रंगत आणली काही टाळकरयांनी टाळ मृदुंगाच्या सहाय्याने आपली वेगळी कला सादर केली काहींनी फुगडी खेळत वारीत मार्ग क्रमण केले त्यात बबनराव पाचपुते, हर्षवर्धन पाटील ह्यांचाही समावेश होता वारीचा इतिवृत्तांत वारीचा मुक्काम त्यांचे खाणेपिणे ,काहीठिकाणी मैलोनमैल चालूनही वारीतल्या महिलांनी केलेला चुलीवरचा स्वयंपाक तोही साधासुधा नाही तर हजारोंच्या संख्येत केलेल्या पुरणपोळ्या T. V. वरील मराठी वाहिनीचे पत्रकार लोकांपर्यंत पोहोचवत होते
ह्या वर्षी पावसान एकदोनदाच हजेरी लावल्यान उन्हाची तीव्रता होती तरीही वारीतील अबालवृद्ध न थकता पायी चालत पंढरपुरला जात होते वारीत सर्व थरातील लोक सामील झाले होते वारीत शेवटच्या मुक्कामात पाऊस आला तेव्हा थोडी तारांबळ उडाली तरीही हव्या असलेल्या पावसाचा आनंद लुटत वारकरी पंढरीकडे निघाले
वारीतील सुसूत्रता ,एकोपा आणि ,शिस्त ह्याच दर्शन ठिकठिकाणच्या रिंगण सोहळ्याच्या वेळेस पाहायला मिळाले शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम सोलापूर इथे तीन दिवस होता तेथील भाविकांनी त्यांना जेवण दिले ह्या पालखीकडे मात्र t.v. वाहिनीच्या पत्रकारांचे लक्ष गेलेले दिसले नाही गेल्या अनेक वर्षापासून शेगावची पालखी सोलापुरात्त विसावते
पंढरपुरात लोखोंच्या संख्येत भाविक दाखल
आषाढी एकादशी निमित्य आज पंढरपूर येथे जवळपास सहा सात लाख भाविक आले असून चंद्रभागेचा काठ भाविकांनी फुलून गेलाय.ह्या वर्षी पावसाअभावी चंद्रभागेत पाणी कमी असल्याने उजनी येथून पाणी सोडण्याची मागणी होती वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपुरातील जुन्या दगडी पुलाजवळील बंधाऱ्यातून नदीत पाणी सोडण्यात आले त्या मूळे वारकऱ्यांना नदीत स्नान करता आले गर्दीमुळे नदी माणसांनी गजबजली सार पंढरपुरच माणसांनी भरून गेलय आणि विठूनामाच्या गजरात न्हावून निघालय
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न पण पूजेआधी मुख्य मंत्र्यांची केली अडवणूक
आज पहाटेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नींच्या हस्ते विठोबाची महापूजा करण्यात आली पण पूजेला उशीर झाला कारण वारकरी संप्रदायाचे प्रमुख बंड्यातात्या कराडकर ह्यांनी गोहात्त्या बंदी चा कायदा करावा त्या शिवाय त्यांना पूजा करू दिल्या जाणार नाही अशी भूमिका घेतली तसा इशारा त्यांनी आधीच दिला होता जेव्हा मुख्यमंत्र्यांनी तसा कायदा आहे लवकरच त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले तेव्हा त्यांना आत सोडण्यात आले. ह्या वर्षी पहिल्या पूजेचा मान शेळके दाम्पत्यांना मिळाला
दर्शनाला लांबच लांब रांगा
दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून दर्शन रांग सहा Km पर्यंत पोहोचली आहे काही भाविक आदल्या दिवसापासून रांगेत उभे होते एका मिनिटाला तीस,चाळीस भाविक दर्शन घेत असून मुखदर्शनासाठी वेगळी रांग लावण्यात आली आहे. मंदिरात व मंदिराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून त्या साठी सोलापूरहून ३००० ग्रामीण पोलिस बोलावण्यात आले आहेत काही सामाजिक संघटना वारकरयांसाठी लागेल ती मदत देण्यास हजर आहेत. वारकरयांसाठी मंदिर प्रशासनातर्फे बुंदीच्या लाडवाचा प्रसाद तयार केला असून काही भाविकांनी बाहेर गावाहून शेंगदाण्याचे लाडू करून पाठवले आहेत पंढरपूर नगरपरिषद देखील नागरिकांच्या सोयी,सुविधेसाठी प्रयत्न करत आहे.

No comments:
Post a Comment